Monday 21 May 2018

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचा राष्ट्रवादीला उघड पाठिंबा;शिवसेनेला धक्का! दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

विधानपरिषद (स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ) निवडणूक मे-२०१८

6 जागांसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================
स्थानिक स्वराज्य विधान परिषदेची निवडणूक २१ रोजी पार पडत असून या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिला आहे. मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे व भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल उघडपणे एकमेकांची भेट घेतली.स्थानिक स्वराज्य विधान परिषदेची निवडणूक २१ रोजी पार पडत असून या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिला आहे. मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे व भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल उघडपणे एकमेकांची भेट घेतली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या स्थानिक  स्वराज्य संस्थांच्या ९४१ मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे. निवडणुकीत सेनेचे राजीव साबळे हे सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना आव्हान देत आहेत. राज्यात भाजपा-सेना एकत्र असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सेनेला हा मोठा झटका मानला जात आहे. पालघर लोकसभा निवडणुकीत सेनेने वनगा कुटुंबीयांचा पक्ष प्रवेश करून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने भाजपामध्ये नाराजी पसरली होती. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत सेना-भाजप यांची अघोषित युती झाली होती.मात्र शेवटच्या क्षणी भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सेनेला मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते पनवेलमध्ये तळ ठोकून बसले होते. पनवेल उरणमध्ये एकूण ११८ मतदार असून, संपूर्ण मतदान राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. पनवेलमधील शेकाप नगरसेवक मतदानासाठी थेट गोव्यावरून पनवेलमध्ये दाखल झाले आहेत. राज्यातील सहा स्थानिक स्वराज संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. सहा जागांवर भरभरून मतदान झाले. नाशिकमध्ये 100 टक्के तर उर्वरित पाच ठिकाणी 99 टक्केहून अधिक मतदान झाले. दरम्यान, या निवडणुकीत झालेल्या मतदानानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला तीनही जागा जिंकण्याची संधी आहे. तसेच भाजप दोन जागा राखणार आहे. परभणी-हिंगोलीच्या एका जागेसाठी शिवसेना व काँग्रेसमध्ये मोठी चुरस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिक व कोकणची जागा निश्चित जिंकणार असे मानले जात आहे तर भाजप अमरावती व वर्ध्याची जागा आपल्या खिशात घालणार आहे. उस्मानाबाद-लातूर-बीडसाठी भाजप-राष्ट्रवादीत मोठा संघर्ष आहे. मात्र, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन केल्याने ही जागाही राष्ट्रवादी मारेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सुरेश धस यांनी आपण ही जागा 150 हून अधिक मतांनी जिंकणार असा दावा केल्याने पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना धोबीपछाड देणार का याकडे लक्ष आहे. परभणी- हिंगोलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्याने स्वाभाविकच काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांना संधी असल्याचे मानले जात आहे. मात्र, अकोल्यातून आयात केलेले शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे चिरंजीव विप्लव बाजोरिया यांनीही पैशांची पेरणी करत मतांची जुळवाजुळव केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे परभणी-हिंगोलीत शिवसेना व काँग्रेसमध्ये चुरस आहे. भाजपने येथे शिवसेनेच्या बाजोरिया यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या नेतेमंडळींनी बाजोरिया यांच्यासाठी मतदारांची जुळवाजुळव करताना शिवसेना, भाजपसह अपक्ष व स्थानिक आघाडीच्या मतदारांना सर्वार्थाने सोबत घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना जिंकेल असे शिवसेनेचे म्हणणे आहे


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

नाशिकमध्ये भाजपा राष्ट्रवादीच्या पाठीशी!

पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या खेळीला चोख प्रत्युत्तर देत भाजपाने नाशिकमध्ये विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. भाजपाने असा निर्णय घेतल्याने सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना भाजपाने बळ दिल्यास शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना मतांसाठी कसरत करावी लागणार आहे. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने विधान परिषद निवडणुकीत सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंगची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच उमेदवारांनी अन्य पक्षांतील नाराज आपल्या गळाला लावले असून, त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचे सांगितले जात आहे.



परभणी-हिंगोली 

सुरेश देशमुख (कॉंग्रेस) विरुद्ध विप्लव बजोरिया (शिवसेना) 
परभणी-हिंगोली विधानपरिषदेच्या जागेसाठी दोन्ही जिल्ह्यातील सात केंद्रांवर 501 मतदार मतदान करतील. हे 501 मतदार निवडणुकीच्या मैदानात असलेल्या तीन उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. शिवसेनेकडून विप्लव बाजोरिया, तर काँग्रेसकडून माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरेही मैदानात आहेत. परभणी हिंगोलीतील 501 पैकी 499 जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदाराची आकडेवारी 99.60 टक्के झाली आहे.

