Thursday 24 May 2018

विधानपरिषद निवडणूक- 2018 निकाल ; नाशिकमध्ये राष्ट्रवादीला धक्का तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा

विधान परिषद निवडणूक: नाशकात राष्ट्रवादीला धक्का तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी दोन जागा


शिवसेनेच्या विजयाला भुजबळांची मदत: नरेंद्र दराडे
नाशिक विधान परिषदेत शिवसेनेच्या विजयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचीही मदत लाभली, असा खळबळजनक दावा विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला आहे.
विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक मतदार संघाच्या निवडणुकीत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे. या विजयात छगन भुजबळांनीही हातभार लावला, अशी  प्रतिक्रिया शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांच्या पुत्राने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे दराडे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, मनसे अशी महायुती असतानाही दराडे यांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर दराडे यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची ठरली. ‘शिवसेनेकडे २११ मतेच होती. तर विजयासाठी ४०० मतांची गरज होती. पण सर्वच पक्षातील नेतेमंडळी माझ्या मदतीला धावून आली. छगन भुजबळांनीही माझ्या विजयात हातभार लावला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या सर्व जागेचे निकाल जाहीर झाले आहेत. पाचपैकी दोन जागेवर शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली असून दोन जागेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. कोकणात राष्ट्रवादीला एका जागेवर यश मिळवण्यात यश आले. विधान परिषदेच्या जागेवरील निकालात  काँग्रेसच्या हात रिकामाच राहिला आहे. कारण काँग्रेसला पाचपैकी  एकाही जागेवर यश मिळालेले नाही. अमरावतीमध्ये काँग्रेसला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला.परभणी - हिंगोलीत शिवसेनेच्या विप्लव बजोरिया यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांना पराभूत केले. विप्लव बजोरिया यांना २५६ मते मिळाली. तर सुरेश देशमुख यांना २२१ मते पडली. परभणी-हिंगोली पाठोपाठ अमरावतीध्येही काँग्रेसला धक्का बसला. अमरावतीमध्ये भाजपच्या प्रविण पोटे यांनी मोठा विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अनिल माधोगढीया यांना पराभूत केले. याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी १७ मते मिळाली. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी ४१२ मते मिळवत विजय मिळवला. चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार रामदास अांटकर ५५० मिळवत विजय झाले. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना पराभूत केले. सराफ यांना ४६२ मते पडली.  कोकणातील रत्नागिरी - सिंधुदुर्ग जागेवर राष्ट्रावादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी सेनेच्या साबळेंना पराभूत केले.



विधानपरिषद निवडणूक 2018 संपूर्ण निकाल

अशी मिळाली मते-

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था

1) अमरावती- प्रविण पोटे (भाजप) विजयी

एकूण मतदान- 488
एकूण वैध मते- 475
एकूण बाद मते- 10
नोटा- 3 मते
प्रवीण पोटे (भाजप) यांना मते- 458 विजयी
अनिल माधोगडिया (काँग्रेस) - 17 मते (पराभव)

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था

2) परभणी-हिंगोली- विप्लव बाजोरिया (शिवसेना) विजयी

एकूणमतदान- 499
एकूणवैध मते- 481
एकूणबाद मते- 16
नोटा- 2 मते
विप्लव बाजोरिया यांना मते- 256
सुरेश देशमुख (काँग्रेस)- 221 मते
सुरेश नागरे (अपक्ष)- 2 मते
निकाल- विप्लव बाजोरिया 35 मतांनी विजयी.

