उपसभापतीपदी भाजपचे रवींद्र कंद यांची बिनविरोध निवड
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनलचे राष्ट्रवादीचे बंडखोर दिलीप काळभोर यांची तर उपसभापतीपदी भाजपचे रवींद्र कंद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज मंगळवारी सकाळी 11 वाजता सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी पुणे हवेली बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती.
जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) तथा निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीसाठी सभापतीपदासाठी दिलीप काळभोर तर उपसभापदासाठी रविंद्र कंद यां दोघांचे उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी वरील दोघांच्या निवडीची घोषणा केली. दिलीप काळभोर यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड झाली आहे. तर रविंद्र कंद हे पहिल्यांदांच निवडुन आले आहेत.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांच्यासाठी नुकतीच निवडणुक झाली होती. या झालेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कंद व पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 13 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलला अवघ्या 2 जागांच्यावर समाधान मानावे लागले होते. तर व्यापारी व हमाल-मापाडी गटातुन तीन उमेदवार स्वतंत्र निवडून आले यांमध्ये व्यापारी आडते संघातून गणेश घुले, अनिरुद्ध भोसले तर हमाल मापाडी मधून संतोष नांगरे संचालक झाले आहेत.
दरम्यान सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी जाहीर होताच, भाजपचे पदाधिकारी व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद व पीडीसीसीचे संचालक विकास दांगट, बाजार समितीचे वरीष्ठ संचालक रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलीप काळभोर व रविंद् काळभोर यांना पुष्पहार घालुन अभिनंदन केले. यावेळीं मार्केटयार्ड आवारात आनंद उत्सव साजरा करण्यात आला तसेच बाजार परिसरातून सर्व संचालक समर्थकांनी मिरवणूक काढून जल्लोष व्यक्त करण्यात आला.
APMC poll: NCP rebels steal show, BJP-backed panel wins
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.