Saturday, 29 April 2023

Pune APMC Election 2023; पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत धक्कादायक निकाल; अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा

पारगे यांचा पराभव; आबनावे, रामकृष्ण सातव, संतोष नांगरे विजयी; राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी भाजपच्या मदतीने उडवला धुव्वा! 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अतिशय चुरशीची लढत पहावयास मिली असून निकाल मात्र धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया मतमोजणी केंद्र बाहेर व्यक्त केल्या जात आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या वर्गातून राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे नवनाथ पारगे यांचा 90 मतांनी पराभव झाला आहे. तर ग्रामपंचायत गटातून आबासाहेब (नाना) आबनावे, रामकृष्ण सातव यांनी यश संपादन केले आहे. पुण्यातील  कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता आली आहे. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर हा एक मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी भाजपच्या मदतीने धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. तर 2 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल विजयी झाले आहे. या व्यतिरिक्त 3 जागावर स्वतंत्र उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालासह पुणे बाजार समितीमध्ये भाजपचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले आहे. ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे नानासाहेब आबनावे (चंदननगर खराडी) हे ३०७ मतांनी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाघोलीतील रामकृष्ण सातव हे सर्वाधिक ४०५ मते घेवून विजयी झाले आहेत. तर, अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे सुदर्शन चौधरी (सोरतापवाडी) हे २५६ मते घेवून विजयी झाले आहेत. या गटात महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे पराभूत झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघाच्या एका जागेवर शेतकरी विकास आघाडी सर्वपक्षीय पॅनलचे रवींद्र कंद (लोणीकंद) ३७५ मते घेवून विजयी झाले आहेत. तसेच हमाल मापाडी मतदार संघातून संतोष नांगरे यांच्या विजयाची शिट्टी वाजली आहे. त्यांना सर्वाधिक ८८८ मते मिळाली. या मतदार संघातील अन्य पराभूत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : राजेंद्र चोरघे ४०३, गोरख मेंगडे ३१४, संजय उंद्रे ८, गोपाळ दसवडकर ३ मते मिळाली आहेत. या मतदार संघात 1 जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात होते. एकूण २ हजार ७ पैकी १ हजार ८०२ मतदान (८९.७९ %) झाले. त्यापैकी १ हजार ६१६ मते वैध ठरली. नांगरे यांचे शिट्टी चिन्ह होते. पुणे जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या पुण्याच्या हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटात धक्कादायक निकाल लागला आहे. ग्रामपंचायत गटातील चारपैकी दोन भारतीय जनता पक्षाने तर दोन जागांच्यावर राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. ग्रामपंचायत गटातुन सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल मधील सुदर्शन जयप्रकाश चौधरी व रवींद्र नारायणराव कंद या दोघांनी बाजी मारली असुन, याच गटातुन राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल चे रामकृष्ण हेमचंद्र सातव व आबासाहेब कोंडीबा आबनावे हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत गटातुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांना पराभावाचा धक्का बसला आहे. व्यापारी गटात १३ हजार १७४ मतदार, हमाल, तोलणार गटात २ हजार ७ मतदार, सहकारी सेवा संस्था गटात १९१८ मतदार आणि ग्रामपंचायत गटात ७१३ मतदार असे एकूण १७ हजार ८१२ मतदारांची संख्या आहे. तर त्यापैकी १२ हजार ८७७ जणांनी मतदान केले आहे. त्यामुळे एकूण ७२.२९ टक्के इतके मतदान झाले आहे.
उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे-
रामकृष्ण हेमचंद्र सातव ४०५ मते
सुदर्शन जयप्रकाश चौधरी २५८ मते
राहुल रामचंद्र काळभोर २३६ मते
शुक्राचार्य हिरामण वांजळे २११ मते

व्यापारी-अडते मतदारसंघातून जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले, अनिरुद्ध भोसले विजयी 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी-अडते मतदार संघातील दोन जागांवर जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. गणेश घुले यांना सर्वाधिक ५ हजार ८५२ एवढी मते मिळाली तर अनिरुद्ध भोसले यांना ५ हजार ८१६ एवढी मते मिळाली. व्यापारी अडते मतदार संघात १३ हजार १७४ मतदानापैकी ८ हजार ७०७ (६६.०९) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात अत्यंत चुरशीने प्रचार झाला होता. या निवडणुकीत बाजार समितीचे माजी संचालक विलास भुजबळ यांच्यासह अमोल घुले, सौरभ कुंजीर पराभूत झाले आहेत. या मतदार संघातील वैध मते ८ हजार २९१ असून ४१६ अवैध मते असल्याचे घोषित करण्यात आले. विजयाच्या घोषणेनंतर व्यापाऱ्यांनी सभागृहाबाहेर गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला.
पराभूत झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते-:
सौरभ कुंजीर 1640, 
अशोक गावडे 128, 
अमोल घुले 374, 
रमेश बडदे 32, 
सुहास बनसोडे 19, 
उमरफारुक बागवान 159, 
बाळासाहेब भिसे 194, 
विलास भुजबळ 650, 
अविनाश शेवते 38,
शिवाजी सुर्यवंशी 1270.

बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक दृष्टिक्षेप

क्र.

मतदारसंघाचे नाव व वर्गवारी

सदस्य संख्या

1

सेवा सहकारी संस्था मतदारसंघ

11

अ) सर्वसाधारण

7

ब) महिला राखीव

2

क) इतर मागास वर्गीय

1

ड) विमुक्त जाती/भटक्या जमाती

1

2

ग्रामपंचायत मतदारसंघ

4

अ) सर्वसाधारण

2

ब) अनुसूचित जाती/जमाती

1

क) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

1

3

व्यापारी-आडते मतदारसंघ

2

4

हमाल-मापाडी मतदारसंघ

1

एकूण

18


सविस्तरपणे निकाल 











Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==============================
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

Tuesday, 25 April 2023

Pune Apmc Election बंडखोरांवरील कारवाई निकालावर अवलंबून असल्याने राष्ट्रवादीतच बेबनाव; पॅनलमधील 3 उमेदवारांचे भवितव्य धोक्यात!

आबनावे, सरला चांदेरे, सचिन घुले यांना मतदारांची सर्वाधिक पसंती; तर विरोधी पॅनलमधील 4 उमेदवारांकडे मतदारांचा कल



पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अवघ्या 3 दिवसांवर असून प्रचारात सर्वच पॅनल आघाडीवर असले तरी आतबट्ट्याच्या सक्रीय प्रचारात मात्र बहुतांश उमेदवारांची फाटाफूट पडल्याचे दिसून येत आहे. काही पॅनलमध्ये केवळ खर्च करण्यासाठी बळीचा बकरा बनविण्याच्या उद्देशाने उमेदवारी दिल्याचे अंधारातील सक्रीय प्रचारातून उघड होत आहे. राष्ट्रवादीत फाटाफूट पडून काही बंडखोरांनी प्रतिस्पर्धी पॅनलच्या प्रमुखांसोबत हातमिळवणी केल्याने अधिकृत पॅनलमधील उमेदवारांची फसगत होत आहे. राष्ट्रवादी मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलच्या जाहीर 18 पैकी 15 जागांवरील उमेदवारांमध्ये नानासाहेब आबनावे, सरला चांदेरे, सचिन घुले यांना मतदारांची सर्वाधिक पसंती मिळत असून 4 जागांवरील उमेदवार मात्र धोक्यात असल्याचे मतदारांच्या कल जाणून घेतल्यावर दिसून येत आहे. यामध्ये ग्रामपंचायत गटातील 1 व सेवा सहकारी मतदारसंघातील गटातील 3 जागांचा समावेश आहे.
        राष्ट्रवादीचे बंडखोर भाजपसोबत छुपे गेले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी केला आहे मात्र कारवाई निकालानंतर करण्यात येईल असे जाहीरपणे स्पष्ट केल्याने राष्ट्रवादीतच बेबनाव असल्याची चर्चा मतदारांमध्ये घडवून आणली जात आहे त्याचा थेट परिणाम मतदानावर होणार असल्याने बंडखोरांना उत्तेजन मिळत आहे. सेवा सहकारी मतदारसंघातील गटातील ग्रामपंचायत गटातील 4 जागांसाठी 11 उमेदवारांमध्ये लढत होत असून एकूण 713 मतदारांच्या हातात त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. 
      सर्वसाधारण गटातून दोन जागांसाठी सहा उमेदवार, अनुसूचित जाती जमाती गटातून एका जागेसाठी तीन उमेदवार, आर्थिक दुर्बल गटातून एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत. यामध्ये बहुतांश ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे असले तरीही विरोधी पक्षांना व बंडखोरांच्या गळाला देखील अनेक मतदार लागले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलची 1 जागा पूर्णतः गमावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे उर्वरीत 3 दिवसांमध्ये दक्षता घेणे गरजेचे बनले आहे. तर सेवा सहकारी मतदारसंघातील 11 जागांसाठी 29 उमेदवारांमध्ये लढत होत असून एकूण 1918 मतदारांच्या हातात त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. यामध्ये अण्णासाहेब मगर शेतकरी आघाडीचे 3 उमेदवारांकडे मतदारांचा कल दिसून येत आहे. सेवा सहकारी मतदारसंघातील 11 जागांमध्ये सर्वसाधारण गटातून सात जागांसाठी २१ उमेदवार आणि महिला राखीव गटातून दोन जागांसाठी चार उमेदवार, इतर मागासवर्ग गटातून एका जागेसाठी दोन उमेदवार, विमुक्त भटक्या प्रवर्गातून एक जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. 
      अण्णासाहेब मगर शेतकरी आघाडीचे चिन्ह कपबशी असून त्यांच्यामध्ये देखील आदळआपट दिसून येत आहे. इतर मागासवर्ग गटातील उमेदवाराला केवळ खर्चाचा धनी म्हणून आघाडीत घेतले असल्याचे बहुतांश मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत तर राष्ट्रवादी मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे चिन्ह छत्री असून प्रचारात छत्री कल्पकतेने वापर केला जात असला तरी गावकी-भावकी व एकमेकांचे परस्परांशी नातेवाईकांच्या संबंधाने आर्थिकदृष्ट्या देवाणघेवाणीमध्ये अडचणीचे ठरत आहे. त्याचा विपरीत परिणाम सक्रीय पसंतीच्या मतदानावर होत असल्याच्या देखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
      व्यापारी, आडते गटात सर्वाधिक मतदार असून, या गटातील निवडणूक चुरशीची होणार आहे. निवडणुकीसाठी दोन पॅनल समोरासमोर असून, व्यापारी गटातील पॅनलने कोणालाही पाठिंबा दिला नाही. या गटातील प्रत्येकी दोन उमेदवारांनी पॅनल तयार केला आहे. 
        व्यापारी-अडते गटातील 2 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात असून हमाल-तोलणार गटातील एका जागेसाठी 5 उमेदवार लढत देत आहेत. सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत गटांत राजकीय पक्षांच्या वतीने पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. तर, कोणत्याही पक्षाकडून त्यांच्या पॅनेलमध्ये आडते, व्यापारी गटात उमेदवार देण्यात आलेला नाही. तरीही एका पॅनेलच्या दोन उमेदवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न सफल झाला नसल्याची चर्चा होत आहे. हमाल पंचायतीसह इतर समितीच्या सलंग्न संघटनांच्या उमेदवारांनीही बंडखोरी केल्याचे पाहायला मिळत आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या बाजार समितीमध्ये प्रथमच सर्वपक्षीय पॅनेलमधून आव्हान निर्माण केले आहे. एकप्रकारे राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचेच आव्हान असल्याचे चित्र असल्याचे स्पष्ट होत आहे. 
    बाजार समितीची निवडणूकीसाठी मतदारसंघनिहाय मतदान केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत. 18 जागांसाठी 17 हजार 812 जण मतदान करणार आहेत. सेवा सहकारी संस्था गटातून सर्वाधिक 11 उमेदवार निवडून येणार आहेत. ग्रामपंचायत गटातून चारजण, व्यापारी-आडते गटातून दोनजण आणि हमाल, मापाडी गटातून एक उमेदवार निवडून येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश जगताप काम पाहत आहेत.

