Friday, 26 February 2021

Assembly Elections: पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; ‘या’ तारखेला निकाल

पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि पुडुचेरीमध्ये निवडणुका 
निवडणूक आयोगाने शुक्रवारी चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश (पुदुचेरी) मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात तर आसाममध्ये तीन फेजमध्ये मतदान होईल. मतदान प्रक्रिया २७ मार्चला सुरु होईल. तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमध्ये एकाच टप्प्यात सहा एप्रिलला मतदान होणार आहे. सर्व राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांचे निकाल दोन मे रोजी जाहीर होतील. एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. १८.६८ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. २.७ लाख मतदान केंद्र असणार आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या सर्वाधिक २९४, तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये १२६ आणि पुदुचेरीत ३० विधानसभा जागांसाठी मतदान होईल. नोव्हेंबर २०२० मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर आता करोनाकाळात या पाच राज्यांमध्ये निवडणूक होत आहे. आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या फेजमध्ये २७ मार्चला, त्यानंतर एक एप्रिल आणि सहा एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. तर राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आठ फेजमध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, 'मागच्या वर्षी सर्व जगासमोर कोरोनाचे संकट उभे होते, तेव्हा जगभरातील निवडणूक आयोगांसमोर निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान होते. अनेक देशांनी अशा परिस्थिती हिम्मत दाखवली आणि सर्व नियमांचे पालन करुन निवडणुका घेतल्या. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 18 जागांवर जून 2020 मध्ये निवडणुका घेऊन सुरुवात केली. आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान बिहारचे होते. तिथे 7.3 कोटी मतदानर होते. 'मला सांगताना आनंद होतो की, बिहारच्या मतदारांनी विश्वास दाखवला आणि निवडणुकीत सहभाग नोंदवला. बिहारमध्ये अनेक अधिकाऱ्यांना कोरोना झाला होता, तरीदेखील निवडणुकीची तयारी केली. बिहारमध्ये 57.3% मतदान झाले, जे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त आहे. '80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, अपंग आणि इतर महत्वाच्या नोकऱ्यांमध्ये असलेले लोकांना पोस्ट बॅलेटद्वारे मतदान करता येईल. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचे लसीकरण होईल. याशिवाय, मतदान करण्यासाठी 1 तास वाढून दिला जाईल. 5 राज्यांमधील 824 जागांसाठी निवडणूक होईल. यासाठी 18.68 कटो मतदार असून, त्यांच्यासाठी 2.7 लाख मतदान केंद्र असतील. आरोरा पुढे म्हणाले की, 'असाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मेपर्यंत आहे. याचप्रकारे तमिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 24 मे, बंगालचा 30 मे, केरळचा 1 जून आणि पुडुचेरीचा 8 जूनपर्यंत आहे. 824 विधानसभा जागांसाठी 18.68 कोटी मतदार असतील आणि 2.7 लाख मतदान केंद्र बनवले जातील. तमिळनाडूमध्ये 66 हजार, असाममध्ये 33 हजार, बंगालमध्ये 1 लाख 1 हजार 916 मतदान केंद्र असतील.

पुदुचेरी निवडणूक कार्यक्रम (३० जागा)

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये एका फेजमध्ये निवडणूक होईल.
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

तामिळनाडूचा निवडणूक कार्यक्रम (२३४ जागा)

तामिळनाडूत विधानसभेच्या २३४ जागांसाठी एका फेजमध्ये मतदान होईल.
अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – १९ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

केरळचा निवडणूक कार्यक्रम (१४० जागा)

अधिसूचना जारी होणार – १२ मार्चला
उमेदवारी अर्जाची छाननी – २० मार्च
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २२ मार्च
केरळमध्ये मतदान – सहा एप्रिल
मतमोजणी – दोन मे

देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि पुडुचेरीमध्ये निवडणुका होतील. पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका होणार आहे. याशिवाय, असाममध्ये 3 टप्प्यात, तमिळनाडू , केरळमध्ये आणि पद्दुचेरीमध्ये एका टप्प्यात निवडणूक होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्चला होईल आणि सर्व राज्यांचा निकाल 2 मे रोजी जाहीर होईल.

बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान

पहिला टप्पा
जागा: 30 (पुरुलिया, बांकुड़ा, झाड़ग्राम, पश्चिम मेदिनीपुर, पूर्व मेदिनीपुर)
अधिसूचना: 2 मार्च
अर्ज भरणे: 9 मार्च
अर्ज मागे घेणे: 12 मार्च
मतदान: 27 मार्च
मतमोजणी: 2 मे
दुसरा टप्पा
जागा: 30 (बांकुड़ा, पश्चिमी मेदिनीपुर, पूर्व मेदिनीपुर, दक्षिण-24 परगना)
अधिसूचना: 5 मार्च
अर्ज भरणे: 12 मार्च
नाव परत घेणे: 17 मार्च
मतदान: 1 एप्रिल
तिसरा टप्पा
जागा: 31
अधिसूचना: 12मार्च
अर्ज भरणे: 19 मार्च
अर्ज परत घेणे: 22 मार्च
मतदान: 6 एप्रिल
चौथा टप्पा
जागा: 44
अधिसूचना: 16 मार्च
अर्ज भरणे: 23 मार्च
नाव परत घेणे: 26 मार्च
मतदान: 10 एप्रिल
पाचवा टप्पा
जागा: 45
अधिसूचना: 23 मार्च
अर्ज भरणे: 30 मार्च
नाव परत घेणे: 3 एप्रिल
मतदान: 17 एप्रिल
सहावा टप्पा
जागा: 43
अधिसूचना: 26 मार्च
अर्ज भरणे: 3 एप्रिल
अर्ज परत घेणे: 7 एप्रिल
मतदान: 22 एप्रिल
सातवा टप्पा
जागा: 36
अधिसूचना: 31 मार्च
अर्ज करणे: 7 एप्रिल
अर्ज परत घेणे: 12 एप्रिल
मतदान: 26 एप्रिल
आठवा टप्पा
जागा: 35
अधिसूचना: 31 मार्च
अर्ज भरणे: 7 एप्रिल
नाव परत घेणे: 12 एप्रिल
मतदान: 29 एप्रिल

आसाममधील निवडणुकीच्या तारखा

पहिला टप्पा
जागा: 47
अधिसूचना: 2 मार्च
अर्ज भरणे: 9 मार्च
नाव परत घेण्यासाठी: 12 मार्च
मतदान: 27 मार्च
मत मोजणी: 2 मे
दुसरा टप्पा
जागा: 39
अधिसूचना: 5 मार्च
अर्ज भरणे: 10 मार्च
अर्ज परत घेणे: 17 मार्च
मतदान: 1 एप्रिल
तिसरा टप्पा
जागा: 40
अधिसूचना: 12 मार्च
अर्ज भरणे: 19 मार्च
अर्ज परत घेणे: 22 मार्च
मतदान: 6 एप्रिल

