Friday, 12 February 2021

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक लवकरच; निवडणूक आयोगाकडून तयारी सुरु

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक-2021; डॉ. संजयकुमार भोसले यांच्या नावाची चर्चा

राष्ट्रवादीचे आमदार कै. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून प्रशासकीय तयारी सुरु करण्यात आली आहे. पंढरपूर  विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मात्र या मतदारसंघातून अनेकांची नावे चर्चिली जात आहेत यामध्ये प्रारंभी राष्ट्रवादीचे अमरजीत पाटील यांनी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना जर उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीचा विजय हा आणखी सोपा होईल असा विश्वास व्यक्त करून चर्चेला उधाण आणले होते तर आमदार रोहित पवार अधूनमधून जनतेच्या मनातील उमेदवार दिला जाईल अशी वक्तव्य करून या भागात दौरे काढून स्वतः प्रसिद्धीच्या झोतात राहतात. या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाकडून अनेकांना उमेदवारीच्या आशा आहेत तर भाजपमधील देखील उमेदवारी मिळाली तर पक्षांतर करण्याच्या स्थितीत आहेत. कै. भारत भालके यांच्या भावकीतील प्रशासकीय अधिकारी डॉ. संजयकुमार भोसले यांच्या नावाची देखील चर्चा राजकीय पदाधिकारी व मतदारांमध्ये आहे. कै. भारत भालके यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मतदारसंघातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉ. संजयकुमार भोसले यांना कमालीचा आग्रह केला जात आहे. कै. भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांची नुकतीच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड केली आहे. भगिरथ भालके यांचे वय आणि अनुभव नसल्यामुळे पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यास तुर्तास टाळले आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये येऊन हा संभ्रम दूर केला होता. तर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पंढरपूरमधून पोटनिवडणुकीतउमेदवारी देण्याची चर्चा रंगली होती त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्ताचे खंडन करून पार्थ यांच्या उमेदवारीबाबत अशी कोणतीही चर्चा नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले होते. या मतदारसंघात साखर कारखाने उद्योग व त्यातून शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांना व शेती पूरक उद्योगांना चालना देण्याचे कार्य प्रशासकीय माध्यमातून डॉ. संजयकुमार भोसले यांनी अविरतपणे सुरु ठेवल्याने युवा वर्गासह जेष्ठ नागरीकांच्या मनात त्यांच्या विषयी आदर आहे. डॉ. संजयकुमार श्रीमंतराव भोसले (54) यांचे शिक्षण बी.ए.एम.एस., एम.ए. (राज्यशास्त्र)असून सध्या प्रशासकीय सेवेत सहसंचालक (साखर) उपपदार्थ, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे वडील मा. प्राचार्य श्रीमंतराव भोसले हे रयत शिक्षण संस्थेचे स्थायी सदस्य आहेत. कै. भारत भालके यांच्या सरकोली हे मूळ गाव असून त्यांच्या भावकीमधील डॉ. संजयकुमार भोसले यांचे या मतदारसंघात सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्य आहे. सरकोली येथील भैरवनाथ इमारत बांधकामात पुढाकार घेऊन इमारत पूर्ण केली आहे. साखर कारखान्यासाठी कामकाज करीत असतांना, इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामसाठी राष्ट्रीय पातळीवरील समितीमध्ये कामकाज व इथेनॉल निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महिला बचत गटांची निर्मिती, ३३ हजार महिलांचे संघटन करून स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन, महिला बचत गटांची जिल्हास्तरीय आरोग्य विमा सहकारी संस्था स्थापन करून १० हजार कुटुंबांना आरोग्य विम्याचे लाभ मिळवून दिले आहेत. शेती आणि ग्रामविकास यासाठी संस्थेमार्फत सातत्त्याने मार्गदर्शन शिबीर उपक्रम राबविला जातो. सोलापूर या जिल्हयातील युवकांना स्वयंराजेगारासाठी प्रेरित करणे व त्यासाठी उद्योजकता केंद्राच्या माध्यमातून गेली २० वर्ष प्रशिक्षण शिबीर घेतली आहेत. त्यांनी विविध ग्रंथाचे संपादन देखील केले आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून अनेक उपक्रम त्यांनी राबविले असल्याने स्थानिक पातळीवर डॉ. संजयकुमार भोसले यांच्या नावाचा बोलबाला असून राजकीय व सामाजिक पदाधिकारी त्यांच्या नावाचा आग्रह करीत असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.