विकास दांगट यांची पक्षातून हकालपट्टी

बंडखोरांवरील कारवाई निकालावर अवलंबून असल्याने राष्ट्रवादीतच बेबनाव वृत्त प्रसिद्धीनंतर तत्काळ दखल व कारवाई 

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेच्या (हवेली) पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम करत आहेत. त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष या नात्याने दांगट यांनी हकालपट्टी करीत असल्याचे गारटकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे हवेली तालुक्यात ग्रामपंचायत आणि सोसायटी विभागात प्राबल्य असून ही निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासाठी अत्यंत सोपी होती असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला आहे.

मतदार संघ

मतदारांची संख्या

मतदानाचे ठिकाण

सहकारी सेवा संस्था

१९१८ मतदार

सातव पाटील इंग्लिश मीडिअम स्कूल, अरण्येश्वर

ग्रामपंचायत

७१३ मतदार

सातव पाटील इंग्लिश मीडिअम स्कूल, अरण्येश्वर

व्यापारी, अडते

१३ हजार १७४ मतदार

श्री शिवाजी मराठा हायस्कूल, शुक्रवार पेठ

हमाल, तोलणार

२ हजार ७ मतदार

हमाल पंचायत भवन, मार्केट यार्ड


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==============================
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 



Saturday, 15 April 2023

Pune APMC Election 2023; राष्ट्रवादीतील मात्तबर बंडखोरांची भाजप-सेनेच्या पॅनेलशी हातमिळवणी! बहुतांश इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागे

बाजार समितीसाठी श्रीमंत उमेदवार झाले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक; बोगस दाखले; वादित उमेदवारांवर आक्षेप