केरळमध्ये एका टप्प्यात मतदान होईल

अधिसूचना: 12 मार्च
अर्ज भरणे: 19 मार्च
नाव परत घेणे: 22 मार्च
मतदान: 6 एप्रिल

पुडुचेरीचा शेड्यूल

अधिसूचना: 12 मार्च
अर्ज भरणे: 19 मार्च
अर्ज परत घेणे: 22 मार्च
मतदान: 6 एप्रिल

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध भाजप

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला तब्बल 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे आणि काँग्रेस आघाडीला 76 जागा मिळाल्या होत्या. केवळ 3 जागा मिळवणाऱ्या भाजपने यावेळी मात्र पश्चिम बंगालमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे.2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 42 पैकी 18 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत यंदा सत्ताच स्थापन करू असे भाजपचे म्हणणे आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दरवेळी डावे विरुद्ध तृणमूल पाहायला मिळत होते. भाजपला यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र ही निवडणूक भाजप विरुद्ध तृणमूल अशी रंगली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, डावे आणि इंडियन सेक्युलर फ्रंट यांच्यात आघाडी शक्य आहे. फुरफुरा शरीफ यांच्या इंडियन सेक्युलर फ्रंटला 30 जागा दिल्या जाणार अशीही चर्चा आहे.

आसामात 126 जागांवर निवडणूक

2016 च्या निवडणुकीत या ठिकाणी भाजपला सत्ता मिळाली. भाजपला 126 पैकी 86 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 26, AIUDF ला 13 जागा आणि इतरास एक जागा मिळाली होती.

तामिळनाडूत 234 जागांवर चुरस

तामिळनाडूत 134 जागांवर विजय मिळवून AIDMK (अन्ना द्रमुक) आघाडी सत्ता स्थापित केली. गठबंधन ने सरकार बनाई थी। DMK (द्रमुक) आणि काँग्रेस आघाडीला 98 जागा मिळाल्या होत्या.

केरळमध्ये 140 जागांवर लढत

देशात एकमेव राज्य केरळमध्ये डाव्यांची सत्ता आहे. केरळमध्ये सध्या डाव्यांच्या 91 आणि काँग्रेसच्या 47 जागा आहेत. भाजपच्या आणि इतर एका पक्षाला प्रत्येकी एक-एक जागा मिळाली होती.

पुद्दुचेरीत 30 जागांवर निवडणूक

केंद्र शासित प्रदेश पुद्दुचेरीत 30 जागांवर निवडणूक होणार आहे. तर येथे 3 जागा नामनिर्देशित असतात. या ठिकाणी आतापर्यंत काँग्रेस आघाडीची सत्ता होती. पण, गेल्या आठवड्यात निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदारांनी काँग्रेस सोडल्याने सरकार अल्पमतात आले. परिणामी मुख्यमंत्री नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

" चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे" या पुस्तकाचे प्रकाशन; कामाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिगत संबंध जपणे मोठे कौशल्य

कामाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिगत संबंध जपणे मोठे कौशल्य : राजू शेट्टी
 
    
पुणे- इरसाल पुढारी, नेते यांना सांभाळून ग्रामीण भागात पत्रकारिता करणे खूप अवघड असते. ही जबाबदारी पार पाडताना, कामाच्या पलीकडे जाऊन सर्वांशी व्यक्तिगत संबंध जपणे हे मोठे कौशल्य असते. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
     जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी लिहिलेल्या " चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे" या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी शेट्टी, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे व जेष्ठ पत्रकार पराग करंदीकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी शेट्टी बोलत होते. यावेळी भाजपा नेते बाबा जाधवराव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.
        शेट्टी म्हणाले, १९९० नंतर पत्रकारितेचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहे. आज लेखणीवर निष्ठा ठेऊन काम करणारे पत्रकार खूप कमी दिसतात. आपली पत्रकारिता करताना समयसूचकता राखून समाजहिताचे काम करणे ही सोपी गोष्ट नाही. श्याम दौंडकर यांनी ग्रामीण भागातून येऊन, खडतर आयुष्य जगून समाजहिताची पत्रकारिता केली आहे. हे काम करताना काही किस्से घडले ते आज खुमासदार पद्धतीने या पुस्तकात मांडण्यात आले आहेत.
       खासदार बारणे यांनी डिजिटलच्या युगातही वर्तमानपत्राचे महत्व कमी झाले नसल्याचे सांगून, प्रत्येक माणूस हा सकाळी प्रथम वर्तमानपत्र वाचतोच याकडे आवर्जून लक्ष वेधले. पत्रकारिता करताना घडलेले किस्से लिहून काढणे व तो ठेवा पुस्तकरुपी समाजासमोर मांडणे हे काम दौंडकर यांनी केले आहे. निर्मला पानसरे यांनी पत्रकार व लोकप्रतिनिधी यांचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगून, पत्रकार हा जनसामान्यांना न्याय देणारा महत्वपूर्ण घटक असल्याचे सांगितले. पराग करंदीकर यांनी श्याम दौंडकर यांनी, एका पुस्तकाचे लिखाण करून न थांबता पुढील आयुष्यात ही लिहीत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी बाबा जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य विश्वजित जगदाळे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
        श्याम दौंडकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात आपल्या ३० वर्षाच्या पत्रकारितेतील किस्से या पुस्तकात लिहिले असल्याचे सांगितले. हा पुस्तक प्रकाशन सोहळा हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असल्याच्या भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी पुस्तक प्रकाशित करणाऱ्या 'लोकमित्र प्रकाशन' चे चंद्रकांत भुजबळ यांचा सत्कार शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार प्रकाश भोईटे, विठ्ठल जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पांडुरंग खेसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का डोंगरे यांनी केले.

"चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे" इ-बुक आवृत्ती उपलब्ध 

जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांचे लिखित व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) 'लोकमित्र प्रकाशन' निर्मित 'चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे' या पुस्तकाचे प्रकाशन निर्मिती जानेवारी 2021 मध्ये करण्यात येऊन प्रकाशन दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आले आहे. या पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या 240 असून किंमत 300/- रुपये आहे. तर इ-बुक आवृत्तीची सवलत किंमत 200/- आहे. पुस्तकाची हि प्रथम आवृत्ती आहे. या पुस्तकामध्ये जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी पत्रकारितेतील काही स्मरणीय घटना व किस्से कथन केलेले आहेत. वृत्तपत्रात कार्यरत असताना नकळत घडलेल्या मुद्रणदोष आणि त्यामधून झालेली विनोदाची निर्मिती असे प्रसंग या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेले आहेत. अशा मुद्रणदोषामुळे घडलेल्या विनोदांचे संकलन महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील असंख्य पत्रकारांकडून केलेले आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच प्रकाशन साहित्यासह सामान्यांना या पुस्तकातून वाचनीय आकर्षण, प्रेरणा, अनुभव तसेच मुद्रणदोष महत्व, परिणाम याबाबत माहिती या पुस्तकामध्ये मिळेल. पत्रकारीतेक्षेत्रात नकळत घडलेल्या चुकांचा होणारा विपरीत परिणाम व विनोद निर्मिती, अशा स्वरूपाच्या मुद्रणदोष निदर्शनास आणून भविष्यात कार्यरत असताना चुका, दोष  होऊ नये म्हणून मार्गदर्शनपर लेखनाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. 

"चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे" पुस्तकाच्या इ-बुक आवृत्तीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

=====================
Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  
 

Monday, 22 February 2021

महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषदांच्या नियोजित निवडणुकांना कोरोनाचा अडसर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा कोरोनाचे सावट

180 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुका 

राज्यातील 5 महानगरपालिका व 2 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 95 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांवर पुन्हा कोरोनाचे संकट ओढवलेले आहे. त्यामुळे या निवडणुका नियोजित वेळेत होण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. तर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुक आणि विविध 19 जिल्हा परिषदा आणि 27 पंचायत समित्यांमधील 60 रिक्तपदांच्या पोटनिवडणूक तसेच विविध 31 नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील 35 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांना देखील कोरोनाचा अडसर निर्माण झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे तर इच्छुकांकडून केलेल्या पूर्वतयारीवर केलेल्या खर्चावर कोरोनामुळे पाणी फेरले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महाआघाडीकरून निवडणुकांना सामोरे जावे असा मतप्रवाह प्रमुख नेत्यांमध्ये असून कॉंग्रेसच्या वेगळ्या आक्रमक भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. मंत्र्यांवर झालेल्या गंभीर आरोप-प्रत्यारोपाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर विपरीत परिणाम होण्याच्या भीतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाणे पथ्यावर असल्याच्या देखील प्रतिक्रिया राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहेत. 180 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुका आणि 95 नगरपरिषदा, नगरपंचायती, 5 महानगरपालिका व 2 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या 15 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात म्हणजेच एप्रिल, मे महीन्यात होणे अपेक्षित आहेत. या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. 
      पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील 2 नगरपरिषदेच्या (राजगुरूनगर, चाकण) सार्वत्रिक निवडणुका होणार असून  पिंपरी चिंचवड महापालिकेतील 3 रिक्तपदांच्या पोटनिवडणुका होणार आहेत यामध्ये रिक्त प्रभाग क्र.1ड (निधन), प्रभाग क्र. 14अ (निधन), प्रभाग क्र. 4ब (निधन) यांचा समावेश आहे तर पुणे महापालिकेतील 2 रिक्तपदांच्या पोटनिवडणुका होणार आहेत यामध्ये प्रभाग क्र. 8क (निधन) आणि  प्रभाग क्र.29ब (निधन) यांचा समावेश आहे तर पुणे जिल्हा परिषदेच्या बारामती तालुक्यातील शिर्सूफळ- गुणवाडी गटातील रिक्तपदासाठी पोटनिवडणुक होणार आहेत तसेच पंचायत समिती हवेली मधील मांजरी बु. या निर्वाचक गणामध्ये पोटनिवडणुक होणार आहे. 
        नवी मुंबई, वसई- विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी (कंसात कारण): नाशिक- 4अ (निधन), धुळे- 5ब (राजीनामा), परभणी- 11ब (निधन), 14क (निधन), ठाणे- 30अ (जात प्रमाणपत्र अवैध), 15ड (निधन), 23ड (निधन), अहमदनगर- 9क (अनर्ह), नांदेड वाघाळा- 13अ (निधन), नागपूर- 8ब (जात प्रमाणपत्र अवैध), मीरा भाईंदर- 10ड (निधन), मालेगाव- 20क (निधन), पिंपरी चिंचवड- 1ड (निधन), 14अ (निधन), 4ब (निधन), उल्हासनगर- 14ड (निधन), 8क (निधन) सोलापूर- 6क (निधन), सांगली मिरज कुपवाड- 16अ (निधन), अकोला- 4अ (निधन), 8क (निधन), 3क (निधन), भिवंडी निजामपूर- 9ब (राजीनामा), पुणे- 8क (निधन) आणि 29ब (निधन).यांचा समावेश आहे. 
       विविध जिल्ह्यांमधील 95 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध 31 नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील 35 रिक्तपदांच्या पोटनिवडणुक होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: ठाणे- अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, मुरबाड, शहापूर, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, रत्नागिरी- मंडणगड, सिंधुदुर्ग- कसई- दोडामार्ग, वाभवे- वैभववाडी, पुणे- राजगुरूनगर, चाकण, नाशिक- चांदवड, निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, जळगाव- भडगाव, वरणगाव अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, जामखेड, शेवगाव, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, परभणी- पालम, बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर- अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, नांदेड- भोकर, हिमायतनगर, नायगाव, हिंगोली- सेनगाव, औंढा- नागनाथ, अमरावती- भारकुली, तिवसा, धारणी, नांदगाव- खंडेश्वर, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, झरी, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, वाशीम- मानोरा, नागपूर- मोवाड, वाडी, हिंगणा, कुही, भिवापूर, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, चंद्रपूर- चिमूर, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.यांचा समावेश आहे.   
         भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच विविध 19 जिल्हा परिषदा आणि 27 पंचायत समित्यांमधील 60 रिक्तपदांच्या पोटनिवडणूक होत असलेल्या निवडणूक विभागांची जिल्हा परिषदनिहाय नावे अशी (कंसात तालुका): रायगड- वरसे (रोहा),  पुणे- शिर्सूफळ- गुणवाडी (बारामती), सांगली- उमदी (जत), सोलापूर- कुर्डू (माढा), कोल्हापूर- दत्तवाड (शिरोळ), नाशिक- कानाशी (कळवण), जळगाव- वाघोदा बु.- विवरा बु. (रावेर), अहमदनगर- सातेवाडी (अकोले), औरंगाबाद- घायगाव (वैजापूर), नांदेड- बोधडी बु. (किनवट), पेठवडज (कंधार), बारड (मुदखेड), लातूर- हाडोळती (अहमदपूर), एकुर्गा (लातूर), चापोली (चाकूर), हिंगोली- आंबा (वसमत), बीड- राजुरी न. (बीड), कडा (आष्टी), उस्मानाबाद- आष्टा (भूम), सांजा (उस्मानाबाद), जालना- पिरकल्याण (जालना), सेवली (जालना), परभणी- कोल्हा (मानवत), अमरावती- बेनोडा (वरुड), गायवाडी (दर्यापूर), देवगाव (धामणगाव रेल्वे), बुलढाणा- निमगाव (नांदुरा), उंद्री (चिखली), चंद्रपूर- मोहाडी नलेश्वर-वासेरा (सिंदेवाडी) आणि चुनाळा विरूर स्टेशन (राजुरा).यांचा समावेश आहे. तर पोटनिवडणूक होत असलेल्या निर्वाचक गणांची पंचायत समितीनिहाय नावे अशी (कंसात जिल्हा): तळा (रायगड)- काकडशेत, हवेली (पुणे)- मांजरी बु., कवठे महाकाळ (सांगली)- देशिंग, शिराळा (सांगली)- मणदूर, मिरज (सांगली)- कसबे डिग्रज, सातारा (सातारा)- दरे खुर्द, शिरोळ (कोल्हापूर)- दानोळी, कळवण (नाशिक)- मोकभणगी, यावल (जळगाव)- दहिगाव, यावल (जळगाव)- भालोद, शिरपूर (धुळे)- हिसाळे, साक्री (धुळे)- हट्टी खुर्द, श्रीगोंदा (अहमदनगर)- काष्टी, अकोले (अहमदनगर)- सातेवाडी, भूम (उस्मानाबाद)- आरसोली, उमरगा (उस्मानाबाद)- मुळज, उमरगा (उस्मानाबाद)- दाळींब, अर्धापूर (नांदेड)- मालेगाव, नांदेड (नांदेड)- वाडी (बु.), मुदखेड (नांदेड)- मुगट, औसा (लातूर)- खरोसा, परळी वै. (बीड)- धर्मापुरी, अमरावती (अमरावती)- वलगाव, अचलपूर (अमरावती)- कांडली, दिग्रस (यवतमाळ)- मांडवा, भद्रावती (चंद्रपूर)- पाटाळा, चंद्रपूर (चंद्रपूर)- पडोली, मूल (चंद्रपूर)- मारोडा, मूल (चंद्रपूर) जुनासुर्ला आणि आरमोरी (गडचिरोली)- अरसोडा. यांचा समावेश आहे.
Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  


