Friday, 12 February 2021

सोशल मिडियावरील कथित पोस्ट वरून संशयकल्लोळ! आत्महत्या केलेल्या तरुणीचे अनेक आजी, माजी मंत्र्यांबरोबर फोटो

संशयास्पद घटनेला अनेक कंगोरे! आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचे वडिलांचे पत्र...


बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एका तरुणीने पुण्यात केलेल्या आत्महत्तेनंतर सोशल मिडियावरील कथित पोस्ट वरून संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे. आत्महत्या केलेल्या या तरुणीचे अनेक आजी, माजी मंत्र्यांबरोबर फोटो तिच्या फेसबुकवर दिसून येत आहेत मात्र विशिष्ट एका राजकीय नेत्याचे नाव चर्चिले जात आहे. एकंदरच याविषयी राजकारण होत असल्याने तपास यंत्रणांच्या तपासाअंतीच या प्रकरणाची स्पष्टता होणार आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुबियांचे पोल्ट्री व्यवसायाच्या नुकसानीमुळे आत्महत्या करावी लागेल अशा आशयाचे पत्र समोर आले आहे. पुजा पोल्ट्री फार्म या लेटरहेड वर वडिलांनी लिहिलेले मा. तहसीलदार परळी यांना 12 मार्च 2020 रोजी पत्र पाठवून कोंबड्या ताब्यात घेण्याची मागणी केली असून खाद्य खर्च भागवला जाऊ शकत नाही 19 ते 20 लाख नुकसान व्यवसायात झालेले असून कोंबड्या ताब्यात न घेतल्यास मारून टाकाव्या लागतील अशी भीती व्यक्त करून कर्जाचा मोठा डोंगर माझ्यावर झाल्याने मला आत्महत्या शिवाय पर्याय नाही असे या पत्रामध्ये म्हंटले असून त्याच दिवशी म्हणजेच 12 मार्च 2020 रोजी सदर पत्र फेसबुक पोस्ट करून अनेकांना ते टॅग व शेअर केले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याबाबत 14 मार्च 2019 च्या फेसबुक पोस्ट करून पोल्ट्रीच्या बांधकामाचा दुसरा स्लॅब पूर्ण झाल्याचे फोटो पोस्ट केलेले दिसून येत आहे. परळी, बीड जिल्ह्यातील मतदारसंघात पुजा चव्हाण सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहून कार्य करीत असल्याच्या पोस्ट करून सोशल मीडियाद्वारे सक्रिय असल्याचे दिसून येत आहे तर राजकीयदृष्ट्या महत्वकांक्षा असल्याचे सोशल मीडियाद्वारे प्रतिबिंबित केले जात असल्याचे देखील अनेक पोष्ट वरून स्पष्ट होत आहे. अनेक आजी, माजी मंत्र्यांबरोबर फोटो तिच्या फेसबुकवर दिसून येत आहेत यामध्ये खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक मंत्री धनंजय मुंडे व सेना मंत्री संजय राठोड यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेकांचा समावेश आहे. फेसबुकवर एखाद्या मंत्र्याच्या बरोबर फोटो आहे म्हणून आरोप करून मृत तरुणी व संबधितांची बदनामी करणे योग्य नाही पोलिसांच्या तपासात सत्यता समाजासमोर येईलच मात्र घटनेला राजकीय वळण मिळाल्याने सामान्यांमध्ये सोशल मिडियावरील कथित पोस्ट वरून संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे. संशयास्पद घटनेला अनेक कंगोरे असल्याचे नवनवीन संदेश रोज समोर येत आहेत. या तरुणीच्या आत्महत्येशी विदर्भातील शिवसेनेच्या एका मंत्र्याचे आडवळणाने नाव घेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने निशाणा साधला आहे. या तरुणीच्या पालकांनी मात्र कोणाविरुद्धही तक्रार दिलेली नाही. मूळची बीडची असलेली २२ वर्षीय पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय होती. सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. मात्र, पूजाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणं आहे. शिवाय, आमच्याकडं कोणाच्याही विरोधात तक्रार आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणं होते. मात्र, या प्रकरणी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे यावरून राजकारण रंगले आहे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली नाही. या प्रकारानंतर भाजपने या आत्महत्येच्या मुद्यावरून चौकशीची मागणी केली आहे. या तरुणीच्या सोशल मिडियातील विशेषतः फेसबुकवरील पोस्ट पाहिल्यानंतर अनेक बाबी समोर येतात. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पुणे भाजपच्या महिला अध्यक्ष अर्चना पाटील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.  दरम्यान सध्या एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली असून या ऑडिओमध्ये दोन व्यक्तींचे बंजारा भाषेतील संभाषण आहे, ज्यामध्ये एक तरुणी आत्महत्येचा विचार करतेय असे संभाषणात आहे. तो आवाज संबधित मंत्र्याचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्यक्ती कोण आहेत? अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, या ऑडिओचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच त्याची सत्यता समोर येईल.  या ऑडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ''तरुणीच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येत आहे'' असे सांगत आहे. यावरुन तरुणीने आत्महत्या करण्यापुर्वी एक व्यक्ती तिच्या सोबत होता आणि दुसऱ्या व्यक्तीला माहिती देत होता. तसेच संबधित व्यक्तींना ती तरुणी आत्महत्या करणार असल्याची माहिती होती. त्यावर, ''त्या तरुणीला समजावून सांगा'' असेही तरुणीसोबत असलेला व्यक्ती फोनवरील व्यक्तीला सांगत होता. त्यावर फोनवरील दुसरी व्यक्ती ''तिला डॉक्टरकडे घेऊन जा'' असे सांगते. त्यानंतर, ''तुम्ही सांगत असाल तर मी डॉक्टरकडे जाते, पण नंतर मी आत्महत्या करणार'' असे तरुणी म्हणतेय असे तो व्यक्ती सांगत आहे. दरम्यान या दोन व्यक्तींमधील बंजारा भाषेतील संवादाचे आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल समोर आले आहे. या ऑडिओ क्लिपवरुन तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिच्यासोबत एक व्यक्ती तिथेच होता. त्या व्यक्तीला फोनवरील दुसरी व्यक्ती ''तिचा मोबाईल काढून घे'' असे सांगत आहे. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप पुजा चव्हाणच्या आत्महत्ये संबधित असल्याची चर्चा सुरु आहे. ही ऑडिओ क्लिप खरी आहे का या तपासणी होईलच. तसेच ऑडिओ क्लिपची सत्यता बाहेर आल्यानंतरच घटनेतील राजकीय सहभागाचा संशयकल्लोळ दूर होईल.

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

क्लिप पहिली:
कथित मंत्री: कुठे आहेस तू? (अरुण राठोडला उद्देशून) नंतर मला मंत्रालयात मिटिंग आहे.कथित मंत्र्याचा अरुण राठोड नावाच्या कार्यकर्त्याचा या क्लिपमध्ये संवाद सुरू आहे. ते अरुणला त्याची विचारपूस करतात. त्याला मंत्रालयात बोलावतात. दोघंही बंजारा भाषेतच बोलत आहेत. अवघी 50 सेकंदाची ही क्लिप आहे.
क्लिप दुसरी:
मंत्री: कुठे आहेस अरुण तू? समजवलं का पूजाला? येतोय ना तू?
अरुण: हो ठिक आहे ठिक आहे. मी येतो.
थोडावेळ काहीच संवाद होत नाही. नंतर दोघांमध्ये पूजाला समजावण्याबाबत चर्चा होते. तू येणार आहेस का?, असं मंत्री अरुणला विचारतात. पूजाला समजावून सांगायला सांगतात. ही 42 सेकंदाची क्लिप आहे.
क्लिप तिसरी
मंत्री: अरुण कुठे आहेस तू?