एकूण 501 मतदार
राष्ट्रवादी 162
काँग्रेस 135
भाजप 51
शिवसेना 97
रासप 7
मनसे 5
एमआयएम 1
अपक्ष 43


वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली 

इंद्रकुमार सराफ (कॉंग्रेस) विरुद्ध रामदास अंबटकर (भाजप) 
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत काँग्रेसकडून इंद्रकुमार सराफ हे उमेदवार आहेत, तर भाजपकडून रामदास आंबटकर हे लढत आहे. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. उमेदवाराला विजय मिळवण्यासाठी 530 च्या घरात मतांची गरज आहे. यात भाजपकडे स्वतःचे 500 च्या घरात मतं आहेत, तर काँग्रेसकडे 300 च्या आसपास मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला जुळवाजुळवी ही अधिक करावी लागणार आहे. वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधील जागेसाठी 99.72 % मतदान झाले. 1059 मतदारांपैकी 1056 जणांनी मताधिकार बजावला.

पक्षनिहाय संख्याबळ
वर्धा 308, चंद्रपूर 469, गडचिरोली 282 

मतदारएकूण मतदार संख्या - 1049
भाजपा -  495
शेतकरी संघटना -  53
काँग्रेस -  260
राष्ट्रवादी काँग्रेस -  79
बहुजन समाज पार्टी - 18
मनसे - 2
सीपीआय - 2
इतर - 15
अपक्ष - 54.


नाशिकमध्ये भाजपची राष्ट्रवादीला साथ

शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना)
 नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत असल्याने निवडणूक चुरशीची ठरली आहे. शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष परवेज कोकणी हे तिघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यातील दोन महानगरपालिकांसह जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतचे सदस्य आणि पंचायत समिती सभापती असे एकूण 644 मतदार आहेत.शिवसेनेचे सर्वधिक 207 मतदार आहेत. त्या पाठोपाठ भाजपचे 167, राष्ट्रवादी काँग्रेसचे 100, काँग्रेस 71, मनसे 6, आरपीआय 5 अपक्ष 38 आणि इतर 50 असं पक्षीय बलाबल आहे. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची मते कोणाच्या पारड्यात मत टाकतात त्याचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे विधानपरिषदेत शिवसेनेला धोबीपछाड देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. परिणामी फोडाफोडीच्या राजकारणावर निवडणुकीचं गणित अवलंबून असल्याने स्वतःचे मतदार संभाळून इतरांच्या फोडाफोडीवर भर दिला जात आहे. नाशिकमध्ये 644 जणांनी मतदानाचा हक्क बजवल्यामुळे 100 टक्के मतदान झाले.

एकूण 644 मतदार

भाजप - 167
शिवसेना - 207
राष्ट्रवादी काँग्रेस- 100
काँग्रेस - 71
मनसे - 6
आरपीआय- 5
अपक्ष - 38
इतर- 50


अमरावती 

प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध अनिल मधोगरिया (कॉंग्रेस) 
अमरावती जिल्ह्यातील 489 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील तहसील कार्यालय स्तरावर एकूण 14 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये महानगरपालिकेचे 92 सदस्य, जिल्हा परिषदेचे 59, पंचायत समित्यांचे सभापती 14, नगर परिषद 249, नगर पंचायतचे 75, असे एकूण 489 सदस्य आहेत. या निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे, तर काँग्रेसचे अनिल माधोगढीया या दोघांमध्ये चुरस आहे. भाजपाने आपल्याकडे 262 सदस्य असल्याचा दावा केला आहे, तर काँग्रेसने 227 मतदार असल्याचा दावा केला. अमरावतीत 489 पैकी 488 सदस्यांनी मतदान केले. अमरावतीत मतदानाची आतापर्यंतची आकडेवारी 99.80 टक्के इतकी आहे.

एकूण 489 मतदार
भाजपा - 200
काँग्रेस - 128
राष्ट्रवादी - 40
शिवसेना - 28
प्रहार - 18
एमआयएम - 14
युवा स्वाभिमान पार्टी - 13
बसपा - 6
अपक्ष - 33
रिपाई - 4
सपा - 1
मनसे - 2
लढा - 1
स्वाभिमानी शे.सं. - 1


उस्मानाबाद-लातूर-बीड 

सुरेश धस (भाजप) वि. अशोक जगदाळे (राष्ट्रवादी पुरस्कृत) या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.या तीन जिह्ल्यात मिळून एकूण 1006 मतदार आहेत. यापैकी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 527, 94 अपक्ष, शिवसेनेचे 64 आणि भाजपचे 321 मतदार आहेत. त्यामुळे भाजप मतांचं गणित कसं जुळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उस्मानाबाद बीड लातूर मतदारसंघात 99.9 % मतदान झाले. एक हजार पाच मतदारापैकी एक हजार चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून उस्मानाबाद (291) आणि लातूर (353) मध्ये शंभर टक्के मतदान झाले. बीडमध्ये (360) एका मतदाराने आपला हक्क बजावला नाही.