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था

3) नाशिक- नरेंद्र दराडे (शिवसेना) विजयी

नरेंद्र दराडे- 412 मते
शिवाजी सहाणे- 219 मते
निकाल- शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे 193 मतांनी विजयी

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था

4) कोकण- अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)- विजयी

अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)- 620 मते
राजीव साबळे (शिवसेना) 306 मते
निकाल- कोकणात राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे 314 मतांनी विजयी

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था
5) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली- रामदास आंबटकर (भाजप) विजयी
रामदास आंबटकर (भाजप)- 550 मते
इंद्रकुमार सराफ (काँग्रेस)- 462 मते
निकाल- भाजपचे रामदास आंबटकर 88 मतांनी विजयी



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

अमरावतीत काँग्रेसवर नामुष्की! शंभरहून अधिक मतं भाजपला

विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात काँग्रेसची मोठी नामुष्की झाली. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसच्या अनिल माधोगडिया यांचा दारुण पराभव झाला आहे. याठिकाणी भाजपच्या प्रविण पोटे यांनी ४५८ मते मिळवत विक्रमी विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे माधोगडियांना केवळ १७ मतं मिळाली. या मतदार संघात काँग्रेसचे १२८ मतदार होते. पण, १११ मतदारांनी  माधोगडियांना नापंसती दर्शवल्याचे चित्र निकालानंतर समोर आले आहे.या मतदारसंघात भाजपाचे २०० राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, शिवसेना २८, प्रहार, युवा स्वाभिमान आणि इतर पक्ष मिळून ४८९ मतदार होते. यातील ४८८ जणांनी मतदान केले होते. शिवसेना, प्रहार, युवा स्वाभिमान आणि काही अपक्षांनी मतदानापूर्वीच पोटे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच पोटेंचे पारडे जड होते. पण, १२८ मतदार असल्यामुळे काँग्रेसला एवढा मोठा पराभव अपेक्षित नव्हता. काँग्रेसच्या शंभरहून अधिक मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे भाजपचा विजय द्विगुणित झाला आहे.  
अमरावती, चंद्रपूरमध्ये काँग्रेसला दणका, भाजपाची बाजी
विधान परिषदेतील अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज संस्थेच्या मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. अमरावतीमध्ये भाजपाचे प्रवीण पोटे तर वर्धा येथे भाजपाचे रामदास आंबटकर विजयी झाले आहेत.चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत व महानगरपालिका सदस्यांनी निवडणुकीत मतदान केले होते. यामध्ये जिल्हा परिषदेचे एकूण १९४, महानगरपालिका ७१, नगर पालिका ४७५, नगर पंचायत ३१९ असे एकूण १०५९ मतदार होते. भाजप व काँग्रेस अशी थेट निवडणूक असली तरी नगरसेवकांच्या नाराजीचा फटका नेमका कोणत्या उमेदवाराला बसतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपाकडून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांपासून आमदार खासदारांपर्यंत सर्वच कामाला लागले होते. या निवडणुकीत रामदास आंबटकर यांवना ५२८ मते मिळाली. तर काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ यांना ४९१ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण १०१९ मते वैध ठरली. तर ३६ मते बाद ठरली. १ मतदाराने नोटाचा वापर केला. रामदास आंबटकर यांच्यासाठी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी शेवटच्या क्षणी सूत्रे हाती घेत रचलेले डावपेच निर्णायक ठरल्याचे दिसते.विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे विरुद्ध काँग्रेसचे अनिल माधोगडिया यांच्यात लढत होती. या मतदारसंघात भाजपाचे २००, काँग्रेसचे १२८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, शिवसेनेचे २८, प्रहार, युवा स्वाभिमान, इतर पक्ष आणि अपक्ष मिळून ४८९ मतदार होते. यातील ४८८ जणांनी मतदान केले आहे. शिवसेना, प्रहार, युवा स्वाभिमान आणि काही अपक्षांनी पोटे यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड मानले जात होते. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात पोटे यांनी बाजी मारली. अमरावतीमध्ये काँग्रेसची स्वत:ची १२८ मते होती. पण माधोगडिया यांना केवळ १७ मते मिळाली. या निवडणुकीत प्रवीण पोटे यांनी ४५८ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. या दोन्ही जागांवरील विजय भाजपासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.