Monday, 15 February 2021

गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी कटीबद्ध- आ. चेतन तुपे

गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी कटीबद्ध- आ. चेतन तुपे

हडपसर भागातील सोसायटींच्या पुनर्विकासासाठी राज्यातील महा विकास आघाडी सरकारच्या वतीने मी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मा. चेतन तुपे-पाटील यांनी केले. ते आदित्यनगर हौसिंग सोसायटीच्या वतीने गार्डनचे सुशोभीकरण व व्यायामशाळेचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. 
     आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने गार्डनचे सुशोभीकरण करण्यात आले व व्यायामासाठी नवीन साधने उपलब्ध करून देण्यात आली असून या उपक्रमांचे उदघाटन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मा. चेतन तुपे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी महापौर व विद्यमान नगरसेविका सौ.वैशालीताई बनकर, मा.नगरसेवक श्री.सुनील बनकर, सोसायटीचे चेअरमन श्री.सुहास शहा, सचिव श्री.एस. व्ही. बारवकर, सोसायटीचे व्यवस्थापन समिती सदस्य व कुटुंबीयांसह सर्वसाधारण सभासद मान्यवर आदी उपस्थित होते. 
       मा. चेतन तुपे-पाटील पुढे म्हणाले की, पुणे शहराच्या पूर्व भागातील उपनगर भागाला मध्यवर्ती शहराचे स्वरूप प्राप्त झाल्याने जुन्या काळातील हडपसर भागातील सोसायटींच्या पुनर्विकास प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रयत्नशील राहील. शहराचा विकास वेगाने होत आहे जुन्या सोसायटीना पार्किंग व पटांगण जागा अपुरी पडत आहे त्यासाठी पुनर्विकास महत्वाचा आहे. कालांतराने मेट्रोचे काम सुरु होईल त्यामुळे चटई निर्देशांक (एफएसआय) वाढवून मिळणार आहे त्याचा देखील लाभ घेणे शक्य होणार आहे, लगतच्या दोन-तीन सोसायटी मिळून एकत्रितपणे पुनर्विकास केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ रहिवाशांना होऊ शकेल. भविष्यात आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासासाठी मी कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
       याप्रसंगी माजी महापौर व विद्यमान नगरसेविका सौ.वैशालीताई बनकर यांनी कमी जागेतही विविध उपक्रम राबवून आदित्यनगर सोसायटीच्या स्तुत्य कार्याचे कौतुक केले. व्यायामाचे थोडक्यात महत्व त्यांनी विषद केले. पुणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना व सोयी-सुविधांचा सोसायटीला लाभ मिळवून दिल्याचे सांगितले व भविष्यातही मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 
      कार्यक्रम प्रारंभी प्रमुख पाहुण्याचे औक्षण महिलांनी केले, व्यायामासाठी नवीन यंत्र साधनांची पुजा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे या प्रसंगी सत्कार करण्यात आले. सोसायटीचे चेअरमन श्री.सुहास शहा यांनी प्रास्ताविक करून सोसायटीच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच पुढील विकासाच्या उपक्रमांना सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच सचिव श्री. सोपानराव बारवकर यांनी आभार मानले. 
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Friday, 12 February 2021

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक लवकरच; निवडणूक आयोगाकडून तयारी सुरु

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक-2021; डॉ. संजयकुमार भोसले यांच्या नावाची चर्चा

