Monday 24 June 2019

पुणे महापालिका पोटनिवडणुकीत भाजपच्या ऐश्वर्या जाधव व अश्विनी पोकळे विजयी

राज्यातील महापालिका/नगरपरिषद/ नगरपंचायत आणि जिल्हा परिषद/ पंचायत समितीचे निकाल

महानगरपालिका निकाल

नगरपरिषद/ नगरपंचायत निकाल

जिल्हा परिषद/ पंचायत समिती निकाल

=========================================

तिकीट वाटपाचा घोळ शिवसेनेच्या अंगलट; राष्ट्रवादीचे गणेश ढोरे पुणे पालिका प्रभाग 42 मधून विजयी



पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ अ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या रेणुका चलवादी यांचा पराभव केला आहे. तर समाविष्ट गावांचा नवीन निर्माण केलेल्या पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 42 मधून अ जागेतून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर ब या महिलांसाठी राखीव असलेल्या जागेतून भाजपाच्या अश्विनी पोकळे विजयी झाल्या आहेत. या प्रभागातून महायुतीतर्फे प्रथम शिवसेनेने जाहीर केलेली उमेदवारी ऐनवेळी माघारी घेऊन संभ्रम निर्माण केला. उमेदवारी देण्याच्या घोळामध्ये अधिकृत पक्षाचे चिन्हाला शिवसेनेच्या उमेदवाराला मुकावे लागले यामुळे शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले. पुणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत ३ जागांवर २ भाजप व 1 जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. प्रभाग 42 ( अ) गणेश ढोरे (राष्ट्रवादी) 4 हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या दोन जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपकडून अश्विनी पोकळे, शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे, राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर काँग्रेसकडून भाग्यश्री कामठे हे उमेदवार रिंगणात होते. या दोन जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. यामध्ये एकुण १ लाख ९६ हजार मतदार होते. त्यापैकी ५१ हजार ४२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानुसार २२ टक्के मतदान झाले. यानंतर आज झालेल्या मत मोजणीत प्रभाग ४२ (अ) मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश ढोरे यांना २६ हजार ३०४ तर शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे यांना २० हजार २२४ एवढी मतं मिळाली. यानुसार सहा हजारांपेक्षा अधिक मतांनी राष्ट्रवादीचे गणेश ढोरे विजयी झाले. तर (ब) मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाग्यश्री कामठे यांना २३ हजार ९१९ तर भाजपाच्या अश्विनी पोकळे यांना २४ हजार ८५१ या मतं मिळाली. या आकडेवारीवरून भाजपच्या अश्विनी पोकळे ९३२ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

पुणे महापालिकेच्या प्रभाग १ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ अच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या रेणुका चलवादी यांचा पराभव केला आहे. पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून भाजपच्या ऐश्वर्या आशुतोष जाधव ह्या ३०९५ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना ७१८० मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या रेणुका चलवादी यांना ४०८५ मत मिळाली आहेत. पुणे महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये निवडणुकी प्रभाग क्रमांक १ मधून भाजपाच्या किरण जठार विजयी झाल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाकडे त्यांनी जे जात प्रमाणपत्र दाखल केले होते ते अवैध असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रमाणपत्राची तपासणी केली असता ते अवैध असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर प्रभाग क्रमांक १ अची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत आघाडीकडून रेणुका चलवादी, भाजपाकडून ऐश्वर्या जाधव, वंचित आघाडीच्या रोहिणी टेकाळे या उमेदवार होत्या. २२. ५ टक्के इतके मतदान झाले. आज सकाळी मतमोजणी झाली. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये रेणुका चलवादी आणि ऐश्वर्या जाधव यांच्यात स्पर्धा पाहण्यास मिळाली. मात्र महत्त्वाची बाब ही की पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत ऐश्वर्या जाधवच आघाडीवर होता. ऐश्वर्या जाधव या ३ हजारहून जास्त मतांनी विजयी झाल्या.
या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार व त्‍यांना मिळालेली मते : 
१) ऐश्वर्या जाधव (भाजप) -  ७१८०
२) रेणुका चलवादी (राष्ट्रवादी)- ४०८५ 
३) रोहिणी टेकाळे (वंचित) - २३४४ 
===============================

पुणे जिल्हा परिषद बावडा-लाखेवाडी गटातील पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांचा विजय