एकूण 1006 मतदार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 527
शिवसेना - 64
भाजप - 321
अपक्ष - 94



रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 

अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) विरुद्ध राजीव साबळे (शिवसेना) 
रायगड-सिंधुदुर्ग-रत्नागिरी या तीन जिल्ह्यातील 940 मतदार कोकणचा आमदार निश्चित करणार आहेत. कोकणच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यामध्ये थेट निवडणूक होणार आहे.राजीव साबळे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर, कोकणच्या या निवडणुकीमध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार हे रायगड जिल्ह्यातील असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसे आघाडी करण्यात आली आहे. तर नारायण राणे यांनी देखील अनिकेत तटकरे यांना पाठिंबा दिला आहे.यामुळे शिवसेनेला भाजपची साथ मिळणार, की एकाकी पडणार याकडे लक्ष लागलं असून मुलाच्या या पहिल्यावहिल्या निवडणुकीसाठी सुनील तटकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत दुपारी चार वाजेपर्यंत 99.57 टक्के मतदानाची नोंद झाली. 940 पैकी 938 जणांनी मतदान केले. कर्जत आणि पनवेलमधील प्रत्येकी एका मतदाराची मतदानासाठी अनुपस्थिती होती. दोन्ही शेकापचे लोकप्रतिनिधी आहेत.

एकूण मतदार 941 (एक जागा रिक्त)
शिवसेना  293
भाजपा  164
राष्ट्रवादी  174
काँग्रेस 69
शेकाप 92
स्वाभिमान 98
मनसे 12
अपक्ष 03
आरपीआय 24
ग्रा.विकास आ. 10

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणालास्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी मतदान होत असून, यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून, प्रत्येक मत मोलाचे ठरणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष दोन जागा राखण्यात यशस्वी होईल असे चित्र असताना, शिवसेनेकडे गमावण्यासारखे काही नाही. सहाही ठिकाणी अतिशय चुरशीने निवडणूक होत असून, एका मताला कमीत कमी दोन लाख ते जास्तीत जास्त 8 लाख रुपये इतका भाव आल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषद, नगरपंचायत या संस्थांतील सुमारे 4 हजार 621 मतदार सदस्य पात्र मतदार आहेत.  राष्ट्रवादीचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग), जयंत जाधव (नाशिक), बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली), कॉंग्रेसचे दिलीप देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड), भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती) आणि मितेश भांगडिया (वर्धा चंद्रपूर गडचिरोली) या सदस्यांची मुदत संपत आहे. या रिक्त झालेल्या सहा जागांसाठी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होत आहे. गुरुवार 24 मे रोजी मतमोजणी होईल.  सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड मधून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात लढत होत आहे.या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नाशिक मध्येही शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशीच लढत होत आहे.या ठिकाणी शिवसेनेचे नरेंद्र दराडे तर राष्ट्रवादीने शिवाजी सहाणे यांच्यात सामना होत आहे.वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघमधून काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ आणि भाजपचे रामदास अंबटकर हे आमने सामने आहेत.परभणी हिंगोली मधून काॅग्रेस आणि शिवसेनेत लढत होत आहे. शिवसेनेचे विपलव बजोरीया आणि काॅग्रेसचे सुरेश देशमुख यांच्यात लढत होत आहे.अमरावती मध्ये भाजपचे प्रविण पोटे आणि काॅग्रेसचे अनिल मधोगरीया यांच्यात सरळ लढत होत आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद या  मतदारसंघातील लढत चुरशीची होत असून,भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.या ठिकाणी राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला.त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला.या मतदार संघात एकूण १ हजार ५ मतदार असून, मतदारांच्या पात्र अपात्रेच्या पार्श्वभूमीवर निवडणूकीत रंगत आली आहे.या ठिकाणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीनंतर झालेल्या स्थानिक निवडणूकीत भाजपने मोठी मुसंडी मारली आहे.या सहा मतदार संघात मतदारांची संख्या पाहिल्यास भाजप दोन जागांवर बाजी मारण्याची दाट शक्यता आहे तर तीन जागा लढविणा-या शिवसेनेची कसोटी लागणार आहे. या निवडणूकीत ज्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे भाजपने उमेदवार दिलेला नाही. शिवसेनेने स्वबळाची घोषणा केली असली तरी जागा वाटपावरून शिवसेना भाजपात समजोता झाल्याचे चित्र आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड मध्ये राजकीय पक्षीय बलाबलामध्ये शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष असला तरी सुनिल तटकरे यांनी मुलाच्या विजयासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि शेकापशी हातमिळवणी केल्याने ये मतदारसंघात शिवसेनेची कसोटी लागणार आहे. अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर या मतदारसंघातील संख्याबळाचा विचार करता या ठिकाणी भाजप सुरक्षित आहे तर परभणी-हिंगोलीत काँग्रेसची बाजू भक्कम आहे.


