Wednesday, 5 June 2019

पृथ्वीराज देशमुख विधान परिषदेवर बिनविरोध

पृथ्वीराज देशमुख विधान परिषदेवर बिनविरोध





विधानपरिषदेच्या एका रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची बिनविरोध निवड झालेली आहे. विधानपरिषदेच्या एका रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजप-शिवसेना युतीतर्फे सोमवारी दाखल केला होता.महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. ७ जून रोजी मतदान घेण्यात येणार होते मात्र त्यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक घेण्यात येत असून ही जागा विधानसभेच्या आमदारांमधून निवडून देण्यात येते. त्यामुळे या जागेसाठी विधानसभेतील आमदार मतदान करणार होते मात्र आता प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत भाजप तर्फे पृथ्वीराज देशमुख यांचा एकमेव अर्ज आलेला होता. पृथ्वीराज हे माजी दिवंगत आमदार संपतराव देशमुख यांचे पुतणे आहेत. सन १९९५ मध्ये अपक्ष उमेदवार संपतराव यांनी तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांचा पराभव केला होता. पतंगराव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांनी निवडणूक लढवली. पृथ्वीराज देशमुख यांनी पोटनिवडणुकीत पतंगराव कदम यांच्या पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या काकांप्रमाणे त्यावेळी युतीला समर्थन दिले होते. १९९९ साली राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसचे पतंगराव कदम यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. २००४मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही. २००९मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून पतंगराव कदम यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. २०१४मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे पृथ्वीराज देशमुख आणि काँग्रेसचे पतंगराव कदम अशी निवडणूक झाली. यात पतंगराव कदम पुन्हा विजयी झाले होते. पृथ्वीराज देशमुख यांच्या बिनविरोध निवडीने आगामी विधानसभा निवडणुकीत विश्वजित कदम यांची डोकेदुखी कमी होणार आहे.दरम्यान 7 जूनला अधिकृतरीत्या निवडणूक आयोगाकडून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात येणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.