Monday 24 June 2019

विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी निलम गोऱ्हे बिनविरोध

विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी निलमताई गोऱ्हे बिनविरोध

शिवसेनेच्या आमदार  नीलमताई गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेतल्याने गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.२००२ पासून विधान परिषदेच्या त्या सदस्या आहेत. याशिवाय विविध विषय समित्यांवर देखील त्यांनी काम केल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे १७, काँग्रेसचे १६, भाजपचे २३ , शिवसेनेचे १२, लोकभारती ,शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षचा प्रत्येकी १ आमदार आहे तर, ६ अपक्ष आमदार आहेत.  माणिकराव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर २० जुलै २०१८ पासून उपसभापतिपद रिक्त होते. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेना नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज (सोमवाऱ) संध्याकाळी चार वाजता ही अधिकृत घोषणा झाली. आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. विधानपरिषद उपसभापतिसाठी निलमताई गोऱ्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधकांना विश्वासात घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. विधिमंडळाच्या नियम सहा आणि सातनुसार उपसभापतीपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम एक दिवस आधी जाहीर करणं अपेक्षित होते. मात्र ही तरदूत स्थगित करण्यासंबंधी विधानकार्य मंत्री विनोद तावडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभागृहानं मंजूर केला. त्यानंतर सभापतींनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.काँग्रेस गटनेते शरद रणपिसे आणि काँग्रेस सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी आदल्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता आज निवडणूक घ्यायला हरकत घेतली, मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी २४ जुलै १९९८ आणि १३ सप्टेंबर २००४ असे दोनदा एका दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचा दाखला दिला आणि काँग्रेसची हरकत फेटाळून लावत स्वतःचे अधिकार वापरून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे घोषित केले होते.
==============================

विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड



विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी कोण बसणार याचे अंदाज वर्तवले जात होते. ज्यानंतर विजय वडेट्टीवार यांचे नाव समोर आले. त्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. तसेच विजय वडेट्टीवार यांनी कशा प्रकारे कामे केली, उपक्रमशीलता हा त्यांच्या स्वभावाचा विशेष आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारचा कारभार नीट चालावा यासाठी सक्षम विरोधी पक्षनेत्याचीही गरज असते. धोरणात्मक विरोध करून विजय वडेट्टीवार त्यांची भूमिका योग्य पद्धतीने निभावतील अशी खात्री वाटत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला, काँग्रेसने ४८ पैकी केवळ १ जागा जिंकली असून ती जागा चंद्रपूरची आहे. चंद्रपूरचे असलेले वड्डेटीवार यांनी या जागेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. स्वभावाने आक्रमक असलेले विजय वड्डेटीवार हे विधानसभेतही विविध मुद्यांवर आक्रमक असतात. त्यामुळे काँग्रेसने विखे यांच्यानंतर वड्डेटीवर यांची विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती करावी असं पत्र हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांना दिलं होते. अधिवेशन सुरू होऊन एक आठवडा उलटल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर निवड जाहीर करण्यात आली आहे. आता  अधिवेशनाच्या कामकाजाचे केवळ ७ दिवस शिल्लक असून हे या सरकारमधील शेवटचे अधिवेशन आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.