पुणे हवेली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील मात्तबर बंडखोरांची भाजप-सेनेच्या पॅनेलशी हातमिळवणी केली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल विरुद्ध भाजप-शिवसेना पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी अशी चुरशीची लढत होणार आहे. दोन्हीही पॅनेलने उमेदवारांची अधिकृत घोषणा केली असून अद्यापही काही जागांवरील उमेदवारी देण्याबाबत वरिष्ठ संभ्रमात असल्याने निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे राष्ट्रवादीने १८ जागांपैकी केवळ 10 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत तर भाजप-शिवसेना पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 15 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.
    दोन्हीही आघाडी पक्षांना आडते, व्यापारी गटातील उमेदवार अद्यापही जाहीर करता आलेले नाहीत. दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीसाठी श्रीमंत उमेदवार स्वतःला कागदोपत्री गरीब म्हणून खोटे दर्शवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र मिळवून राखीव प्रवर्गातील जागेवर हक्क दर्शवित आहेत. बनावट दाखल्यांमुळे वादातील या उमेदवारांवर हरकती व आक्षेप नोंदवले जात आहेत.
      पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीतील मतांचा भाव आधीच फुटला असून प्रबळ व मात्तबर उमेदवारांनी त्यांच्या भागातील अनेक इच्छुकांना प्रसाद देऊन अर्ज मागे घेण्यासाठी गळ घातल्याने बहुतांश इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येत आहेत. 20 एप्रिल पर्यंत इच्छुक उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहेत. 

18 जागांसाठी तब्बल 301 अर्जांपैकी 195 अर्ज वैध

     पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी तब्बल 301 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये 16 उमेदवारांचे 18 अर्ज बाद करण्यात आले, तर ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले होते त्यांचा एकच अर्ज मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे 301 अर्जांपैकी 195 अर्ज वैध ठरले आहेत. 
       20 एप्रिल पर्यंत इच्छुक उमेदवाराला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यामधील प्रबळ व मात्तबर उमेदवार त्यांच्या भागातील अनेक इच्छुकांना प्रसाद, महाप्रसाद देऊन अर्ज मागे घेऊन पाठींबा प्राप्त करीत आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे जाहीर उमेदवार-

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने 15 पैकी 10 उमेदवारांची पहिली यादी शुक्रवार 14 एप्रिल रोजी जाहीर केली आहे. 
      घोषित जागांमध्ये राष्ट्रवादीला 9 आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 1 जागा देण्यात आलेली आहे. बाजार समितीच्या 20 वर्षानंतर होणार्‍या निवडणुकीमुळे इच्छुकांची मोठ्याप्रमाणावर संख्या असून अजूनही 5 जागांवरील उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा सुरु आहे. विकास सोसायटीच्या 11 पैकी 7 जागा आणि ग्रामपंचायत मतदार संघाच्या 4 पैकी 3 जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. 
       त्यामध्ये विकास सोसायटी मतदार संघातून (सर्वसाधारण गट) शेखर सहदेव म्हस्के (कळस), संतोष आबासाहेब कांचन (उरुळीकांचन), अशोक सुदाम गायकवाड (कोलवडी), योगेश बाळासाहेब शितोळे (न्हावी सांडस) यांचा समोवश आहे. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सचिन बाळासाहेब घुले (उंड्री), महिला प्रवर्गातून सरला बाबुराव चांदेरे (बाणेर), विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातून अर्जुन पिलाजी मदने (कोलवडी) यांचा समावेश आहे. तर ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण गटातून महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र काळभोर (लोणी काळभोर), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामकृष्ण हेमचंद्र सातव (वाघोली) आणि आर्थिक दुर्बल प्रवर्गातून नवनाथ रोहिदास पारगे (डोणजे) यांचा समावेश आहे.

भाजप-शिवसेना पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार-

भाजप-शिवसेना पुरस्कृत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 18 पैकी 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. 
     यामध्ये सोसायटी मतदार संघ : रोहिदास उंद्रे, दिलीप काळभोर, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, प्रकाश जगताप, नितीन दांगट, दत्तात्रय पायगुडे, शशिकांत गायकवाड (इतर मागास प्रवर्ग). लक्ष्मण केसकर (भटक्‍या विमुक्त जाती प्रवर्ग). मनिषा हरपळे, सारिका हरगुडे (महिला प्रतिनिधी प्रवर्ग). सुदर्शन चौधरी, शुक्राचार्य वांजळे, रवींद्र कंद, सत्यवान गायकवाड (ग्रामपंचायत मतदार संघ) यांचा समावेश आहे. यामध्ये बंडखोरांना राष्ट्रवादीकडून संपर्क साधण्यात येत असून त्यामुळे काही उमेदवार आजारी पणाचे ढोंग करून फोन घेणे टाळाटाळ करीत आहेत. अजून 5 दिवस माघारीसाठी राहिले आहेत त्यामुळे काळजी घेण्यात येत असून वैयक्तीक रीत्या प्रचार केला जात आहे.  

