Wednesday, 26 June 2019

लोकसभा निवडणूकीत सर्वच उमेदवारांनी खर्च लपविल्याचे उघड; आयोगाचा दणका ;खर्च मान्य करण्याची वेळ

लोकसभा निवडणूक खर्चात शिवाजीराव आढळरावच आघाडीवर ; कांचन कुल यांच्यावर 32 लाखांचे कर्ज


लोकसभा निवडणूक खर्चात शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळरावच आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले असून प्रमुख उमेदवारांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यावर 32 लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचे निवडणूक खर्च नोंदवहीत नमूद करण्यात आले आहे. तर पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी निवडणूक खर्च लपविल्याचे उघड झाले आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या खर्च नोंदवहीतील खर्च तपशील आणि निवडणूक आयोगाच्या अभिरूप खर्च नोंदवहीनुसार हिशोबातील तफावतीमुळे खर्च निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्वच उमेदवारांना नोटीसा पाठवून खुलासा व स्पष्टीकरण करण्यास २४ तासांची मुदत देण्यात आलेली होती. खर्चाची मर्यादा ओलांडणारा खर्च झाल्याच्या नोटीसा पाठवल्याने उमेदवार धास्तावले होते. सदर मुदतीत ढोबळपणे केलेले खुलासे निवडणूक आयोगाच्या खर्च निवडणूक निरीक्षकांकडून फेटाळण्यात आले. आयोगाने दणका दिल्याने खुली सुनावणी घेऊन काही प्रमाणात अभिरूप खर्च नोंदवहीतील खर्च उमेदवारांना मान्य करणे भाग पडले. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत सर्वच उमेदवारांनी निवडणूक खर्च लपविल्याचे उघड झाले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ मधील उमेदवारांनी अंतिम खर्च प्रतिज्ञापत्र नुकतेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. यामध्ये शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांच्या पेक्षा सर्वाधिक 65 लाख 71 हजार 665 इतका झालेला आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार यांचा सर्वाधिक कमी 47 लाख 85 हजार 355 खर्च झाल्याचे दाखल केलेल्या अंतिम अहवालात दिसून येत आहे. त्यांना ३ हितचिंतकांनी 1 लाख 12 हजार रुपयांची देणगी मिळाल्याची नोंद करण्यात आलेली आहे तर पक्षाने निवडणूक खर्च बँक खात्यात 60 लाख रुपये जमा केल्याचे दर्शवण्यात आलेले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी राहुल कुल यांच्या मामाच्या कुठुंबातील सदस्यांकडून 32 लाखांचे कर्जरुपी रक्कम खर्चासाठी घेतल्याचे निवडणूक खर्च नोंदवहीत नमूद करण्यात आले आहे. त्यांना 36 लाख 29 हजार 791 रुपये खर्च लपविला असल्याची नोटीस पाठवण्यात आलेली होती त्यामधील 22 लाख 30 हजार 126 रुपयांचा खर्च नोंदवहीत दाखल करण्याचा आदेश काढण्यात आला. उर्वरित खर्च अमान्य करण्यात आलेला आहे. कांचन कुल यांचा एकूण निवडणूक खर्च 58 लाख 59 हजार 917 इतका दर्शवलेला आहे. सर्वच प्रमुख उमेदवारांचे खर्च मर्यादा 70 लाखांच्या आत मध्ये झालेले दर्शविण्यात आलेले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या खर्च व उमेदवार प्रतिनिधीने निवडणूक आयोगाचा अभिरूप खर्च नोंदवहीतील खर्च अमान्य करून सुनावणी घेण्यास भाग पाडले सुनावणीत खर्च रक्कम वाढत असल्याने भयभीत झालेल्या प्रतिनिधींनी लपविलेला खर्च मान्य करणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार भाषण करीत असलेली सभेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग  प्रतिनिधींनी नाकारून आमची सभा नसल्याचा अजब दावा केल्याने संतप्त निवडणूक अधिकारी व निरीक्षकांनी चांगलेच त्यांना धारेवर धरून सुनावले. अखेर सामंजस्य दर्शवून खर्च आवाक्यात आणून 60 लाख 91 हजार 555 इतका अंतिम खर्च दाखविण्यात आलेला आहे. अकुशल व्यक्तींकडे जबाबदारीचे काम सोपविले होते त्यांच्यामुळे खर्चाची मर्यादा ओलांडून पार्थ पवार कारवाईस पात्र ठरून त्यांची पुढील राजकीय कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता निर्माण करणारी परिस्थिती तयार झालेली होती. या प्रकारामुळे वरिष्ठांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे वृत्त आहे. पार्थ पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाने 5 लाख 47 हजार 750 इतका खर्च केला असून पक्षाने निवडणूक खर्च बँक खात्यात 60 लाख रुपये जमा केल्याचे दर्शवण्यात आलेले आहे. निवडणूक आयोगाने नव्याने विहित केलेल्या पद्धतीने उमेदवारांना खर्च लपविणे अवघड झालेले आहे अशा कामांचा अनुभव असलेल्यांना जबाबदारी सोपविणे आवश्यक आहे मात्र मागील निवडणुकांचा खर्च देखभाल केलेल्या व्यक्तींना जबाबदारी दिल्याने नव्या विहित पद्धतीमुळे त्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. प्रतिनिधींमध्ये बारामती नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्षांचा समावेश होता. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गिरीश बापट यांचा 53 लाख 35 हजार 857 खर्च झाल्याचे दाखल नोंदवहीत म्हंटले तर स्वतः 5 लाख 41 हजार रुपये आणि पक्षाने निवडणूक खर्च बँक खात्यात 35 लाख रुपये जमा केल्याचे दर्शवण्यात आलेले आहे. कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी 60 लाख 3 हजार 824 खर्च झाल्याचे दाखल नोंदवहीत म्हंटले तर पक्षाने निवडणूक खर्च बँक खात्यात 50 लाख रुपये जमा केल्याचे दर्शवण्यात आलेले आहे. त्यांना दोन व्यक्तींनी 11 लाखांची देणगी दिल्याचे नमूद केली आहे यामध्ये त्यांचे चिरंजीवाने 10 लाख तर 1 लाख फिरोदियांनी दिलेली असल्याचे नमूद केलेले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी 63 लाख 28 हजार 218 खर्च झाल्याचे दाखल नोंदवहीत म्हंटले तर स्वतः 1 हजार 1 रुपये आणि पक्षाने निवडणूक खर्च बँक खात्यात 60 लाख रुपये जमा केल्याचे दर्शवण्यात आलेले आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी 62 लाख 50 हजार 897 खर्च झाल्याचे दाखल नोंदवहीत म्हंटले तर स्वतः 20 लाख 10 हजार रुपये आणि पक्षाने निवडणूक खर्च बँक खात्यात 40 लाख रुपये जमा केल्याचे दर्शवण्यात आलेले आहे. नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांना 12 एप्रिलला 14 लाख 91 हजार 713 रुपयांची तफावत असल्याची नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आलेला होता तर दुसरी नोटीस दिनांक 14 एप्रिलला 7 लाख 29 हजार 302 तर तिसरी नोटीस दिनांक 21 एप्रिलला 8 लाख 89 हजार 386 रुपयांची तफावत असल्याची नोटीस धाडण्यात आलेली होती. 
राजकीय पक्षांद्वारे निवडणूक प्रयोजनार्थ निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापर्यंत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक लेखा (हिशेब) विहीत नमुन्यात व विहीत पध्दतीने ठेवणे आणि तो निवडणूक आयोगास सादर करणे अनिवार्य आहे. राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्याव्दारे निवडणूक प्रयोजनार्थ करण्यात येणाऱ्या सर्व खर्चाचे निवडणूक खर्च संनियंत्रण यंत्रणेमार्फत सनियंत्रण आणि परिनिरीक्षण केले जाते. अधिसूचित करण्यात आलेले प्रमाणति दर आधारभूत मानून सर्व लेखांकन चमूंनी उमेदवारांच्या संदर्भातील अभिरूप निरीक्षण नोंदवहीमध्ये खर्चाच्या नोंदी घेण्यात येतात. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील कलम ७७ (१) अन्वये विहीत करण्यात आलेल्या तरतुदीनुसार लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या प्रत्येक उमेदवारास ज्या तारखेस तो नामनिर्देशित झाला होता ती तारीख आणि निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याची तारीख या दोन्ही तारखांसह यादरम्यान त्याने केलेल्या किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक लेखा (हिशेब) विहीत नमुन्यात व विहीत पध्दतीने ठेवणे आणि तो वेळोवेळी तपासणीसाठी प्राधिकृत यंत्रणेस उपलब्ध करून देणे अनिवार्य असते. राज्यांतील उमेदवारांसाठी लोकसभा निवडणुकीत ७० लाख रुपये आहे. निवडणुका मुक्त/खुल्या वातावरणात व्हाव्यात यासाठी १९५१ साली लोकप्रतिनिधित्व कायदा करण्यात आला. केवळ आर्थिक बळाच्या जोरावर मतदारांचा कौल मिळविणे योग्य नाही, अशा विचाराने त्या कायद्याद्वारे उमेदवारांवर निवडणूक खर्चाची मर्यादा घालण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चाच्या कमाल रकमेमध्ये सातत्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात करण्यात येणारी वाढ ही सदर कायद्याच्या खर्चाच्या मर्यादेसंबंधीच्या तदतुदींच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बहुतांश उमेदवार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब देताना खर्चाच्या कमाल मर्यादेच्या जवळपास निम्माच खर्च केल्याचे दाखवीत असतात. लोकप्रतिनिधित्व कायदा- १९५१च्या कलम ७७ (१) नुसार उमेदवाराने अथवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधीने निवडणुकीच्या संदर्भात करण्यात येणाऱ्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व खरा हिशेब ठेवणे आवश्यक आहे. तसेच सदर कायद्याच्या ७७ (३) अन्वये उमेदवारांवर निवडणूक खर्चाची मर्यादा घालण्यात आलेली आहे. सदर कायद्याच्या कलम १२३ (६) नुसार कलम ७७ (३) मध्ये नमूद केलेल्या निवडणूक खर्चाच्या कमाल मर्यादेचे उल्लंघन झाल्यास ती कृती सदर उमेदवाराचे भ्रष्ट आचरण ठरेल व अशा उमेदवाराची निवड अवैध ठरवून त्यास पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास प्रतिबंध केला जाईल, असे कायद्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे. पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेतर्फे निवडणूक खर्च योग्य देखभाल करण्याबाबत सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना प्रबोधनात्मक प्रशिक्षण व सल्ला देण्यात येतो. लोकसभा निवडणुकीत या सेवेचा राज्यातील बहुतांश उमेदवारांनी लाभ घेतलेला आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================

