संसदीय अभ्यास व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ‘क्षमता अभिवृद्धी’ कार्यक्रमाअंतर्गत उपक्रम
कोरोना संसर्ग आपत्तीमुळे गेली वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे, शालेय शिक्षणाची शाळा भरवण्याचा निर्णय घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच आता ऑनलाइन शाळेला सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा सचिवालयाच्या संसदीय अभ्यास व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ‘क्षमता अभिवृद्धी’ कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील आमदार व विधान भवनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱयांची देशी व विदेशी भाषा शिकण्यासाठी ही ऑनलाइन शाळा भरवण्यात येणार आहेत. 22 जूनपासून ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत.
या वर्गाला लोकप्रतिनिधींचा प्रतिसाद किती मिळतो हे पहावे लागणार आहे. दांडी बहाद्दर लोकप्रतिनिधींवर आता नागरिकांचे लक्ष राहणार आहे. ऑनलाइन करिता आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अनुउपास्थितीची कारणे देखील अफलातून पहावयास मिळतील यामध्ये काही शंका असणार नाही. आमदारांची लवकरच ऑनलाइन शाळा भरणार आहे. राज्यातील आमदारांना देशी व विदेशी भाषा शिकण्यासाठी ही ऑनलाइन शाळा भरवण्यात येणार आहेत. आमदारांना फ्रेंच, जर्मन, रशियन तसेच बंगाली गुजराती, मराठी, ओडिया भाषा शिकवण्यासाठी 22 जूनपासून ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत. लोकसभा सचिवालयाच्या संसदीय अभ्यास व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ‘क्षमता अभिवृद्धी’ कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील आमदार व विधान भवनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱयांना फ्रेंच, जर्मन, जपानी, पोर्तुगीज, रशियन आणि स्पॅनिश या आंतरराष्ट्रीय भाषा तसेच बंगाली, गुजराती, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू या भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भाषांचे वर्ग ऑनलाइन भरवण्यात येतील. आमदार व विधान भवनातील कर्मचारी व अधिकाऱयांच्या कुटुंबीयांनाही या भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 22 जून रोजी या भाषा प्रशिक्षण शिबिराचे ऑनलाइन उद्घाटन होईल. हे प्रशिक्षण तीन महिन्यांचे असून एकूण तीस तासांमध्ये 24 वर्ग होतील. प्रत्येक आठवडय़ाला 75 मिनिटांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. 22 जूनपासून सकाळी 10 ते 11.15 आणि दुपारी 11.30 ते दुपारी 12.45 या वेळेत वर्ग भरतील. त्यानंतर 5 जुलैपासून दुपारी 2.30 ते 3.45 आणि दुपारी 3.45 ते संध्याकाळी 5 या वेळेत वर्ग भरवण्यात येणार आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.