Wednesday 30 May 2018

पालघर लोकसभा मतदारसंघ पोट निवडणुकीत शिवसेनेचा पराभव अटळ! मतदानोत्तर चाचणीतून स्पष्ट

पालघर लोकसभा मतदारसंघ पोट निवडणुकीत शिवसेनेचा पराभव अटळ!

मतदारांची भाजपलाच सर्वाधिक पसंती; मतदानोत्तर चाचणीतून स्पष्ट


पालघर लोकसभा मतदारसंघात पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने या मतदारसंघात मतदानोत्तर चाचणी घेतली. यामध्ये मतदारांनी भाजपलाच सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. तर त्याखालोखाल बहुजन विकास आघाडी व शिवसेनेला पसंती दिल्याचे दिसून आले. पालघर पोट निवडणुक मतदानाची टक्केवारी एकूण मतदानाच्या ५३.२२% झाले आहे. विधानसभा निहाय झालेले मतदान  पुढीलप्रमाणे- विक्रमगड - 1,58,030 , डहाणू - 1,49,366 , भोईसर - 1,51,833 , पालघर - 1,44,905 , वसई - 1,32,966 ,  नालासोपारा - 1,50,687 या मतदारसंघात एकूण मतदान १६ लाख ६८ हजार १४५ असून त्यापैकी ८ लाख ८७ हजार ७८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे अशी माहिती उपलब्ध आहे. पालघर लोकसभा क्षेत्रात २०८७ मतदान केंद्र असून यामध्ये डहाणू विधानसभा क्षेत्रात 327, विक्रमगडमध्ये 328, पालघरमध्ये 318, बोईसरमध्ये 338, नालासोपारामध्ये 449, तर वसई विधानसभा क्षेत्रात 327 मतदान केंद्र आहेत. यापैकी १२५३ मतदान  मतदान केंद्रावर कल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.






* नियोजनाचा अभाव; काही बेजाबदार निवडणूक कर्मचारयामुळे मतदारांच्या विश्वासाला तडा
* निवडणूक आयोगाकडून नियोजनाचा ढिसाळपणा!
* काही निवडणूक कर्मचारी यांची बेजाबदारपणे कृत्ये! 
* व्हीव्हीपीएटी Voter Verifiable Paper Audit Trail (VVPAT) प्रिंटींग मशीन कनेक्शन सुविधा मधील नियोजनाच्या अभावामुळे काही ठिकाणी गोंधळ व संभ्रम
* प्रशासनातील काही बेजाबदार अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्याची गरज

==========
पालघर लोकसभा पोट निवडणुकीसाठी आयोगाकडून निरीक्षक नियुक्त केले आहेत यामध्ये निवडणुक खर्च देखरेख निरीक्षक म्हणून रितू राज गुप्ता यांची नियुक्ती केली होती. गुप्ता हे  मुळचे उत्तर प्रदेशातील असून पंजाब राज्यात सेवेत आहेत त्यांचा संपर्क क्र. 8004931446 असा आहे. 
तर निवडणुक निरीक्षक म्हणून Dr. Pritam B.Yashvant (IAS) व Mr. Gorakh Nath (IAS) यांची नियुक्ती केली होती. Dr. Pritam B.Yashvant (IAS) (संपर्क क्र. 09636991122) यांच्याकडे लोकसभा मतदारसंघातील ३ (डहाणू, विक्रमगड, पालघर) विधानसभांची जबाबदारी होती तर Mr. Gorakh Nath (IAS) (संपर्क क्र.09431431837) यांच्याकडे लोकसभा मतदारसंघातील ३ (बोईसर, नालासोपारा व वसई) विधानसभांची जबाबदारी होती. 
तसेच कायदा व सुव्यवस्था, सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाच्या निवडणुक निरीक्षक म्हणून Mr. Tejraj Singh Kharodia (IAS) (संपर्क क्र.09414055899) यांची नियुक्ती केली होती.  Mr. Tejraj Singh Kharodia यांच्याकडे संपुर्ण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती.
==========