बीड नगरपालिकेच्या ‘त्या’ अकरा अपात्र नगरसेवकांना मतदान करता येणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आज होणा-या मतदानाच्या दिवशी बीड नगरपालिकेच्या ‘त्या’ अकरा अपात्र नगरसेवकांना मतदान तर करता येईल पण मतमोजणीच्या दिवशी गरज पडली तरच त्यांच्या मतांचा विचार केला जाणार आहे, तसा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज दिला. ऐन निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला या निर्णयाने चांगलाच दणका बसला आहे. आठ महिन्यांपुर्वी बीडमध्ये नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या केबीनमध्ये काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी घाण टाकली होती, या प्रकरणात दहा नगरसेवकांना  मागच्या दोन दिवसांपुर्वी नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी अपात्र केले होते, या निर्णयाच्या विरोधात काल आघाडीच्या नगरसेवकांनी हायकोर्टात धाव घेवून याचिका दाखल केली होती. यावेळी नगराध्यक्षांच्या गटानेही आपली याचिका दाखल करून त्या दहा नगरसेवकांना मतदानापासून रोखावे असे म्हणणे मांडल्याचे समोर येत आहे. त्यावर सदर नगरसेवकांना आजच्या निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार दिला, मात्र गरज पडली तरच त्यांच्या मतांचा विचार करावा, असा निर्णय दिल्याचे संबंधितांच्या वकिलांनी सांगितले. याचप्रमाणे शिरूरचे नगर पंचायतीचे अपात्र नगरसेवक भिमराव गायकवाड हेही उच्च न्यायालयात गेले होते, त्यानुसार त्यांना मतदान करता येईल पण ते ग्राह्य धरले जाणार नाही, जर दोन्ही उमेदवारांना सारखे मते पडले तर कोर्ट अंतीम सुनावणी करून निर्णय देणार आहे. याशिवाय २५ मे रोजी शिरूर पंचायत समितीमध्ये होणार्‍या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पुर्वी नगरविकास खात्याने गायकवाड यांच्या अपात्रेवर सुनावणी घेण्याचेही कोर्टाने म्हटले आहे. याठिकाणी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशास स्थगिती मिळाली तरच भिमराव गायकवाड यांना २५ मे रोजी मतदान करता येणार आहे. दरम्यान, ऐन निवडणूकीत हातात आलेल्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच धास्तावले आहेत.


पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी निवडीतील बेबनावामुळे मतदारांचा कल आर्थिक लाभाकडेच असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.

21 मे रोजी मतदान, 24 मे रोजी निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे.  21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण ७८ जागा असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे २३ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे १९, भाजप १८, शिवसेना ९, अपक्ष ५, शेकाप २, पीआरपी आणि लोकभारती प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजप, सेनेचे विधानसभेत बहुमत असले तरी परिषद विरोधकांची असल्यामुळे सभापतिपद राष्ट्रवादीकडे, तर उपसभापतिपद काँग्रेसकडे आहे.


* रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या विधानपरिषद मतदारसंघात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे-

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच
1 पनवेल महापालिका
2 नवी मुंबई-पनवेल (महापालिका क्षेत्र वगळून)
3 माथेरान नगरपरिषद
4 मुरूड-जंजिरा नगरपरिषद
5 श्रीवर्धन नगरपरिषद
6 अलिबाग नगरपरिषद
7 रोहा अष्टमी नगरपरिषद
8 महाड नगरपरिषद
9 कर्जत नगरपरिषद
10 उरण नगरपरिषद
11 पेण नगरपरिषद
12 खोपोली नगरपरिषद
1 वेंगुर्ला नगरपरिषद
2 कणकवली नगरपंचायत
3 मालवण नगरपरिषद
4 सावंतवाडी नगरपरिषद
1 राजापूर नगरपरिषद
2 दापोली कॅम्प नगरपंचायत
3 खेड नगरपरिषद
4 चिपळूण नगरपरिषद
5 रत्नागिरी नगरपरिषद
6 देवरूख नगरपरिषद
7 लांजा नगरपरिषद
(वरील स्थानिक स्वराज्य संस्था मधील सविस्तरपणे पक्षीय बलाबल पहा- "महाराष्ट्रातील राजकारण" या उपयुक्त पुस्तकात.


