पुणे जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे वर्चस्व
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
पुणे जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी, तर ९७ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी मतदान घेण्यात आले होते. निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. काँग्रेस दुसऱ्या तर, केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी सरपंच एका गटाचा आणि ग्रामपंचायत सदस्यांचे बहुमत दुसऱ्या गटाकडे, असे चित्र निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्य आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांना आपापल्या गावाची सत्ता राखण्यात यश आले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून गावाची सूत्रे सातत्याने स्वतःच्या हातात कायम ठेवणाऱ्या प्रस्थापित गावपुढाऱ्यांना मतदारांनी सपशेल नाकारले आहे. अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना झिडकारून सत्तेची सूत्रे तरुणांच्या हातात दिली आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (काटेवाडी, ता. बारामती), माजी विधानसभा अध्यक्ष, आमदार दिलीप वळसे पाटील आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील (निरगुडसर, ता. आंबेगाव), भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे (पारवडी, ता. बारामती), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते आणि माजी उपाध्यक्ष शरद लेंडे व आमदार शरद सोनवणे (पिंपळवंडी, ता. जुन्नर) आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके (बुचकेवाडी, ता. जुन्नर) आदी नेत्यांना आपापल्या गावाची सत्ता कायम राखण्यात किंवा नव्याने मिळविण्यात यश आले आहे. पिंपळवंडी ग्रामपंचायतीत लेंडे आणि आमदार सोनवणे यांनी एकत्र येत, सर्वपक्षीय पॅनेल स्थापन केला होता. या पॅनेलला यश आले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची पिंपळवंडीत संयुक्त सत्ता असणार आहे. पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काही दिग्गजांना आपले गड राखण्यात यश आले असले तरी काहींच्या हातातून सत्ता गेली आहे. नारायणगावमध्ये सर्वपक्षीय सत्ता आली असून काटेवाडीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. तर पुरंदर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायती सत्ताधारयांच्या हातून गेल्या आहेत. बारामती तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे आज जाहीर झाले.यामध्ये काटेवाडी ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रस, पारवडी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व कायम राखण्यात यश आले आहे.या निकालामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे नेते बाळासाहेब गावडे या बड्या नेत्यांच्या समर्थकांना गड राखण्यात यश आले आहे. आंबेगाव तालुक्यात ९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतमोजणी झाली. यामध्ये ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रसने, तर ४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने व २ ग्रामपंचायतींवर भाजपाने दावा केला आहे. यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या निरगुडसर ग्रामपंचायतीमध्ये सर्वच्या सर्व जागांवर राष्टवादी काँग्रेसने विजय मिळविला.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी - ८५ जागा होत्या त्यासाठी २१२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर एकूण सदस्य - ५१३ जागासाठी १,१३३ उमेदवार उमेदवार निवडणूक रिंगणात होते.सरपंचपदाच्या २१२ उमेदवारांचे आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या १ हजार १३३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्ह्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी दोन ग्रामपंचायती अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पूर्णपणे बिनविरोध झाल्या. उर्वरित ९७ ग्रामपंचायतींपैकी ११ गावांचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल होऊ न शकल्याने, येथील पद रिक्त राहिले आहे. त्यामुळे उर्वरित ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि ९७ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी मतदान घेण्यात आले होते. या सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडले आहेत. हाती आलेल्या निकालामध्ये सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसला मानणाऱ्याचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीची सत्ता आलेल्या ग्रामपंचायतीची तालुकानिहाय संख्या- भोर व मावळ प्रत्येकी - ५, पुरंदर - २ (दोन्ही ठिकाणी आघाडी), दौंड व शिरूर प्रत्येकी - १, हवेली - ६, बारामती - १५, वेल्हे - ३, जुन्नर - १६, आंबेगाव - ७, खेड - २, मुळशी - १३.
