पुणे शहरातील आठ मतदारसंघासाठी भाजपकडे इच्छुकांची शंभरी
विद्यमान आमदार असलेल्या जागांवर चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने पुणे शहरातील आठ पैकी शिवसेनेला एकही मतदारसंघ न सोडण्याची भाजपची भूमिका असल्याने सर्वच जागांवर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. पुणे शहरातील आठ मतदारसंघासाठी भाजपकडे इच्छुकांनी शंभरी घाटली असून आरपीआय व शिवसेनेचे देखील बहुतांश इच्छुक भाजप मधून निवडणूक लढवण्यास तयार आहेत. दरम्यान भाजपच्या प्रदेश शाखेच्या वतीने शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी पुणे महापालिका हद्दीतील आठ मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यानिमित्त सर्वच मतदारसंघांमधील गटातटांचे राजकारण उघडपणे समोर आले. मुलाखतींच्या दरम्यान शक्तीप्रदर्शन करण्यात येऊ नये, असे पक्षाकडून इच्छुकांना बजाविण्यात आले होते. त्यामुळे बहुतेक इच्छुक एकटेच किंवा निवडक समर्थकांसह कार्यालयात आले होते. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातून एकूण १०४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. महापौर बंगला येथे पार पडलेल्या आढावा बैठकीस खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यापूर्वी शेलार यांनी कोअर कमिटीची बैठक घेतली. यामध्ये भाजपची आगामी निवडणुकीतील रणनिती कशी असेल, याचा कानोसा घेतला. शहराचे प्रश्न, राजकीय परिस्थितीचा आढावा घेतानाच वंचित बहुजन आघाडीच्या सद्यस्थितीचाही अंदाज केंद्रीय निरीक्षक, शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला. कसबा, हडपसर, खडकवासला तसेच कँटोन्मेंट मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या किती, या मतदारांची भूमिका कशी असेल याचाही अंदाज घेण्यात आला. विरोधकांकडून या प्रचारात कोणते मुद्दे उपस्थित होऊ शकतात, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पक्षाने काय भूमिका घ्यावी, याची विचारणाही त्यांनी केली. लोकसभा तसेच विधानसभेला गतवेळी पडलेल्या मतदानाचा आढावा घेतानाच आगामी निवडणुकीतील संभाव्य शक्यतांवरही चर्चा केली. शेलार यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. दरम्यान पाटबंधारे विभागाचे अधिकारी पांडुरंग शेलार यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांच्या मतदारसंघातून एकूण 15 जणांनी मुलाखती दिल्या. यामध्ये पुणे जिल्हा पाटबंधारे विभागाचे अधिकारी पांडुरंग शेलार यांनी देखील मुलाखत दिली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पांडुरंग शेलार म्हणाले की, मी अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहे. त्या माध्यामांतून समाजात काम करत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य पाहून राजकारणात जाण्याचा निर्णय मागील काही महिन्यापासून माझ्या मनात आला. माझ्या निवृत्तीला साधारण चार महिन्याचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे मी जून महिन्यात स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज शासनाकडे केला आहे. स्वेच्छा निवृत्ती निर्णयाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यावर लवकरच निर्णय होईल. त्याच बरोबर या निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंटमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.