Sr No
Candidate Name
Party Affiliation

1
Shri Jain Kishor Otermal
Shivsena

2
Shri Aniket Sunil Tatkare
Nationalist Congress Party

3
Aditi Sunil Tatkare
Nationalist Congress Party

4
Shri Sabale Rajiv Ashok
Shivsena

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



* नाशिक या विधानपरिषद मतदारसंघात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे-

नाशिक  जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच
1 नाशिक महानगरपालिका
2 त्रिबंक नगरपरिषद
3 भागुर नगरपरिषद
4 नांदगाव नगरपरिषद
5 इगतपूरी नगरपरिषद
6 सटाणा नगरपरिषद
7 येवला नगरपरिषद
8 सिन्नर नगरपरिषद
9 मनमाड नगरपरिषद
10 देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड
(वरील स्थानिक स्वराज्य संस्था मधील सविस्तरपणे पक्षीय बलाबल पहा- "महाराष्ट्रातील राजकारण" या उपयुक्त पुस्तकात.


Sr No
Candidate Name
Party Affiliation

1
Shri Shivaji Laxman Sahane
Nationalist Congress Party

2
Shri Yatindra Madhukar Patil
Nationalist Congress Party

3
Shri Narendra Bhikaji Darade
Shivsena

4
Shri Kishor Bhikaji Darade
Shivsena

5
Shri Ashok Deoram Aher
Independent
6
Shri Parvej Mohammad Usuf Kokani
Bharatiya Janata Party

7
Shri Dnyaneshwar Ramkrishna Gaikwad
Indian National Congress

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


* वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या विधानपरिषद मतदारसंघात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे-

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच
1 सिंदी नगरपरिषद
2 देवळी नगरपरिषद
3 पुलगाव नगरपरिषद
4 आर्वी नगरपरिषद
5 हिंगणघाट नगरपरिषद
6 वर्धा नगरपरिषद
1 चंद्रापूर महानगरपालिका
2 मूल नगरपरिषद
3 राजूरा नगरपरिषद
4 ब्रम्हपूरी नगरपरिषद
5 वरोरा नगरपरिषद
6 भद्रावती नगरपरिषद
7 बल्लारपूर नगरपरिषद
1 देसाईगंज नगरपरिषद
2 गडचिरोली नगरपरिषद
(वरील स्थानिक स्वराज्य संस्था मधील सविस्तरपणे पक्षीय बलाबल पहा- "महाराष्ट्रातील राजकारण" या उपयुक्त पुस्तकात.

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


Sr No
Candidate Name
Party Affiliation


1
Shri Rambhau Pundalik Meshram
Indian National Congress
9422152613

2
Shri Tawari Jagdish Achaladasji
Independent
9423003432

3
Shri Saurabh Raju Timande
Independent
8888892111

4
Shri Ramdas Bhagwanji Ambatkar
Bharatiya Janata Party
9422113007

5
Shri Suresh Ramaji Munjewar
Independent
9822368598

6
Shri Chandansing Sadhusing Chandel
Bharatiya Janata Party
9422935686

7
Shri Indrakumar Balmukund Saraf
Indian National Congress
9325375750

8
Shri Pandurang Ramu Jadhav
Independent
7774812211



============================

* परभणी-हिंगोली या विधानपरिषद मतदारसंघात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे-

परभणी-हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच
1 परभणी महानगरपालिका
2 सोनपेठ नगरपरिषद
3 मानवत नगरपरिषद
4 पुर्णा नगरपरिषद
5 पाथरी नगरपरिषद
6 जिंतूर नगरपरिषद
7 सैलू नगरपरिषद
8 गंगाखेड नगरपरिषद
1 कळमनुरी नगरपरिषद
2 बसमत नगरपरिषद
3 हिंगोली नगरपरिषद
(वरील स्थानिक स्वराज्य संस्था मधील सविस्तरपणे पक्षीय बलाबल पहा- "महाराष्ट्रातील राजकारण" या उपयुक्त पुस्तकात.


Sr No
Candidate Name
Party Affiliation

1
Shri Sushilkumar Deshmukh
Indian National Congress

2
Shri Viplove Gopikishan Bajoria
Shivsena

3
Shri Suresh Sakhabau Deshmukh
Indian National Congress

4
Shri Nagre Suresh Kundlikrao
Independent

5
Shri Praful Shrikant Patil
Bharatiya Janata Party

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


* अमरावती या विधानपरिषद मतदारसंघात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे-

अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच
1 अमरावती महानगरपालिका
2 चिखलदरा नगरपरिषद
3 चांदूर बाजार नगरपरिषद
4 चांदूर रेल्वे नगरपरिषद
5 दत्तपूर धामणगाव रेल्वे नगरपरिषद
6 शेंदूर रंजना नगरपरिषद
7 दर्यापूर बनोसा नगरपरिषद
8 मोर्शी नगरपरिषद
9 वरूड नगरपरिषद
10 अंजनगाव सुर्जी नगरपरिषद
11 अचलपूर नगरपरिषद
(वरील स्थानिक स्वराज्य संस्था मधील सविस्तरपणे पक्षीय बलाबल पहा- "महाराष्ट्रातील राजकारण" या उपयुक्त पुस्तकात.