Monday, 24 June 2019

विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी निलम गोऱ्हे बिनविरोध

विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी निलमताई गोऱ्हे बिनविरोध

शिवसेनेच्या आमदार  नीलमताई गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेतल्याने गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.२००२ पासून विधान परिषदेच्या त्या सदस्या आहेत. याशिवाय विविध विषय समित्यांवर देखील त्यांनी काम केल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे १७, काँग्रेसचे १६, भाजपचे २३ , शिवसेनेचे १२, लोकभारती ,शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षचा प्रत्येकी १ आमदार आहे तर, ६ अपक्ष आमदार आहेत.  माणिकराव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर २० जुलै २०१८ पासून उपसभापतिपद रिक्त होते. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेना नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज (सोमवाऱ) संध्याकाळी चार वाजता ही अधिकृत घोषणा झाली. आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. विधानपरिषद उपसभापतिसाठी निलमताई गोऱ्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधकांना विश्वासात घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. विधिमंडळाच्या नियम सहा आणि सातनुसार उपसभापतीपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम एक दिवस आधी जाहीर करणं अपेक्षित होते. मात्र ही तरदूत स्थगित करण्यासंबंधी विधानकार्य मंत्री विनोद तावडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभागृहानं मंजूर केला. त्यानंतर सभापतींनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.काँग्रेस गटनेते शरद रणपिसे आणि काँग्रेस सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी आदल्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता आज निवडणूक घ्यायला हरकत घेतली, मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी २४ जुलै १९९८ आणि १३ सप्टेंबर २००४ असे दोनदा एका दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचा दाखला दिला आणि काँग्रेसची हरकत फेटाळून लावत स्वतःचे अधिकार वापरून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे घोषित केले होते.
==============================

विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड



विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी कोण बसणार याचे अंदाज वर्तवले जात होते. ज्यानंतर विजय वडेट्टीवार यांचे नाव समोर आले. त्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. तसेच विजय वडेट्टीवार यांनी कशा प्रकारे कामे केली, उपक्रमशीलता हा त्यांच्या स्वभावाचा विशेष आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारचा कारभार नीट चालावा यासाठी सक्षम विरोधी पक्षनेत्याचीही गरज असते. धोरणात्मक विरोध करून विजय वडेट्टीवार त्यांची भूमिका योग्य पद्धतीने निभावतील अशी खात्री वाटत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला, काँग्रेसने ४८ पैकी केवळ १ जागा जिंकली असून ती जागा चंद्रपूरची आहे. चंद्रपूरचे असलेले वड्डेटीवार यांनी या जागेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. स्वभावाने आक्रमक असलेले विजय वड्डेटीवार हे विधानसभेतही विविध मुद्यांवर आक्रमक असतात. त्यामुळे काँग्रेसने विखे यांच्यानंतर वड्डेटीवर यांची विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती करावी असं पत्र हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांना दिलं होते. अधिवेशन सुरू होऊन एक आठवडा उलटल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर निवड जाहीर करण्यात आली आहे. आता  अधिवेशनाच्या कामकाजाचे केवळ ७ दिवस शिल्लक असून हे या सरकारमधील शेवटचे अधिवेशन आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================



पुणे महापालिका पोटनिवडणुकीत भाजपच्या ऐश्वर्या जाधव व अश्विनी पोकळे विजयी

राज्यातील महापालिका/नगरपरिषद/ नगरपंचायत आणि जिल्हा परिषद/ पंचायत समितीचे निकाल

महानगरपालिका निकाल

नगरपरिषद/ नगरपंचायत निकाल

जिल्हा परिषद/ पंचायत समिती निकाल

=========================================

तिकीट वाटपाचा घोळ शिवसेनेच्या अंगलट; राष्ट्रवादीचे गणेश ढोरे पुणे पालिका प्रभाग 42 मधून विजयी



पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ अ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या रेणुका चलवादी यांचा पराभव केला आहे. तर समाविष्ट गावांचा नवीन निर्माण केलेल्या पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 42 मधून अ जागेतून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर ब या महिलांसाठी राखीव असलेल्या जागेतून भाजपाच्या अश्विनी पोकळे विजयी झाल्या आहेत. या प्रभागातून महायुतीतर्फे प्रथम शिवसेनेने जाहीर केलेली उमेदवारी ऐनवेळी माघारी घेऊन संभ्रम निर्माण केला. उमेदवारी देण्याच्या घोळामध्ये अधिकृत पक्षाचे चिन्हाला शिवसेनेच्या उमेदवाराला मुकावे लागले यामुळे शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले. पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत ३ जागांवर २ भाजप व 1 जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. प्रभाग 42 ( अ) गणेश ढोरे (राष्ट्रवादी) 4 हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या दोन जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपकडून अश्विनी पोकळे, शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे, राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर काँग्रेसकडून भाग्यश्री कामठे हे उमेदवार रिंगणात होते. या दोन जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. यामध्ये एकुण १ लाख ९६ हजार मतदार होते. त्यापैकी ५१ हजार ४२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानुसार २२ टक्के मतदान झाले. यानंतर आज झालेल्या मत मोजणीत प्रभाग ४२ (अ) मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश ढोरे यांना २६ हजार ३०४ तर शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे यांना २० हजार २२४ एवढी मतं मिळाली. यानुसार सहा हजारांपेक्षा अधिक मतांनी राष्ट्रवादीचे गणेश ढोरे विजयी झाले. तर (ब) मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाग्यश्री कामठे यांना २३ हजार ९१९ तर भाजपाच्या अश्विनी पोकळे यांना २४ हजार ८५१ या मतं मिळाली. या आकडेवारीवरून भाजपच्या अश्विनी पोकळे ९३२ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

पुणे महापालिकेच्या प्रभाग १ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ अच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या रेणुका चलवादी यांचा पराभव केला आहे. पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भाजपच्या ऐश्वर्या आशुतोष जाधव ह्या ३०९५ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना ७१८० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या रेणुका चलवादी यांना ४०८५ मत मिळाली आहेत. पुणे महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये निवडणुकी प्रभाग क्रमांक १ मधून भाजपाच्या किरण जठार विजयी झाल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाकडे त्यांनी जे जात प्रमाणपत्र दाखल केले होते ते अवैध असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रमाणपत्राची तपासणी केली असता ते अवैध असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर प्रभाग क्रमांक १ अची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत आघाडीकडून रेणुका चलवादी, भाजपाकडून ऐश्वर्या जाधव, वंचित आघाडीच्या रोहिणी टेकाळे या उमेदवार होत्या. २२. ५ टक्के इतके मतदान झाले. आज सकाळी मतमोजणी झाली. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये रेणुका चलवादी आणि ऐश्वर्या जाधव यांच्यात स्पर्धा पाहण्यास मिळाली. मात्र महत्त्वाची बाब ही की पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत ऐश्वर्या जाधवच आघाडीवर होता. ऐश्वर्या जाधव या ३ हजारहून जास्त मतांनी विजयी झाल्या.
या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार व त्‍यांना मिळालेली मते : 
१) ऐश्वर्या जाधव (भाजप) -  ७१८०
२) रेणुका चलवादी (राष्ट्रवादी)- ४०८५ 
३) रोहिणी टेकाळे (वंचित) - २३४४ 
===============================

पुणे जिल्हा परिषद बावडा-लाखेवाडी गटातील पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांचा विजय

बावडा-लाखेवाडी गटातील पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांचा विजय

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने विजय झाला आहे. अंकिता पाटील 17 हजार 274 मतांनी विजयी झाल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेवर 23 जून रोजी मतदान झाले होते. अंकिता पाटील यांनी नुकताच सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. अंकिता पाटील यांच्या रुपाने पाटील घराण्यातील तिसरी पिढीच्या राजकारणात आली आहे. अंकिता पाटील यांचं शिक्षण परदेशात झालेले आहे. त्या सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तसंच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांचा सोशल मीडिया आणि शिक्षण संस्थांची जबाबदारी अंकिता पाटील यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव पाटील दोन वेळा बारामतीचे खासदार होते. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस वाढवण्यात त्यांनी मोठं योगदान दिले. यानंतर हर्षवर्धन पाटील 1992 नंतर राजकारणात सक्रिय झाले. राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढलेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला.
==============================================

वाडेबोल्हाई पंचायत समिती पोटनिवडणूक; युतीचे उमेदवार शाम गावडेंचा विजय


पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई पंचायत समितीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप -शिवसेना पुरस्कृत उमेदवार शाम परिलाल गावडे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बळीराम प्रभू गावडे यांचा १२०६ मतांनी दारुण पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या होमपिचवर झालेला पराभव हा त्यांना धक्का मानला जात आहे. वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि.२४) सकाळी १० वाजल्यानंतर शिवाजीनगर, पुणे शासकीय धान्य गोदामात पार पडली. वाडेबोल्हाई पंचायत समिती गणासाठी रविवार ( दि.२३) रोजी झालेल्या चुरशीच्या मतदानात २० हजार ६१५ मतदारांपैकी १४ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीनंतर भाजप-शिवसेना पुरस्कृत उमेदवार शाम परिलाल गावडे यांना ६ हजार ९४९ मते मिळली तर प्रतीस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार बळीराम प्रभू गावडे यांना ५७२९ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय समाज पक्षाचे भरत गडदे यांना १५६४ मतांवर समाधान मानावे लागले आहे. मागील अडीच वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेंद्र पठारे यांनी शाम गावडे यांचा २०८० मतांनी पराभव केला होता. राजेंद्र पठारे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत शाम गावडे यांनी १२०६ मतांनी विजय मिळवत राष्ट्रवादीला धुळ चारली आहे. राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद यांचे वर्चस्व असलेल्या वाडेबोल्हाई गणात भाजप-शिवसेनेने आव्हान दिले होते.
==================================================

