Friday, 28 April 2017

80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 3,909 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी 27 मे रोजी मतदान

80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 3,909 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी 27 मे रोजी मतदान

राज्यातील विविध 14 जिल्ह्यांतील 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 2 हजार 440 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 909 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी 27 मे 2017 रोजी मतदान होणार आहे.
जून ते सप्टेंबर 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या अशा एकूण 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. 5 ते 12 मे 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नित्रंणाखाली मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आलेल्या आहेत.
नामनिर्देनपत्रांची 15 मे 2017 रोजी छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 17 मे 2017 पर्यंत राहील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 27 मे 2017 रोजी मतदान होईल. गडचिरोली जिल्हा वगळता सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत मतदान होईल. केवळ गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 29 मे 2017 रोजी होईल.
जिल्हानिहाय सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या: ठाणे- 4, पालघर- 26, नाशिक- 4, अहमदनगर- 1, पुणे- 22, सातारा-10, सोलापूर- 4, सांगली- 1, औरंगाबाद- 1, नांदेड- 2, उस्मानाबाद- 1, जालना- 2, वाशीम- 1 व चंद्रपूर- 1. एकूण- 80.
जिल्हानिहाय पोट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या (कंसात रिक्त पदांची संख्या): ठाणे- 99 (212), पालघर- 66 (132), रायगड-60 (75), रत्नागिरी- 187 (247), सिंधुदुर्ग- 38 (65), नाशिक- 218 (348), जळगाव- 110 (162), नंदुरबार- 49 (63), पुणे- 359 (603), सातारा- 48 (81), सांगली- 105 (170), कोल्हापूर- 77 (100), औरंगाबाद- 102 (120), नांदेड- 109 (160), उस्मानाबाद- 49 (74), जालना- 73 (86), लातूर- 45 (53), अमरावती- 89 (105), यवतमाळ- 116 (150), बुलडाणा- 72 (88), नागपूर- 46 (84) वर्धा- 63 (87), चंद्रपूर- 46 (80), भंडारा- 60 (103) वगडचिरोली- 154 (451). एकूण- 2440 (3909).



Political Research and Analysis Bureau (PRAB)

Wednesday, 26 April 2017

Delhi Municipal Corporation Election Results दिल्ली महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

दिल्ली महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत


२४ एप्रिलला या तिन्ही महानगरपालिकांसाठी सरासरी ५३.५८ टक्के मतदान झाले होते. तीन महानगरपालिकांच्या २७२ पैकी २७० प्रभागांसाठी हे मतदान झाले होते. दिल्लीकर मतदार ज्या ३ महापालिकांसाठी मतदान करतात, त्या पूर्व महापालिकेत ६४, उत्तर महापालिकेत १०४ व दक्षिण महापालिकेत १०४ असे एकूण २७२ वॉर्ड आहेत.






54 टक्के मतदानाची नोंद
- दिल्ली महानगरपालिकेसाठी 23 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी 54% एवढी नोंदवण्यात आली. पूर्व दिल्लीतील मौजपूर आणि उत्तर दिल्ली मनपातील सराय पीपल थाला या ठिकाणी उमेदवारांच्या निधनामुळे दोन्ही वार्डांत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

दिल्लीतील तीन महापालिकांच्या निवडणुकीत प्रत्यक्षात एकूण 272 वॉर्डांवर निवडणूक घेतली जाणार होती. मात्र, यापैकी दोन वॉर्डांमध्ये उमेदवारांचे निधन झाल्याने तेथील निवडणुक प्रक्रिया रद्द करण्यात आली. उर्वरित 270 वॉर्डांसाठी 2,537 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातही उत्तर दिल्लीत सर्वाधिक 104 वॉर्डांवर 1,004 उमेदवार रिंगणात होते.




उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

शिवसेनेच्या ५६ पैकी ५५ जणांचीतर राष्ट्रवादीच्या ४३ पैकी ४२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आदी उत्तर भारतीय पक्षांबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही दिल्लीतील तीन महापालिका निवडणुकांमध्ये अजिबात डाळ शिजली नाही. शिवसेनेच्या ५६ पैकी ५५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४३ पैकी ४२ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.
शिवसेनेने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएममधील कथित घोटाळ्यावर फोडले. हा निकाल मान्य नसल्याने आम्ही ईव्हीएमविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे दिल्लीप्रमुख नीरज सेठी यांनी दिली. मोहनसिंग (वॉर्ड क्रमांक ४५ आणि मते २२३५) यांचा सन्माननीय अपवादवगळता शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची नाचक्की झाली. शिवसेनेचा एकही महत्त्वाचा नेता प्रचारासाठी आला नव्हता किंवा दिल्ली शाखेने कोणालाही बोलाविले नसल्याचे समजते. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे दिल्लीचे संपर्कप्रमुख आहेत. २०१५मधील विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचे उमेदवार नुसते नावाला उभे होते. उत्तर प्रदेशातील निवडणुकीतही शिवसेनेला एखाददुसऱ्या ठिकाणी उल्लेखनीय मते मिळविण्यात यश आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचीही स्थिती काही वेगळी नाही. दिल्लीतील पक्षाचे अस्तित्व तोळामासा आहे.त्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली महापालिकेच्या बुधवारी घोषित झालेल्या २७० जागांपैकी तब्बल १८१ जागा जिंकून भाजपने सर्वाना धोबीपछाड दिला. आम आदमी पक्ष व काँग्रेस या प्रमुख पक्षांना जेमतेम कामगिरी करता आली. पण भाजपच्या या लाटेमध्ये अन्य पक्षांची चांगलीच वाताहत झाली. बिहारी (पूर्वाचली) मतदारांवर डोळा ठेवून संयुक्त जनता दलाने (जेडीयू) मोठा गवगवा केला होता. खुद्द नितीशकुमारांनी दोन सभा घेतल्या. पण त्यांच्या सर्वच्या सर्व ९४ उमेदवारांना अनामत रकमा गमवाव्या लागल्या. अशीच स्थिती बसपावर (२०९ पैकी १९४) आणि समाजवादी पक्षावर (२७पैकी २५) ओढविली. अगदी काँग्रेससारख्या जाळे असलेल्या पक्षाच्या ९२ उमेदवारांनाही स्वत:ची अब्रू वाचविता आली नाही.


2012 च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं. एकूण 272 जागांपैकी 142 जागा भाजप, काँग्रेस 74, बसपा 15 आणि अपक्ष 41 जागांवर विजयी झाले होते


2012 दिल्ली मनपा निकाल
उत्तर दिल्ली मनपा
एकूण वार्ड - 104
भाजप - 59, काँग्रेस - 29, बसप - 7, इतर- 9
दक्षिण दिल्ली मनपा
एकूण - 104
भाजप - 44, काँग्रेस - 29, बसप - 5, इतर - 26

पूर्व दिल्ली मनपा
एकूण वार्ड - 64
भाजप - 35, काँग्रेस - 19, बसप - 3, इतर - 7

Friday, 21 April 2017

नागभीड नगरपरिषद, रेणापूर, नेवासा आणि शिराळा नगरपंचायती व धारणी पंचायत समितीसाठी 24 मे रोजी मतदान

