पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची १७ एप्रिलला पोटनिवडणूक
निवडणूक आयोगाने 12 राज्यातील 14 विधासनभा आणि 2 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. या सर्व ठिकाणी 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 15 दिवसानंतर म्हणजेच, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. यात, महाराष्ट्रातील पंढरपूर मतदारसंघासाठीही निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि उपचारादरम्यान पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी ५२४ मतदान केंद्रे आहेत. पोटनिवडणुकीसाठी ४२ मतदान केंद्रांच्या नावांमध्ये बदल झालेला असून, पंढरपूर शहर २२, ग्रामीण २, तसेच मंगळवेढा येथील २८ केंद्रांच्या नावात बदल झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिल रोजी मतदान तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यासाठी अनेक जणांनी तयारी केली आहे. प्रत्येक पक्ष निवडणूक आयोग कधी तारीख जाहीर करतो याकडे लक्ष लागले होते.आज ती तारीख जाहीर झाली असून 23 मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारभ होणार आहे. 30 मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख तर 3 एप्रिल पर्यत अर्ज मागे घेता येणार आहे. प्रत्यक्ष मतदान 17 एप्रिल तर मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यामुळे आचार संहिता लागू झाली आहे.या जागांसाठी पोटनिवडणूक
विधानसभा
महाराष्ट्र (1 जागा) : पंढरपूर
राजस्थान (3 जागा) : सहारा, सुजानगड आणि राजसमंद
मध्य प्रदेश (1 जागा) : दमोह
गुजरात (1 जागा) : मोरवा हदफ
उत्तराखंड (1 जागा) : सल्ट
झारखंड (1 जागा) : मधुपूर
कर्नाटक (2 जागा) : बसवकल्याण आणि मस्की
मिजोरम (1 जागा) : सेरछिप
नागालंड (1 जागा) : नोकसेन
ओडिशा (1 जागा) : पिपिली
तेलंगाणा (1 जागा) : नागार्जुन सागर
लोकसभा
आंध्र प्रदेश (1 जागा) : तिरुपतीकर्नाटक (1 जागा) : बेळगाव
दरम्यान पंढरपूर विधानसभा निवडणूक-2014 मध्ये काँग्रेसकडून विजयी भारत भालके यांना 91 हजार 863 मते (40.03%) मिळाली होती तर प्रशांत परिचारक 82 हजार 950 मते (36.15%) मिळाली होती त्यांना पराभूत केले होते. तर शिवसेनेचे समाधान आवताडे यांना 40 हजार 910 मते (17.83%) मिळाली होती, तसेच राष्ट्रवादीचे चंद्रकांत बागल यांना केवळ 3 हजार 075 मते (1.34 %) प्राप्त झालेली होती. काँग्रेस उमेदवार भारत भालके यांनी 8 हजार 913 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेनेचे समाधान आवताडे, चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस चे चंद्रकांत बागल आणि पाचव्या क्रमांकावर नंदकुमार पवार होते. तर पंढरपूर विधानसभा निवडणूक- 2009 मध्ये भारत भालके यांना 1 लाख 06 हजार 141 (38.66%) मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे विजयसिंग मोहिते-पाटील यांना 68 हजार 778 (25.05%) मते मिळाली होती. भारत भालके यांनी 37363 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. तर पंढरपूर विधानसभा निवडणूक- 2019 मध्ये राष्ट्रवादीचे भारत भालके यांना 89 लाख 78 हजार 700 (37.48%) मते मिळाली होती तर भाजपचे समाधान औताडे यांना 76 हजार 426 (31.90%) मते मिळाली होती. कै. भारत भालके यांनी 13361 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. पंढरपूर मतदारसंघात पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील गावांचा समावेश होतो. मतदारसंघात एक लाख 77 हजार 387 पुरूष, एक लाख 62 हजार 148 महिला आणि 5 तृतीयपंथी, असे एकूण तीन लाख 39 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 2019 मध्ये या मतदारसंघात दोन लाख 39 हजार 690 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 71.85 टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत 1050 बॉलेट युनिट, 1016 कंट्रोलिंग युनिट, 1009 व्हीव्ही पॅटचा वापर मतदानासाठी होणार आहे. 524 मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी 3150, 60 सेक्टर अधिकारी, विविध पथकातील कर्मचारी 205 आणि 550 पोलीस कर्मचारी अशा एकूण 3965 मनुष्यबळाची नेमणूक करण्यात येणार आहे. तर कोविड-19 चे सर्व नियम पाळून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 1210 आरोग्य कर्मचारी/आशा कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार असून प्रत्येक केंद्रावर सॅनिटायझर, तापमान तपासणीसाठी 550 थर्मल गन, 4500 फेस शिल्ड, 4500 हॅन्ड ग्लोज आणि 5000 मास्क यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.