सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती मागे, लवकरच होणार निवडणुका
जिल्हा मध्यवर्ती बँका, साखर कारखान्यांसह ४७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सुकर झाला आहे. गळीत हंगामामुळे सहकारी मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तीन महिन्यांसाठी सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर आणलेली स्थगिती सरकारने पुन्हा मागे घेतली आहे. ४७ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. निवडणुकीला ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ती मागे घेण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह राज्यातील 22 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका आणि 8 हजार 194 प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. सहकार विभागाने आता निवडणुकीला परवानगी दिल्यानंतर त्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला. पण जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच साखर कारखान्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होताच, ऊस गाळप हंगाम पूर्ण होईपर्यंत या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. त्यानंतर १६ जानेवारीला निवडणुकांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 157 मधील तरतुदीनुसार शासनास असलेल्या अधिकारात कलम 73 क मधील तरतुदीस सूट देऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था या संस्थांच्या निवडणुका ज्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत, अशा संस्था वगळून राज्यातील इतर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता मात्र त्या आदेशास ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या, दूध संघ, शिखर संस्था अशा अ वर्गातील ११६ मोठय़ा सहकारी संस्था, सहकारी नागरी बँका, क्रेडिट सोसायटी, कर्मचाऱ्यांच्या क्रे डिट सोसायटी अशा ब वर्गातील मध्यम स्वरूपाच्या १३ हजार ८५, छोटय़ा क्रेडिट सोसायटी, गृहनिर्माण संस्था, छोटे दूध संघ अशा क वर्गातील १३ हजार ७४ आणि ग्राहक संस्था, कामगार संस्था अशा ड वर्गातील २१ हजार संस्था यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. राज्यात आता कोरोनाची स्थितीही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग ही मोकळा होणार आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.