राखीव प्रवर्गातील उमेदवारांवर हरकती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांमध्ये इतर मागास वर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या गटातून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांवर हरकती व आक्षेप नोंदवले जात आहेत. 
      राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने इतर मागास वर्गीय गटातून हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य सचिन सुभाष घुले यांना ओबीसी-मराठा-कुणबी या जातप्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी दिल्याने त्यांच्या नावाला ओबीसी पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतले आहेत.
         महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशात नियम आणि अटी दिल्या आहेत. त्यानुसार राखीव प्रवर्गातील व्यक्तींनी जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा अर्ज करावा लागणार आहे. अर्जासोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्गमीत केलेला नमुना १५ अ मधील प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील व्यक्तीने निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे विहित नमुन्यातील हमीपत्र द्वावे लागणार आहे. 
      निवडून आल्याच्या दिनांकानंतर वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि ती व्यक्ती सदस्य राहण्यास अपात्र ठरणार आहे. तर श्रीमंत उमेदवार स्वतःला कागदोपत्री गरीब म्हणून खोटे दर्शवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र मिळवून राखीव प्रवर्गातील जागेवर हक्क दर्शवित आहेत असा आरोप करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती पूजा पारगे यांचे पती नवनाथ पारगे यांना राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र त्यांच्या कुटुंबियांच्या मागील निवडणूक प्रतिज्ञापत्रात 8 लाख 50 हजार रुपयांचे वार्षिक करप्राप्त उत्त्पन्न असल्याचे आयकर विवरण पत्रात नमूद केलेले आहे. तसेच त्यांची मालमत्ता कोट्यावधी असल्याचे देखील नमूद केलेले असताना ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल कसे ठरतात असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांकडून आक्षेप घेतले जात आहेत. 
      आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्रतेचे निकष असे आहेत कि, कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. आपल्या कुटुंबात 5 एकर किंवा त्याहून अधिक शेती जमीन नसावी. आपल्या कुटुंबाकडे 1000 फीट स्क्वेअर किंवा त्यापेक्षा अधिकचा निवासी प्लॉट नसावा. उत्पन्नाचा पुरावा (सातबारा, 8 अ / फॉर्म 16 / आयकर भरल्याचा पुरावा). या आधारावर तहसीलदार सदर प्रमाणपत्र जारी करतात.  

आडते, व्यापारी गटात चुरस

व्यापारी-आडते मतदारसंघातून 2 जागा तर हमाल-मापाडी मतदारसंघातून 1 जागा अशाप्रकारचे 3 जागांसाठी इच्छुकांची चुरस आहे. या गटात मतदारांची संख्याही सर्वाधिक आहे. मात्र 5 ते 6 हजार मतदारच संपर्कातून निष्पन्न होत आहेत अन्य मतदारांचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे ज्या उमेदवारांना मतदारांचा थांगपत्ता लागेल त्यांना विजयाची संधी मिळणार आहे. 
     5 ते 6 हजार मतदारांवर बहुतांश इच्छुकांची मदार असल्याने या गटातील निवडणुकीत चुरस पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे दिग्गज आडते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आडते संघटनेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ आडते विलास भुजबळ, बाजार समितीचे माजी संचालक गणेश घुले, आडते संघटनेचे माजी उपाध्यक्ष अमोल घुले, तण आडते सौरभ कुंजीर, शिवाजी सूर्यवंशी आणि अनिरूद्ध भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे सहा इच्छुक उमेदवार वैयक्तीक रीतीने प्रचारही करत आहेत. मात्र अद्याप कोणत्याच पक्षाने पॅनेल जाहीर केले नसल्याने या उमेदवारांना स्वत:च्याच नावाने प्रचार करावा लागत आहे. 

चार उमेदवारांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी

पुणे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील विकास सोसायटी मतदारसंघ गटातून बाजार समितीचे तत्कालीन तीन माजी सभापती आणि एका संचालकांनी भरलेले उमेदवारी अर्ज मंजूर करण्याच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या आदेशास पणन संचालकांकडे आव्हान देण्यात आले आहे. त्याबाबत पणन संचालकांनी येत्या सोमवारी (दि.17) दुपारी एक वाजता सुनावणी ठेवली आहे. 
     बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्याकडे तक्रारदार चंद्रकांत गोविंद वारघडे (बकोरी, ता. हवेली) यांनी बाजार समितीचे माजी सभापती व निवडणुकीतील उमेदवार दिलीप काळभोर (लोणी काळभोर), प्रकाश जगताप (जगताप वस्ती, आष्टारपूर), रोहिदास उंंद्रे (मांजरी खुर्द) आणि माजी संचालक राजाराम कांचन (उरुळी कांचन) यांचे दाखल उमेदवारी अर्ज अपात्र करण्यासाठी अपील केले होते. 
     त्यामध्ये असे नमूद केले होते की, पुणे बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाचे 1 ऑक्टोबर 1999 ते 19 ऑगस्ट 2002 या कार्य कालावधीतील कामकाजाची चौकशी करण्यासाठी पणन संचालकांनी मे. मुलाणी आणि कंपनीची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या चौकशी अहवालानुसार त्या कालावधीत 8 कोटी 66 लाख 50 हजार इतक्या रकमेचा आर्थिक तोटा झाला. त्या आर्थिक तोट्याला 21 संचालक जबाबदार होते.
       ही रक्कम विभागल्यास प्रत्येक संचालकानुसार 41 लाख 26 हजार 190 रुपयांच्या रकमेस ते जबाबदार होते आणि अहवाल अस्तित्वात असल्याने बाजार समिती कायद्यानुसार ते अपात्र ठरतात. वादी वारघडे व प्रतिवादींनी आपापली बाजू मांडली. त्यातील निष्कर्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्हा उपनिबंधकांनी 8 मार्च 2022 रोजीच्या कायद्यान्वये संबंधित संचालकांना नोटीस काढल्या. त्यास पणनमंत्र्यांकडे अपिल क्रमांक 10/2023 दाखल केले असता त्यांनी 8 मार्च 2022 रोजीच्या नोटीसविरुध्द पुढील सुनावणी होईपर्यंत अंतरीम स्थगिती आदेश पारित केले आहेत व या प्रकरणी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज 5 एप्रिलच्या आदेशान्वये मंजूर केलेले आहेत.

