Wednesday 23 May 2018

महाराष्ट्राचे ५ आमदार अतिरेक्यांच्या हल्यातून बचावले

महाराष्ट्राचे ५ आमदार अतिरेक्यांच्या हल्यातून बचावले


 जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिचबिहारी तालुक्याच्या ठिकाणी शहरी भागात प्रवास करत असताना महाराष्ट्रातील तुकाराम काते, विक्रम काळे, सुधीर पारवे, दीपक चव्हाण आणि किशोरअप्पा पाटील हे पाच आमदार अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यातून थोडक्यात बचावले. महाराष्ट्रातील २० आमदार पंचायत राज समितीच्या कामासाठी अनंतनाग येथे गेले असताना हा अतिरेक्यांनी हल्ला झाला.  हा हल्ला या पाच आमदारांच्या गाडीवर आज दुपारी १२.३० च्या सुमारास झाला.यावेळी हल्ल्यातून वाचलेल्या आमदारांना टायर फुटल्याचा आवाज आला. मात्र हा ग्रेनेड हल्ला अतिरेक्यांकडून करण्यात आला असल्याचे आमदारांच्या लक्षात आले. या पाचही आमदारांची सुखरूप सुटका झाल्यानंतर त्यांनी श्रीनगरमधील विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन संबंधित माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सुरक्षा देण्यात आली आहे. काश्मीर येथे पंचायत राज समितीच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील पाच आमदारांवर अतिरेक्यांनी जोरदार हल्ला केला. मात्र सुदैवाने हे पाचही आमदार अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यातून बचावले आहेत. शिक्षक आमदार विक्रम काळे, तुकाराम काते, किशोर पाटील, सुधीर चव्हाण आणि सुधीर पारवे अशी या आमदारांची नावे आहेत. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आज दुपारी साडे बारा- एकच्या दरम्यान ही घटना घडली. शिक्षक आमदार विक्रम काळे, तुकाराम काते, किशोर पाटील, सुधीर चव्हाण आणि सुधीर पारवे हे पाचही आमदार अनंतनागच्या बिजबिहारी येथून जात होते. त्यांच्यासोबत एकूण २० जण होते. त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात आले होते. 'दुपारी आमचा ताफा श्रीनगरकडे जात असताना अचानक टायर फुटल्याचा आवाज आला. त्यामुळे लोक सैरावैरा पळू लागले. आम्हीही घाबरून गेलो. आमच्या चालकाने सुसाट गाडी चालवली. बरेच अंतर कापल्यानंतर आम्ही गाडी थांबवली. तेव्हा आमच्या गाडीचे दोन्ही टायर फुटलेले होते. शिवाय बंदुकीच्या गोळ्या लागल्यानंतर निर्माण व्हावीत तशी छिद्रे आमच्या गाडीला झाली होती. आमच्या सोबत असणारे अधिकारी गाडीत लपल्याने त्यांना गोळ्या लागल्या नाहीत,' असं आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं. हा ग्रेनेड हल्ला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, श्रीनगरमध्ये आल्यानंतर आम्ही हा सर्व प्रकार तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितला. त्यामुळे त्यांनी तात्काळ आमच्या संरक्षणात वाढ केली. आम्ही सर्व सुखरूप असून कोणालाही कसलीही इजा झाली नाही.
आमदार - पक्ष - मतदारसंघ
किशोर आप्पा पाटील- शिवसेना- पाचोरा (जळगाव)
दीपक चव्हाण- राष्ट्रवादी- फलटण (सातारा)
तुकाराम काते - शिवसेना- मानखुर्द (मुंबई)
विक्रम काळे- राष्ट्रवादी- औरंगाबाद शिक्षक मतदार संघ
सुधीर पारवे- भाजप - उमरेड (नागपूर)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.