Friday, 9 June 2017

शिवसेनेची साथ, काँग्रेसचे जावेद दळवी भिवंडीचे नवे महापौर

शिवसेनेची साथ, काँग्रेसचे जावेद दळवी भिवंडीचे नवे महापौर


मालेगावप्रमाणे भिवंडी महापालिकेतही शिवसेना आणि काँग्रेस अशी युती पाहायला मिळाली. त्यामुळेच काँगेसचे जावेद दळवी हे भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झाले.जावेद दळवी यांनी भाजप उमेदवार प्रकाश तावरे यांचा पराभव केला.जावेद दळवी यांना 90 पैकी तब्बल 62 मतं मिळाली. दळवी हे दुसऱ्यांदा महापौरपदी विराजमान झाली आहे. तर काँग्रेसने पहिल्यांदाच बहुमताने सत्ता स्थापन केली आहे.महापौर निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना अशी अजब युती पाहायला मिळाली.
काल मालेगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीतही शिवसेना-काँग्रेसची युती झाली होती. विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं स्पष्टीकरण काल शिवसेनेने दिलं होतं.दरम्यान,  भिवंडी महापालिका निवडणुकीत एकूण 90 पैकी 47 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. तर भाजपला 19 जागीच विजय मिळवता आला होता.दुसरीकडे शिवसेना 12 आणि कोणार्क विकास आघाडी 4, आरपीआयने 4 जागा जिंकल्या होत्या.
भिवंडी महापालिका निकाल – एकूण जागा 90
  • काँग्रेस- 47 विजयी
  • भाजप- 19 विजयी
  • शिवसेना 12 विजयी
  • कोणार्क-4 विजयी
  • समाजवादी-2 विजयी
  • आरपीआय-4 विजयी
  • राष्ट्रवादी-0
  • अपक्ष 2

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.