=========================
वाघोलीच्या सरपंचपदी वसुंधरा उबाळे; ग्रामविकास पॅनेलला बहुमत
वाघोली ग्रामपंचायत निवडणुकीत 17 पैकी ग्रामविकास पॅनलने नउ जागांवर विजय मिळविला. मात्र सरपंचद त्यांना गमवावे लागले. सरपंचपदी वाघेश्वर पॅनलच्या वसुंधरा उबाळे यांनी 50 मतांची आघाडी घेत ग्रामविकास पॅनलच्या मिना सातव यांचा पराभव केला. उबाळे यांना 8766 मते तर सातव यांना 8716 मते मिळाली.सरपंचपदाच्या उमेदवार मीना सातव यांचा केवळ 50 मतानी पराभव झाल्याने त्यांचे पती व विद्यमान सदस्य संजय सातव यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. फेर मतमोजणीत वसुंधरा उबाळे याच 50 मतानी विजयी ठरल्या. वाघेश्वर पॅनलने सात जागांवर विजय मिळविला. कविता दळवी या विद्यमान सदस्या विजयी झाल्या तर मच्छींद्र सातव व स्वाती सातव हे विद्यमान सदस्य पराभुत झाले. अपक्ष उमेदवार श्रीकांत वाघमारे हा विजयी झाला. तर काळभैरवनाथ पॅनेलचा दारुण पराभव झाला. वाघेश्वर पॅनल, वाघोली ग्रामविकास पॅनल व काळभैरवनाथ पॅनल मध्ये लढत झाली. सरपंचपदासाठी वाघोली ग्रामविकास पॅनलच्या मीना सातव, वाघेश्वर पॅनलच्या वसुंधरा उबाळे व काळभैरवनाथ पॅनलच्या साधना व्यवहारे यांच्यात चुरस होती. पहील्या तीन वार्डमधील मतमोजणीत उबाळे यांनी 1400 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर उर्वरीत तीन वॅार्डमधील मतमोजणीत सातव यानी मतांची आघाडी तोडली. मात्र तरीही त्यांना 50 मतानी पराभुत व्हावे लागले. तिसर्या उमेदवार साधना व्यवहारे यांना केवळ 336 मते मिळाली.माजी जिल्हा परीषद सदस्या अर्चना कटके या वॅर्डक्रमांक पाच मधुन विजयी झाल्या. तर विद्यमान सदस्य समीर भाडळे यांच्या पत्नी पूजा भाडळे क्रमांक एकमधुन तर माजी सरंपच रामदास दाभाडे यांच्या वहीनी वंदना दाभाडे क्रमांक दोन मधुन विजयी झाल्या. पोलिस पाटील पदाचा राजीनामा देउन निवडणुक लढविलेले रामकृष्ण सातव हे क्रमांक तीन मधुन विजयी झाले. सदस्यामध्ये सर्वाधिक पुजा भाडळे यांना 2900 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार गणेश पवार यांना सर्वात कमी 41 मते मिळाली.सर्वाधिक चुरस सरपंचपदासाठी व क्रमांक सहा मध्ये होती. सहामध्ये ग्रामविकास पॅनेलच्या तीन्ही उमेदवारांनी विजय मिळविला. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान सदस्या कविता दळवी व माजी सरपंच शिवदास उबाळे वगळता सर्व चेहरे ग्रामपंचायतीवर प्रथमच निवडुन आले आहेत. सरपंचपदी विजयी झालेल्या वसुंधरा उबाळे या हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती आहे. त्यांचे पती माजी सरपंच शिवदास उबाळे हे ही विजयी झाले.काळभैरवनाथ पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार साधना व्यवहारे व त्यांचे पती दत्तात्रय व्यवहारे दोघही पराभूत झाले. वाघोलीत निकालापूर्वीच ग्रामविकास पॅनेलच्या मिनाकाकी सातव यांच्या विजयाचे होर्डींग लागले होते. मात्र ऐनवेळी वसुंधरा उबाळे या सरपंचपदी विजयी झाल्या तर मिनाकाकी सातव यांना 49 मतांनी पराभवास सामोरे जावे लागले .
विजयी उमेदवार-
सरपंचपदी वसुंधरा शिवदास उबाळे. ( 8766 )
विजयी सदस्य- शिवदास मनोहर उबाळे ( 2503 ), पुजा समीर भाडळे ( 2900 ), महेंद्र परशुराम भाडळे ( 2567 ) विजय रामचंद्र भाडळे ( 1316 ), वंदना संजय दाभाडे ( 1381 ), रामकृष्ण हेमचंद्र सातव ( 2026 ), रेश्मा गणेश पाचारणे ( 2092 ), रेाहीणी सागर गेारे ( 2214 ), कविता सुधीर दळवी ( 1530 ), सुनिता अनिल सातव ( 1643 ), श्रीकांत भगवान वाघमारे ( 1189 ), मारुती भगवंता गाडे ( 1448 ), जयप्रकाश सुभाष सातव ( 1185 ), अर्चना शांताराम कटके ( 1350 ), संदीप सोमनाथ सातव ( 2160 ), मालती गणेश गोगावले ( 2273 ), जयश्री सुनिल काळे ( 1981 )
=========================
'माळेगाव बुद्रुक'वर भाजपची सत्ता!
बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीवर अखेर भाजपने आपला झेंडा फडकविला. सोमवारी (दि. 22) झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत जयदीप विलास तावरे यांनी एका मताने बाजी मारत सरपंचपदाची खुर्ची पटकावली. तावरे यांना 9, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र चव्हाण यांना 8 मते मिळाली. सरपंचपदाच्या निवडीमुळे गेला महिनाभर चाललेली राजकीय उलथापालथ सोमवारी थांबली. हा निकाल राष्ट्रवादीसाठी धक्कादायक मानला जातो. माळेगावचे यापूर्वीचे सरपंच जयदीप दिलीप तावरे यांनी ठरलेल्या कालावधीत राजीनामा न दिल्याने त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या उद्देशाने 12 सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले होते. जयदीप दिलीप तावरे यांना कोणत्याही परिस्थितीत खुर्चीवरून हटविण्याचा चंगच काही सदस्यांनी बांधला होता. त्यातून माळेगावच्या राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला होता. या सगळ्या घडामोडीत सरपंचपद भाजपकडे जात असल्याची चाहूल राष्ट्रवादीला लागल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याप्रश्नी लक्ष घालत जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित अशोकराव तावरे यांचे मनोमिलन घडवून आणले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातून ही ग्रामपंचायत जाणार नाही, अशी चिन्हे दिसत होती.
===========================================
काटेवाडीत राष्ट्रवादीचे वर्चस्व
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या काटेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भवानीमाता पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत १५ पैकी १४ जागा पटकावल्या. सरपंचपदी राष्ट्रवादीचे विद्याधर श्रीकांत काटे हे १५९२ मताधिक्याने निवडून आले. संरपचपदाचे उमेदवार विद्याधर श्रीकांत काटे यांनी पांडुरंग मारुती कचरे यांचा १,५०२ मतानी दणदणीत पराभव केला. काटे यांना ३०५५, तर कचरे याना १५५३ मते मिळाली. भाजप- रासप पुरस्कृत लोकशाही परिवर्तनवादी पॅनेलला मात्र एकही जागा मिळाली नाही. काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी सहा उमेदवार उभे होते. लढत मात्र राष्ट्रवादीच्या विद्याधर काटे व भाजप- रासप युतीच्या पांडुरंग कचरे यांच्यात झाली. यामध्ये कचरे यांना १४६३ मते मिळाली, तर काटे यांना ३ हजार ५५ मते मिळाली. या निवडणुकीत विरोधकांच्या पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत भवानीमाता पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- राजू लक्ष्मण भिसे, हेमलता अमोल जगताप, प्रियांका प्रदीप देवकाते, समीर अजमुद्दीन मुलाणी, राहुल विलास काटे, शीतल अमोल काटे, नितीन लव्हा भिसे, धीरज लक्ष्मण घुले, रंजना लक्ष्मण लोखंडे, संजीवनी दत्तात्रेय गायकवाड, स्वाती संतोष लकडे, श्रीधर आनंद घुले, स्वाती अजित गडदरे व पद्मिनी पोपट देवकर.
बारामती तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेली सायंबाचीवाडी ग्रामपंचायत वगळता उर्वरित 15 ग्रामपंचायतीच्या मंगळावरी (ता.26) झालेल्या मतदानात सरासरी 85.52 टक्के मतदान झाले होते यामध्ये सर्वाधिक 96.69 टक्के मतदान गाडीखेल ग्रामपंचायतीसाठी तर सर्वात कमी मतदान डोर्लेवाडी येथे 78.39 टक्के झाले होते. एकुण 44 हजार 909 मतदारांपैकी 38 हजार 407 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावामध्ये 5635 मतदारांन पैकी 4740 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये अजित पवार यांनीही आपल्या कुटुंबासह मतदान केले होते. तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या पारवडी गावातही 4056 मतदारांपैकी 3628 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
बारामती तालुक्यातील मतदान झालेल्या ग्रामपंचायती, मतदार संख्या, झालेले मतदान, टक्केवारी
1) काटेवाडी - (5635) - (4740) - (84.12)
2) डोर्लेवाडी - (5480) - (4296) - (78.39)
3) पारवडी - (4056) - (3628) - (89.45)
4) कऱ्हावागज - (2691) - (2378) - ( 88.37)
5) धुमाळवाडी - (2343) -( 1854) - ( 79.13)
6) करंजेपुल - (2230) - (1912) - (85.74)
7) आंबी ब्रु. - (1100) - ( 953) -( 86.64)
8) गुणवडी - (6408) - ( 5355) - (83.57)
9) गाडीखेल - (756) - ( 731) - ( 96.69)
10) पवईमाळ - (1481) - ( 1324) -( 89.40)
11) मान्नापावाडी - (3023) - ( 2712) - ( 89.71)
12) सि. निंबोडी - (1742) - (1639) - (94.09)
13) मुढाळे - (4047) - ( 3435) - ( 84.88)