अरुण: एक्सप्रेस हायवेला आहे. दोन तास लागेल यायला. (मोबाईलवर गाड्यांचा कर्णकर्कश आवाज स्पष्ट ऐकू येतो. त्यामुळे अरुण वाहतूक कोंडीत अडकल्याचं स्पष्ट होतं.)
मंत्री: एवढा लेट का?
अरुण: वाहतूक कोंडी होती. गाडीवालाही लेट आला.
मंत्री: तीन तास म्हणजे खूपच उशीर आहे.
अरुण: संध्याकाळी भेटणं जमणार नाही का?
मंत्री: ठिक आहे. तू ये. नंतर बघू. आल्यावर फोन कर.
अरुण: हाव. ओके.
या दोघांमध्ये 1 मिनिट 18 सेकंदाचं बोलणं होतं. अरुण प्रवासात असल्यानं त्यांचं जुजबीच बोलणं झाल्याचं दिसून येतं.
क्लिप चौथी
या क्लिपमध्ये दोघेही मराठीत बोलत आहेत. त्यात पूजाच्या ट्रीटमेंटच्या अनुषंगानेच चर्चा सुरू असल्याचं दिसतं.
अरुण: सुसाईडचं वेड तिच्या डोक्यातून काढा.
मंत्री: ठिक आहे. काय करावं आता.
अरुण: तेच तिच्या डोक्यातून काढा. सुसाईड हा पर्याय नाही. खूप आयुष्य आहे अजून.
मंत्री: तेच तर सांगत आहे तिला मी.
अरुण: ती कितीतरी मुलींची आयडॉल आहे. तिच्या सारखं बनायला बघतात पोरी. सुसाईड करतेय म्हटल्यावर अवघड आहे.
मंत्री: हम्म
अरुण: असं थोडीच असतं.
मंत्री: तू कुठे आहे? बाहेर आहे का? ये ना.
अरुण: तुम्ही बोला.
मंत्री: काय बोलू तिला. एवढं क्लिअर बोलूनही त्याच मुद्द्यावर असेल तर…
अरुण: त्या दिवशीपासून सांगतो ट्रिटमेंट करू, नाहीच म्हणत होती. आज म्हणाली, तू आणि ते सांगतात तर ट्रिटमेंट करते. पण नंतर इलाज केल्यावर सुसाईड करेल म्हणते. असं थोडीच असतं.
मंत्री: हम्म
नंतर बराच गॅप जातो. संभाषण थांबतं.
अरुण: असं थोडीच असतं. तुम्ही काढा तिच्या डोक्यातून.
मंत्री: हम्म. तुला काय म्हणत होती ती. काही तरी म्हटली ना. काही तरी आणून दे म्हणून… कशाला सांगितलं तू?
अरुण: कशाला म्हणजे? गरजेचं आहे सांगणं. असं थोडीच असतं. सुसाईड म्हणजे काय…
मंत्री: ठिक आहे. तू कुठे आहे, इथेच आहे ना?
अरुण: हां इथेच आहे. डोक्यातून काढा तिच्या तेवढं सुसाईडचं. सुसाईड हा ऑप्शन नाही हे ना.
मंत्री: हो
अरुण: ठेवू
या दोघांमधील हा संवाद दोन मिनिटं 24 सेकंदाचा आहे. त्यात दोघंही पूजाच्या आत्महत्येबाबत चर्चा करत आहेत. अरुण हा पूजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कथित मंत्र्याला पोटतिडकीने गळ घालत आहे.
क्लिप पाचवी
ही क्लिप 1 मिनिट 31 सेकंदाची आहे. त्यात हा मंत्री मुलीला कन्व्हिन्स करण्यासाठी अरुणला सांगत आहे. त्यात एका मुलीचा आवाजही येतो. तीही या मंत्र्याशी बोलते. ही मुलगी मंत्र्याला जेवण झालं का विचारत आहे. बहुतेक ती पूजा असावी. तर मंत्री तिला ज्यूस किंवा मंच्युरिअन आणून खायला सांगत आहे. मुलगीही या मंत्र्याला पटकन यायला सांगत आहे. त्यानंतर मंत्रीही तिला होकार देतात.