मंत्री राम शिंदेना पोटनिवडणुकीत धक्का

कर्जत तालुक्यातील पंचायत समिती पोटनिवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना धक्का बसला. भाजप उमेदवाराचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मनिषा दिलीप जाधव विजयी झाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मनीषा दिलीप जाधव या विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार शशिकला हनुमान शेळके यांचा पराभव केला. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. कोरेगाव पंचायत समिती गण आवर भाजपचे वर्चस्व होते. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपचे वर्चस्व मोडून काढत ही जागा खेचून आणली. हे पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. 
===================================================

मूल नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. मूल नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी भाजप उमेदवार शिल्पा रामटेके यांचा 176 मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये भाजप नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती. मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदासंघात लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला मोठा धक्का बसला होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा सुफडासाफ झाला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मात्र, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचा पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे सतराव्या लोकसभेत महाराष्ट्रातून धानोरकर हे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव खासदार असतील. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये भाजपचे केवळ दोन आमदार असताना हंसराज अहीर विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाले होते. 2019 च्या निवडणुकीत देशात सर्वत्र मोदी लाट तथा या लोकसभा क्षेत्रात भाजपचे पाच आमदार असताना ४५ हजार मतांनी झालेला पराभव अनपेक्षित, चिंतनीय व धक्कादायक असल्याचे अहिर यांनी म्हटले होते. या पराभवाचे राष्ट्रीय पातळीवर निश्चितच चिंतन होईल. या पराभवाने खचून न जाता पक्ष कार्य अधिक जोमाने करणार असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभा निकालानंतर पहिल्याच पत्रपरिषदेत दिली. दरम्यान, हंसराज अहीर हे भाजपमध्ये 1980 पासून सक्रिय आहेत. भाजयुमो अध्यक्ष ते स्वीकृत नगरसेवक, विधान परिषद आमदार, खासदार त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री आदी अनेक महत्त्वाची पदे भूषवले आहेत.
===========================================

कोल्हापुरात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पोटनिवडणुकीत विजय

कोल्हापूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. सत्ताधारी पक्षांनी आपले संख्याबळ कायम राखले असून सत्ताधाऱ्यांना शह देण्याचा विरोधकांचा प्रयत्न अपयशी ठरला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत पक्षादेश भंग केल्याने  पक्षांतरबंदी कायद्यानुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे हे दोन नगरसेवक अपात्र ठरले होते. या रिक्त जागासाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सिध्दार्थनगर प्रभागातील नगरसेवक अफजल पिरजादे यांना अपात्र ठरवल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या प्रभागातून पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे जय पटकारे,शिवसेनेने पाठिंबा दिलेले सुशील भांदिगरे आणि ताराराणी आघाडीचे नेपोलियन सोनूले अशी तिरंगी लढत होती. पटकारे यांना १५८०, भांदीगरे ८४० तर सोनूले १२०९ अशी मते पडली. पद्माराजे प्रभागात अजिंक्य चव्हाण हे अपात्र ठरल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. या प्रभागात राष्ट्रवादीचे अजित राऊत, शिवसेनेचे पियुष चव्हाण यांच्यासह अन्य ४ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने बहुरंगी होती. राऊत यांनी सर्वाधिक १७०६ मते घेऊन निवडणूक एकतर्फी जिंकली. पियुष चव्हाण यांना ६४३,महेश चौगुले यांना ३४४तर राजेंद्र चव्हाण यांना ३३४ मते मिळाली.सिद्धार्थनगर या भागात निवडणूक जिंकल्याने काँग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ एकने संख्या वाढले आहे. दलित समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदार संघातून काँग्रेस उमेदवारास निवडून आणून आमदार सतेज पाटील यांनी यशाची घौडदौड कायम ठेवली आहे. तर, राऊत यांना विजयी करून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे.
======================================

बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय

स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विजय मिळवण्याची भाजपाची घोडदौड सुरूच आहे. परभणीतील मानवत आणि नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदच्या निवडणुकीत भाजपचं कमळ फुलले आहे. नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला येथे भोपळा म्हणजे एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. नगराध्यक्षपदी भाजपचे बबलू गौतम विजयी झाले आहेत.  भाजपाने 19 पैकी 17 नगरसेवक जिंकले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 जागांवर विजय झाला आहे. विशेष म्हणजे बुटीबोरी नगर परिषद स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक घेण्यात आली. तसेच परभणीतील मानवतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे सखाहरी पाटील विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या पूजा खरात यांचा त्यांनी 9 हजार 439 मतांनी पराभव केला आहे. पाटील यांना 12 हजार 210 तर खरात यांना मिळाली 2 हजार 771 मते मिळाली आहेत. दरम्यान उल्हासनगर महापालिकेतील पोटनिवडणुकीत रिपाई आठवले गटाचे मंगल वाघे विजयी झाले आहे. वाघे यांनी भाजप, सेना आणि साई या युतीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. येथे भाजप नगसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध झाल्याने नगरसेवक पद रद्द झाले होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 च्या पोट निवडणुकीत रिपाई आठवले गटाने बाजी मारली आहे.


