करोनाच्या काळातील निवडणुकांसाठी आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर; रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा
बिहार विधानसभा निवडणुकांबरोबर महाराष्ट्रातील रिक्त जागांच्या देखील निवडणुका जाहीर होणार
कोरोना संसर्गजन्य महामारी रोगामुळे देशातील सर्वच संचलन व नियोजित प्रक्रिया खंडित झाल्याचा विपरीत परिणाम निवडणूक आयोगाच्या कामकाजावर देखील झाला. जाहीर झालेल्या व रिक्त जागांच्या निवडणुका अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आलेल्या होत्या. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणत कमी होत असून निवडणुका लांबवणे घटनात्मकदृष्ट्या अशक्य होत असल्याने कोरोना काळात सर्व दक्षता घेऊन निवडणुका पार पडण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे, या पार्श्वभूमीवर करोनाच्या कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकांबरोबर महाराष्ट्रातील रिक्त जागांच्या देखील निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह शिक्षक, पदवीधर मतदारसंघ विधानपरीषदेच्या रिक्त जागांवर देखील लवकरच निवडणुका होऊ शकतात. औरंगाबाद, नवी मुंबई महापालिका सह नगरपरिषद व ग्रामपंचायतीच्या मुदत संपलेल्या आणि कोरोनामुळे रखडलेल्या निवडणुका पार पडण्याचा मार्ग व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याने सुकर झालेला आहे. पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासह अन्य विधानपरिषदेच्या रिक्त जागांच्या देखील निवडणुका आगामी 2 ते 4 महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान करोनाच्या कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे (ईव्हीएम) बटण दाबण्यासाठी मतदारांना हातमोजे उपलब्ध करून देण्यात येणार असून अलगीकरणात असलेल्या रुग्णांना मतदानाच्या दिवशी अखेरच्या एका तासात मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. वापर केल्यानंतर विल्हेवाट लावता येतील असे हातमोजे देण्यात येण्याची शक्यता आहे. जो परिसर संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे तेथील मतदारांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत. मतदान केंद्रांचे मतदानाच्या आधीच्या दिवशी र्निजतुकीकरण करणे बंधनकारक करण्याची शिफारसही निवडणूक आयोगाने केली आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेश द्वारावर थर्मल चाचणी यंत्र बसविण्यात येणार असून निवडणूक अथवा निमवैद्यकीय कर्मचारी मतदारांची थर्मल चाचणी करणार आहेत. मतदान केंद्रात १५०० ऐवजी जास्तीत जास्त एक हजार मतदारांना प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारासह पाच जणांच्या एका गटाला घरोघरी प्रचारात सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे, मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रचारात सहभागी होण्याची मनाई करण्यात आली आहे. रोड-शोमध्ये पाच वाहनांच्या ताफ्यानंतर अंतर ठेवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे जाहीर सभा, मेळावे कोविड-१९च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आयोजित करता येऊ शकतात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने जाहीर सभांसाठीची मैदाने वेळेपूर्वीच निश्चित करावयाची असून तेथे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित करणे गरजेचे आहे. या मैदानांमध्ये सामाजित अंतर राखण्यासाठी खुणा करणे आवश्यक आहे. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने जाहीर सभेसाठी किती जणांच्या उपस्थितीला मान्य दिली आहे त्याप्रमाणे लोक उपस्थित राहतील याची खबरदारी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घ्यावयाची आहे, असे आयोगाने म्हटले आहे. करोनाच्या काळात विधानसभेची निवडणूक होणारे बिहार हे पहिले राज्य आहे. तेथे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यानुसार कोरोना काळातील ही पहिली निवडणूक असल्याने मतदार, उमेदवार, अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी वेगवेगळे निर्देश आहेत. यात मतदारांसाठी पोलिंग बूथवर ईव्हीएमचे बटण दाबण्यासाठी व स्वाक्षरी करण्यासाठी ग्लोव्हज दिले जातील. निवडणुकीवेळी कोणत्याही कामादरम्यान मास्क घालावा लागेल. इलेक्शनसाठी वापरण्यात येणार्या रुम, हॉल किंवा कोणत्याही परिसरावर थर्मल स्कॅनर, सॅनिटायजर, साबन आणि पाणी ठेवावे लागेल. प्रत्येकाची स्कॅनिंग होईल. सरकारी निर्देशांनुसार सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल. यासाठी मोठा हॉल किंवा परिसराचा वापर करावा लागेल. निवडणूक अधिकारी, सुरक्षेतील कर्मचारी यांच्यासाठी ट्रांसपोर्टेशन दरम्यान वाहने ठेवणे गरजेचे असेल. बूथमध्ये प्रवेशापूर्वी प्रत्येक मतदाराची थर्मल स्कॅनिंग होईल. उमेदवार आपले अर्ज, अनामत रक्कम इत्यादी ऑनलाइन भरता येईल. त्याची प्रिंट काढून ती रिटर्निंग ऑफिसरकडे सोपवता येईल. एवढेच नव्हे तर घरोघर प्रचारासाठी फक्त पाच समर्थकांनाच परवानगी असेल. आयोगाने राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांकडून कोरोना काळात निवडणूक घेण्याबाबत सूचना मागवल्या होत्या.