क्लिप सहावी
या क्लिपमध्ये हा मंत्री अजितदादासोबत मिटिंग असल्याचं अरुणला सांगतो. रात्री या मुलीला समजावलं पण ती ऐकत नसल्याचंही ते सांगतात. त्यावर कार्यकर्ता म्हणतो, पण आत्महत्या करणं हा ऑप्शन नाही ना?. त्यावर, मग मी काय करू? असा हतबल सवाल मंत्री करतात. तेव्हा कार्यकर्ता म्हणतो, तिला एकदा तुम्हाला भेटायचं आहे. तिला तुम्ही भेटा आणि समजवा. अरुणच्या या आग्रहानंतर मंत्रीही तिच्याशी चर्चा करायला तयार होतात. एखादी गाडी कर. तिला मुंबईत घेऊन ये. चर्चा करू, असं मंत्री सांगतात. अरुणही उद्या सकाळी येऊ का? असं विचारतो. त्यावर होय, असं उत्तर मंत्री देतात. ही क्लिप 2 मिनिटं 13 सेकंदाची आहे.
क्लिप सातवी
ही 12 मिनिटाची क्लिप आहे. या क्लिपमध्ये मंत्री वैतागलेले दिसत आहेत. टेन्शनमध्ये असल्याचं ते सांगत आहेत.
मंत्री: मला एक तर टेन्शन… टेन्शन आलंय. आधीच मी परेशान आहे. घराचं टेन्शन आहे. समजव तिला. तूच तिला कन्व्हिन्स करू शकतो.
अरुण: काही तरी मार्ग काढावा लागेल.
मंत्री: कन्व्हिन्स कर तू.
अरुण: कन्व्हिनस करावं लागेल, अवघड विषय आहे,. मागे लागेल… मी जातो आणि व्यवस्थित बोलतो.
मंत्री: ठिक आहे. तू कर नंतर मी येतो.
त्यानंतर या दोघांमध्ये मुलीच्या ट्रिटमेंटबाबत चर्चा सुरू होते. त्यावर अरुण ही मुलगी सर्किट असल्याचं सांगतो. मग मंत्री तिला गोडीत समजावण्याचं अरुणला सल्ला देतात. त्यावर हा बदनामीचा धंदाच आहे, असं अरुण म्हणतो. अरुणच्या या उत्तराने मंत्री अधिकच वैतागतात. माझ्या घरी काय चालू आहे माझं मलाच माहीत. घर डिस्टर्ब झालंय माझं. मला माहीत मी किती परेशान आहे. तिला समजाव तू, असं हा मंत्री म्हणतो. त्यावर तुमचं रेप्युटेशन आहे. हे तिला कळलं पाहिजे, असं अरुण म्हणतो.
मंत्री: मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.
अरुण: तुम्ही काही करणार नाही. मी बघतो परिस्थिती हाताळतो.
मंत्री: तूच काही तरी कर, मी काही करत नाही.
अरुण: मी करतो कन्व्हिन्स
काही वेळाने पुन्हा संवाद सुरू होतो.
अरुण: तिने किट आणली आणली आणि टेस्ट केली. रेड पट्टी झाली. पॉझिटीव्ह आली. एकदमच धडधड झाली. काय करू आणि काय नको असं झालं. घामच फुटला. रुममध्ये आल्यावर कालच माझं आधार कार्ड घेतलं होतं. तिला समजून सांगणं गरजेचं आहे. नाही तर ती भलतीच माथेफिरू… सायको आहे. तिला एकदम कन्व्हिन्स केलं पाहिजे.
मंत्री: हे सगळं झालं की इतक्या लांब जाईल की मला स्वप्नातही दिसलं नाही. म्हटलं तुझं स्वप्नं कर पूर्ण. पण ती दुसऱ्याच मार्गावर गेली. त्यात माझी थोडीच चूक आहे. माझी प्रतिमा… माझी इज्जत…हां… माझ्यामागे एवढा समाज आहे.
