Friday 21 August 2020

राज्यसभेच्या एका जागेसाठी ११ सप्टेंबरला होणार पोटनिवडणूक

 राज्यसभेच्या एका जागेसाठी ११ सप्टेंबरला होणार पोटनिवडणूक

समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांच्या निधनानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर ११ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. समाजवादी पक्षाचे अमर सिंह यांच्या निधनानंतर त्यांची जागा रिक्त झाली असून निवडणुक आयोगाने आज (ता. २१) याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. अमर सिंह यांना किडनीसंबधित आजार असल्याच्या कारणाने त्यांच्यावर सिंगापूरमधील एका रुग्णालयात उपचार चालू होते. परंतु, उपचारांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांचे निधन झाले. दरम्यान, उत्तर प्रदेशमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेले होते. त्यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत असल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आयोगाकडून येत्या २५ ऑगस्ट रोजी अधिकृतरित्या एक आदेश जारी करण्यात येईल. त्या आदेशानुसार ११ सप्टेंबर रोजी मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दरम्यान, अमर सिंग यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. त्यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही झाली होती. उत्तर प्रदेशातील दिग्गज नेत्यांपैकी एक असेलेल्या अमर सिंग हे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जात होते. समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर राजकारणातही ते फारसे सक्रीय नव्हते. 5 जुलै 2016 मध्ये त्यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली होती. दरम्यान, आजारी पडण्याआधीच त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही राज्यसभेपासूनच झाली होती. 1996 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभा खासदार झाले होते. त्यानंतर 2002 आणि 2008 मध्येही ते राज्यसभेचे खासदार झाले होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.