बावडा-लाखेवाडी गटातील पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांचा विजय

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने विजय झाला आहे. अंकिता पाटील 17 हजार 274 मतांनी विजयी झाल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेवर 23 जून रोजी मतदान झाले होते. अंकिता पाटील यांनी नुकताच सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. अंकिता पाटील यांच्या रुपाने पाटील घराण्यातील तिसरी पिढीच्या राजकारणात आली आहे. अंकिता पाटील यांचं शिक्षण परदेशात झालेले आहे. त्या सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तसंच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांचा सोशल मीडिया आणि शिक्षण संस्थांची जबाबदारी अंकिता पाटील यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव पाटील दोन वेळा बारामतीचे खासदार होते. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस वाढवण्यात त्यांनी मोठं योगदान दिले. यानंतर हर्षवर्धन पाटील 1992 नंतर राजकारणात सक्रिय झाले. राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढलेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला.
==============================================

वाडेबोल्हाई पंचायत समिती पोटनिवडणूक; युतीचे उमेदवार शाम गावडेंचा विजय


पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई पंचायत समितीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप -शिवसेना पुरस्कृत उमेदवार शाम परिलाल गावडे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बळीराम प्रभू गावडे यांचा १२०६ मतांनी दारुण पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या होमपिचवर झालेला पराभव हा त्यांना धक्का मानला जात आहे. वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि.२४) सकाळी १० वाजल्यानंतर शिवाजीनगर, पुणे शासकीय धान्य गोदामात पार पडली. वाडेबोल्हाई पंचायत समिती गणासाठी रविवार ( दि.२३) रोजी झालेल्या चुरशीच्या मतदानात २० हजार ६१५ मतदारांपैकी १४ हजार ४३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीनंतर भाजप-शिवसेना पुरस्कृत उमेदवार शाम परिलाल गावडे यांना ६ हजार ९४९ मते मिळली तर प्रतीस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार बळीराम प्रभू गावडे यांना ५७२९ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय समाज पक्षाचे भरत गडदे यांना १५६४ मतांवर समाधान मानावे लागले आहे. मागील अडीच वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेंद्र पठारे यांनी शाम गावडे यांचा २०८० मतांनी पराभव केला होता. राजेंद्र पठारे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत शाम गावडे यांनी १२०६ मतांनी विजय मिळवत राष्ट्रवादीला धुळ चारली आहे. राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद यांचे वर्चस्व असलेल्या वाडेबोल्हाई गणात भाजप-शिवसेनेने आव्हान दिले होते.
==================================================

मंत्री राम शिंदेना पोटनिवडणुकीत धक्का

कर्जत तालुक्यातील पंचायत समिती पोटनिवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना धक्का बसला. भाजप उमेदवाराचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मनिषा दिलीप जाधव विजयी झाल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मनीषा दिलीप जाधव या विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार शशिकला हनुमान शेळके यांचा पराभव केला. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. कोरेगाव पंचायत समिती गण आवर भाजपचे वर्चस्व होते. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपचे वर्चस्व मोडून काढत ही जागा खेचून आणली. हे पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. 
===================================================

मूल नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. मूल नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी भाजप उमेदवार शिल्पा रामटेके यांचा 176 मतांनी पराभव केला आहे. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये भाजप नगरसेवक अपात्र झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली होती. मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदासंघात लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला मोठा धक्का बसला होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा सुफडासाफ झाला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मात्र, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचा पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे सतराव्या लोकसभेत महाराष्ट्रातून धानोरकर हे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव खासदार असतील. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये भाजपचे केवळ दोन आमदार असताना हंसराज अहीर विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाले होते. 2019 च्या निवडणुकीत देशात सर्वत्र मोदी लाट तथा या लोकसभा क्षेत्रात भाजपचे पाच आमदार असताना ४५ हजार मतांनी झालेला पराभव अनपेक्षित, चिंतनीय व धक्कादायक असल्याचे अहिर यांनी म्हटले होते. या पराभवाचे राष्ट्रीय पातळीवर निश्चितच चिंतन होईल. या पराभवाने खचून न जाता पक्ष कार्य अधिक जोमाने करणार असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभा निकालानंतर पहिल्याच पत्रपरिषदेत दिली. दरम्यान, हंसराज अहीर हे भाजपमध्ये 1980 पासून सक्रिय आहेत. भाजयुमो अध्यक्ष ते स्वीकृत नगरसेवक, विधान परिषद आमदार, खासदार त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री आदी अनेक महत्त्वाची पदे भूषवले आहेत.
===========================================