Sr No
Candidate Name
Party Affiliation

1
Shri Pravin Ramchandra Pote
Bharatiya Janata Party
2
Shri Anil Ramchandraji Madhogarhia
Indian National Congress



पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


* उस्मानाबाद-लातूर-बीड या विधानपरिषद मतदारसंघात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे-
उस्मानाबाद  जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच
1 भूम नगरपरिषद
2 नळदूर्ग नगरपरिषद
3 मूरूम नगरपरिषद
4 पारंडा नगरपरिषद
5 कळंब नगरपरिषद
6 तुळजापूर नगरपरिषद
7 उमरगा नगरपरिषद
8 उस्मानाबाद नगरपरिषद
1 लातूर महानगरपालिका
2 औसा नगरपरिषद
3 निलंगा नगरपरिषद
4 अहमदपूर नगरपरिषद
5 उदगीर नगरपरिषद
1 किल्ले धारूर नगरपरिषद
2 काजी नगरपंचायत
3 गेवराई नगरपरिषद
4 मांजलगाव नगरपरिषद
5 आंबेजोगाई नगरपरिषद
6 परळी-वैजनाथ नगरपरिषद
7 बीड नगरपरिषद
(वरील स्थानिक स्वराज्य संस्था मधील सविस्तरपणे पक्षीय बलाबल पहा- "महाराष्ट्रातील राजकारण" या उपयुक्त पुस्तकात.


Sr No
Candidate Name
Party Affiliation

1
Shri Ashok Haridas Jagdale
Independent

2
Shri Ramesh Kashiram Karad
Nationalist Congress Party

3
Shri Raj Sayyad Ahmad Sayyad Noor
Independent

4
Shri Suresh Ramchandra Das
Bharatiya Janata Party

5
Shri Dhulshette Kisan Madhavrao
Bharatiya Janata Party

6
Shri Ramesh Shivdas Pokale
Bharatiya Janata Party

7
Shri Sheikh Taufiq Sattar
Independent
8
Shri Sachin Prakashrao Patil
Independent





POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



==================================
=================================


चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक

चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित

"महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक आगामी निवडणुकांसाठी उपयुक्त




अनुक्रमणिका


अ.क्र. तपशिल                      पान क्र.