शिर्डी - संगमनेर नगरपालिका पोटनिवडणूक, पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी, राजेंद्र वाकचौरे 711 मतांनी विजयी

परभणी- मानवत नगरपरिषदेची नगराध्यक्ष पद निवडणूक, भाजप-शिवसेना आघाडीचे प्रा एस एन पाटील यांचा विजय , काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पुजा खरात यांचा दारुण पराभव , तब्बल 9 हजार मतांनी भाजप चे एस एन पाटील विजयी

मानवत : येथील नगराध्यक्षपदाचा पोटनिवडणुक भाजपने एकतर्फी विजय मिळत मिळवत कॉंग्रेसच्या तब्बल ९ हजार ४३९ मतानी दारुण पराभव केला.

हिंगोली- हिंगोली पालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सविता जयस्वाल विजयी


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================

पुणे जिल्हा परिषद बावडा-लाखेवाडी गटातील पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांचा विजय

बावडा-लाखेवाडी गटातील पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांचा विजय

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने विजय झाला आहे. अंकिता पाटील 17 हजार 274 मतांनी विजयी झाल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेवर 23 जून रोजी मतदान झाले होते. इंदापूर येथे मतमोजणी पार पडली. त्यामध्ये अंकिता पाटील यांना २० हजार ७३७ मते मिळाली तर विरोध अपक्ष उमेदवार रूपाली कोकाटे यांना ३ हजार ४२३ मते मिळाली. या निवडणूक रिंगणात एकूण ७ अपक्ष उमेदवार उभे होते. अंकिता पाटील यांनी नुकताच सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. अंकिता पाटील यांच्या रुपाने पाटील घराण्यातील तिसरी पिढीच्या राजकारणात आली आहे. अंकिता पाटील यांचं शिक्षण परदेशात झालेले आहे. त्या सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तसंच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांचा सोशल मीडिया आणि शिक्षण संस्थांची जबाबदारी अंकिता पाटील यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव पाटील दोन वेळा बारामतीचे खासदार होते. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस वाढवण्यात त्यांनी मोठं योगदान दिले. यानंतर हर्षवर्धन पाटील 1992 नंतर राजकारणात सक्रिय झाले. राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढलेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला.

मूल नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभव

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. मूल नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी भाजप उमेदवार शिल्पा रामटेके यांचा 176 मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये भाजप नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती. मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदासंघात लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला मोठा धक्का बसला होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा सुफडासाफ झाला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मात्र, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचा पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे सतराव्या लोकसभेत महाराष्ट्रातून धानोरकर हे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव खासदार असतील. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये भाजपचे केवळ दोन आमदार असताना हंसराज अहीर विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाले होते. 2019 च्या निवडणुकीत देशात सर्वत्र मोदी लाट तथा या लोकसभा क्षेत्रात भाजपचे पाच आमदार असताना ४५ हजार मतांनी झालेला पराभव अनपेक्षित, चिंतनीय व धक्कादायक असल्याचे अहिर यांनी म्हटले होते. या पराभवाचे राष्ट्रीय पातळीवर निश्चितच चिंतन होईल. या पराभवाने खचून न जाता पक्ष कार्य अधिक जोमाने करणार असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभा निकालानंतर पहिल्याच पत्रपरिषदेत दिली. दरम्यान, हंसराज अहीर हे भाजपमध्ये 1980 पासून सक्रिय आहेत. भाजयुमो अध्यक्ष ते स्वीकृत नगरसेवक, विधान परिषद आमदार, खासदार त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री आदी अनेक महत्त्वाची पदे भूषवले आहेत.

शिर्डी - संगमनेर नगरपालिका पोटनिवडणूक, पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी, राजेंद्र वाकचौरे 711 मतांनी विजयी

हिंगोली- हिंगोली पालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सविता जयस्वाल विजयी


परभणी- मानवत नगरपरिषदेची नगराध्यक्ष पद निवडणूक, भाजप-शिवसेना आघाडीचे प्रा एस एन पाटील यांचा विजय , काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पुजा खरात यांचा दारुण पराभव , तब्बल 9 हजार मतांनी भाजप चे एस एन पाटील विजयी

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोरेगाव गण पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या मनीषा दिलीप जाधव 539 मतांनी विजयी

मानवत : येथील नगराध्यक्षपदाचा पोटनिवडणुक भाजपने एकतर्फी विजय मिळत मिळवत कॉंग्रेसच्या तब्बल ९ हजार ४३९ मतानी दारुण पराभव केला.



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================




Monday, 17 June 2019

भाजपच्या इतर उमेदवारांना कसबापेठ मतदारसंघात यश मिळवणे जिकरीचे!