राष्ट्रवादीचे आमदार कै. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून प्रशासकीय तयारी सुरु करण्यात आली आहे. पंढरपूर  विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मात्र या मतदारसंघातून अनेकांची नावे चर्चिली जात आहेत यामध्ये प्रारंभी राष्ट्रवादीचे अमरजीत पाटील यांनी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना जर उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीचा विजय हा आणखी सोपा होईल असा विश्वास व्यक्त करून चर्चेला उधाण आणले होते तर आमदार रोहित पवार अधूनमधून जनतेच्या मनातील उमेदवार दिला जाईल अशी वक्तव्य करून या भागात दौरे काढून स्वतः प्रसिद्धीच्या झोतात राहतात. या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाकडून अनेकांना उमेदवारीच्या आशा आहेत तर भाजपमधील देखील उमेदवारी मिळाली तर पक्षांतर करण्याच्या स्थितीत आहेत. कै. भारत भालके यांच्या भावकीतील प्रशासकीय अधिकारी डॉ. संजयकुमार भोसले यांच्या नावाची देखील चर्चा राजकीय पदाधिकारी व मतदारांमध्ये आहे. कै. भारत भालके यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मतदारसंघातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉ. संजयकुमार भोसले यांना कमालीचा आग्रह केला जात आहे. कै. भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांची नुकतीच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड केली आहे. भगिरथ भालके यांचे वय आणि अनुभव नसल्यामुळे पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यास तुर्तास टाळले आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये येऊन हा संभ्रम दूर केला होता. तर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पंढरपूरमधून पोटनिवडणुकीतउमेदवारी देण्याची चर्चा रंगली होती त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्ताचे खंडन करून पार्थ यांच्या उमेदवारीबाबत अशी कोणतीही चर्चा नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले होते. या मतदारसंघात साखर कारखाने उद्योग व त्यातून शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांना व शेती पूरक उद्योगांना चालना देण्याचे कार्य प्रशासकीय माध्यमातून डॉ. संजयकुमार भोसले यांनी अविरतपणे सुरु ठेवल्याने युवा वर्गासह जेष्ठ नागरीकांच्या मनात त्यांच्या विषयी आदर आहे. डॉ. संजयकुमार श्रीमंतराव भोसले (54) यांचे शिक्षण बी.ए.एम.एस., एम.ए. (राज्यशास्त्र)असून सध्या प्रशासकीय सेवेत सहसंचालक (साखर) उपपदार्थ, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे वडील मा. प्राचार्य श्रीमंतराव भोसले हे रयत शिक्षण संस्थेचे स्थायी सदस्य आहेत. कै. भारत भालके यांच्या सरकोली हे मूळ गाव असून त्यांच्या भावकीमधील डॉ. संजयकुमार भोसले यांचे या मतदारसंघात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्य आहे. सरकोली येथील भैरवनाथ इमारत बांधकामात पुढाकार घेऊन इमारत पूर्ण केली आहे. साखर कारखान्यासाठी कामकाज करीत असतांना, इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामसाठी राष्ट्रीय पातळीवरील समितीमध्ये कामकाज व इथेनॉल निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महिला बचत गटांची निर्मिती, ३३ हजार महिलांचे संघटन करून स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन, महिला बचत गटांची जिल्हास्तरीय आरोग्य विमा सहकारी संस्था स्थापन करून १० हजार कुटुंबांना आरोग्य विम्याचे लाभ मिळवून दिले आहेत. शेती आणि ग्रामविकास यासाठी संस्थेमार्फत सातत्त्याने मार्गदर्शन शिबीर उपक्रम राबविला जातो. सोलापूर या जिल्हयातील युवकांना स्वयंराजेगारासाठी प्रेरित करणे व त्यासाठी उद्योजकता केंद्राच्या माध्यमातून गेली २० वर्ष प्रशिक्षण शिबीर घेतली आहेत. त्यांनी विविध ग्रंथाचे संपादन देखील केले आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून अनेक उपक्रम त्यांनी राबविले असल्याने स्थानिक पातळीवर डॉ. संजयकुमार भोसले यांच्या नावाचा बोलबाला असून राजकीय व सामाजिक पदाधिकारी त्यांच्या नावाचा आग्रह करीत असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.या मतदारसंघात सहकारी साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट-तटाचा प्रभाव आमदारकीच्या राजकारणावर असतो त्यामुळे साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व राखून सामाजिक संस्थांचे गट मतदारांवर प्रभाव निर्माण करून निवडणुकीत यश मिळवण्याचा प्रयत्न केला जातो अशी स्थिती आहे. राजकीय यशस्वीतेसाठी विविध गट, ग्रुप व सामाजिक संस्थाच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या महत्वाकांक्षा स्थानिक राजकीय पदाधिकारी व्यक्त करीत असतात. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मंगळवेढा शहर आणि सर्वच ग्रामीण भाग असून, यामध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर तालुक्याच्या राजकारण, अर्थकारणाचा महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. सहकार शिरोमणी कारखाना, पांडुरंग कारखाना, वसंतराव काळे कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, दामाजी साखर कारखाना यांचा निवडणुकीत प्रभाव असतो.आमदार कै. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर कायम वर्चस्व ठेवले. भारत भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती. कै. भारत भालके यांचे 28 नोव्हेंबर 2020 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, सर्वांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले केले होते. त्यांनी सरकोली (ता.पंढरपूर) येथे जाऊन आ.भारत भालके यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती. कै. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या जागेसाठी प्रशासकीय तयारी सुरु करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांची यादी मागवली आहे. विधानसभेचे पद रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेण्याचा नियम असल्याने प्रशासकीय स्तरावर तयारी सुरु करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलमध्ये पंढरपूर विधानसभेसाठी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीसाठी किती मतदान यंत्रे लागणार आहेत, याची प्रशासनाकडून माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दुसरीकडे पंढरपुरात राजकीय नेत्यांकडूनही जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. पंढरपूर विधानसभा निवडणूक-2014 मध्ये काँग्रेसकडून विजयी भारत भालके यांना 91 हजार 863 मते (40.03%) मिळाली होती तर प्रशांत परिचारक 82 हजार 950 मते (36.15%) मिळाली होती त्यांना पराभूत केले होते. तर शिवसेनेचे समाधान आवताडे यांना 40 हजार 910 मते (17.83%) मिळाली होती, तसेच राष्ट्रवादीचे चंद्रकांत बागल यांना केवळ 3 हजार 075 मते (1.34 %) प्राप्त झालेली होती. काँग्रेस उमेदवार भारत भालके यांनी 8 हजार 913 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेनेचे समाधान आवताडे, चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस चे चंद्रकांत बागल आणि पाचव्या क्रमांकावर नंदकुमार पवार होते. तर पंढरपूर विधानसभा निवडणूक- 2009 मध्ये भारत भालके यांना 1 लाख 06 हजार 141 (38.66%) मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे विजयसिंग मोहिते-पाटील यांना 68 हजार 778 (25.05%) मते मिळाली होती. भारत भालके यांनी 37363 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. तर पंढरपूर विधानसभा निवडणूक- 2019 मध्ये राष्ट्रवादीचे भारत भालके यांना 89 लाख 78 हजार 700 (37.48%) मते मिळाली होती तर भाजपचे समाधान औताडे यांना 76 हजार 426 (31.90%) मते मिळाली होती. कै. भारत भालके यांनी 13361 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांचा निधनाने रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी भगीरथ भालके, डॉ. संजयकुमार भोसले, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक, सेना पदाधिकारी शैला गोडसे यांच्यासह अनेक जणांची नावे इच्छूक म्हणून चर्चेत आहेत. पंढरपूर विधानसभा निवडणूक- 2019 मध्ये एकूण मतदार संख्या 3,33,397 इतकी होती त्यामध्ये अंशतःवाढ झालेली आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

सोशल मिडियावरील कथित पोस्ट वरून संशयकल्लोळ! आत्महत्या केलेल्या तरुणीचे अनेक आजी, माजी मंत्र्यांबरोबर फोटो

संशयास्पद घटनेला अनेक कंगोरे! आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचे वडिलांचे पत्र...


बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एका तरुणीने पुण्यात केलेल्या आत्महत्तेनंतर सोशल मिडियावरील कथित पोस्ट वरून संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे. आत्महत्या केलेल्या या तरुणीचे अनेक आजी, माजी मंत्र्यांबरोबर फोटो तिच्या फेसबुकवर दिसून येत आहेत मात्र विशिष्ट एका राजकीय नेत्याचे नाव चर्चिले जात आहे. एकंदरच याविषयी राजकारण होत असल्याने तपास यंत्रणांच्या तपासाअंतीच या प्रकरणाची स्पष्टता होणार आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुबियांचे पोल्ट्री व्यवसायाच्या नुकसानीमुळे आत्महत्या करावी लागेल अशा आशयाचे पत्र समोर आले आहे. पुजा पोल्ट्री फार्म या लेटरहेड वर वडिलांनी लिहिलेले मा. तहसीलदार परळी यांना 12 मार्च 2020 रोजी पत्र पाठवून कोंबड्या ताब्यात घेण्याची मागणी केली असून खाद्य खर्च भागवला जाऊ शकत नाही 19 ते 20 लाख नुकसान व्यवसायात झालेले असून कोंबड्या ताब्यात न घेतल्यास मारून टाकाव्या लागतील अशी भीती व्यक्त करून कर्जाचा मोठा डोंगर माझ्यावर झाल्याने मला आत्महत्या शिवाय पर्याय नाही असे या पत्रामध्ये म्हंटले असून त्याच दिवशी म्हणजेच 12 मार्च 2020 रोजी सदर पत्र फेसबुक पोस्ट करून अनेकांना ते टॅग व शेअर केले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याबाबत 14 मार्च 2019 च्या फेसबुक पोस्ट करून पोल्ट्रीच्या बांधकामाचा दुसरा स्लॅब पूर्ण झाल्याचे फोटो पोस्ट केलेले दिसून येत आहे. परळी, बीड जिल्ह्यातील मतदारसंघात पुजा चव्हाण सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहून कार्य करीत असल्याच्या पोस्ट करून सोशल मीडियाद्वारे सक्रिय असल्याचे दिसून येत आहे तर राजकीयदृष्ट्या महत्वकांक्षा असल्याचे सोशल मीडियाद्वारे प्रतिबिंबित केले जात असल्याचे देखील अनेक पोष्ट वरून स्पष्ट होत आहे. अनेक आजी, माजी मंत्र्यांबरोबर फोटो तिच्या फेसबुकवर दिसून येत आहेत यामध्ये खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक मंत्री धनंजय मुंडे व सेना मंत्री संजय राठोड यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेकांचा समावेश आहे. फेसबुकवर एखाद्या मंत्र्याच्या बरोबर फोटो आहे म्हणून आरोप करून मृत तरुणी व संबधितांची बदनामी करणे योग्य नाही पोलिसांच्या तपासात सत्यता समाजासमोर येईलच मात्र घटनेला राजकीय वळण मिळाल्याने सामान्यांमध्ये सोशल मिडियावरील कथित पोस्ट वरून संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे. संशयास्पद घटनेला अनेक कंगोरे असल्याचे नवनवीन संदेश रोज समोर येत आहेत. या तरुणीच्या आत्महत्येशी विदर्भातील शिवसेनेच्या एका मंत्र्याचे आडवळणाने नाव घेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने निशाणा साधला आहे. या तरुणीच्या पालकांनी मात्र कोणाविरुद्धही तक्रार दिलेली नाही. मूळची बीडची असलेली २२ वर्षीय पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय होती. सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. मात्र, पूजाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणं आहे. शिवाय, आमच्याकडं कोणाच्याही विरोधात तक्रार आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणं होते. मात्र, या प्रकरणी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे यावरून राजकारण रंगले आहे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली नाही. या प्रकारानंतर भाजपने या आत्महत्येच्या मुद्यावरून चौकशीची मागणी केली आहे. या तरुणीच्या सोशल मिडियातील विशेषतः फेसबुकवरील पोस्ट पाहिल्यानंतर अनेक बाबी समोर येतात. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पुणे भाजपच्या महिला अध्यक्ष अर्चना पाटील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.  दरम्यान सध्या एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली असून या ऑडिओमध्ये दोन व्यक्तींचे बंजारा भाषेतील संभाषण आहे, ज्यामध्ये एक तरुणी आत्महत्येचा विचार करतेय असे संभाषणात आहे. तो आवाज संबधित मंत्र्याचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्यक्ती कोण आहेत? अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, या ऑडिओचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच त्याची सत्यता समोर येईल.  या ऑडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ''तरुणीच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येत आहे'' असे सांगत आहे. यावरुन तरुणीने आत्महत्या करण्यापुर्वी एक व्यक्ती तिच्या सोबत होता आणि दुसऱ्या व्यक्तीला माहिती देत होता. तसेच संबधित व्यक्तींना ती तरुणी आत्महत्या करणार असल्याची माहिती होती. त्यावर, ''त्या तरुणीला समजावून सांगा'' असेही तरुणीसोबत असलेला व्यक्ती फोनवरील व्यक्तीला सांगत होता. त्यावर फोनवरील दुसरी व्यक्ती ''तिला डॉक्टरकडे घेऊन जा'' असे सांगते. त्यानंतर, ''तुम्ही सांगत असाल तर मी डॉक्टरकडे जाते, पण नंतर मी आत्महत्या करणार'' असे तरुणी म्हणतेय असे तो व्यक्ती सांगत आहे. दरम्यान या दोन व्यक्तींमधील बंजारा भाषेतील संवादाचे आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल समोर आले आहे. या ऑडिओ क्लिपवरुन तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिच्यासोबत एक व्यक्ती तिथेच होता. त्या व्यक्तीला फोनवरील दुसरी व्यक्ती ''तिचा मोबाईल काढून घे'' असे सांगत आहे. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप पुजा चव्हाणच्या आत्महत्ये संबधित असल्याची चर्चा सुरु आहे. ही ऑडिओ क्लिप खरी आहे का या तपासणी होईलच. तसेच ऑडिओ क्लिपची सत्यता बाहेर आल्यानंतरच घटनेतील राजकीय सहभागाचा संशयकल्लोळ दूर होईल.

