Wednesday, 31 March 2021

२५२- पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक 2021; महाविकास आघाडीसह भाजपमध्येही बंडखोरीची लागण

बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या शैला गोडसे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार

राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार भालके यांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक शैला गोडसे यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली मात्र त्यांनी बंडखोरी कायम ठेवत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून दुसरे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. त्यांच्या बंडखोरीचा लाभ कोणाला मिळणार तसेच उमेदवारी कायम ठेवणार काय? याबाबत राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.  शैला गोडसे या गेल्या विधानसभेच्या वेळी निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक होत्या. मात्र पक्षाने युतीमध्ये उमेदवारी डावलल्याने त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. यावेळी मात्र त्यांनी सुरुवातीपासून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे उमेदवारी मागितली होती. ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने त्यांनी शरद पवार, अजित पवार व जयंत पाटील यांचीही भेट घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र उमेदवारी भालके यांच्या कुटुंबातच देण्यात येणार असल्याचे समजताच त्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरत प्रचाराला सुरुवात केली. शैला गोडसे यांची उमेदवारी राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवणारी असल्याने शिवसेनेतून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिल्याने शैला गोडसे यांचेवर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली. आज सामना या मुखपत्रातून शैला गोडसे यांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली आहे. शैला गोडसे या कायम महिला आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात अग्रेसर राहत असल्याने त्यांची लोकप्रियता मोठी आहे. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नासाठी त्या सातत्याने आंदोलने करून न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या याच लोकप्रियतेमुळे ते सोलापूर जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. महिला वर्गातील विशेष लोकप्रियतेमुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळत चालला आहे. आता निवडणुकीतून माघार घेतल्यास आपली विश्वासार्हता संपेल अशी भूमिका कार्यकर्ते व समर्थकांनी घेतल्याने त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेने त्यांचे निलंबन केले आहे. 

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी 38 उमेदवारांनी दाखल केले 44 अर्ज


पोट निवडणूक २५२ - पंढरपूर विधानसभा मतदारसंघ

नामनिर्देशनपत्र दाखल उमेदवारांचा तपशील

अ.क्र.