कुणासाठी काय निर्देश?
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मतदारांसाठी -
>अंगात ताप अधिक असेल तर सर्वात शेवटी मतदान करू शकतील,
>कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शेवटच्या तासात किंवा टपालाने मतदान करू शकतील,
पोस्टल बॅलटद्वारे मतदान कोण करू शकेल?
> दिव्यांग
> 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदानर
> अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी
> कोरोना पॉझिटिव्ह किंवा कोरोना संशयित
मतदारांसाठी निर्देश -
> मतदारांना ईव्हीएम बटण दाबण्यासाठी आणि मतदार नोंदणी वहीत स्वाक्षरी करताना हातमोजे दिले जातील. ते शक्यतो डिस्पोझल असतील.
> क्वाॅरंटाइन कोविड-१९ रुग्ण शेवटच्या तासात मतदान करू शकतील.
> कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या मतदारांसाठी वेगळे निर्देश असतील.
> मतदारांना ओळख पटवण्यासाठी आपला मास्क नाकाखाली घ्यावा लागेल.
उमेदवारांसाठी निर्देश -
> उमेदवार आपला अर्ज, शपथपत्र आणि अनामत रक्कम ऑनलाइन जमा करू शकतात. त्याची प्रिंट रिटर्निंग ऑफिसरला द्यावी लागेल.
> उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारासोबत २ व्यक्ती आणि दोनच वाहने नेता येतील.
> घरोघर प्रचाराच्या वेळी उमेदवारासोबत पाच व्यक्तीच जाऊ शकतील. यात सुरक्षा जवानांचा समावेश नाही.
> जाहीर सभा आणि रोड शोची परवानगी गृह मंत्रालय तसेच राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले तरच मिळेल.
> रोड शोमध्ये दर पाच वाहनांनंतर अंतर ठेवावे लागेल. यात सुरक्षा वाहनांचाही समावेश आहे. आतापर्यंत ही संख्या १० अशी होती.
> जाहीर सभा व प्रचार फेऱ्या काेविड-१९च्या निर्देशांनुसारच होऊ शकतील.
> जिल्हा निवडणूक अधिकारी सभांसाठी मैदाने ठरवतील. तेथे येण्या-जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतील. मैदानावर फिजिकल डिस्टन्सिंगसाठी मार्किंग असेल.
मतदान केंद्रांसाठी निर्देश -
> मतदानापूर्वी एक दिवस केंद्र सॅनिटाइझ केले जाईल. येथे प्रवेश व बाहेर पडताना साबण, पाणी आणि सॅनिटायझर असेल.
> प्रत्येक केंद्राबाहेर मतदारांचे थर्मल स्क्रीनिंग होईल. मतदान कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ किंवा आशा कर्मचारी हे काम करतील. दोन वेळा तपासणीनंतर शरीराचे तापमान अधिक वाटले तर मतदारास पोलचिट देऊन मतदानासाठी शेवटच्या तासात येण्यास सांगितले जाईल.
> एका बूथवर १ हजार लोक मतदान करू शकतील. पूर्वी ही संख्या १५०० होती.
> ईव्हीएम-व्हीव्हीपॅटसंबंधी अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही हातमोजे दिले जातील.
ईव्हीएम/व्हीव्हीपॅट
> पहिल्या आणि दुसऱ्या ईव्हीएमसंबंधित प्रत्येक काम मोठ्या हॉलमध्ये व्हायला हवे.
> सॅनिटायजरचा मोठा साठा करावा लागेल.
> ईव्हीएम/व्हीव्हीपॅटला सांभाळणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला ग्लव्ज घालावे लागतील.
नॉमिनेशन प्रॉसेस
> नॉमिनेशन फॉर्म ऑनलाइन दिले जातील. उमेदवार फॉर्म ऑनलाइनदेखील भरू शकतात.
> शपथपत्रही ऑनलाइन भरता येईल. त्याची प्रिंट आपल्याकडे ठेवता येईल. नोटरीकरणानंतर त्याला निवडणूक अर्जासोबत अधिकाऱ्याला देता येईल.
> उमेदवार ऑनलाइन आणि ऑफलाइन, अशा दोन्ही पद्धतीने डिपॉझिट भरू शकतील.
> नॉमिनेशन फॉर्म भरताना उमेदवारासोबत दोनपेक्षा जास्त लोक नसावेत. त्यांना दोनपेक्षा जास्त गाड्या घेऊन फिरण्याची परवानगी नसेल.
> उमेदवारांना वेगवेगळ्यावेळी बोलवण्यात येईल.
पोलिंग बूथ
> एका पोलिंग बूथवर 1500 ऐवजी 1000 मतदार बोलवले जातील.
> मतदानापूर्वी पोलिंग स्टेशन सॅनिटाइज केला जाईल.
> प्रत्येक बुथच्या एंट्री पॉइंटवर थर्मल स्कॅनर लावला जाईल. प्रत्येकाची थर्मल स्क्रिनींग होईल.
> ज्या मतदाराचे तापमान जास्त असेल, अशांना शेवटच्या तासात मतदान करता येईल.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.