14) चौधरवाडी - (720) - ( 642) - ( 89.17)
15) मेडद - (3197) - ( 2808) - ( 87.83)
एकुण - (44909) - ( 38407)- ( 85.52)
=========================
मानाप्पावाडीत 25 वर्षांनी सत्तापरिवर्तन
बारामती तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या मानाप्पावाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत "मानाप्पावाडी ग्रामविकास पॅनेल'चे प्रमुख ऍड. केशवराव जगताप यांच्या तब्बल 25 वर्षांच्या सत्तेचा पाडाव झाल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. येथे भैरवनाथ परिवर्तन पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार योगिता विक्रम जगताप यांनी तब्बल 459 इतके मताधिक्य घेत मानाप्पावाडी पॅनेलच्या उमेदवार वैशाली सुनील जगताप यांचा पराभव केला. विशेषतः मानाप्पावाडी येथील निवडणुकीत म्होसोबावाडी येथील मतदारांची निर्णायक भूमिका ठरल्याने सत्ताधाऱ्यांचा दारुण पराभव झाल्याचे उघड झाले.म्हसोबावाडी येथील गावकऱ्यांना विभक्त ग्रामपंचायत करण्याचे नियोजन होते, परंतु सत्ताधाऱ्यांनी त्या प्रक्रियेला विरोध केल्याचा आरोप या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला. एका बाजूला म्हसोबावाडीकरांची सत्ताधाऱ्यांविरुद्ध निर्णायक भूमिका आणि दुसऱ्या बाजूला येथील पणदरे पंचक्रोशीतील नेतेमंडळींनी दाखविलेला एकोपा विचारात घेता ऍड. केशवराव जगताप यांचा या निवडणुकीत टिकाव लागला नाही.जगताप यांना केवळ 5 जागांवर विजयी मिळविता आला. विशेषतः सत्ताधाऱ्यांच्या पराभव करण्यासाठी कुलभूषण कोकरे, ऍड. एस. एन. जगताप, योगेश जगताप, अमरसिंग जगताप, तानाजी कोकरे, शिवाजी टेंगले, विलास टेंगले, भुजंगराव टेंगले, गेणबापू कोकरे, संतोष टेंगले, अनिल जगताप, बी. के. जगताप, काका पाटील, योगेश लकडे, उत्तम चौगुले आदी नेतेमंडळींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.भैरवनाथ परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - राजेंद्र टेंगले, कृष्णराव टेंगले, सविता टेंगले, अनिता वैभव कोकरे, जितेंद्र जगताप, धनसिंग लक्ष्मण जगताप (अपक्ष), तर मानाप्पावाडी ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार ः अनिता पवार, मंदाकिनी कुदळे, पुष्पाताई मुळीक, अनिल आवाडे, अश्विनी लकडे.
ग्रामपंचायतीची सूत्रे नव्या पिढीच्या हातात करंजेपूल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या लढतीत मतदारांनी प्रस्थापितांना सपशेल नाकारत नव्या पिढीच्या हातात सत्तेची सूत्रे सोपविली. युवकांचे उमेदवार वैभव अशोक गायकवाड यांनी मातब्बरांच्या गावकरी पॅनेलचे उमेदवार बबन आण्णा पवार यांचा तब्बल 315 मतांनी पराभव केला. करंजेपूल हे पश्चिम भागातील प्रमुख गाव असल्याने येथील लढतीकडे राजकीय धुरीणांचे लक्ष होते.ग्रामपंचायतीचे करंजेपूल एक, करंजेपूल दोन व गायकवाडमळा या तीन प्रभागातील आठपैकी सात जागांवर गावकरी पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर शेंडकरवाडी प्रभागात मात्र बिनविरोधचा मेळ न बसल्याने तीन जागांसाठी दोन गटात लढत सरळ लढत झाली. गावकरी पॅनेलने सरपंचपद इतर मागासप्रवर्गासाठी राखीव असल्याने बबन पवार यांना पहिली अडीच वर्षे आणि विजय कोळपे यांना उर्वरीत कालावधीसाठी सरपंच करण्याचा निर्णय घेतला. परंतु इतर मागास प्रवर्गातूनच उपसरपंच वैभव गायकवाड यांनीही सरपंचपदासाठी बंड करत दंड थोपटले. शेंडकरवाडी प्रभागातून उद्योजक राजकुमार धुर्वे, माजी सदस्य दिलीप कुंभार यांनीही सरपंचपदासाठी उडी घेतल्याने रंगत निर्माण झाली होती. वैभव गायकवाड यांच्यासोबत गावातील युवकांसोबत सोमेश्वर कारखान्याचे संचालक विशाल गायकवाड, माजी सरपंच बंडा गायकवाड, बाळू गायकवाड, सागर गायकवाड, विजय गायकवाड आदी उघडपणे मैदानात उतरले. सुरवातीला बबन पवार यांचेच वर्चस्व दिसत होते. परंतु हळूहळू गायकवाड यांना सर्वच प्रभागात पाठिंबा वाढत गेला आणि त्यांनी प्रस्थापितांना धक्का दिला. वैभव गायकवाड यांना 874, बबन पवार यांना 559, राजकुमार धुर्वे यांना 341 तर दिलीप कुंभार यांना अवघी 145 मते मिळाली. तर प्रभाग तीन (शेंडकरवाडी) येथे दोन गटात झालेल्या सरळ लढतीतही युवकांनी उभ्या केलेल्या पॅनेलच्या तिन्ही उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला. काही ज्येष्ठांनीही त्यांना साथ दिली. येथे गीतांजली समीर शेंडकर यांनी सर्वाधिक 368 मते मिळविली. प्रभाग दोनमध्ये गावकरी पॅनलच्या निखिल गायकवाड यांना निवृत्त मुख्याध्यापक संभाजी गायकवाड यांनी आव्हान दिले होते. परंतु निखील गायकवाड यांनी 25 मतांनी विजय मिळविला.