रायगडात राष्ट्रवादी- भाजपाची छुपी युती, अनिकेत तटकरेंचा दणदणीत विजय

विधान परिषदेतील रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे विजयी झाले आहेत. भाजपाच्या छुप्या पाठिंब्यामुळे अनिकेत तटकरे यांना भरघोस मताधिक्याने विजय मिळवता आला असून त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा पराभव केला.रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातील तीन जिल्ह्यांमध्ये मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण ९४० मतदार होते. रायगड जिल्ह्यातील ४६९ मतदारांपकी ४६७ सदस्यांनी तर रत्नागिरी (२५९) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (२१२) सर्व सदस्यांनी मतदान केले होते. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत ९४० पैकी १२ मते बाद ठरली. तर दोन जण मतदानादरम्यान अनुपस्थित होते. उर्वरित मतांपैकी ६२० मते अनिकेत तटकरे यांना मिळाली असून राजीव साबळे यांना फक्त ३०६ मतांवर समाधान मानावे लागले. तटकरे हे ३१४ मतांनी विजयी झाले असून भाजपाच्या छुप्या पाठिंब्यामुळेच त्यांना हा विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस, शेकाप, स्वाभिमान पक्षानेही तटकरे यांच्या मुलाला पाठिंबा जाहीर केल्याने अनिकेत तटकरे यांचे पारडे जड होते.रायगडमध्ये राजकीय हिशेब चुकते करण्याचीही संधी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी साधली. राणेंच्या ‘स्वाभिमान’ने तटकरेंना पाठिंबा जाहीर केला. तर दुसरीकडे पालघरमधील वचपा काढण्यासाठी भाजपानेही राष्ट्रवादीशी छुपी करत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

विधान परिषद निवडणूक: परभणी- हिंगोलीत आघाडीला धक्का, शिवसेनेचे बाजोरिया विजयी

विधान परिषदेतील परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांचा पराभव केला आहे.विधान परिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात २१ मेला मतदान झाले होते. परभणी हिंगोलीत ५०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत विप्लव बाजोरिया यांना २५६ मते मिळाली. तर सुरेश देशमुख यांना २२१ मते मिळाली.सहा मतदारसंघातील मतदारांचे आकड्यांचे गणित पाहता, तीन जागांवर लढणाऱ्या शिवसेनेची कसोटी लागणार आहे. राज्यात २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय स्थिती बदलली असून भाजपाने स्थानिक राजकारणातही आघाडी घेतली आहे. विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड, नाशिक, अमरावती, परभणी-हिंगोली, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि लातूर-बीड-उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात २१ मे रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत स्थानिक संस्था मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांचे नगरसेवक हे मतदार होते. परभणी-हिंगोलीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने काँग्रेसची बाजू भक्कम होती.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी- भाजपा तोंडघशी

विधान परिषदेतील नाशिक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाच्या साथीने दराडे यांचा पराभवाचा डाव रचला होता. पण शेवटी दराडे यांनी बाजी मारत नाशिकमध्ये भगवा फडकावला.विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र दराडे, काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे आणि भाजपाशी संबंधित अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांच्यात लढत होती. या निवडणुकीसाठी ६४४ मतदार होते. पक्षीय बलाबलाचा विचार करता शिवसेनेचे २०७, काँग्रेस आघाडी १७१, भाजपा (मित्रपक्ष) १७८, माकप १३, आणि इतर छोटे-मोठे पक्ष आणि अपक्ष मिळून ७५ मतदार होते.कोणत्याही पक्षाकडे पहिल्या पसंतीची मते गाठण्याइतके संख्याबळ नसल्याने उमेदवार न देणाऱ्या भाजपाच्या मतांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले होते. भाजपाने अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. परंतु तोवर पक्षात वेगवेगळे गट पडले होते. शिवसेनेने भाजपाची मते त्यांच्या बाजूने फिरवली होती. तसेच मालेगाव आणि नाशिकमध्ये काँग्रेस- शिवसेना आघाडी असून याचा फायदाही शिवसेनेला झाला.पालघरमधील घडामोडीनंतर भाजपाने हा निर्णय घेतला होता. या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे










No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.