नागभीड नगरपरिषद, रेणापूर, नेवासा आणि शिराळा नगरपंचायती

व धारणी पंचायत समितीसाठी 24 मे रोजी मतदान


नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीतसेच विविध 18 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोट निवडणुकांबरोबरच धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील 24 मे 2017 रोजी मतदान घेण्यात येईल.
संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा  व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 28 एप्रिल ते 5 मे 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 मे 2017 रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 11 मे 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयापासून तीन दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 24 मे 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 26 मे 2017 रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
जिल्हानिहाय नगरपरिषद व नगरपंचायतींच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुका: पालघर: जव्हार- 1 क, 3 ब, 4अ, 4 ब व 4 इ, रायगड: मुरुड जंजिरा- 7 अ आणि श्रीवर्धन- 6 अ, रत्नागिरी: चिपळूण- 9 अ, सिंधुदुर्ग: कसई दोडामार्ग- 7, सातारा: मेढा- 3, सोलापूर: दुधनी- 2 अ,नाशिक: देवळा- 14, जळगाव: यावल- 1 ब, नंदुरबार: धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु.- 11, नंदुरबार- 2 क, उस्मानाबाद: उस्मानाबाद- 11 ब,लातूर: औसा- 10 अ आणि अमरावती: अचलपूर- 19 ब.
धारणीचा निवडणूक कार्यक्रम
       धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4 मे ते 9 मे 2017 या कालावधीत नामनिर्देनपत्रे दाखल करता येतील. 11 मे 2017 रोजी नामनिर्देनपत्रांची छाननी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे 14 मे 2017 पर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 16 मे 2017 हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक असेल. अपील असलेल्या ठिकाणी 19 मे 2017 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान केंद्रांची यादी 18 मे 2017 रोजी प्रसिद्ध केली जाईल. 24 मे 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची मुदत असेल. 26 मे 2017 रोजी मतमोजणी होईल.




chandrapur latur parbhani result 2017 चंद्रपूर, लातूर, परभणी महापालिका निकाल

चंद्रपूर, लातूर, परभणी महापालिका निकाल




लातूर महापालिका (70 जागा) 2017 निकाल
भाजपा – 41
काँग्रेस – 28
राष्ट्रवादी – 1
एकूण जागा- 70
----------------------------
2012 लातूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 70

राष्ट्रवादी काँग्रेस – 13
काँग्रेस – 49
शिवसेना – 06
रिपाइं – 02
-----------------------------------------------------------

चंद्रपूर महापालिका (66 जागा) 2017 निकाल
भाजप- 36
काँग्रेस- 12
बसपा- 8
मनसे- 2
राष्ट्रवादी- 2
शिवसेना- 2
अपक्ष-3
प्रहार-1
एकूण जागा- 66
---------------------------------------------------
2012 चंद्रपूर महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 66

काँग्रेस – 26
भाजप – 18
शिवसेना – 5
राष्ट्रवादी – 4
मनसे – 1
बीएसपी – 1
अपक्ष – 10
भारिप बहुजन महासंघ – 1
---------------------------------------------------------------

परभणी महापालिका (65) 2017 निकाल
काँग्रेस -29
राष्ट्रवादी 20
शिवसेना 6
भाजप 8
इतर 2
एकूण जागा – 65
--------------------------------------------------------------
2012 परभणी महानगरपालिका पक्षीय बलाबल: एकूण जागा- 65

राष्ट्रवादी काँग्रेस – 30
काँग्रेस – 23
शिवसेना – 8
भाजप – 2
अपक्ष – 2
------------------------------------------------------------------
तिन्ही महापालिकेत एकूण 125 उमेदवार कोट्यधीश आहे. तर 64 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. विशेष म्हणजे, 1 हजार 284 उमेदवारांपैकी एकूण 806 उमेदवार अल्पशिक्षित आहे.या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भाजपाने 44, काँग्रेसने 31, राष्ट्रवादी काँग्रेसने 19, शिवसेनेने 15 कोट्यधीश आणि लखपतींना उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारांची मिळून सरासरी संपत्ती काढली, तर प्रत्येकजण 50 लाखांच्या संपत्तीचा मालक आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांमध्ये 64 उमेदवारांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, विनयभंग, दरोडा आणि जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत.  यातील सर्वाधिक गुन्हे हे लातूरच्या वार्ड क्रमांक 7 मधील रिपाइंचे उमेदवार चंद्रकांत चिट्टेवर यांच्याविरोधात आहेत. चिट्टेवर यांच्याविरोधात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत.गुन्हेगारांना तिकीट वाटपात या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. कारण, काँग्रेसचे 24, भाजपचे 18, शिवसेनेचे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 उमेदवार गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत.
============================================================PRAB....