निवडून आलेले सदस्य व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
प्रभाग क्रमांक एक -
निलेश विठ्ठल गायकवाड, लतीफ गफूर मुलाणी, सुनिता गणेश गायकवाड (तिन्ही बिनविरोध)
प्रभाग क्रमांक दोन -
सारिका नानासाहेब गायकवाड, सविता जयराम लकडे (दोन्ही बिनविरोध), निखिल रमेश गायकवाड (232)
प्रभाग क्रमांक तीन -
सोनलकुमार उत्तम शेंडकर (321), गीतांजली समीर शेंडकर (368), राणी बिरू महानवर (330)
प्रभाग क्रमांक चार -
अजित अप्पासाहेब गायकवाड, निलम प्रमोद गायकवाड (दोन्ही बिनविरोध)
=========================
पारवडी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व कायम
बारामती तालुक्यामध्ये असून पवारांचे पारंपारिक विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी पारवडी ग्रामपंचतीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. तेथे सरपंच म्हणून बाळासाहेब गावडे यांचे पुतणे जिजाबा अशोक गावडे यांच्यासह संपूर्ण 13 सदस्य भरघोस मतांनी निवडून आले आहेत. पारवडीमधील वियजानंतर पारवडी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ध्वज फडकावीत एकच जल्लोष केला. या निकालाने ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व असल्याचे गावडे यांनी पुन्हा सिध्द केले आहे.यंदाच्या थेट सरपंच पदाच्या पहिल्याच निवडणुकीसाठी येथील सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी असल्याने मोठी रस्सीखेच होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्री भैरवनाथ विकास पॅनल व राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री भैरवनाथ जनसेवा पॅनल यांच्या मध्ये थेट लढत झाली. यामध्ये सरपंच पदासाठी बाळासाहेब गावडे यांचे पुतणे जिजाबा अशोक गावडे यांनी 2351 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार देविदास गावडे यांचा 1128 मतांनी पराभव केला. तर सदस्यांच्या सर्वच्या सर्व 13 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पारवडी गावावर विशेष लक्ष देत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या रुपाने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेले वसंत गावडे, तसचे पंचायत समिती सदस्या लिलाबाई गावडे यांच्या माध्यमातून पदे देत ताकद देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये बाळासाहेब गावडे यांनी आपला करिष्मा कायम राखला.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे -
प्रभाग 1
अ) जिजाबा अशोक गावडे - (2351)
ब) अनिल सोपान आटोळे (556)
क) सोनाली विशाल गावडे (557)
प्रभाग 2
अ) नवनाथ दादाराम लांडगे (521)
ब) मंगल अशोक होले (550)
प्रभाग 3
अ) अंबादास झिंगोबा गवंड (568)
ब) देवईबाई धोंडिराम गावडे (515)
क) निर्मला दत्तात्रय पोंदकुले (563)
प्रभाग 4
अ) वंदना बाळु पाळेकर (407)
ब) संगिता कोंडिराम गवंड (368)
क) युवराज मच्छिंद्र गावडे (419)
प्रभाग 5
अ) संजय सोमनाथ गावडे (311)
ब) हरिभाऊ सोमनाथ गावडे (237)
क) सुनंदा युवराज पवार (278)
=========================
मुढाळे सरपंचपदासाठी समान मते, शोभा वाबळे ठरल्या लकी
बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या सरपंचपदाची अखेरपर्यंत चुरशीची ठरली. सरपंच पदासाठी उभे असलेल्या शोभा अशोक वाबळे व शरयू देवेंद्र वाबळे यांना प्रत्येकी ८०५ समसमान मते पडली. चिठ्या टाकून सरपंचपद देण्याचा निर्णय घेतला. यामधे शोभा वाबळे यांची चिठ्ठी निघाल्याने त्या येथील लकी सरपंच ठरल्या आहेत. सरपंच पदासाठी सात महिला उमेद्वार आपले नशीब अजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात होत्या. यामधे बारामती पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर वाबळे यांच्या सूनबाई शरयू वाबळे, सरपंच संगीता पोपट