Friday, 26 February 2021

" चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे" या पुस्तकाचे प्रकाशन; कामाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिगत संबंध जपणे मोठे कौशल्य

कामाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिगत संबंध जपणे मोठे कौशल्य : राजू शेट्टी
 
    
पुणे- इरसाल पुढारी, नेते यांना सांभाळून ग्रामीण भागात पत्रकारिता करणे खूप अवघड असते. ही जबाबदारी पार पाडताना, कामाच्या पलीकडे जाऊन सर्वांशी व्यक्तिगत संबंध जपणे हे मोठे कौशल्य असते. असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
     जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी लिहिलेल्या " चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे" या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी शेट्टी, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे व जेष्ठ पत्रकार पराग करंदीकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी शेट्टी बोलत होते. यावेळी भाजपा नेते बाबा जाधवराव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.
        शेट्टी म्हणाले, १९९० नंतर पत्रकारितेचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहे. आज लेखणीवर निष्ठा ठेऊन काम करणारे पत्रकार खूप कमी दिसतात. आपली पत्रकारिता करताना समयसूचकता राखून समाजहिताचे काम करणे ही सोपी गोष्ट नाही. श्याम दौंडकर यांनी ग्रामीण भागातून येऊन, खडतर आयुष्य जगून समाजहिताची पत्रकारिता केली आहे. हे काम करताना काही किस्से घडले ते आज खुमासदार पद्धतीने या पुस्तकात मांडण्यात आले आहेत.
       खासदार बारणे यांनी डिजिटलच्या युगातही वर्तमानपत्राचे महत्व कमी झाले नसल्याचे सांगून, प्रत्येक माणूस हा सकाळी प्रथम वर्तमानपत्र वाचतोच याकडे आवर्जून लक्ष वेधले. पत्रकारिता करताना घडलेले किस्से लिहून काढणे व तो ठेवा पुस्तकरुपी समाजासमोर मांडणे हे काम दौंडकर यांनी केले आहे. निर्मला पानसरे यांनी पत्रकार व लोकप्रतिनिधी यांचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगून, पत्रकार हा जनसामान्यांना न्याय देणारा महत्वपूर्ण घटक असल्याचे सांगितले. पराग करंदीकर यांनी श्याम दौंडकर यांनी, एका पुस्तकाचे लिखाण करून न थांबता पुढील आयुष्यात ही लिहीत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी बाबा जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य विश्वजित जगदाळे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
        श्याम दौंडकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात आपल्या ३० वर्षाच्या पत्रकारितेतील किस्से या पुस्तकात लिहिले असल्याचे सांगितले. हा पुस्तक प्रकाशन सोहळा हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असल्याच्या भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी पुस्तक प्रकाशित करणाऱ्या 'लोकमित्र प्रकाशन' चे चंद्रकांत भुजबळ यांचा सत्कार शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार प्रकाश भोईटे, विठ्ठल जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पांडुरंग खेसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का डोंगरे यांनी केले.

"चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे" इ-बुक आवृत्ती उपलब्ध 

जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांचे लिखित व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) 'लोकमित्र प्रकाशन' निर्मित 'चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे' या पुस्तकाचे प्रकाशन निर्मिती जानेवारी 2021 मध्ये करण्यात येऊन प्रकाशन दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आले आहे. या पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या 240 असून किंमत 300/- रुपये आहे. तर इ-बुक आवृत्तीची सवलत किंमत 200/- आहे. पुस्तकाची हि प्रथम आवृत्ती आहे. या पुस्तकामध्ये जेष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी पत्रकारितेतील काही स्मरणीय घटना व किस्से कथन केलेले आहेत. वृत्तपत्रात कार्यरत असताना नकळत घडलेल्या मुद्रणदोष आणि त्यामधून झालेली विनोदाची निर्मिती असे प्रसंग या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेले आहेत. अशा मुद्रणदोषामुळे घडलेल्या विनोदांचे संकलन महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील असंख्य पत्रकारांकडून केलेले आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच प्रकाशन साहित्यासह सामान्यांना या पुस्तकातून वाचनीय आकर्षण, प्रेरणा, अनुभव तसेच मुद्रणदोष महत्व, परिणाम याबाबत माहिती या पुस्तकामध्ये मिळेल. पत्रकारीतेक्षेत्रात नकळत घडलेल्या चुकांचा होणारा विपरीत परिणाम व विनोद निर्मिती, अशा स्वरूपाच्या मुद्रणदोष निदर्शनास आणून भविष्यात कार्यरत असताना चुका, दोष  होऊ नये म्हणून मार्गदर्शनपर लेखनाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. 

"चुका, खुलासे अन किस्से पत्रकारितेचे" पुस्तकाच्या इ-बुक आवृत्तीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

=====================
Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.