उमेदवाराचे नाव

पक्ष

1

संतोष महादेव माने

अपक्ष

2

सचिन अरुण शिंदे

स्वाभिमानी पक्ष

3

संजय नागनाथ माने

अपक्ष

4

संदिप जनार्दन खरात

अपक्ष

5

महेंद्र काशिनाथ जाधव

पिपल्स रिपब्लिकन पार्टी

6

नागेश प्रकाश पवार

अपक्ष

7

इलियास हाजीयुसुफ शेख

अपक्ष

8

शैला धनंजय गोडसे

अपक्ष

9

आवताडे समाधान महादेव

भारतीय जनता पार्टी

10

रज्जाक उर्फ अबुदलरोफ जाफर मुलाणी

अपक्ष

11

संजय चरणु पाटील

अपक्ष

12

अशोक ज्ञानदेव वाघमोडे

अपक्ष

13

भालके भागिरथ भारत

राष्ट्रवादी कॉंग्रेस

14

अभिजीत वामनराव आवाडे - बिचुकले

अपक्ष

15

अमोल अभिमन्यू माने

अपक्ष

16

सतिश विठ्ठल जगताप

अपक्ष

17

पोपट हरी धुमाळ

हिंदुस्तान जनता पार्टी

18

सुनिल सुरेश गोरे

अपक्ष

19

सिताराम मारुती सोनवले

अपक्ष

20

शैला धनंजय गोडसे

बहुजन विकास आघाडी

21

सिध्दाराम सोमण्णा काकणकी

अपक्ष

22

आवताडे सिध्देश्वर बबन

अपक्ष

23

शितल शिवाजी आसबे

अपक्ष

24

बळीराम जालींदर बनसोडे

राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी

25

किशोर सिताराम जाधव

अपक्ष

26

सुधाकर रामदास बंदपट्टे

अपक्ष

27

मोहन नागनाथ हळणवर

अपक्ष

28

रामचंद्र नागनाथ सलगर

अपक्ष

29

खंदारे सुदर्शन रायचंद

अपक्ष

30

कपिलदेव शंकर कोळी

अपक्ष

31

सुदर्शन पाडूरंग मसुरे

अपक्ष

32

भोसले नागेश आण्णासो

अपक्ष

33

डॉ. भोसले राजाराम कोंडीबा

बळीराजा पार्टी

34

पुजारी मनोज गोविंदराव

अपक्ष

35

आवारे सिध्देश्वर भारत

बहुजन महा पार्टी

36

माने संजय नागनाथ

महाराष्ट्र विकास आघाडी

37

बिराप्पा मधुकर मोटे

वंचित बहुजन आघाडी

38

बापू दादा मेटकरी

अपक्ष

39

बिरुदेव सुखदेव पापरे

अपक्ष

40

गणेश शिवाजी लोखंडे

अपक्ष

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी एकूण 38 जणांनी 44 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही बाजूने बंडखोरीला उधाण आले आहे. भाजपमध्येही बंडखोरीची लागण झाली असून परिचारक गटाचे पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी उमेदवारी दाखल केला आहे. नगराध्यक्षा भाजप उमेदवाराच्या कार्यक्रमात असताना पती नागेश भोसले बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. नागेश भोसले यांच्या बंडखोरीमुळे पंढरपूर शहर व परिसरात भाजपाला धक्का बसू शकतो. तर भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांनीही घरातूनच बंडखोरी करत भाजपाला आव्हान दिल्याने मंगळवेढ्यात भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीलाही असाच फटका बसला असून त्यांच्या मित्रपक्षातून बंडखोरी झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी उमेदवारी दाखल केली असून पक्षाने सचिन पाटील यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्याने हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. दिवंगत आमदार कै. भारत भालके हे पहिली निवडणूक स्वाभिमानीकडून लढून विजयी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात मोठी ताकद असून राजू शेट्टी प्रचारासाठी तळ ठोकून थांबणार असल्याने राष्ट्रवादीला हे बंड वरिष्ठ पातळीवरून शांत करावे लागणार आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक शैला गोडसे यांनी उमेदवारी कायम ठेवत प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून आता शिवसेनेने त्यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे. शैला गोडसे या गेल्या 10 वर्षे महिला व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करत आल्या असून महिलावर्गात त्या लोकप्रिय आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेत त्या सदस्य असून कार्यकर्ते व मतदारांच्या दबावामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत हि निवडणूक लढवणार असल्याची त्यांची भूमिका आहे. धनगर उमेदवारांची उमेदवारीही दोन्ही पक्षांच्या अडचणीत भर घालणारी ठरणार आहे. या उमेदवारात सातारा येथील अभिजित बिचकुले यांचेसह इंदापूर, सोलापूर, करमाळा, पुणे अशा मतदारसंघाशी संबंध नसलेल्या उमेदवारांमध्ये हौशे-नवश्यांची भर पडली असून आपले अर्ज दाखल केले आहेत. एका उमेदवाराने तर 'विठू माऊलीच्या कृपेने बिनविरोध' असे राजकीय पक्षाचे नावापुढे नामनिर्देशनपत्रात नमूद केलेले आहे. अर्थातच आज होणाऱ्या छाननीत असे चुकीचे उमेदवारी अर्ज अवैध ठरतील.  दरम्यान पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी ३८ उमेदवारांनी ४४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत काही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध झाल्यानंतर ३० अर्ज वैध ठरले. १ ते ३ एप्रिल अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. मात्र १ तारखेला एकाही उमेदवाराने अर्ज माघारी घेतला नाही.

17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी निकाल
अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021
अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021
अर्जांची छाननी – 31 मार्च 2021
अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021
मतदान – 17 एप्रिल 2021
निवडणूक निकाल – 2 मे 2021

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.