वाबळे, उपसरपंच लालासो जायपत्रे यांच्या पत्नी संगीता जायपत्रे यांचा समावेश होता. तिसऱ्या क्रमांकाची ५२५ मते स्वाती अशोक निंबाळकर यांना मिळाली आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील सरपंच पदाच्या उमेदवार शोभा यांना मतदारांनी मते देत गावची सूत्रे हाती सोपवली आहेत. उपसरपंच लालासो जायपत्रे यांना सदस्य पदाच्या जागेवरही पराभव पत्कारावा लागला आहे. गेल्या पाच वर्षाचा कारभार सदस्यांमधील वादावादीत झाला. सदस्य संख्येचे बळ मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होत होते. यावेळी गट तट नसल्याने फक्त सरपंच पदाच्या जागेसाठी मत मागण्याची चुरस होती. यामधे मतदारांनी समान मते देउन टांगती तलवार कायम ठेवली होती.चिठ्ठी टाकुन झालेल्या निवडीत शोभा वाबळे यांची चिठ्ठी निघताच कार्यकर्त्यांनी जल्लोश केला. तेरा सदस्य संख्येच्या ग्रामपंचायतीच्या पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या आठ जागांसाठी २५ उमेद्वार निवडणूक लढवीत होते. यामधून राणी संदीप बर्गे, गोरख रामभाउ कदम, पुनम प्रविण दळवी, बापूराव किसन साळवे, संतोषी तात्यासो थोरात, ढगु नवाजी जायपत्रे, नितिन बाळासो जायपत्रे, सुलोचना रामभाउ शिंदे, विजयी झाले आहेत.
=========================
नारायणगावच्या सरपंचपदी योगेश पाटे
नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व राजकीय अंदाज मोडीत ठरवून ग्रामपंचायतीवर सर्वपक्षीय पुरस्कृत योगेश ऊर्फ बाबू नामदेव पाटे २ हजार ९८८ विक्रमी मताधिक्याने विजयी झाले़ पाटे यांच्या श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलचे १७ पैकी १५ सदस्य विजयी झाले़ सर्वपक्षीय पुरस्कृत मुक्ताई हनुमान जनसेवक पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले़ यामध्ये उपसरपंच संतोष पाटे व ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य रामदास अभंग यांचा समावेश आहे.गेली २३ वर्षे नारायणगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेले चंद्रशेखर कोरहाळे यांच्या मुक्ताई ग्रामविकास पॅनलला एकही जागा मिळाली नाही़ वॉर्ड क्ऱ ६ मध्ये तीनही जागा पाटे यांच्या पॅनलला मिळाल्या आहेत़ मतदारांनी हातात घेतलेल्या या निवडणुकीत गेली २० वर्षे ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेल्या व ४ वेळा उपसरपंच राहिलेल्या संतोष वाजगे यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत तिसरया स्थानावर जावे लागले आहे़ पहिल्या फेरीपासूनच योगेश ऊर्फ बाबू पाटे आघाडीवर राहिले.
=========================
मावळात भाजप आणि राष्ट्रवादी
मावळ तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपने साळुंबे्र व उढेवाडीमध्ये तर राष्ट्रवादीने बेबडओहोळ व आढले बु. ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता काबीज केली असून, या दोन्ही प्रमुख पक्षांनी 5 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. निवडणूक निकालानंतर आमदार संजय भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी बिनविरोध झालेल्या उढेवाडी ग्रामपंचायीसह साळुंब्रे, डोणे, शिळींब, मळवंडी ढोरे या 5 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे ; तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे यांनीही बेबडओहोळ, आढले बु., मळवंडी ढोरे, शिळींब, डोने या 5 ग्रामपंचायतींवर वर्चस्वाचा दावा केला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांनी दावा केला असला तरी बेबडओहोळ व आढले बु. येथे राष्ट्रवादीने व साळुंब्रे, उढेवाडी येथे भाजपने सरपंच पदासह एकहाती सत्ता काबीज केली आहे. आंबळे व शिळींबमध्ये सरपंचपद राष्ट्रवादीकडे तर बहुमत भाजपकडे, डोणे येथे सरपंचपद भाजपकडे व बहुमत भाजपकडे आहे.