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

क्लिप पहिली:
कथित मंत्री: कुठे आहेस तू? (अरुण राठोडला उद्देशून) नंतर मला मंत्रालयात मिटिंग आहे.कथित मंत्र्याचा अरुण राठोड नावाच्या कार्यकर्त्याचा या क्लिपमध्ये संवाद सुरू आहे. ते अरुणला त्याची विचारपूस करतात. त्याला मंत्रालयात बोलावतात. दोघंही बंजारा भाषेतच बोलत आहेत. अवघी 50 सेकंदाची ही क्लिप आहे.
क्लिप दुसरी:
मंत्री: कुठे आहेस अरुण तू? समजवलं का पूजाला? येतोय ना तू?
अरुण: हो ठिक आहे ठिक आहे. मी येतो.
थोडावेळ काहीच संवाद होत नाही. नंतर दोघांमध्ये पूजाला समजावण्याबाबत चर्चा होते. तू येणार आहेस का?, असं मंत्री अरुणला विचारतात. पूजाला समजावून सांगायला सांगतात. ही 42 सेकंदाची क्लिप आहे.
क्लिप तिसरी
मंत्री: अरुण कुठे आहेस तू?
अरुण: एक्सप्रेस हायवेला आहे. दोन तास लागेल यायला. (मोबाईलवर गाड्यांचा कर्णकर्कश आवाज स्पष्ट ऐकू येतो. त्यामुळे अरुण वाहतूक कोंडीत अडकल्याचं स्पष्ट होतं.)
मंत्री: एवढा लेट का?
अरुण: वाहतूक कोंडी होती. गाडीवालाही लेट आला.
मंत्री: तीन तास म्हणजे खूपच उशीर आहे.
अरुण: संध्याकाळी भेटणं जमणार नाही का?
मंत्री: ठिक आहे. तू ये. नंतर बघू. आल्यावर फोन कर.
अरुण: हाव. ओके.
या दोघांमध्ये 1 मिनिट 18 सेकंदाचं बोलणं होतं. अरुण प्रवासात असल्यानं त्यांचं जुजबीच बोलणं झाल्याचं दिसून येतं.
क्लिप चौथी
या क्लिपमध्ये दोघेही मराठीत बोलत आहेत. त्यात पूजाच्या ट्रीटमेंटच्या अनुषंगानेच चर्चा सुरू असल्याचं दिसतं.
अरुण: सुसाईडचं वेड तिच्या डोक्यातून काढा.
मंत्री: ठिक आहे. काय करावं आता.
अरुण: तेच तिच्या डोक्यातून काढा. सुसाईड हा पर्याय नाही. खूप आयुष्य आहे अजून.
मंत्री: तेच तर सांगत आहे तिला मी.
अरुण: ती कितीतरी मुलींची आयडॉल आहे. तिच्या सारखं बनायला बघतात पोरी. सुसाईड करतेय म्हटल्यावर अवघड आहे.
मंत्री: हम्म
अरुण: असं थोडीच असतं.
मंत्री: तू कुठे आहे? बाहेर आहे का? ये ना.
अरुण: तुम्ही बोला.
मंत्री: काय बोलू तिला. एवढं क्लिअर बोलूनही त्याच मुद्द्यावर असेल तर…
अरुण: त्या दिवशीपासून सांगतो ट्रिटमेंट करू, नाहीच म्हणत होती. आज म्हणाली, तू आणि ते सांगतात तर ट्रिटमेंट करते. पण नंतर इलाज केल्यावर सुसाईड करेल म्हणते. असं थोडीच असतं.
मंत्री: हम्म
नंतर बराच गॅप जातो. संभाषण थांबतं.
अरुण: असं थोडीच असतं. तुम्ही काढा तिच्या डोक्यातून.
मंत्री: हम्म. तुला काय म्हणत होती ती. काही तरी म्हटली ना. काही तरी आणून दे म्हणून… कशाला सांगितलं तू?
अरुण: कशाला म्हणजे? गरजेचं आहे सांगणं. असं थोडीच असतं. सुसाईड म्हणजे काय…
मंत्री: ठिक आहे. तू कुठे आहे, इथेच आहे ना?
अरुण: हां इथेच आहे. डोक्यातून काढा तिच्या तेवढं सुसाईडचं. सुसाईड हा ऑप्शन नाही हे ना.
मंत्री: हो
अरुण: ठेवू
या दोघांमधील हा संवाद दोन मिनिटं 24 सेकंदाचा आहे. त्यात दोघंही पूजाच्या आत्महत्येबाबत चर्चा करत आहेत. अरुण हा पूजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कथित मंत्र्याला पोटतिडकीने गळ घालत आहे.
क्लिप पाचवी
ही क्लिप 1 मिनिट 31 सेकंदाची आहे. त्यात हा मंत्री मुलीला कन्व्हिन्स करण्यासाठी अरुणला सांगत आहे. त्यात एका मुलीचा आवाजही येतो. तीही या मंत्र्याशी बोलते. ही मुलगी मंत्र्याला जेवण झालं का विचारत आहे. बहुतेक ती पूजा असावी. तर मंत्री तिला ज्यूस किंवा मंच्युरिअन आणून खायला सांगत आहे. मुलगीही या मंत्र्याला पटकन यायला सांगत आहे. त्यानंतर मंत्रीही तिला होकार देतात.
क्लिप सहावी
या क्लिपमध्ये हा मंत्री अजितदादासोबत मिटिंग असल्याचं अरुणला सांगतो. रात्री या मुलीला समजावलं पण ती ऐकत नसल्याचंही ते सांगतात. त्यावर कार्यकर्ता म्हणतो, पण आत्महत्या करणं हा ऑप्शन नाही ना?. त्यावर, मग मी काय करू? असा हतबल सवाल मंत्री करतात. तेव्हा कार्यकर्ता म्हणतो, तिला एकदा तुम्हाला भेटायचं आहे. तिला तुम्ही भेटा आणि समजवा. अरुणच्या या आग्रहानंतर मंत्रीही तिच्याशी चर्चा करायला तयार होतात. एखादी गाडी कर. तिला मुंबईत घेऊन ये. चर्चा करू, असं मंत्री सांगतात. अरुणही उद्या सकाळी येऊ का? असं विचारतो. त्यावर होय, असं उत्तर मंत्री देतात. ही क्लिप 2 मिनिटं 13 सेकंदाची आहे.
क्लिप सातवी
ही 12 मिनिटाची क्लिप आहे. या क्लिपमध्ये मंत्री वैतागलेले दिसत आहेत. टेन्शनमध्ये असल्याचं ते सांगत आहेत.
मंत्री: मला एक तर टेन्शन… टेन्शन आलंय. आधीच मी परेशान आहे. घराचं टेन्शन आहे. समजव तिला. तूच तिला कन्व्हिन्स करू शकतो.
अरुण: काही तरी मार्ग काढावा लागेल.
मंत्री: कन्व्हिन्स कर तू.
अरुण: कन्व्हिनस करावं लागेल, अवघड विषय आहे,. मागे लागेल… मी जातो आणि व्यवस्थित बोलतो.
मंत्री: ठिक आहे. तू कर नंतर मी येतो.
त्यानंतर या दोघांमध्ये मुलीच्या ट्रिटमेंटबाबत चर्चा सुरू होते. त्यावर अरुण ही मुलगी सर्किट असल्याचं सांगतो. मग मंत्री तिला गोडीत समजावण्याचं अरुणला सल्ला देतात. त्यावर हा बदनामीचा धंदाच आहे, असं अरुण म्हणतो. अरुणच्या या उत्तराने मंत्री अधिकच वैतागतात. माझ्या घरी काय चालू आहे माझं मलाच माहीत. घर डिस्टर्ब झालंय माझं. मला माहीत मी किती परेशान आहे. तिला समजाव तू, असं हा मंत्री म्हणतो. त्यावर तुमचं रेप्युटेशन आहे. हे तिला कळलं पाहिजे, असं अरुण म्हणतो.
मंत्री: मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.
अरुण: तुम्ही काही करणार नाही. मी बघतो परिस्थिती हाताळतो.
मंत्री: तूच काही तरी कर, मी काही करत नाही.
अरुण: मी करतो कन्व्हिन्स
काही वेळाने पुन्हा संवाद सुरू होतो.
अरुण: तिने किट आणली आणली आणि टेस्ट केली. रेड पट्टी झाली. पॉझिटीव्ह आली. एकदमच धडधड झाली. काय करू आणि काय नको असं झालं. घामच फुटला. रुममध्ये आल्यावर कालच माझं आधार कार्ड घेतलं होतं. तिला समजून सांगणं गरजेचं आहे. नाही तर ती भलतीच माथेफिरू… सायको आहे. तिला एकदम कन्व्हिन्स केलं पाहिजे.