latur election 2017 result लातूर महापालिकेवर भाजप

लातूर महापालिकेवर भाजपचा झेंडा


संपूर्ण राज्याचं आणि देशभरातील काँग्रेसचं लक्ष लागलेल्या लातूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे.महानगरपालिकेच्या 70 जागांपैकी तब्बल 38 जागांवर विजय मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.तर सत्ताधारी काँग्रेसला 31 जागीच यश मिळवता आलं. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका जागेवर आटोपली.महत्त्वाचं म्हणजे 2012 मधील निवडणुकीत भाजपला एकही जागा नव्हती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपने थेट झिरोवरुन हिरो होत, सत्ता काबिज केली आहे.तर  हुकूमाची गढी म्हणून ओळखली जाणारी लातूर महापालिका काँग्रेसने गमावली आहे.
लातूर महानगरपालिका निकाल 2017
भाजप – 38
काँग्रेस – 31
राष्ट्रवादी – 01
काँग्रेसने लातूरही गमावलं
काँग्रेसचा गढ म्हणून विलासराव देशमुखांच्या लातूरकडे पाहिलं जात होतं. विलासरावांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांच्याकडे लातूर काँग्रेसची सूत्रं आली. त्यांच्याच नेतृत्त्वात यंदा लातूर मनपाची निवडणूक लढण्यात आली. मात्र काँग्रेसला आपला गढ आणि देशमुखांची गढी राखता आली नाही.
संभाजी पाटील-निलंगेकरांचं यश
लातुर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावर धुरा सोपवण्यात आली होती. जिल्हा परिषदेप्रमाणेच संभाजी पाटील यांनी लातूर मनपासाठीही काटेकोर नियोजन करुन ऐतिहासिक विजय मिळवला.
लातूर महानगरपालिका निकाल
पक्षनिकाल 2012निकाल 2017
भाजप0038
काँग्रेस4931
राष्ट्रवादी1301
शिवसेना0600
अपक्ष/अन्य इतर0200

Thursday, 20 April 2017

panvel election 2017 पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगावात 24 मे रोजी मतदान

       पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगावात 24 मे रोजी मतदान


                                        26 मे रोजी मतमोजणी

नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची मुदत 10 जून 2017तर मालेगाव महानगरपालिकेची मुदत 14 जून 2017 रोजी संपत आहे. भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
एकूण 64 प्रभागातील 252 जागांसाठी निवडणूक होत असून इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत 29 एप्रिल 2017 पासून 6 मे 2017 पर्यंत असेल. रविवारी (ता. 30 एप्रिल 2017) नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतीलपरंतु 1 मे 2017 च्या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
निवडणूक कार्यक्रम
·         नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 29 एप्रिल ते 6 मे 2017
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी- 8 मे 2017
·         उमेदवारी मागे घेणे- 11 मे 2017
·         निवडणूक चिन्ह वाटप- 12 मे 2017
·         उमेदवारांची अंतिम यादी- 12 मे 2017
·         मतदान- 24 मे 2017 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
·         मतमोजणी- 26 मे 2017

महानगरपालिकानिहाय तपशील
महानगरपालिका
लोकसंख्या
मतदार
एकूण जागा
महिला राखीव
सर्वसाधारण
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग
पनवेल
5,09,901
4,25,453
78
39
49
6
2
21
भिवंडी-निजामपूर
7,09,665
4,79,253
90
45
62
3
1
24
मालेगाव
5,90,998
3,91,320
84
42
55
4
2
23
एकूण
18,10,564
12,96,026
252
126
166
13
5
68

Political Research and Analysis Bureau (PRAB) 9422323533



Monday, 17 April 2017

सहकार विभागाकडून राज्यातील 38 संस्थांना पुरस्कार

सहकार विभागाकडून राज्यातील 38 संस्थांना पुरस्कार

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकार निष्ठ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याकरिता राज्यातील 38 संस्थांची निवड करण्यात आली.या पुरस्कारांसाठी राज्यभरातून 133 प्रस्ताव आले होते. यातून 38 संस्थांची निवड करण्यात आली आहे. 26 एप्रिल 2017 रोजी सोलापुरात या संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत


पुरस्काराचे नाव व पुरस्कारप्राप्त संस्था पुढीलप्रमाणे
सहकारमहर्षी राज्यस्तरीय पुरस्कार :
वर्धा कुक्कुटपालन व कृषी उद्योग संशोधन सह. संस्था मर्या. जि. वर्धा, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था : सहकार भूषण पुरस्कार : वसंत सर्व सेवा सहकारी सोसायटी लि. म्हैसाळ, (ता. मिरज, जि. सांगली), निफाड विविध कार्यकारी (विकास) सेवा सहकारी सोसायटी लि. निफाड (नाशिक), नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. नेरपिंगळाई (ता. मोर्शी, जि. अमरावती), सहकार निष्ठ पुरस्कार : अंधारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था. मर्या. सिल्लोड (जि. औरंगाबाद), लांजे पंचक्रोशी वि. का. सेवा सोसायटी लि. (ता. लांजा, जि. रत्नागिरी), विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्या. तळोधी, (ता. नागभीड, जि. चंद्रपूर), 
नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था व पगारदार नोकरांच्या पतसंस्था 
सहकारभूषण पुरस्कार : ज्ञानदीप सहकारी पतसंस्था म. अरुणोदय नगर मुलुंड (पू), मुंबई, धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (जि. सातारा), भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्या. (जि.उस्मानाबाद). सहकार निष्ठ पुरस्कार : साईसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म. काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. नगर), प्रियदर्शनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (ता. नांदुरा, जि. बुलढाणा), गिरनार अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटी लि. (नागपूर).
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक 
 सहकार भूषण पुरस्कार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्या. (पुणे), सहकार निष्ठ पुरस्कार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंक. मर्या. (लातूर), रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. (रत्नागिरी).
नागरी सहकारी बॅंका
सहकार भूषण पुरस्कार : म्युनिसिपल को. ऑप. बॅंक लि. फोर्ट, मुंबई, विदर्भ मर्चंट को-ऑप. बॅंक. मर्या. हिंगणघाट (ता. हिंगणघाट, जि. वर्धा), सहकार निष्ठ : अभिनंदन अर्बन को. ऑप. बॅंक मर्या. अमरावती, दि बाबासाहेब देशमुख सहकारी बॅंक मर्या. आटपाडी (सांगली).
सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी, सहकारी दूध संघ
सहकार भूषण पुरस्कार : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर), कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकूळ), हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणी मर्या. मुदाळ (ता. भुदरगड, जि.कोल्हापूर), सहकार निष्ठ पुरस्कार : रेणा सहकारी साखर कारखाना लि. दिलीप नगर निवाडा (जि. लातूर), विकास सहकारी साखर कारखाना लि. (लातूर), संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या. संगमनेर (जि. नगर).
गृहनिर्माण सहकारी संस्था
सहकार भूषण : मॅराथॉन कॉसमॉस को. ऑप. हौसिंग सोसायटी लि. (मुंबई), दि योगानंद को. ऑप. हौसिंग सोसायटी, बोरिवली (प.), मुंबई, सहकार निष्ठ : महावीर नगर को-ऑप. हौसिंग सोसायटी मर्या. डोंबिवली (पू.), स्वप्नपूर्ती फेज -1 सहकारी गृहरचना संस्था मर्या. (ता.हवेली, जि. पुणे), सकारी कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. (भंडारा).
औद्योगीक संस्था, हातमाग व यंत्रमाग संस्था, उपसा सिंचन संस्था व इतर संस्था 
सहकार भूषण पुरस्कार : महाबळेश्‍वर मध उत्पादक सहकारी सोसायटी मर्या. (महाबळेश्‍वर, जि. सातारा), महामुंबई छत्री उत्पादक केंद्र लि. कांजुरमार्ग (पू), मुंबई.
फळे, भाजीपाला संस्था, खरेदी विक्री संघ, प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था
सहकार भूषण : दि कुलाबा सेंट्रल को-ऑप. कन्झ्युमर्स होलसेल अँड रिटेल स्टोअर्स लि. मुंबई, रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ मर्या. कोल्हापूर. सहकार निष्ठ पुरस्कार : दि पांडव सह. विपणन आणि भातगिरणी मर्या. (जि. गोंदिया).
प्राथमिक दूध उत्पादक संस्था, कुक्कुटपालन संस्था, मत्स्यपालन संस्था व पशुसंवर्धन संस्था
सहकार भूषण पुरस्कार : गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या. राजुरी (ता. जुन्नर, जि. पुणे), सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. (जि. पालघर)