कसबा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून मोर्चेबांधणी; भाजपमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा 


कसबापेठ मतदारसंघातील जातीय समीकरण

समाज जात/धर्म तपशील
अं म. संख्या
मुस्लीम
27500
अनुसूचित जाती (एस. सी.)
29000
अनुसूचित जमाती (एस. टी.)
12500
इतर मागासवर्गीय
97500
मराठा व कुणबी
78000
ब्राह्मण
37000
इतर घटक (जैन,ख्रिश्चन इ.)
18500
एकूण मतदारसंख्या सरासरी
300000
215 – कसबा पेठ लोकसभा 2019 मते
भाजप
103583
काँग्रेस
51192
वंचित
2471
नोटा
1831
पोस्टल वोट विभागून
2079
एकूण मतदान
161156
एकूण मतदार अं
285890
नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांच्यानंतर भाजपच्या इतर उमेदवारांना कसबापेठ मतदारसंघात यश मिळवणे जिकरीचे ठरणार असल्याचे नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीतील मतदान विश्लेषण करताना दिसून येत आहे. भाजपच्या इतर इच्छुक उमेदवारांना त्यांच्या सारखे राजकारण अवगत करणे अवघड जाणार आहे. या परिस्थितीचा लाभ प्रतिस्पर्धी उमेदवार कशाप्रकारे घेऊ शकतील यावर या मतदारसंघातील यशाचे गणित अवलंबून राहणार आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील पेठांचा समावेश असलेला कसबापेठ मतदारसंघ आहे. सर्व जातीधर्माचे मतदार असून कोणत्याही एका समाजाचे प्राबल्य या मतदारसंघात नाही. ब्राह्मण समाजाचा प्रभाव या मतदारसंघात असला तरीदेखील मतदारसंख्येच्या इतर समाजाच्या तुलनेत प्राबल्य नाही. खासदार गिरीश बापट यांनी सलग यश मिळवून मतदारसंघावर पकड मजबूत केलेली होती. त्यांच्या कुटुंबाबाहेरील भाजपने उमेदवार दिल्यास यशावर निश्चित परिणाम होऊ शकतो असा काही समर्थकांचा कयास आहे. बापट यांनी सलग यश संपादन केलेले असलेतरी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत १३७१ मतदारांनी त्यांना लायक नसल्याने नोटा हा पर्याय निवडलेला होता. तर 2019 च्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघातून १८६० जणांनी त्यांच्यासह इतर उमेदवार लायक नसल्याचे नोटा पर्याय निवडून दर्शवून दिलेले आहे यामध्ये सर्वाधिक मतदार सदाशिवपेठ, नारायणपेठ व शनिवार, कसबापेठ येथील आहेत. कसबापेठ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला गेल्यावेळी कमी मतदान झाल्यामुळे आघाडीतील मित्र पक्षांना जागा सोडण्यात येणार असल्याने येथून काँग्रेस व मनसेला संधी मिळणार आहे. इच्छुकांची आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केलेली आहे. तीव्र इच्छुक रवींद्र धंगेकर यांनी राजकीय पक्षाचे चिन्ह टाळून केवळ नाव नमूद करून मतदारसंघातील गृहनिर्माण संस्थांसाठी रेन हार्वेस्टिंग प्रकल्प सवलतीत कार्यान्वित करून देण्याच्या जाहिरातींचे फलक झळकावलेले आहेत या माध्यमातून ते मतदारांना आकर्षित करू पाहत आहेत तर मनसेच्या अध्यक्षा रुपालीताई पाटील या देखील विविध कार्यक्रमांद्वारे मतदारसंघात मोर्चेबांधणी करीत आहेत. भाजपमधून इच्छुकांची संख्या मोठी आहे. कोणाला संधी मिळते यावरूनच येथील राजकीय गणित अवलंबून आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून मताधिक्याने निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांच्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागेवर अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केलेली आहे. खासदार गिरीश बापट यांनी सलग पाच वेळा कसबा विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. आता तब्बल 25 वर्षांनंतर कसबा विधानसभेला नवीन उमेदवार मिळणार आहे. इच्छुकांची आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोबर 2019 मध्ये अपेक्षित आहे. मात्र कसबा विधानसभा मतदारसंघात आतापासूनच चुरस पाहायला मिळत आहे. 