कोल्हापुरात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पोटनिवडणुकीत विजय

कोल्हापूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. सत्ताधारी पक्षांनी आपले संख्याबळ कायम राखले असून सत्ताधाऱ्यांना शह देण्याचा विरोधकांचा प्रयत्न अपयशी ठरला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत पक्षादेश भंग केल्याने  पक्षांतरबंदी कायद्यानुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे हे दोन नगरसेवक अपात्र ठरले होते. या रिक्त जागासाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सिध्दार्थनगर प्रभागातील नगरसेवक अफजल पिरजादे यांना अपात्र ठरवल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या प्रभागातून पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे जय पटकारे,शिवसेनेने पाठिंबा दिलेले सुशील भांदिगरे आणि ताराराणी आघाडीचे नेपोलियन सोनूले अशी तिरंगी लढत होती. पटकारे यांना १५८०, भांदीगरे ८४० तर सोनूले १२०९ अशी मते पडली. पद्माराजे प्रभागात अजिंक्य चव्हाण हे अपात्र ठरल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. या प्रभागात राष्ट्रवादीचे अजित राऊत, शिवसेनेचे पियुष चव्हाण यांच्यासह अन्य ४ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने बहुरंगी होती. राऊत यांनी सर्वाधिक १७०६ मते घेऊन निवडणूक एकतर्फी जिंकली. पियुष चव्हाण यांना ६४३,महेश चौगुले यांना ३४४तर राजेंद्र चव्हाण यांना ३३४ मते मिळाली.सिद्धार्थनगर या भागात निवडणूक जिंकल्याने काँग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ एकने संख्या वाढले आहे. दलित समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदार संघातून काँग्रेस उमेदवारास निवडून आणून आमदार सतेज पाटील यांनी यशाची घौडदौड कायम ठेवली आहे. तर, राऊत यांना विजयी करून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे.
======================================

बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय

स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विजय मिळवण्याची भाजपाची घोडदौड सुरूच आहे. परभणीतील मानवत आणि नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदच्या निवडणुकीत भाजपचं कमळ फुलले आहे. नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला येथे भोपळा म्हणजे एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. नगराध्यक्षपदी भाजपचे बबलू गौतम विजयी झाले आहेत.  भाजपाने 19 पैकी 17 नगरसेवक जिंकले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 जागांवर विजय झाला आहे. विशेष म्हणजे बुटीबोरी नगर परिषद स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक घेण्यात आली. तसेच परभणीतील मानवतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे सखाहरी पाटील विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या पूजा खरात यांचा त्यांनी 9 हजार 439 मतांनी पराभव केला आहे. पाटील यांना 12 हजार 210 तर खरात यांना मिळाली 2 हजार 771 मते मिळाली आहेत. दरम्यान उल्हासनगर महापालिकेतील पोटनिवडणुकीत रिपाई आठवले गटाचे मंगल वाघे विजयी झाले आहे. वाघे यांनी भाजप, सेना आणि साई या युतीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. येथे भाजप नगसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध झाल्याने नगरसेवक पद रद्द झाले होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 च्या पोट निवडणुकीत रिपाई आठवले गटाने बाजी मारली आहे.


शिर्डी - संगमनेर नगरपालिका पोटनिवडणूक, पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी, राजेंद्र वाकचौरे 711 मतांनी विजयी

परभणी- मानवत नगरपरिषदेची नगराध्यक्ष पद निवडणूक, भाजप-शिवसेना आघाडीचे प्रा एस एन पाटील यांचा विजय , काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पुजा खरात यांचा दारुण पराभव , तब्बल 9 हजार मतांनी भाजप चे एस एन पाटील विजयी

मानवत : येथील नगराध्यक्षपदाचा पोटनिवडणुक भाजपने एकतर्फी विजय मिळत मिळवत कॉंग्रेसच्या तब्बल ९ हजार ४३९ मतानी दारुण पराभव केला.

हिंगोली- हिंगोली पालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सविता जयस्वाल विजयी


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.