मावळ तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या आठ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीला समसमान यश मिळाल्याचे दिसते; परंतु बेबडओहोळ, आंबळे व आढले बु. या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये मात्र भाजपला हार पत्करावी लागली असून, साळुंबे्रमध्ये राष्ट्रवादीला हार पत्करावी लागली आहे.
ग्रामपंचायत व प्रभागनिहाय बिनविरोध व विजयी झालेले उमेदवार :
बेबडओहोळ - प्रभाग 1 : कमल रोहिदास गराडे(बिनविरोध), जालिंदर गराडे (190 मते), लता गायकवाड (236 मते), प्रभाग 2 : तुषार बारमुख (बिनविरोध), नम्रता घारे (392 मते), प्रभाग 3 : सेवक घारे (295 मते), मनीषा घारे(308 मते), भीमा अढाळगे (306 मते),प्रभाग 4 : बाळू ठाकर व संध्या शिंदे(दोघे बिनविरोध), कविता ढमाले (227 मते).
साळुंब्रे - प्रभाग 1 : सुहास विधाटे (227 मते), द्वारका राक्षे (221 मते), प्रभाग 2 : सगुणा राक्षे (118 मते), नलिनी विधाटे (150 मते), प्रभाग 3 : वर्षा राक्षे, अजय दवणे (दोघे बिनविरोध), समीर थोरवे(234 मते)
आंबळे - प्रभाग 1 : वर्षा शरद पवार, संदिप गोविंद गायकवाड, सुरेखा संजय नखाते (सर्व बिनविरोध), प्रभाग 2 : रामदास शेटे (375 मते), अंजनाबाई पिलाणे(266 मते), नवनाथ मोढवे(299 मते), प्रभाग 3 : पुनम हांडे (383 मते), नवनाथ आंभोरे(358 मते), कमल चतूर(362 मते).
मळवंडी ढोर- - प्रभाग 1 : नवनाथ शिंदे(नामाप्र स्त्री), सुवर्णा सुनिल ढोरे(दोघी बिनविरोध), प्रभाग 2 : सविता ढोरे(118 मते), शंकर ढोरे(109 मते), प्रभाग 3 :संदिप खरात(166 मते), अनिता ढोरे, सावित्राबाई मोरे(दोघी बिनविरोध)
आढले बु॥ - प्रभाग 1 : संगिता सावंत(334 मते), जालिंदर म्हस्के(332 मते), प्रताप घोटकुले(315 मते), प्रभाग 2 : अश्विनी सपकाळ(256 मते), सुनिता सावळे(263 मते), नितीन घोटकुले(252 मते), प्रभाग 3 : सुमन घोटकुले(162 मते), नितेश वाघमारे(170 मते), नंदिनी कटके(164 मते).
डोणे - प्रभाग 1 : सुलभा वाडेकर(141 मते), नामदेव सुतार(144 मते), प्रभाग 2 : श्रीरंग खिलारी(132 मते),मनिषा सुतार(125 मते), प्रभाग 3 : पुनम वाघमारे(198 मते), कुंदा घारे(196 मते), प्रसाद घारे(209 मते).
शिळींब - प्रभाग 1 : लिलाधर धनवे(306 मते), पुनक दरेकर(335 मते), प्रभाग 2 : धोंडाबाई घोगरे(208 मते), भाऊ आखाडे(195 मते), प्रभाग 3 : यशवंत शिंदे(216 मते), सुभद्रा कडू(221 मते), सिताबाई धनवे(बिनविरोध).
=========================
निरगुडसरवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर येथील गावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सरपंच पदासह सर्व सदस्य विजयी करून एकहाती सत्ता राखली आहे. माजी उपसरपंच रवींद्र वळसे पाटील यांच्या धर्मराज परिवर्तन पॅनेलचा पराभव झाला.सरपंचपदासाठी उर्मिला संतोष वळसे आणि मनिषा रवींद्र वळसे यांच्यामध्ये लढत होऊन उर्मिला वळसे विजयी झाल्या आहेत. निवडून आलेले सदस्य-प्राजक्ता अनिल वळसे, शरद नारायण वळसे, वैशाली संजय राऊत, तेजल सुधीर गावडे, शांताराम रामभाऊ उमाप, कैलास सुडके, जयश्री नवनाथ थोरात, सपना राहुल हांडे, दादाभाऊ जयराम टाव्हरे याप्रमाणे आहे. बिनविरोध सदस्य तृप्ती सुरेश टाव्हरे आणि आनंदराव निवृत्ती वळसे या प्रमाणे आहे.