या मतदारसंघात सहकारी साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट-तटाचा प्रभाव आमदारकीच्या राजकारणावर असतो त्यामुळे साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व राखून सामाजिक संस्थांचे गट मतदारांवर प्रभाव निर्माण करून निवडणुकीत यश मिळवण्याचा प्रयत्न केला जातो अशी स्थिती आहे. राजकीय यशस्वीतेसाठी विविध गट, ग्रुप व सामाजिक संस्थाच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या महत्वाकांक्षा स्थानिक राजकीय पदाधिकारी व्यक्त करीत असतात. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मंगळवेढा शहर आणि सर्वच ग्रामीण भाग असून, यामध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर तालुक्याच्या राजकारण, अर्थकारणाचा महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. सहकार शिरोमणी कारखाना, पांडुरंग कारखाना, वसंतराव काळे कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, दामाजी साखर कारखाना यांचा निवडणुकीत प्रभाव असतो.आमदार कै. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर कायम वर्चस्व ठेवले. भारत भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती. कै. भारत भालके यांचे 28 नोव्हेंबर 2020 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, सर्वांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केले केले होते. त्यांनी सरकोली (ता.पंढरपूर) येथे जाऊन आ.भारत भालके यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती. कै. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या जागेसाठी प्रशासकीय तयारी सुरु करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांची यादी मागवली आहे. विधानसभेचे पद रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेण्याचा नियम असल्याने प्रशासकीय स्तरावर तयारी सुरु करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलमध्ये पंढरपूर विधानसभेसाठी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीसाठी किती मतदान यंत्रे लागणार आहेत, याची प्रशासनाकडून माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून दुसरीकडे पंढरपुरात राजकीय नेत्यांकडूनही जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. पंढरपूर विधानसभा निवडणूक-2014 मध्ये काँग्रेसकडून विजयी भारत भालके यांना 91 हजार 863 मते (40.03%) मिळाली होती तर प्रशांत परिचारक 82 हजार 950 मते (36.15%) मिळाली होती त्यांना पराभूत केले होते. तर शिवसेनेचे समाधान आवताडे यांना 40 हजार 910 मते (17.83%) मिळाली होती, तसेच राष्ट्रवादीचे चंद्रकांत बागल यांना केवळ 3 हजार 075 मते (1.34 %) प्राप्त झालेली होती. काँग्रेस उमेदवार भारत भालके यांनी 8 हजार 913 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेनेचे समाधान आवताडे, चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस चे चंद्रकांत बागल आणि पाचव्या क्रमांकावर नंदकुमार पवार होते. तर पंढरपूर विधानसभा निवडणूक- 2009 मध्ये भारत भालके यांना 1 लाख 06 हजार 141 (38.66%) मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे विजयसिंग मोहिते-पाटील यांना 68 हजार 778 (25.05%) मते मिळाली होती. भारत भालके यांनी 37363 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. तर पंढरपूर विधानसभा निवडणूक- 2019 मध्ये राष्ट्रवादीचे भारत भालके यांना 89 लाख 78 हजार 700 (37.48%) मते मिळाली होती तर भाजपचे समाधान औताडे यांना 76 हजार 426 (31.90%) मते मिळाली होती. कै. भारत भालके यांनी 13361 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांचा निधनाने रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी भगीरथ भालके, डॉ. संजयकुमार भोसले, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक, सेना पदाधिकारी शैला गोडसे यांच्यासह अनेक जणांची नावे इच्छूक म्हणून चर्चेत आहेत. पंढरपूर विधानसभा निवडणूक- 2019 मध्ये एकूण मतदार संख्या 3,33,397 इतकी होती त्यामध्ये अंशतःवाढ झालेली आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.