मंत्री: हे सगळं झालं की इतक्या लांब जाईल की मला स्वप्नातही दिसलं नाही. म्हटलं तुझं स्वप्नं कर पूर्ण. पण ती दुसऱ्याच मार्गावर गेली. त्यात माझी थोडीच चूक आहे. माझी प्रतिमा… माझी इज्जत…हां… माझ्यामागे एवढा समाज आहे.
अरुण: लोकांना काय विषय चघळायला पाहिजे
मंत्री: मला तर काही कळतच नाही. मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.
अरुण: तुम्हाला काही होणार नाही. टेन्शन घेऊ नका. मी करेल सर्व बरोबर. मी समजावतो ना नंतर.
मंत्री: तू आधी सगळं सांभाळ. मी येतो नंतर…
अरुण: ठिक आहे.
क्लिप आठवी
ही 2 मिनिटे 22 सेकंदाची क्लिप अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात या पूजाचा मृत्यू झाल्याचं कळतं. पूजाने आत्महत्या केल्यानंतरचा हा संवाद आहे. त्यात मंत्री हे अरुणला पूजाचा मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. दरवाजा तोडून आत जा, विलाससोबत आत जा आणि मोबाईल ताब्यात घे. तू फक्त मोबाईल ताब्यात घे, असं ते सांगतात. त्यानंतर पाठिमागे कुणाचा तरी आवाज येतो. पोलिस बोलत असल्याचं जाणवतं.  पोलीस सीपीआर दे म्हणून सांगत आहेत. त्यानंतर पूजाचा मृत्यू झाल्याचं अरुण मंत्र्याला सांगतो. डोक्यावर पडून तिचा मृत्यू झाल्याचं तो सांगतो. तुम्ही येणार आहात का म्हणून अरुण विचारतो. तुमचा फोन सुरूच राहू द्या असंही तो सांगतो. (must listen 11 viral clips of Pooja Chavan Suicide case in pune)
क्लिप नववी:
या क्लिपमध्ये 8 मिनिटं 47 सेंकदाचा संवाद आहे. अरुण रुग्णालयात असून तिथेच त्यांचं मंत्र्याशी फोनवरून संभाषण सुरू असल्याचं दिसतं.
मंत्री: तू आधी फोन घे
अरुण: हॉस्पिटलच्या बाहेर आहे. आत सोडत नाहीत.
मंत्री: नातेवाईक आहे म्हणून सांग. पटकन जा आत.
त्यानंतर फोनमध्ये कुणाचा तरी आवाज येतो. बहुतेक पोलीस अरुणची चौकशी करत आहेत. तिने उडी मारली का? मुलीचं नाव काय? तिचं वय काय? पत्ता काय? असं अरुणला विचारलं जातं. त्यावर मुलीचं नाव पूजा चव्हाण. वय 22. पत्ता परळी वैजनाथ. आता पुण्यात मोहम्मदवाडी, हेमंत पार्क लेन क्रमांक 10मध्ये राहत असल्याचं अरुण सांगतो. त्याचं नावही तो अरुण राठोड म्हणून सांगतो. त्याचं वय 24 असल्याचं आणि पुण्यात पूजासोबतच राहत असल्याचं तो सांगतो. तिचा चुलत भाऊ असल्याचं तो सांगतो. मुलगी कशी पडली? असं त्याला विचारलं जातं. तेव्हा ती पडली तेव्हा बघितल्याचं सांगतो. ती कशी पडली हे कळलं नसल्याचं तो सांगतो. त्यावर ती पडली की तिने उडी मारली? असा सवाल पोलीस करतात. त्यानंतरच संभाषण अर्धवट तुटतं. थेट मंत्र्यांशी संवाद सुरू होतो.
मंत्री: हां, अरुण
अरुण: जबानी नोंदवत होते. गॅलरीबाबत विचारत होते.
मंत्री: गॅलरीतून मोबाईल काढ.
पुन्हा पोलीस अरुणला काही विचारतात. संभाषण तुटतं. नंतर मंत्री आणि अरुणचं पूजाच्या उपचाराबाबत संभाषण सुरू होतं. डॉक्टरांनी तिचा श्वास पाहिला. नाडी चेक केली. तिला पंप दिला, असं तो सांगतो. ती डोक्यावर आपटली. सिमेंटच्या रोडवर तिचं डोकं आदळल्याचं तो सांगतो. त्यावर मंत्री त्याला पुन्हा मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. कुणाच्याच हाती मोबाईल लागू देऊ नका असंही सांगतात. त्यानंतर पुन्हा संपर्क तुटतो. आता अरुणचा पोलिसांशी संवाद सुरू होतो. मी तिचा सख्खा चुलत भाऊ. आम्ही तिघं एकाच रुममध्ये राहतो, असं तो पोलिसांना सांगतो. पुन्हा त्याचा मंत्र्याशी संवाद सुरू होतो. मंत्री हॅलो हॅलो करतात. पण प्रतिसाद येत नाही. विलास…. अरुण… अरुण… असा आवाज देतात पण आवाज येत नाही. काही वेळ असाच जातो.
त्यानंतर पुन्हा संवाद सुरू होतो. मंत्री अरुणला म्हणतात, तू कर पहिलं. काहीही चॅटमार. काहीही हालचाल कर. बाजूलाच राहा. फोन करत राहा. त्याचवेळी मंत्री त्याला फोन ताब्यात घ्यायला सांगतात. नातेवाईकांना गावावरूनही आणायला सांगतात.
क्लिप दहावी
मंत्री: तू काहीच करू नको बस. चिंता करू नको. मदत करू. मी सांभाळतो. माझ्यावर भरोसा ठेव. ठिक आहे?
अरुण: हो.
पूजाने आत्महत्या केल्यानंतर या दोघांमध्ये संवाद होतो. त्यात मंत्री आपण सर्व काही पाहून घेत असल्याचं सांगताना दिसत आहे. ही एक मिनिट दोन सेकंदाची क्लिप आहे.
क्लिप अकरावी
शेवटची क्लिप ही 2 मिनिटं 22 सेकंदाची आहे. रुग्णालयातील हा संवाद आहे. या ठिकाणी पूजाचं शवविच्छेदन सुरू आहे. या ठिकाणी तिचा भाऊ विलासही आहे.
अरुण: पोस्टमार्टेम सुरू आहे.
मंत्री: असं का…
मंत्री: दोरीने चढ आणि मोबाईल काढ. चऱ्हाटाने जा.
त्यानंतर मंत्री विलासशी संवाद साधतात.
विलास: सर काय करू? (विलासचा सूर रडवेला आहे. तो घाबरलेला आहे. हे त्याच्या बोलण्यातून जाणवतं)
मंत्री: काय करू शकतो विलास? ( मंत्र्याच्या या प्रश्नानंतर विलास रडायला लागतो)
मंत्री: तू हिंमतीने काम घे.
विलास: काय करू? डॉक्टर म्हणतात पीएम (शवविच्छेदन) करा.
मंत्री: दुसरी काय करू शकतो आपण.
त्यानंतर अरुण आणि मंत्र्याचा संवाद होतो. मंत्री त्याला घराचं बांधकाम तोडून आत जायला सांगतात. तसेच कुणी विचारलं तर आम्ही झोपलो होतो. ती चक्कर येऊन पडली, असं सांग असं मंत्री विलासला सांगतात. त्यावर माझी सांगायची हिंमत होत नसल्याचं विलास म्हणतो. पण तरीही मंत्री त्याला चक्कर येऊन पडल्याचं सांग म्हणून सांगतात. गॅलरीतून बॅलन्स गेला, चक्कर आली, असंही सांगतात. शेवटच्या क्लिपमध्येही मंत्री अरुणला मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. मोबाईल ताब्यात घे. दरवाजा तोड. आवाज आला तरी चालेल, असंही ते सांगतात. 
विशेष टीप: हा सर्व व्हायरल क्लिप्सचा मजकूर आहे. ‘प्राब’ याची पृष्टी करत नाही.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================