Monday 22 February 2021

महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषदांच्या नियोजित निवडणुकांना कोरोनाचा अडसर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा कोरोनाचे सावट

180 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुका 

राज्यातील 5 महानगरपालिका व 2 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 95 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांवर पुन्हा कोरोनाचे संकट ओढवलेले आहे. त्यामुळे या निवडणुका नियोजित वेळेत होण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. तर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुक आणि विविध 19 जिल्हा परिषदा आणि 27 पंचायत समित्यांमधील 60 रिक्तपदांच्या पोटनिवडणूक तसेच विविध 31 नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील 35 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांना देखील कोरोनाचा अडसर निर्माण झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे तर इच्छुकांकडून केलेल्या पूर्वतयारीवर केलेल्या खर्चावर कोरोनामुळे पाणी फेरले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महाआघाडीकरून निवडणुकांना सामोरे जावे असा मतप्रवाह प्रमुख नेत्यांमध्ये असून कॉंग्रेसच्या वेगळ्या आक्रमक भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. मंत्र्यांवर झालेल्या गंभीर आरोप-प्रत्यारोपाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर विपरीत परिणाम होण्याच्या भीतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाणे पथ्यावर असल्याच्या देखील प्रतिक्रिया राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहेत. 180 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुका आणि 95 नगरपरिषदा, नगरपंचायती, 5 महानगरपालिका व 2 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या 15 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात म्हणजेच एप्रिल, मे महीन्यात होणे अपेक्षित आहेत. या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. 
      पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील 2 नगरपरिषदेच्या (राजगुरूनगर, चाकण) सार्वत्रिक निवडणुका होणार असून  पिंपरी चिंचवड महापालिकेतील 3 रिक्तपदांच्या पोटनिवडणुका होणार आहेत यामध्ये रिक्त प्रभाग क्र.1ड (निधन), प्रभाग क्र. 14अ (निधन), प्रभाग क्र. 4ब (निधन) यांचा समावेश आहे तर पुणे महापालिकेतील 2 रिक्तपदांच्या पोटनिवडणुका होणार आहेत यामध्ये प्रभाग क्र. 8क (निधन) आणि  प्रभाग क्र.29ब (निधन) यांचा समावेश आहे तर पुणे जिल्हा परिषदेच्या बारामती तालुक्यातील शिर्सूफळ- गुणवाडी गटातील रिक्तपदासाठी पोटनिवडणुक होणार आहेत तसेच पंचायत समिती हवेली मधील मांजरी बु. या निर्वाचक गणामध्ये पोटनिवडणुक होणार आहे. 
        नवी मुंबई, वसई- विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी (कंसात कारण): नाशिक- 4अ (निधन), धुळे- 5ब (राजीनामा), परभणी- 11ब (निधन), 14क (निधन), ठाणे- 30अ (जात प्रमाणपत्र अवैध), 15ड (निधन), 23ड (निधन), अहमदनगर- 9क (अनर्ह), नांदेड वाघाळा- 13अ (निधन), नागपूर- 8ब (जात प्रमाणपत्र अवैध), मीरा भाईंदर- 10ड (निधन), मालेगाव- 20क (निधन), पिंपरी चिंचवड- 1ड (निधन), 14अ (निधन), 4ब (निधन), उल्हासनगर- 14ड (निधन), 8क (निधन) सोलापूर- 6क (निधन), सांगली मिरज कुपवाड- 16अ (निधन), अकोला- 4अ (निधन), 8क (निधन), 3क (निधन), भिवंडी निजामपूर- 9ब (राजीनामा), पुणे- 8क (निधन) आणि 29ब (निधन).यांचा समावेश आहे. 