डहाणु लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २८ मे 2018 रोजी पोट निवडणुक घेण्यात आली. या मतदारसंघात सद्यस्थितीत बदलेल्या राजकीय समीकरणामुळे हा पालघर गड कोण काबीज करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने या मतदारसंघात मतदानोत्तर चाचणी घेण्यात आली यामध्ये घेतलेल्या चाचणीत संभाव्य निकाल काय असेल याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. डहाणु लोकसभेतून नव्याने निर्माण झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात शहरी व ग्रामीण अशी मत विभागणी झाली आहे. खरी लढत भाजपा व बहुजन विकास आघाडी या पक्षांमध्ये झाल्याचे दिसून आले. भाजपा व बहुजन विकास आघाडीच्या तुलनेत प्रचारात आघाडीवर असलेली शिवसेना मात्र मतदानात पिछाडीवर गेल्याचे मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट होत आहे. शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, भाजपाकडून राजेंद्र गावित, काँग्रेसकडुन दामु शिंगडा, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव, तर माकपाकडून किरण गहला या सर्वच उमेदवारांनी मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला मात्र मतांची विभागणी व स्थानिक राजकारण यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या वसई, नालासोपारा व बोईसर या तिन विधानसभा मतदारसंघात भाजपा व बहुजन विकास आघाडीला मतदारांनी पसंती दिली असल्याचे दिसून आले. या संपुर्ण मतदारसंघात कॉगे्रसची हवी तशी बांधणी नसल्याने काँग्रेससाठी ही निवडणुक आत्मपरीक्षण करणारी ठरेल. भाजपाने संपूर्ण ताकद एकवटली असल्याचे दिसून आले, दिवंगत खासदार चिंतामण वनगाच्या पुत्राने सेना प्रवेश केल्याने सहानुभूतीचा लाभ घेण्यात सेनेला अपयश आल्याचे मतदारांच्या भूमिकेवरून दिसून आले. बुलेट ट्रेन, वाढवन बंदर, सुपर हायवे या मुद्यांना सामोरे जाणारया भाजपाकडे सध्या कोणतीही लाट नसली तरी जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये संघ परिवार व अंगीभूत संघटनांची बांधणी पक्की असल्याचा भाजपला निश्चितच लाभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच शिवसेनेचे ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेच्या तुलनेत सर्वाधिक अंतर्गत प्रचार व मतदारांशी संवाद करण्यात भाजपने आघाडी मिळविली असल्याचे मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट होत आहे. काँग्रेसपेक्षा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मतदारांचा प्रतिसाद या मतदारसंघात जास्त असल्याचे जाणवले. लोकसभा पोट निवडणुकीतील विजयी उमेदवाराला जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळणार असल्याने कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास आपल्या समस्या सुटू शकतील याबाबतीत मतदारांमध्ये प्रारंभी संभ्रम होता. मात्र भाजपने मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, तारापूर औद्ययोगिक मंडळातील सीईटीपी, घनकचरा प्रश्न, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, रेल्वे प्रश्न, विना अनुदानित शाळांचा प्रश्न, किनारपट्टीवरील तुटलेले धूप प्रतिबंधक बंधारे, डिझेलचा परतावा, वसई-उत्तन व पालघर-डहाणू दरम्यान मच्छिमारांचा हद्दीचा वाद, दलालांकडून मच्छिमारांची होणारी लूट, अद्यायावत रुग्णालयाची कमतरता आदी प्रश्न महत्वाचे असल्याने अनुभवी आणि सत्ता पक्षात असणारा व्यक्ती या प्रश्नांना न्याय देईल की नवखा व्यक्ती या प्रश्नावर मतदारांमध्ये चर्चेतून सकारात्मकता भाजपने निर्माण केली याचा लाभ मतदानात झाल्याचे चाचणीत दिसून आले. बविआचे उमेदवार बळीराम जाधव याना देखील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना कामकाजाचा काहीच अनुभव नसल्याची नकारात्मक चर्चा आणि राजकारणातील उथळपणा, ऐनवेळी पक्षांतर यामुळे वडिलांची सहानभूती गमावल्याचे मतदारांच्या प्रतिसादावरून दिसून आले. गावितांची काम करण्याची क्षमता तसेच त्यांनी जिल्ह्यात केलेली विकासकामे व  समाजाशी त्यांची जोडलेली नाळ ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांच्या पक्षांतारचा मुद्दा मतदारांमध्ये चर्चिला गेला नाही, शिवसेनेने देखील या मुद्द्यावर भर दिला नाही. याचा मतदानावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे या पोट निवडणुकीत भाजप व बहुजन विकास आघाडीत खरी लढत असून शिवसेना तुलनेने तिसऱ्या क्रमांकावर असेल असा अंदाज मतदारांनी दिलेल्या पसंती वरून दिसून येतो.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.