अरुण: लोकांना काय विषय चघळायला पाहिजे
मंत्री: मला तर काही कळतच नाही. मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.
अरुण: तुम्हाला काही होणार नाही. टेन्शन घेऊ नका. मी करेल सर्व बरोबर. मी समजावतो ना नंतर.
मंत्री: तू आधी सगळं सांभाळ. मी येतो नंतर…
अरुण: ठिक आहे.
क्लिप आठवी
ही 2 मिनिटे 22 सेकंदाची क्लिप अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात या पूजाचा मृत्यू झाल्याचं कळतं. पूजाने आत्महत्या केल्यानंतरचा हा संवाद आहे. त्यात मंत्री हे अरुणला पूजाचा मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. दरवाजा तोडून आत जा, विलाससोबत आत जा आणि मोबाईल ताब्यात घे. तू फक्त मोबाईल ताब्यात घे, असं ते सांगतात. त्यानंतर पाठिमागे कुणाचा तरी आवाज येतो. पोलिस बोलत असल्याचं जाणवतं.  पोलीस सीपीआर दे म्हणून सांगत आहेत. त्यानंतर पूजाचा मृत्यू झाल्याचं अरुण मंत्र्याला सांगतो. डोक्यावर पडून तिचा मृत्यू झाल्याचं तो सांगतो. तुम्ही येणार आहात का म्हणून अरुण विचारतो. तुमचा फोन सुरूच राहू द्या असंही तो सांगतो. (must listen 11 viral clips of Pooja Chavan Suicide case in pune)
क्लिप नववी:
या क्लिपमध्ये 8 मिनिटं 47 सेंकदाचा संवाद आहे. अरुण रुग्णालयात असून तिथेच त्यांचं मंत्र्याशी फोनवरून संभाषण सुरू असल्याचं दिसतं.
मंत्री: तू आधी फोन घे
अरुण: हॉस्पिटलच्या बाहेर आहे. आत सोडत नाहीत.
मंत्री: नातेवाईक आहे म्हणून सांग. पटकन जा आत.
त्यानंतर फोनमध्ये कुणाचा तरी आवाज येतो. बहुतेक पोलीस अरुणची चौकशी करत आहेत. तिने उडी मारली का? मुलीचं नाव काय? तिचं वय काय? पत्ता काय? असं अरुणला विचारलं जातं. त्यावर मुलीचं नाव पूजा चव्हाण. वय 22. पत्ता परळी वैजनाथ. आता पुण्यात मोहम्मदवाडी, हेमंत पार्क लेन क्रमांक 10मध्ये राहत असल्याचं अरुण सांगतो. त्याचं नावही तो अरुण राठोड म्हणून सांगतो. त्याचं वय 24 असल्याचं आणि पुण्यात पूजासोबतच राहत असल्याचं तो सांगतो. तिचा चुलत भाऊ असल्याचं तो सांगतो. मुलगी कशी पडली? असं त्याला विचारलं जातं. तेव्हा ती पडली तेव्हा बघितल्याचं सांगतो. ती कशी पडली हे कळलं नसल्याचं तो सांगतो. त्यावर ती पडली की तिने उडी मारली? असा सवाल पोलीस करतात. त्यानंतरच संभाषण अर्धवट तुटतं. थेट मंत्र्यांशी संवाद सुरू होतो.
मंत्री: हां, अरुण
अरुण: जबानी नोंदवत होते. गॅलरीबाबत विचारत होते.
मंत्री: गॅलरीतून मोबाईल काढ.