       विविध जिल्ह्यांमधील 95 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच इतर विविध 31 नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील 35 रिक्तपदांच्या पोटनिवडणुक होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: ठाणे- अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, मुरबाड, शहापूर, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, रत्नागिरी- मंडणगड, सिंधुदुर्ग- कसई- दोडामार्ग, वाभवे- वैभववाडी, पुणे- राजगुरूनगर, चाकण, नाशिक- चांदवड, निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, जळगाव- भडगाव, वरणगाव अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, जामखेड, शेवगाव, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, परभणी- पालम, बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर- अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, नांदेड- भोकर, हिमायतनगर, नायगाव, हिंगोली- सेनगाव, औंढा- नागनाथ, अमरावती- भारकुली, तिवसा, धारणी, नांदगाव- खंडेश्वर, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, झरी, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, वाशीम- मानोरा, नागपूर- मोवाड, वाडी, हिंगणा, कुही, भिवापूर, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, चंद्रपूर- चिमूर, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.यांचा समावेश आहे.   
         भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच विविध 19 जिल्हा परिषदा आणि 27 पंचायत समित्यांमधील 60 रिक्तपदांच्या पोटनिवडणूक होत असलेल्या निवडणूक विभागांची जिल्हा परिषदनिहाय नावे अशी (कंसात तालुका): रायगड- वरसे (रोहा),  पुणे- शिर्सूफळ- गुणवाडी (बारामती), सांगली- उमदी (जत), सोलापूर- कुर्डू (माढा), कोल्हापूर- दत्तवाड (शिरोळ), नाशिक- कानाशी (कळवण), जळगाव- वाघोदा बु.- विवरा बु. (रावेर), अहमदनगर- सातेवाडी (अकोले), औरंगाबाद- घायगाव (वैजापूर), नांदेड- बोधडी बु. (किनवट), पेठवडज (कंधार), बारड (मुदखेड), लातूर- हाडोळती (अहमदपूर), एकुर्गा (लातूर), चापोली (चाकूर), हिंगोली- आंबा (वसमत), बीड- राजुरी न. (बीड), कडा (आष्टी), उस्मानाबाद- आष्टा (भूम), सांजा (उस्मानाबाद), जालना- पिरकल्याण (जालना), सेवली (जालना), परभणी- कोल्हा (मानवत), अमरावती- बेनोडा (वरुड), गायवाडी (दर्यापूर), देवगाव (धामणगाव रेल्वे), बुलढाणा- निमगाव (नांदुरा), उंद्री (चिखली), चंद्रपूर- मोहाडी नलेश्वर-वासेरा (सिंदेवाडी) आणि चुनाळा विरूर स्टेशन (राजुरा).यांचा समावेश आहे. तर पोटनिवडणूक होत असलेल्या निर्वाचक गणांची पंचायत समितीनिहाय नावे अशी (कंसात जिल्हा): तळा (रायगड)- काकडशेत, हवेली (पुणे)- मांजरी बु., कवठे महाकाळ (सांगली)- देशिंग, शिराळा (सांगली)- मणदूर, मिरज (सांगली)- कसबे डिग्रज, सातारा (सातारा)- दरे खुर्द, शिरोळ (कोल्हापूर)- दानोळी, कळवण (नाशिक)- मोकभणगी, यावल (जळगाव)- दहिगाव, यावल (जळगाव)- भालोद, शिरपूर (धुळे)- हिसाळे, साक्री (धुळे)- हट्टी खुर्द, श्रीगोंदा (अहमदनगर)- काष्टी, अकोले (अहमदनगर)- सातेवाडी, भूम (उस्मानाबाद)- आरसोली, उमरगा (उस्मानाबाद)- मुळज, उमरगा (उस्मानाबाद)- दाळींब, अर्धापूर (नांदेड)- मालेगाव, नांदेड (नांदेड)- वाडी (बु.), मुदखेड (नांदेड)- मुगट, औसा (लातूर)- खरोसा, परळी वै. (बीड)- धर्मापुरी, अमरावती (अमरावती)- वलगाव, अचलपूर (अमरावती)- कांडली, दिग्रस (यवतमाळ)- मांडवा, भद्रावती (चंद्रपूर)- पाटाळा, चंद्रपूर (चंद्रपूर)- पडोली, मूल (चंद्रपूर)- मारोडा, मूल (चंद्रपूर) जुनासुर्ला आणि आरमोरी (गडचिरोली)- अरसोडा. यांचा समावेश आहे.
Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.