आठ मतदारसंघातील इच्छुकांची संख्या - १०४ असून यामध्ये शिवाजीनगर - ३१, कँटोन्मेंट - २२, कोथरूड - १२, खडकवासला - १२, कसबा - ९, वडगाव शेरी - ५, पर्वती - ४, हडपसर-९ असे आहेत. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच्या १०४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यात विद्यमान ८ आमदारांसह अनेक नगरसेवकांचा तसेच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, सुनील माने यांचा समावेश होता. मात्र कसबा पेठेतून इच्छुक असलेल्या खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट आणि गणेश बिडकर हे मुलाखतींना उपस्थित नव्हते मात्र ते इच्छुक आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ३१ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. सर्वात कमी म्हणजे ४ इच्छुक पर्वती मतदारसंघात होते. शहरातील सर्वच म्हणजे आठही मतदारसंघामध्ये भाजपाचेच आमदार आहेत. त्या सर्वांनीच आपापल्या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखती दिल्या. त्यांच्याबरोबरच बहुतांश मतदारसंघातील नगरसेवक, पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मुलाखती दिलेले इच्छुक उमेदवारांची नावे-
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ-
विजय काळे, सुनिल माने, सिद्धार्थ शिरोळे, डॉ राजेंद्र खेडेकर, रवींद्र साळगांवकर, विजय शेवाळे, अजय दुधाने, उषा बाजपेयीं, महेंद्र कदम, अशोक मुंडे, नितीन कुंवर, अनिल भिसे, नंदकुमार मांडोरा, अनिल पवार, वसंत अमराळे, अपर्णा गोसावी, दत्तात्रय खाडे, संतोष लांडगे, नीलिमा खाडे, सुधीर आल्हाट, शामराव सातपुते, सतीश बहिरट, अर्चना मुसळे, मधुकर मुसळे, गणेश गायकवाड, ज्योत्स्ना एकबोटे, शिरीष नाईकारे, शंतनू खिलारे पाटील, सुधीर मांडके, संजय सावळे, लहूदास कुलकर्णी.कसबा विधानसभा मतदारसंघ-
मुक्ता टिळक, धीरज घाटे, महेश लडकत, दिलीप काळोखे, अशोक एनपुरे, हेमंत रासने, मनिष साळुंके.पर्वती विधानसभा मतदारसंघ-
श्रीनाथ भिमाले, माधुरी मिसाळ, गोपाळ चिंतल, राजेंद्र शिळीमकर.वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ-
जगदीश मुळीक, महेंद्र गलांडे, उषा बाजपेयीं, राजेश लोकरे, संजय पवार.कोथरूड विधानसभा मतदारसंघ-
मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ, अमोल बालवडकर, राजेश बराटे, संदीप खर्डेकर, मंजुश्री खर्डेकर, शामराव सातपुते, सुशील मेंगडे, निलेश निधाळकर, विशाल गंधिले, योगेश राजपुरकर, राहुल कोकाटे.हडपसर विधानसभा मतदारसंघ-
योगेश टिळेकर, मारुती तुपे, विकास रासकर, जीवन जाधव, बाबासाहेब शिंगोटे, अनुपसिंहा गौड, ज्ञानेश्वर कुदळे, मेघना प्रमाणिक, उमेश गायकवाड.खडकवासला विधानसभा मतदारसंघ-
भीमराव तापकीर, सुनील मारणे, राजेंद्र खेडकर, प्रसन्न जगताप, संगीतादेवी राजेनिंबाळकर, राजू लायगुडे, हेमंत दांगट पाटील, दिलीप वेडे पाटील, राजाभाऊ जोरी, अभिजित देशमुख, दीपक माने, अरुण राजवाडे.कँटोमेंट विधानसभा मतदारसंघ-
दिलीप कांबळे, सुनील माने, पांडुरंग शेलार, मिलिंद बहिरट, संजय पवार, सुखदेव अडागळे, प्रकाश सोनवणे, किरण कांबळे, बाप्पू कांबळे, अतुल गायकवाड, प्रवीण गाडे, वर्षा गाडे, विरसेन जगताप, विष्णू हरिहर, रमेश काळे, राहुल बोराडे, डॉ भरत वैरागे, प्रवीण जगताप, श्रीधर कसबेकर, सिद्धार्थ सोनवणे, राहुल माने.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook===============================
यापूर्वी प्रसिद्ध झालेला इतर पक्षातील इच्छुकांची माहिती असलेला अनुषंगिक ब्लॉग-
पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 11 विधानसभा मतदारसंघातून 70 इच्छूकांचे राष्ट्रवादीकडे अर्ज
11 विधानसभा मतदारसंघातून 70 इच्छूकांचे राष्ट्रवादीकडे अर्ज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले. पिंपरी विधानसभेतून ८, चिंचवड विधानसभेतून ७, भोसरी विधानसभेत ३ या तिन्ही मतदार संघातून एकूण मतदारसंघातून १८ तर पुणे शहराच्या आठही विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा लढविण्यासाठी शहरातील माजी आमदारासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक; तसेच ५२ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. प्रमुख व मात्तबर नेत्यांनी मात्र अर्ज प्रदेश समितीकडे करणार असल्याने या संख्येत वाढ होणार आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात आहे. येथे तीव्र इच्छुक असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही.