पुन्हा पोलीस अरुणला काही विचारतात. संभाषण तुटतं. नंतर मंत्री आणि अरुणचं पूजाच्या उपचाराबाबत संभाषण सुरू होतं. डॉक्टरांनी तिचा श्वास पाहिला. नाडी चेक केली. तिला पंप दिला, असं तो सांगतो. ती डोक्यावर आपटली. सिमेंटच्या रोडवर तिचं डोकं आदळल्याचं तो सांगतो. त्यावर मंत्री त्याला पुन्हा मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. कुणाच्याच हाती मोबाईल लागू देऊ नका असंही सांगतात. त्यानंतर पुन्हा संपर्क तुटतो. आता अरुणचा पोलिसांशी संवाद सुरू होतो. मी तिचा सख्खा चुलत भाऊ. आम्ही तिघं एकाच रुममध्ये राहतो, असं तो पोलिसांना सांगतो. पुन्हा त्याचा मंत्र्याशी संवाद सुरू होतो. मंत्री हॅलो हॅलो करतात. पण प्रतिसाद येत नाही. विलास…. अरुण… अरुण… असा आवाज देतात पण आवाज येत नाही. काही वेळ असाच जातो.
त्यानंतर पुन्हा संवाद सुरू होतो. मंत्री अरुणला म्हणतात, तू कर पहिलं. काहीही चॅटमार. काहीही हालचाल कर. बाजूलाच राहा. फोन करत राहा. त्याचवेळी मंत्री त्याला फोन ताब्यात घ्यायला सांगतात. नातेवाईकांना गावावरूनही आणायला सांगतात.
क्लिप दहावी
मंत्री: तू काहीच करू नको बस. चिंता करू नको. मदत करू. मी सांभाळतो. माझ्यावर भरोसा ठेव. ठिक आहे?
अरुण: हो.
पूजाने आत्महत्या केल्यानंतर या दोघांमध्ये संवाद होतो. त्यात मंत्री आपण सर्व काही पाहून घेत असल्याचं सांगताना दिसत आहे. ही एक मिनिट दोन सेकंदाची क्लिप आहे.
क्लिप अकरावी
शेवटची क्लिप ही 2 मिनिटं 22 सेकंदाची आहे. रुग्णालयातील हा संवाद आहे. या ठिकाणी पूजाचं शवविच्छेदन सुरू आहे. या ठिकाणी तिचा भाऊ विलासही आहे.
अरुण: पोस्टमार्टेम सुरू आहे.
मंत्री: असं का…
मंत्री: दोरीने चढ आणि मोबाईल काढ. चऱ्हाटाने जा.
त्यानंतर मंत्री विलासशी संवाद साधतात.
विलास: सर काय करू? (विलासचा सूर रडवेला आहे. तो घाबरलेला आहे. हे त्याच्या बोलण्यातून जाणवतं)
मंत्री: काय करू शकतो विलास? ( मंत्र्याच्या या प्रश्नानंतर विलास रडायला लागतो)
मंत्री: तू हिंमतीने काम घे.
विलास: काय करू? डॉक्टर म्हणतात पीएम (शवविच्छेदन) करा.
मंत्री: दुसरी काय करू शकतो आपण.
त्यानंतर अरुण आणि मंत्र्याचा संवाद होतो. मंत्री त्याला घराचं बांधकाम तोडून आत जायला सांगतात. तसेच कुणी विचारलं तर आम्ही झोपलो होतो. ती चक्कर येऊन पडली, असं सांग असं मंत्री विलासला सांगतात. त्यावर माझी सांगायची हिंमत होत नसल्याचं विलास म्हणतो. पण तरीही मंत्री त्याला चक्कर येऊन पडल्याचं सांग म्हणून सांगतात. गॅलरीतून बॅलन्स गेला, चक्कर आली, असंही सांगतात. शेवटच्या क्लिपमध्येही मंत्री अरुणला मोबाईल ताब्यात घ्यायला सांगतात. मोबाईल ताब्यात घे. दरवाजा तोड. आवाज आला तरी चालेल, असंही ते सांगतात. 
विशेष टीप: हा सर्व व्हायरल क्लिप्सचा मजकूर आहे. ‘प्राब’ याची पृष्टी करत नाही.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.