काले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पानसरे
वडज- काले (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनार्धन सदाशिव पानसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काले ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली होती. सरपंचपदी मालिता मारुती नायकोडी यांची निवड करण्यात आली होती. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने पानसरे यांची बिनविरोध केली.
कुरुळीच्या उपसरपंचपदी अमित मुऱ्हे
कुरूळी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसंरपचपदी अमित ज्ञानेश्वर मुऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली. कुरूळी येथील ग्रामपंचायतीच्या उपसंरपच नगिना मेदनकर यांनी स्वखुशीने पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सरपंच चंद्रकांत बधाले यांच्या अध्यक्षस्तेखाली घेण्यात आलेल्या उपसंरपचपदासाठी अमित मुऱ्हे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने कुरूळी ग्रामपंचायतीच्या उपसंरपचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचेजाहिर केले.
खराबवाडीच्या सरपंचपदी सागर खराबी
खराबवाडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर पांडुरंग खराबी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी रोहिदास बबन शिळवणे यांची बहुमताने निवड झाली.
खराबवाडीच्या सरपंच दिपाली संतोष खराबी व उपसरपंच माधुरी शंकर खराबी यांनी आपापल्या पदाचा नियोजित कालावधी पूर्ण केल्याने इतरांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी, म्हणून स्वखुशीने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच या पदासाठी खराबवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दोन्ही पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सरपंचपदासाठी सागर खराबी यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र, उपसरपंच पदासाठी मच्छिंद्र बचुटे, मावळत्या उपसरपंच माधुरी खराबी व सदस्य रोहिदास शिळवणे या तिघांचे उमेदवारी अर्ज आल्याने मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ऐनवेळी माधुरी खराबी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बुचडे आणि शिळवणे या दोघांसठी हातवर करून मतदान घेण्यात आले. यात शिळवणे यांना 14, तर बचुटे यांना अवघी दोनच मते पडल्याने शिळवणे हे बहुमताने निवडून आल्याने त्यांची उपसरपंच पदी वर्णी लागली.
=========================
पुणे जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतीचा तालुका व गावे खालील प्रमाणे..
1) हवेली - (9 गावे) - भिलारवाडी, फुलगाव, गुजर निंबाळकरवाडी, कोलवडी साष्टे, जांबुळवाडी- कोडवाडी, खामगाव मावळ, मांगडेवाडी, वाडेबोल्हाई, वाघोली
2) मावळ - (7 गावे) - साळुंब्रे, आढले बुद्रुक, डोणे, मळवंडी ढोरे, बेबड ओव्हळ, आंबळे, शिंळींब,
3) आंबेगाव - (9 गावे) - चांडोली खुर्द, जारकरवाडी, पहाडदरा, कुशीरे बुद्रुक, निरगुडसर, जाधववाडी, कोलतावडे, पिंपरगणे, चास
4) दौंड (1 गाव) - मलठण
5) वेल्हे ( 4 गावे) - आंबवणे, कांदवे, करण बुद्रुक, मानगाव
6) बारामती (15 गावे) - मानाप्पाची वाडी, धुमाळवाडी, डोर्लेवाडी, पारवडी, मुढाळे, सिध्देश्वर निंबोडी, मेडद, पवईमाळ, काटेवाडी, आंबी बुद्रुक, गुणवडी, कऱ्हावागज, करंजेपुल, गाडीखेल, चौधरवाडी
7) मुळशी - (15 गावे) - वांतुडे, भांबर्डे, शेडाणी, जामगाव, बेलावडे, भादस बुद्रुक, जातेडे, धामण ओव्हळ, आंबवणे, मुगाव, डावजे, वाद्रे, खुबवली, कोंढावळे, वडगाव,
8) भोर ( 10 गावे) - कांबरे बुद्रुक, जयतपाड, नांदगाव, वडतुंबी, टिटेघर, पळसोशी, वरोडी बुद्रुक, वरोडी डायमुख, कुरुंजी, माळेगाव,
9) शिरुर (1 गाव) - राजंणगाव सांडस,
10) खेड (2 गावे) - होलेवाडी, निघोज,
11) पुरंदर (2 गावे) - गुळुंचे, कर्नलवाडी
12) जुन्नर (22 गावे) - पांगरी त.मढ., आंबेगव्हाण, बांगरवाडी, बुचकेवाडी, धालेवाडी, डुंबरवाडी, गुळुंचवाडी, कांदळी, खामगाव, खटकाळे, नारायणगाव, निमगिरी, पाडळी, पिंपळवंडी, पिंपरी कावळा, राळेगण, सागणोरे, शिरोली तर्फे आळे, सुकाळवेढे, उंब्रज नं 1, मानमळा, वडगाव आनंद..
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)