कसबा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकालांचा मागोवा-

2014 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १६९४०० मतदान झाले होते. राष्ट्रवादीतर्फे दिपक मानकर निवडणूक रिंगणात होते त्यांना  १५८६५ मते मिळाली आहेत. तर मनसेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना २५९९८ मते मिळाली ते आता काँग्रेस पक्षात परंतु अपक्ष नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. आणि शिवसेनेचे प्रशांत बधे यांना केवळ ९२०३ मते तर काँग्रेसचे उमेदवार रोहित टिळक यांना ३१३२२ मते मिळाली होती ते आता राजकारणाच्या प्रवाहाबाहेर आहेत. तर नुकत्याच लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केलेले तत्कालीन भाजप आमदार गिरीश बापट यांना ७३५९४ मते मिळवून यश प्राप्त केले होते. ते आता खासदार आहेत. त्यांच्या विरोधातील प्रमुख उमेदवारांना एकूण ८२३८८ मते मिळाली होती ती त्यांच्या पेक्षा ८७९४ जास्त होती. शिवसेनेची मते विरोधकांमधून वगळली तरी अल्प काठावरचे बहुमत मिळाल्याचे दिसून येते. त्यानंतर नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत अपेक्षितपणे मतदान भाजप उमेदवार गिरीश बापट यांना झालेले नाही.  लोकसभा 2019 मधील नुकत्याच झालेला निवडणुकीत प्रमुख 15 भागांमध्ये भाजपला मताधिक्य मिळाले आहे मात्र विरोधकांना देखील त्यातुलनेत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या सदाशिवपेठ मध्ये भाजपला प्रतिसाद मिळालेला आहे. या ठिकाणी ३९९९२५ मतदारसंख्या आहे तर दुसरा मोठा भाग भवानीपेठ भाग आहे या ठिकाणी २८९७५ एकूण मतदार आहेत तर महात्मा फुले पेठ- २५१२०, शुक्रवार पेठ-२४३२४, कसबा २२४१३, घोरपडे पेठ- २०८२६, बुधवार- २०३४५, रविवार-१७४०६, शनिवार-१६५८७, गुरुवार-१४९८०, गणेश पेठ-१३७४९, तसेच सेनादत्त, रास्तापेठ नारायणपेठ याभागामध्ये ८ हजार ते  १० हजार मतदारसंख्या विखुरलेली आहे. नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत भाजपला १०४५४३ मतदान झालेले आहे. तर विरोधात ५७५७३ मते मिळालेली आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कल वेगळा असतो मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागात कमी मतदान झालेले आहे त्या परिस्थितीचा गांभीर्याने दाखल भाजपने घेतली नाही तर विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. महात्मा फुले पेठ, गणेश पेठ आणि घोरपडे पेठ यासह दत्तवाडी, आंबिलओढा, दांडेकरपूल, नवीपेठ काही केंद्रावरील याभागात भाजप विरोधी मतदान झालेले आहे. तर पेठांमधील मतदारांचा कल लोकसभा निवडणुकीत राहिलेला आहे त्याप्रमाणेच कायम राहील असेही नाही. यामुळेच विरोधकांनी श्री. बापट यांच्या अनुउपस्थित निवडणूक जिंकण्याचा चंग बांधलेला दिसून येत आहे.

कसब्यातील १८६० मतदार म्हणतात उमेदवार लायक नाही

2014 च्या विधानसभा निवडणुकीत १३७१ मतदारांनी योग्य लायक उमेदवार नसल्याने नोटाला मतदान केले होते त्यामध्ये आता १८६० जणांची भर पडली आहे. यामध्ये २९ पोस्टल म्हणजेच शासकीय नोकरदार मतदारांनी सर्व उमेदवारांना नाकारले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ४८९ मतदारांच्या मनात कसबापेठ मतदारसंघात लायक उमेदवार नसल्याचे दिसून येत आहे. विद्यमान खासदार यांना देखील लोकसभा निवडणुकीत १८६० मतदारांनी नाकारले आहे.

कसबा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची नावे-  

काँग्रेस - रवींद्र धंगेकर, अरविंद शिंदे, कमलताई व्यवहारे, गोपाळ तिवारी, रोहित टिळक, इतर

मनसे - रुपालीताई पाटील, इतर

भाजप - मुक्ताताई टिळक, स्वरदाताई बापट, गणेश बिडकर, महेश लडकत, हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले, धीरज घाटे, धनंजय जाधव, इतर

पुणे लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कसबापेठ विधानसभा मतदारसंघात प्रमुख भागानुसार पक्षनिहाय मतदान

मतदान केंद्र प्रमुख भाग
भाजप
काँग्रेस
वंचित
इतर पक्ष
नोटा
मतदान
पुरुष
महीला
एकूण मतदार
सदाशिव पेठ
17805
5325
545
299
320
24294
12479
11790
39925
भवानी पेठ
9593
5386
122
200
111
15412
8301
6848
28975
महात्मा फुले पेठ
5175
6013
359
236
85
11868
6368
5501
25120
शुक्रवार पेठ
10626
3487
29
156
209
14507
7688
6919
24324
कसबापेठ
7537
4629
140
177
189
12672
6687
5986
22413
घोरपडे पेठ
5035
5079
142
137
60
10453
5056
5397
20826
बुध्रवार पेठ
8271
2694
31
143
163
11302
5822
5480
20345
रविवार पेठ
5444
3449
38
79
89
9099
5016
4177
17406
शनिवार पेठ
8516
1882
21
88
171
10678
5430
5248
16587
गुरुवार पेठ
5147
2840
85
105
85
8262
4716
3847
14980
गणेश पेठ
4129
3404
73
105
68
7779
4347
3564
13749
सेनादत्त पेठ
3795
1539
114
69
62
5579
2853
2726
9788
रास्ता पेठ
3327
1943
34
67
49
5420
2945
2475
9491
नारायण पेठ
4242
907
8
42
80
5279
2721
2558
8869
दत्तवाडी
2339
1316
373
86
44
4158
2218
1940
7710
अंबिलओढा
1406
759
162
52
18
2397
1273
1124
4824
नवी  पेठ
828
376
7
23
23
1257
658
599
2262
 दांडेकरपूल
368
164
188
15
5
740
370
370
1389
एकूण
103583
51192
2471
2079
1831
161156
84948
76549
288983
पोस्टल मतदान
960
337
59
27
29
1412



एकूण संख्या
104543
51529
2530
2106
1860
162568



मतदानाचे प्रमाण
64.31
31.7
1.56
1.3
1.14
56.26





POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================