कॉंग्रेसमधील इच्छुकांची संख्या घटली
प्रदेश कॉंग्रेस तसेच शहर कॉंग्रेसकडून अर्ज मागविण्यात आल्यानंतर शहरातून केवळ 20 ते 22 जणांचेच अर्ज आलेले असून कोथरूड, हडपसर, पर्वती, वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघात अतिशय नगण्य प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील आठ विधानसभांपैकी चार विधानसभा मध्ये पक्षाकडून निवडणूक लढविण्यास उमेदवारच इच्छूक नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पक्षाकडून 6 जुलै पर्यंत अर्ज करण्याची असलेली मुदत आठ दिवसांनी वाढविण्यात आली असून या वाढीव मुदतीत अर्जांची संख्या वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेसकडून शिवाजीनगर, कॅन्टोंन्मेंट, कसबा या तीन मतदारसंघा उमेदवारीसाठी चुरस असणार आहे. पुण्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून 2014 मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यापूर्वी 2009 मध्ये दोन्ही पक्षांकडून चार जागा लढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता आघाडीतील जागा वाट निश्चित झालेले नसले तरी, पक्षाकडून सर्व विधानसभांसाठी हे अर्ज मागण्यिात आले होते. मात्र, पक्षाकडे तीनच मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार आहेत. तर इतर ठिकाणी पक्षाला आलेला प्रतिसाद अतिशय नगण्य आहे.
मतदारसंघ आणि इच्छुक उमेदवारांची नावे -
वडगावशेरी विधानसभा -
राष्ट्रवादी- बापू पठारे, सुनील टिंगरे, सतीश म्हस्के, भीमराव गलांडे, तबस्सुम इनामदार
काँग्रेस - पी ए इनामदार, रमेश सकट, भीवसेन रोकडे आणि विकास टिंगरे, ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे, माजी नगरसेवक सुनील मलके, राजू केसरकर.
शिवाजीनगर विधानसभा -
राष्ट्रवादी- नीलेश निकम, प्रदीप देशमुख, बाळासाहेब रानवडे, दयानंद इरकल
काँग्रेस - माजी आमदार दिप्ती चवधरी, माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट, संजय अगरवाल, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष मनीष आनंद, गोपाल तिवारी, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, राजू साठे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, नंदलाल धिवार, हुसैन शेख, संदीप मोकाटे.
कोथरूड विधानसभा -
राष्ट्रवादी- बंडू केमसे, लक्ष्मी दुधाने, विजय डाकले, संदीप बालवडकर, माणिक दुधाने, बाळासाहेब बराटे, स्वप्नील दुधाने, गणेश घोरपडे
काँग्रेस - संदीप मोकाटे,प्राची दुधाणे, विजय खळदकर, मिलिंद पोकळे.
पर्वती विधानसभा -
राष्ट्रवादी- अश्विनी कदम, संतोष नांगरे, नितीन कदम, शशिकांत तापकीर, अर्चना हनमघर, निखिल शिंदे
काँग्रेस - नरेंद्र व्यवहारे, मुकेश धिवार, सचिन तावरे, माजी उपमहापौर उल्हास उर्फ आबा बागूल.
कसबा पेठ विधानसभा -
राष्ट्रवादी- गणेश नलावडे, रवींद्र माळवदकर, विशाल गद्रे, वनराज आंदेकर, अशोक राठी, गोरख भिकुले
काँग्रेस - माजी नगरसेवक विरेंद्र किराड, मुख्तार शेख, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, बाळासाहेब दाभेकर, योगेश भोकरे, विनय ढेरे, अब्दुलरझाक बागवान, माजी पदाधिकारी गोपाल तिवारी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, शिवानंद हुल्याळकर, सुशीलकुमार चिखले, माजी महापौर कमल व्यवहारे.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा -
राष्ट्रवादी- शांतीलाल मिसाळ, शैलेंद्र जाधव, अशोक कांबळे
काँग्रेस - माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह, सदानंद शेट्टी, रवींद्र आरडे, नगरसेवक अविनाश बागवे, शहराध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, मुकेश धिवार , करणसिंग मकवाना, नगरसेविका लता राजगुरू
हडपसर विधानसभा -
राष्ट्रवादी- वैशाली बनकर, प्रवीण तुपे, प्रशांत जगताप, गफूर पठाण, बंडू गायकवाड, अशोक कांबळे, योगेश ससाणे, फारुक इनामदार, नंदा लोणकर, लाला गायकवाड, अनिस सुंडके, सुरेश घुले, आनंद अलकुंटे
काँग्रेस - माजीमंत्री बाळासाहेब शिवरकर, शंकर ढावरे, प्रशांत तुपे, अभिजित शिवरकर, शिवाजी केदारी, प्रशांत सुरसे.
खडकवासला विधानसभा -
राष्ट्रवादी- दत्ता धनकवडे, दिलीप बराटे, सचिन दोडके, रुपाली चाकणकर, काका चव्हाण, बाबा धुमाळ, भाग्यश्री कामठे
काँग्रेस - श्रीरंग चव्हाण, सचिन बराटे, संग्राम अशोक मोहोळ, निवृत्ती निवंगुणे, अर्चना शाह.