1 महाराष्ट्र मतदार संघ पुर्नरचना  25
2 आजची संसद रचना व स्वरूप 27
3 निवडणूक संबंधीचे गुन्हे व त्यांची माहिती 31
4 लोकप्रतिनिधी कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा 34
5 भारतातील निवडणूक कायदे 36
6 नकारात्मक मतदान अधिकार 39
7 निवडणूक लढविण्याची पुर्वतयारी व प्रभावी प्रचारतंत्र 40
8 हंगामी सरकार 1947 ते 1952 42
9 पहिली लोकसभा 1952 ते 1957 43
10 दूसरी लोकसभा 1957 ते 1962 46
11 तिसरी लोकसभा 1962 ते 1967 49
12 चवथी लोकसभा 1967 ते 1971 53
13 पाचवी लोकसभा 1971 ते 1977 56
14 सहावी लोकसभा 1977 ते 1980 58
15 सातवी लोकसभा 1980 ते 1984 61
16 आठवी लोकसभा 1984 ते 1988 63
17 नववी लोकसभा 1989 ते 1991 65
18 दहावी लोकसभा 1991 ते 1996 67
19 अकरावी लोकसभा 1996 ते 1998 69
20 बारावी लोकसभा 1998 ते 1999 72
21 तेरावी लोकसभा 1999 ते 2004 74
22 चौदावी लोकसभा 2004 ते 2009 77
23 पंधरावी लोकसभा 2009 ते 2014 80
24 सोळावी लोकसभा 2014 ते 2019 82
25 संयुक्त महाराष्ट्राची वाटचाल 85
26 पहिली विधानसभा 1960 विधानसभा अस्तित्वात 87
27 दूसरी विधानसभा 1962 ते 1967 नवनिर्मिती राज्याच्या राजकारणास प्रारंभ 88
28 तिसरी विधानसभा 1967 ते 1972 काँग्रेसला बहूमत 90
29 चौथी विधानसभा 1972 ते 1978 पुन्हा काँग्रेसला कौल 92
30 पाचवी विधानसभा 1978 ते 1980 काँग्रेसमध्ये फुट : पुलोदचे सरकार 95
31 सहावी विधानसभा 1980 ते 1985 इंदिरा काँग्रेसला बहुमत 97
32 सातवी विधानसभा 1985 ते 1990 काँग्रेसच्या मताधिक्यात घट 99
33 आठवी विधानसभा 1990 ते 1995 काँग्रेसला काठावरचे बहुमत 101
34 नववी विधानसभा 1995 ते 1999 भाजप-शिवसेना युतीचे सरकार 104
35 दहावी विधानसभा 1999 ते 2004 राष्ट्रवादीचा उदय 107
36 अकरावी विधानसभा 2004 ते 2009 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार 109
37 बारावी विधानसभा 2009 ते 2014 मनसेचा उदय व आघाडीचे राजकारण 113
38 तेरावी विधानसभा 2014 ते 2019 भाजपला सर्वाधिक जागा 117
39 महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष 120
40 महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांची यादी 125
41 वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शिका 128
42 सोशल मिडियाचा प्रचारातील वापर व सूचना  130
43 पेड न्युज म्हणजे काय? व नियंत्रण 131
44 निवडणूक काळात होणारी फसवणूक 134
45 महाराष्ट्रातील जातवास्तव 144
46 महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघ 147
47 गडचिरोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 148
48 भंडारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 151
49 गोंदिया जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 154
50 सिंधदुर्ग जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 157
51 नांदेड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 160
52 चंद्रपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 163
53 रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 166
54 लातूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 169
55 उस्मानाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 172
56 बीड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 175
57 परभणी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 178
58 नंदूरबार जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 181
59 अमरावती जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 184
60 यवतमाळ जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 187
61 सातारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 190
62 वर्धा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 193
63 हिंगोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 196
64 बुलढाणा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 199
65 रायगड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 202
66 जालना जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 206
67 नागपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 209
68 अकोला जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 212
69 धुळे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 215
70 नाशिक जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 217
71 जळगाव जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 220
72 सोलापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 223
73 वाशिम जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 226
74 औरंगाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 229
75 अहमदनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 232
76 पुणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 235
77 ठाणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 238
78 सांगली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 241
79 मुंबई उपनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 244
80 कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 245
81 मुंबई जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 248
82 मतदान पद्धत-मतदानात झालेले तीन बदल.. 249
83 लोकसभा निवडणुक 2014; महाराष्ट्रातील दृष्टीक्षेप 250
84 राज्यातील लोकसंख्येनुसार प्रमाण व सद्यस्थिती 251
85 राज्यातील लोकसभा व विधानसभा 2014 मधील पक्षनिहाय स्थिती व प्रमाण 252
86 महाराष्ट्र राज्यातील वयोगटाप्रमाणे मतदार संख्या व प्रमाण 253
87 विधानसभेच्या 234 मतदारसंघात महायुतीला आघाडी (निवडणूक-2014) 254
88 लोकसभा निवडणूक 2014; उमेदवारांची सामाजिक स्थिती 255
89 लोकसभा व विधानसभा मतदारसंघ दर्शविणारा महाराष्ट्र राज्याचा नकाशा 256
90 लोकसभा मतदार संघातील रचना, निवडणूक विश्‍लेषण, जातीय प्रमाण व प्रभाव, राजकीय सद्यस्थिती, विधानसभा स्थिती, मतदारांची वर्गवारी (अनुक्रमे 1 ते 48 मतदारसंघ) 
91 1. नंदूरबार लोकसभा मतदारसंघ  259
92 2. धुळे लोकसभा मतदारसंघ 264
93 3. जळगाव लोकसभा मतदारसंघ 269
94 4. रावेर लोकसभा मतदारसंघ 274
95 5. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ 279
96 6. अकोला लोकसभा मतदारसंघ 284
97 7. अमरावती लोकसभा मतदारसंघ 289
98 8. वर्धा लोकसभा मतदारसंघ 294
99 9. रामटेक लोकसभा मतदारसंघ 299
100 10. नागपूर लोकसभा मतदारसंघ 304
101 11. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ 309
102 12. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ 314
103 13. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ 319
104 14. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ 324
105 15. हिंगोली लोकसभा मतदारसंघ 329
106 16. नांदेड लोकसभा मतदारसंघ 334
107 17. परभणी लोकसभा मतदारसंघ 339
108 18. जालना लोकसभा मतदारसंघ 344
109 19. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ 349
110 20. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ 354
111 21. नाशिक लोकसभा मतदारसंघ 359
112 22. पालघर लोकसभा मतदारसंघ 364
113 23. भिवंडी लोकसभा मतदारसंघ 369
114 24. कल्याण लोकसभा मतदारसंघ 374
115 25. ठाणे लोकसभा मतदारसंघ 379
116 26. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ 384
117 27. मुंबई उत्तर पश्‍चिम लोकसभा मतदारसंघ 389
118 28. मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदारसंघ 394
119 29. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ 399
120 30. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ 404
121 31. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ 409
122 32. रायगड लोकसभा मतदारसंघ 414
123 33. मावळ लोकसभा मतदारसंघ 419
124 34. पुणे लोकसभा मतदारसंघ 424
125 35. बारामती लोकसभा मतदारसंघ 429
126 36. शिरूर लोकसभा मतदारसंघ 434
127 37. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ 439
128 38. शिर्डी लोकसभा मतदारसंघ 444
129 39. बीड लोकसभा मतदारसंघ 449
130 40. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 454
131 41. लातूर लोकसभा मतदारसंघ 459
132 42. सोलापूर लोकसभा मतदारसंघ 464
133 43. माढा लोकसभा मतदारसंघ 469
134 44. सांगली लोकसभा मतदारसंघ 474
135 45. सातारा लोकसभा मतदारसंघ 479
136 46. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ 484
137 47. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 489
138 48. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ 494
139 थोडक्यात महत्वाचे 
 लोकसभेत राज्यातील केवळ 5 महिला उमेदवार विजयी,लोकसभेत महिला खासदारांच्या प्रमाणात वाढ,लोकसभा निवडणुकीत 1,652 पक्षांना अपयश,आता मतदान यंत्रावर  उमेदवारांचा फोटो,मतदानाची मिळणार पोचपावती,राजकीय पक्षाप्रमाणेच आता नोटाचं स्वतंत्र चिन्ह!, 16व्या लोकसभेत केवळ तीनच अपक्ष उमेदवारांना संधी 
140 महाराष्ट्र राज्यातील राज्यसभेतील खासदार 499
141 लोकसभा, विधानसभेचा कार्यकाल व आगामी निवडणूका 502
142 देशभरातील सर्व विधानसभांचा कार्यकाल व आगामी निवडणूका 503
143 राज्यातील आगामी काळातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 505
144 महाराष्ट्रातील विभागानुसार स्थानिक स्वराज्य संस्था दृष्टीक्षेप/आरक्षण स्थिती 507
145 राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 508
146 राज्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 510
147 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2016 नगराध्यांची पक्षनिहाय संख्या 520
148 राज्यातील जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 521
149 राज्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 523
150 निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी निर्धारित केलेली निवडणूक खर्च मर्यादा 525
151 नोंदणीकृत राजकीय पक्ष व निवडणूक चिन्ह, संक्षिप्त नावे 526
152 संदर्भ, तळ टिपा 529
153 पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेची माहिती व कार्य 531




