अभ्यासक्रम नसलेल्या संस्थेतून 'एमबीए' शिक्षण घेतल्याचा खोटा दावा! शपथपत्रात अनेक तफावती
आमदार संजय चंद्रकांत जगताप यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना २०१४ व २०१९ मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर दाखल केलेल्या शपथपत्रात तपासणीअंती अनेक तफावती आढळून आल्या आहेत. यात निवडणूक आयोगाची दिशाभूल व फसवणूक झाल्याचे निष्पन्न होत असल्याने या प्रकरणी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करून याचिकाकर्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी डॉ. अभिषेक सुभाष हरदास यांनी याचिकेद्वारे केली आहे. सासवड येथील प्रथम वर्ग न्यायालयात १८ जून शुक्रवार रोजी फिर्यादी हरदास यांनी पाच पाने असलेली सविस्तर याचिका दाखल केली असल्याने आता सासवड न्यायालयात याची सुनावणी पुढील काळात करण्यात येणार आहे. शेत जमीन, खरेदी-वारसा हक्काने मिळालेली जमीन, स्वतःची वाहने खरेदी, रहिवासी सदनिका, बंगला, इतर वापराच्या जमिनी व त्यांच्या किंमती, स्वतःचे आर्थिक उत्पन्न यातील तफावती व स्वतःची शैक्षणिक अर्हता सिद्ध करणारी प्रमाणित प्रमाणपत्रे यात मोठी तफावत तपासाअंती आढळून आल्याने त्यांच्याकडून राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल होत असून ती फसवणूक असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. जगताप यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये 'एमबीए' असल्याचा उल्लेख असून 'एनआयबीएन' या संस्थेत हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. मात्र, संस्थेकडे माहिती घेतली असता, 'एमबीए' अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्धच नाही असे संस्थेने लेखी कळविले असल्याचे याचिकेत म्हटले आहे.=========================
माजी मंत्री विजय शिवतारे यांचा कौटुंबिक कलह सोशल मिडीयावर; पोस्ट व्हायरल
शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे सध्या आजारी असून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशा परिस्थितीत गेली 2 वर्षापासून त्यांच्या मुलांकडून वैयक्तिक जीवनावरील काही प्रतिप्रश्न निर्माण करून तसेच काही संपत्तीच्या वादातून कौटुंबिक कलह निर्माण केला आहे. विजय शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे-लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे पुरंदर तालुक्यात समर्थकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे. कौटुंबिक वाद सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल झाल्याने चर्चेला उधान आले आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या तब्बेतीची चौकशी समर्थकांकडन केली जात आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे नाजूक प्रकृतीमुळे रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या मुलांमध्ये कौटुंबिक वाद सुरु आहेत. विजय शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे-लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे. ममता स्वत: डॉक्टर असून प्रसिद्ध पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या त्या पत्नी आहेत. विजय शिवतारे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री होते. शिवसेनेने त्यांना प्रवक्तेपद दिले होते. पण २०१९ विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या संजय जगताप यांनी त्यांचा पराभव केला. विजय शिवतारे हे सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांना मंत्रिपदही मिळाले. सध्या आजारपणामुळे विजय शिवतारे हे सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. विजय शिवतारे यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं ममता यांनी सांगितले आहे.
ममता शिवतारे-लांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये खालीलप्रमाणे नमूद केले आहे-:
प्रिय बांधवांनो, माता भगिनींनो, आज दिनांक २२/०६/२०२१ वेळ पहाटे ३:००, ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आय सी यू (ICU) विभागात बसून हे लिहिण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठ्ठ कारण आहे. बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारख जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिल. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरच स्थान आहे. अश्या माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अवस्थ आहे. मागील काही दिवसात फेसबुक वरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल अस त्यांना वाटत होतं व आजही वाटते. मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे . डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागिल दीड वर्षापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही ? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सूरु झाले. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम फक्त बघ्याची भूमिका बजावत होती. मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी २०२१ मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. मात्र, मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे. सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता. तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे. आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलंत. तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका. आणि बाबाही अविरत पुरंदर साठी आपला जीव ओततील. आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा झटका आला. आयसीयुमध्ये रात्री २:०० वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले. माझी देवाला प्रार्थना आहे ,मला बळ दे!!! काही प्रश्न आहेत, त्यावर नक्की आपणही सर्वांनी विचार करावा.
1)१९९४ मध्ये घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज २७ वर्षानंतर त्या का आठवाव्यात ? 2)बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने २०१८ पर्यंत का सांभाळला? 3) बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली? 4)विनय शिवतारे व विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावल? 5) वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली... पण मृत्यूशय्येवर असलेल्या वडीलांसोबत असा व्यवहार कीतीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का? असे पोस्ट मध्ये म्हंटले आहे. दरम्यान माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा मुलगा विनय शिवतारे यांचे फेसबुक अकाऊंटवरुन “नाईलाजास्तव येत्या 48 तासात मला एक खून करावा लागणार आहे !!!!” अशी पोस्ट (16 ऑगस्ट 2020) रोजी संध्याकाळी 4.30 च्या सुमारास करण्यात आली होती. याबाबत विजय शिवतारे यांनी स्पष्टीकरण देत अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली होती. तसेच बदनामी करण्याच्या दृष्टिकोनातून चुकीच्या पोस्ट viral केल्या जात आहेत, असेही ते म्हणाले होते. या घटनेची देखील कार्यकर्ते आता चर्चा करीत आहेत.
माझ्या मुलीने केलेले सर्व आराेप खोटे : मंदाकिनी शिवतारे शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन मुलगी डॉ. ममता शिवदीप लांडे यांना उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझी मुलगी ममताने केलेले आरोप धादांत खोटे आहेत. गेल्या २७ वर्षांपासून शिवतारे हे कुटुंबापासून वेगळे राहत आहेत. संपत्ती हा वादाचा विषय नाही तर सुरू असलेला जाच आणि मानसिक छळातून मुक्तता करण्याचा हेतू आहे.
फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी काय म्हटलं –
“मी मंदाकिनी विजय शिवतारे बोलत आहे. काही वेळापूर्वी माझी मुलगी डॉक्टर ममता शिवदीप लांडेने केलेली पोस्ट मी वाचली. सदर पोस्टमध्ये तिने माझा मुलगा विनय आणि विनस यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. वास्तविक गेल्या २७ वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत होते. त्यातील पहिली पाच वर्ष उज्ज्वला बागवे नावाच्या महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजतागायत मिनाक्षी रमेश पटेल हिच्यासोबत पवई येथे राहत आहेत. यामध्ये संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंकडून दोन वर्षांपासून सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबवणे आणि मानसिक जाचातून सुटका करुन घेणे, हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे”.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.