निवडणूक खर्चाबाबत मार्गदर्शक नियमावलीचा भंग

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका मताचा ‘भाव’ प्रारंभीच फुटला असून सदरील बाजारभाव पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या आधारावर फुटला असल्याची चर्चा आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत अ वर्ग सोसायटीच्या एका मताचा भाव 5 लाख रुपयांपर्यंत गेला होता. त्या गटातील निवडणुकीत कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही पराभव झाल्याने यावेळी काही उमेदवारांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. तर ज्यांना या निवडणुकीत यश मिळाले त्यांनीच आत्मविश्वासामुळे पहिल्यांदा या बाजार समितीच्या निवडणुकीत ‘भाव’  फोडला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक खर्चाबाबत मार्गदर्शक नियमावली जारी केलेली आहे मात्र सदर नियमांचा सर्रासपणे भंग केला जात आहे. 
       इच्छुकांकडून मोठ्याप्रमाणावर प्रचारासाठी खर्च केला जात आहे. यात्रांच्या निमित्ताने जेवणावळी बैठका, मनोरंजक प्रचारही सुरु आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी च्या निमित्ताने या मोहिमा सुरु आहे. माहिती प्रचार पत्रकाचे वाटप, बॅनर व फ्लेक्स लावले जात आहेत यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. सोशल मिडिया समाज माध्यमांवरही प्रचार केला जात आहे. मात्र खर्चाचे कोणतेही नियंत्रण व देखरेख यंत्रणा प्रशासनाकडून राबविली जात नसल्याने उमेदवार निश्चिंतपणे बखळ खर्चाची उधळण करीत आहेत.

राखीव प्रवर्गातील लढती स्पष्ट 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक संचालक पदाच्या निवडणुकीसाठी प्रमुख दोन्ही गटाच्या उमेदवारी जाहीर झाल्याने सरळ लढती देखील स्पष्ट होत आहेत. 18 जागांमध्ये इतर मागास प्रवर्ग जागेसाठी सचिन घुले आणि शशिकांत गायकवाड यांच्यात लढत होणार आहे तर भटक्‍या विमुक्त जाती प्रवर्ग या जागेसाठी अर्जुन पिलाजी मदने आणि लक्ष्मण केसकर यांच्यात लढत होणार आहे. आणि महिला प्रतिनिधी प्रवर्ग या 2 जागेसाठी सरला बाबुराव चांदेरे आणि मनिषा हरपळे, सारिका हरगुडे यांच्यात लढत होणार आहे. 

बाजार समिती निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम जाहीर-: २७ मार्च, 
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत-: २७ मार्च ते ३ एप्रिल, 
उमेदवारी अर्जांची छाननी-: ५ एप्रिल, 
वैध उमेदवारी अर्जांची यादी-: ६ एप्रिल, 
अर्ज माघारीची मुदत-: ६ ते २० एप्रिल, 
अंतिम यादी आणि चिन्हवाटप-: २१ एप्रिल, 
मतदान-: २९ एप्रिल
मतमोजणी व निकाल-: ३० एप्रिल.


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==============================
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 




 

Monday, 10 April 2023

Lokmitra Prakshan 'DHADPAD' Book Publication Pune; ज्येष्ठ पत्रकार श्‍याम दौंडकर लिखित ‘धडपड’ या पुस्तकाचे प्रकाशन

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांची गाथा समाजासाठी उपयुक्त; कौतुकास्पद कार्य- अजित पवार


ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांची गाथा ‘धडपड’ या पुस्तकाद्वारे मांडली हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.केवळ राजकारणी व्यक्तींच नव्हे तर समाजकारणात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. 
      लोकमित्र प्रकाशन आणि पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) च्या वतीने निर्मित केलेले व ज्येष्ठ पत्रकार श्‍याम दौंडकर लिखित ‘धडपड’ या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. ८) श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात संपन्न झाले. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, हभप भोईटे गुरुजी, राष्ट्रतेजचे संपादक व जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक अॅड. अमरसिंह जाधवराव, प्रकाशक चंद्रकांत भुजबळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
       प्रकाशन कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला अचानक सर्व कार्यक्रम रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर लेखक, ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी प्रास्ताविक करताना अजितदादा पवार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसते तर एखाद्या गरीबाच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले असते असे म्हंटले होते त्यांच्या या विधानाचा संदर्भ घेऊन " एखाद्या गरीबाच्या नव्हे, तर गरीब स्वभावाच्या माणसाच्या हातून या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे," अशा शब्दांत अजितदादा यांनी स्वतःचा परिचय करून देताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
         लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर राज्यात आज चौफेर हल्ले होत आहेत. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने घातक असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही. सध्या घडत असलेल्या घटना पाहता अघोषित आणीबाणी येत आहे की काय असा प्रश्न पडत असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
      पवार म्हणाले, सध्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जाणीवपूर्वक हल्ले सुरू आहेत. कोकणात पत्रकाराची हत्या झाली. मागील आठवड्यात एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते दम देतात. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये खोके यावरून रॅप साँग करणाऱ्याला जेलमध्ये टाकले. खोका हा उल्लेख केला परंतु, त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एक प्रकारे समर्थन केले आहे. 
      पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकाराला शाई फेकीच्या गुन्ह्यात गोवले गेले. तेव्हा पत्रकारांनी एकजूट केल्यावर त्या पत्रकाराला गुन्ह्यातून वगळले गेले. सुसंकृत महाराष्ट्रात हा प्रकार एक शोकांतिका असून, असे हिणकस प्रकार थांबले पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी एकजूट करण्याची गरज आहे. म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये. यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत.
        पुस्तकाचे लेखक श्याम दौंडकर यांनी प्रास्ताविक केले, प्रदीप देशमुख यांनी सुत्रसंचालन केले.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)




धडपड पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे प्रसारमाध्यमांमधील प्रसिद्धी- लिंक खालीलप्रमाणे-








Ajit Pawar Live | अजित पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार दौंडकर यांच्या 'धडपड' पुस्तकाचे प्रकाशन
====================
====================
https://www.facebook.com/policenama/videos/live-ज्येष्ठ-पत्रकार-श्याम-दौंडकर-यांच्या-धडपड-या-पुस्तकाचे-प्रकाशन-राज्याचे-विर/757112545973621/
====================
====================
====================
====================
‘खोका’ उल्लेख करणाऱ्याला अटक करून खोक्याचे समर्थनच- अजित पवार April 8, 2023 by pktop20
====================
====================
====================
====================
पत्रकारांवरील हल्ले ही सुसंस्कृत महाराष्ट्रात शोकांतिका ः अजित पवार
====================
====================
====================
====================
Attacks on journalists in the state are a tragedy in cultured Maharashtra – Ajit Pawar
====================
Mr.Chandrakant Bhujbal
Lokmitra Prakashan & Political Research And Analysis Bureau (PRAB) 

"महाराष्ट्रातील राजकारण" 





Wednesday, 29 March 2023

Karnataka Assembly Election 2023 ; कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर; 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी

224 विधानसभा जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक

Poll Events Karnataka (All 224 Assembly Constituencies)
Date of Issue of Gazette Notification - 13.04.2023 (Thursday)
Last Date of making nominations - 20.04.2023 (Thursday)
Date for Scrutiny of Nominations - 21.04.2023 (Friday)
Last date for the withdrawal of candidatures - 24.04.2023 (Monday)
Date of Poll - 10.05.2023 (Wednesday)
Date of Counting - 13.05.2023 (Saturday)
Date before which election shall be completed - 15.05.2023 (Monday)