अधिक माहितीसाठी संपर्क :

श्री.चंद्रकांत भुजबळ

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

823/24, सदाशिव पेठ, गाडगीळ स्ट्रीट, 

पुणे 411030फोन नं- 020-24481671 

ई.मेल.- PRAB.ELECTION@GMAIL.COM


================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक घरपोच मिळण्यासाठी पुस्तकाचे व पोस्ट/कुरियर खर्च रक्कम बँकेत जमा करा. BOOK PURCHASE REQUEST FORM भरून बँकेत रक्कम जमा केलेली RECEIPT UPLOAD करा. खात्री केल्यानंतर ८ दिवसात नमूद केलेल्या पत्यावर पुस्तक मिळेल.


"महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक सवलतीत (१२००/-) मिळावा (सवलत मर्यादित कालावधीसाठी)

BOOK PURCHASE REQUEST FORM

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeMHI34OXJrVYCuis1nEYo7dRJiBphz75UN404lS5ObXUmrnQ/viewform



पत्रव्यवहार पत्ता
श्री. चंद्रकांत भुजबळ

अध्यक्षपॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

८२३/२४पुण्याई अपार्टमेंटऑफीस नं. २,

गाडगीळ स्ट्रीटसदाशिव पेठ,पुणे-४११०३०,

 फोन-०२०-२४४८१६७१EMAIL : PRAB.ELECTION@GMAIL.COM



 आर्थिक मदतीसाठी बँकविषयक तपशील

A/C. NAME : POLITICAL RESEARCH AND ANALYSIS BUREAU

BANK A/C. NO. 113004180000015

IFS CODE - SVCB 0000130

BANK NAME : SVC BANK LTD. 

BRANCH NAME : SADASHIV PETH, PUNE 411030

(THE SHANMRAO VITHAL CO-OPRTATIVE BANK LTD.)


टिप : १. धनादेश पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो“ या नावाने काढावा. अथवा आरटीजीएस ने अदा करावे.
२. पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेने कोणत्याही व्यक्तिला आर्थिक व्यवहार करण्यासाठी नियुक्त केलेले नाही.
             पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेच्या अधिक माहितीसाठी

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.