Saturday, 1 August 2020

घर बसल्या बदला मतदान ओळखपत्रावरील फोटो

घर बसल्या बदला मतदान ओळखपत्रावरील फोटो

How to update photo in voter id card online : मतदान ओळखपत्र कोणत्याही भारतीय नागरिकासाठी एक महत्वाचा पुरवा आहे. निवडणुकीत मदतान करण्यासाठी ओळखपत्राचा वापर होतो. त्याशिवाय इतर सरकारी कामाला मतदान ओळखपत्र पुरवा म्हणून वापरलं जातं. आपली ओळख दाखवणाऱ्या या मतदान ओळखपत्रात नेहमी अद्यवत माहिती भरणं गरजेचं आहे. त्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही. घरबसल्या ऑनलाइन तुम्ही सर्व बदल करु शकता. मतदान ओळखपत्रावरील फोटो किंवा इतर माहिती बदलण्यासाठी सोप्या पद्धतीचा वापर करावा. मतदान ओळखपत्रावर फोटो व्यवस्थीत नसल्यास अनेक सराकारी कामं होत नाहीत. सरकारी योजना, बँकिगसह अन्य ठिकाणी ओळखपत्र पुरवा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यावर फोटो व्यवस्थित असल्यास अडचणी कमी येतात. मतदान ओळखपत्रावरील फोटो बदलण्यासाठी नॅशनल वोटर्स सर्विसच्या अधिकृत संकेतस्थळ www.nvsp.in ला भेट द्या. ८ नंबरचा अर्ज पूर्ण भरा. यावर क्लिक केल्यानंतर फोटो बदलण्याचा पर्याय दिसेल. ऑनलाईन चौकशी झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-आईडी मागीतले जाईल. महिनाभराच्या आत तुमच्या फोटोमध्ये बदल होतील. पत्ता बदलायचा असल्यास काय कराल. www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर correction of entries in electoral roll दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर पत्ता बदलण्याचा पर्याय दिसेल. पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, वाहन परवाना, पासपोर्ट यांसारख्या शासकीय कागदपत्रांची छायाप्रत मागितली जाते. अपडेट झाल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक मागितला जाईल. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर तुमचा नवीन मतदान ओळखपत्र तुमच्या राहत्या घरात पोहोचवला जाईल.

असा करा मतदार ओळखपत्र तपशील डाउनलोड

मतदार ओळख पत्र केवळ नागरिकाला निवडणुकीमध्ये घटनात्मक आणि लोकशाहीतील मतदानाचाच हक्क प्रदान करत नाही, तर ते आपल्या नागरिकत्वाचेही ओळखपत्र आहे. भारतात सध्या ड्युप्लीकेट मतदार ओळखपत्र ऑनलाइन डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, आपण आपल्या मतदार ओळखपत्राचा तपशील नक्कीच ऑनलाइन डाउनलोड करू शकतो. तर, पाहुया कशी डाउनलोड करायची मतदार ओळखपत्राची माहिती. सर्वप्रथम Electoralsearch.in या वेबसाइटला भेट द्या. येथे तुम्हाला २ टॅब आढळतील. त्यांपैकी एका टॅबमध्ये तुम्ही तुमचे नाव आणि इतर आवश्यक ती माहिती नमूद केल्यानंतर मतदार ओळखपत्राचा तपशील मिळेल. तर दुसऱ्या टॅबमध्ये तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्राचा EPIC No. अर्थात, मतदार ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल. पाहुयात, दोन्ही पद्धतीने कशी डाउनलोड करायची मतदार ओळखपत्राची माहिती..
पहिली पद्धत
१. तुमच्याकडे मतदार ओळखपत्र क्रमांक नसल्यास 'विवरण द्वारा खोज' टॅबवर क्लिक करा.
२. या साठी आपल्याला खालील माहिती द्यावी लागेल:
नाम/Name- तुमचे पूर्ण नाव इथे लिहा
पिता/पति का नाम (Father’s/Husband’s Name)- आपले वडील/पतीचे नाव टाइप करा
लिंग / Gender- आपले लिंग निवडा
उम्र / Age या जन्म तिथि / DoB- यापैकी एक निवडा
राज्य / State- आपल्या राज्याची निवड करा
जिला / District- आपला जिल्हा निवडा
विधानसभा निर्वाचन क्षेत्र / Assembly Constituency- अपल्या विधानसभा मतदारसंघाची निवड करा
कोड/ Code- बॉक्समध्ये दिलेल्या ५ अंकी कोड अचूकपणे भरा
३. डिटेल्स दर्ज करने के बाद ' खोजें/ Search' वर क्लिक करा
४. या नंतर खाली दिसत असलेली माहिती आपल्याला दिसेल
. या नंतर समोर आलेल्या विकल्पांपैकी ' View Details' वर क्लिक करा
६. आपल्याबाबतचा सर्व तपशील नव्या टॅबमध्ये उघडेल. खाली दिलेल्या 'मतदाता सूचना प्रिंट करें' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर हा तपशील पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड होईल.
दुसरी पद्धत
१. तुमच्या कडे तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC Number) असल्यास http://electoralsearch.in ला भेट देत दुसरे टॅब निवडा
२. येथे तुम्हाला तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक संख्या, राज्य आणि बॉक्समध्ये दिसणारा Captcha Code टाकावा लागेल
३. ही माहिती भरल्यानंतर 'खोजें/ सर्च' वर क्लिक करा
४. या नंतर आपल्या समोर संपूर्ण तपशील येईल. त्या नंतर ' View Details' वर क्लिक करा
५. तुमचा सर्व तपशील नव्या टॅबमध्ये उघडेल. खाली दिलेल्या 'मतदाता सूचना प्रिंट करें' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर हा तपशील पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड होईल.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.