कर्नाटक निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. 10 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होतील. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. कर्नाटकात 5.21 कोटी मतदार आहेत. जे 224 विधानसभा जागांवर मतदान करणार आहेत. 9.17 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. कर्नाटकच्या २२४ विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, अनुसूचित जातीसाठी ३६ जागांवर आरक्षण आहे, तर अनुसूचित जमातींसाठी १५ जागा राखीव आहेत. कर्नाटक मध्ये ५८,२८२ मतदान केंद्र असून २०,८६६ शहरी केंद्र आहेत. ज्यामध्ये ५०% मतदान केंद्रांवर म्हणजेच २९,१४० केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहेत. तर, कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी २४० मतदान केंद्रांना मॉडेल पोलिंग स्टेशन बनवण्यात येत असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. कर्नाटकात १० मे रोजी मतदान होत असून १३ मे २०२३ रोजी निकाल हाती येणार आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, यापूर्वी एक प्रक्रिया सुरू केली होती. याअंतर्गत 1 एप्रिल रोजी ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण होईल, त्यांनाही मतदान करता येणार आहे. दरम्यान, कर्नाटकात यावेळीही मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात होणार आहे. मागच्या वेळी जेडीएस-काँग्रेस एकत्र होते. मात्र, यंदाच्या निवडणूकीत जेडीएस स्वतंत्र लढणार आहे. कर्नाटकातील विद्यमान भाजप सरकारचा कार्यकाळ 24 मे रोजी संपणार आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत येडियुरप्पा 17 मे 2018 रोजी मुख्यमंत्री झाले. 23 मे 2018 रोजी अवघ्या सहा दिवसांनी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाले होते. कर्नाटकात नेहमीच भाजप, काँग्रेस व धर्मनिरपेक्षा जनता दल अशी तिरंग लढत होते. यंदाही तिरंगी लढतीत कोणाची कोणाला मदत होते हे महत्त्वाचे ठरणार आहे. २०१८ मध्ये येडियुरप्पा यांचे अल्पकाळचे सरकार गडगडल्यावर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे संयुक्त सरकार सत्तेत आले. पण काँग्रेस व जनता दलाचे आमदार फुटल्याने कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार १४ महिन्यांतच कोसळले. त्यानंतर पुन्हा येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. जुलै २०२१ मध्ये येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून भाजपने मूळ जनता दलातून आलेल्या बसवराज बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविले होते. सत्ता कायम राखणे अवघड जात असल्याचे लक्षात आल्यानेच भाजपने मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला आहे. हिजाब वादात किनारपट्टीचा परिसर आणि उत्तर कर्नाटकात मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. मुस्लिमांने दिले जाणारे चार टक्के आरक्षण गेल्याच आठवड्यात रद्द करण्यात आले. यातून हिंदू मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न झाला. लिंगायत आणि वोकलिंग समाजाच्या आरक्षणातच प्रत्येकी दोन टक्के वाढ करण्यात आली. अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणांमध्ये वाढ करण्यात आली. दलित, इतर मागासवर्गीय लिंगायत तसेच अन्य समाज घटकांच्या आरक्षणात वाढ करून विविध समाज घटकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. त्याचा निवडणुकीत फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. धर्मवनिरपेक्ष जतना दलाला बंगळुरू ग्रामीम, म्हैसूरू या पट्ट्यात पाठिंबा मिळतो. विशेषत: शेतकरी किंवा वोकलिंग समाज देवेगौडा यांचे हक्काचे मतदार आहेत देवेगौडा आता थकले आहेत. जनता दलाचे वर्चस्व असलेल्या पट्ट्यात भाजप आणि काँग्रेस या दोघांनी दोर लावला आहे. देवेगौडा यांचा पक्ष किती मते घेतो आणि कोणाचे अधिक नुकसान करतो यावर सत्तेची गणिते अवलंबून आहेत. ४०च्या आसपास आमदार निवडून आणण्याची पक्षाची ताकद आहे. देवेगौडा यांचा पक्ष भाजपला मदत करील अशी शक्यता वर्तविली जात होती. पण अमित शहा यांनी मध्यंतरी कर्नाटक दौऱ्यात देवेगौडा यांच्याबरोबर कसलीही चर्चा होणार नाही व जनता दलाला पराभूत करण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. राहुल गांधी यांची खासदारकी कर्नाटकातील कोलारमधील भाषणामुळे रद्द झाली. हा मुद्दा मांडत काँग्रेस त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. लिंगायत समाजाच्या पाठिंब्यावर पुन्हा सत्ता मिळवायची हे भाजपचे धोरण आहे. कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागा आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104, काँग्रेसला 78 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. येडियुरप्पा यांनी 17 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि सभागृहात बहुमत सिद्ध करू न शकल्याने त्यांनी 23 मे रोजी राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. 14 महिन्यांनंतर कर्नाटकच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळाली. काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांच्या बंडानंतर कुमारस्वामी यांना खुर्ची सोडावी लागली. येडियुरप्पा यांनी या बंडखोरांना भाजपमध्ये विलीन केले. 26 जुलै 2019 रोजी 219 आमदारांच्या पाठिंब्याने बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांनी 2 वर्षानंतर राजीनामा दिला. बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 150 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 महिन्यांत 7 वेळा कर्नाटकचा दौरा केला आहे. गेल्या भेटीत बीएस येडियुरप्पा आणि मोदी यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. 27 फेब्रुवारीला मोदी शिवमोग्गा येथे पोहोचले होते आणि येथेच त्यांनी येडियुरप्पांना नमन केले. येदी यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी 25 मार्च रोजी काँग्रेसने 124 उमेदवारांची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणा विधानसभेतून तर कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार कनकापुरातून निवडणूक लढवणार आहेत. याच महिन्यात राहुल गांधींनी सभा घेतली. त्यांनी सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे, काहीही करायचे असेल तर 40 टक्के कमिशन द्यावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यांनी आरक्षण हा निवडणुकीचा मुद्दा बनवला आणि सत्तेत आल्यास एससी-एसटी आरक्षणाचा कोटा वाढवला जाईल, असे सांगितले. याशिवाय आम आदमी पक्षाने (आप) 20 मार्च रोजी 80 उमेदवारांची घोषणा केली आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

"महाराष्ट्रातील राजकारण"