Thursday, 22 August 2019

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

सहकारी बँक घोटाळा; बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांचे वितरण करताना हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपांप्रकरणी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ७६ आरोपींविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची २५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर असून आरोपींमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, तत्कालीन राष्ट्रवादीचे व सध्या भाजपमध्ये असलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह ५०हून अधिक राजकीय नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांच्या आत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) दिले होते. त्यानुसार सोमवारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४९१, १२० (ब) यांसह लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे राज्याची शिखर सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएससी बँकेतील गैरव्यवहार उघड झाला असून अनेक राजकीय नेते अडचणीत सापडले आहेत. या बँकेतील संचालक मंडळाने तसेच कर्ज मंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या तसेच संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यपणे व सवलतीच्या दरांत कर्जांचे वितरण केले. अशा कर्जांची परतफेड न झाल्याने बँक डबघाईस आली आणि सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले, असे नाबार्ड बँकेने २०११मध्ये केलेल्या ऑडिटमधून स्पष्ट झाले होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला या बँकेवर प्रशासक नेमण्याचा आदेश काढावा लागला होता. याप्रकरणी राज्य सरकारच्या सहकार विभागातील प्राधिकृत अधिकाऱ्याने महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम ८८ अन्वये तत्कालीन संचालक मंडळातील संचालकांवर विविध नियमबाह्य कर्जांप्रकरणी सप्टेंबर २०१५ मध्ये आरोपपत्र ठेवले होते. यासंदर्भात फौजदारी कारवाई करण्यासाठी काहींनी पोलिसांत तक्रारही दिली होती. तरीही कोणतीच कारवाई होत नसल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत २०१५ मध्ये फौजदारी जनहित याचिका केली होती. त्यात एफआयआर नोंदवण्यासह तपास सीबीआयकडे देण्याची विनंतीही होती. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रश्नाची दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेला अरोरा यांचा जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षी २९ जानेवारी रोजी त्यांचा तपशीलवार जबाब नोंदवून घेतला. मात्र, त्यानंतर पुढे काहीच कार्यवाही केली नाही. पोलिसांच्या या कारभारावर ताशेरे ओढत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. 

दाखल एफआयआरमध्ये खालीलप्रमाणे नावे-

माणिकराव पाटील, नीलेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, दिलीपराव देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, शिवराम जाधव, गुलाबराव शेळके, माधवराव पाटील, सिद्रामप्पा अल्लुरे, विलासराव पाटील, रवींद्र दुरगकर, अरविंद पोरेड्डीवार, सदाशिवराव मंडलिक, यशवंतराव गडाख, लीलावती जाधव, मधुकरराव जुंजाळ, प्रसाद तनपुरे, आनंदराव चव्हाण, सरकार जितेंद्रसिंह रावळ, बाळासाहेब वसदे, नरेशचंद्र ठाकरे, नितीन पाटील, किरण देशमुख, तानाजीराव चोरगे, दत्तात्रय पाटील, राजेंद्र जैन, तुकाराम दिघोळे, मीनाक्षी पाटील, रवींद्र शेट्ये, पृथ्वीराज देशमुख, आनंदराव अडसूळ, राजेंद्र पाटील, अंकुश पोळ, नंदकुमार धोटे, जगन्नाथ पाटील, सुरेश देशमुख, उषाताई चौधरी, संतोषकुमार कोरपे, जयंत पाटील, देविदास पिंगळे, एन. डी. कांबळे, राजवर्धन कदमबांडे, गंगाधरराव देशमुख, रामप्रसाद कदम, धनंजय दलाल, जयंतराव आवळे, वसंतराव शिंदे, डी. एम. मोहोळ, पांडुरंग फुंडकर, ईश्वरलाल जैन, वसंतराव पवार, राजन तेली, दिलीपराव सोपल, चंद्रशेखर घुले पाटील, विलासराव जगताप, अमरसिंह पंडित, योगेश पाटील, शेखर निकम, श्रीनिवास देशमुख, डी. एम. रवींद्र देशमुख, विश्वासराव शिंदे, यशवंत पाटील, बबनराव तायवडे, अविनाश अरिंगळे, रजनीताई पाटील, लक्ष्मणराव पाटील, माणिकराव कोकाटे, राहुल मोठे, शिवाजीराव नलावडे, सुनील फुंडे, शैलजा मोरे तसेच उच्च न्यायालयाचा अहवाल हाच गुन्हा म्हणून दाखल करून घेण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी एफआयआरमध्ये थेट कुणाच्याही नावाचा उल्लेख करणे टाळले आहे. पोलिसांनी सोईस्कर 'तत्कालीन' शब्दाचा वापर केला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँकांचे तत्कालीन संचालक, पेण सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक, तत्कालीन संबंधित अधिकारी, तत्कालीन मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी अशा शब्दांत आरोपींचा उल्लेख करण्यात आला आहे.  

=================================

अजित पवारांसह ५० हून अधिक सर्वपक्षीय दिग्गज नेते गोत्यात

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांच्या वितरणात हजारो कोटी रुपयांचा घोटा‌ळा झाल्याप्रकरणी पाच दिवसांच्या आत एफआयआर नोंदवून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले. त्यामुळे बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, तत्कालीन राष्ट्रवादीचे व सध्या भाजपमध्ये असलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह पन्नासहून अधिक राजकीय नेते अडचणीत आले आहेत. या बँकेतील संचालक मंडळाने तसेच कर्जमंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या आणि संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्य व सवलतीच्या दरात कर्जांचे वितरण केले. अशा कर्जांची परतफेड न झाल्याने बँक डबघाईस आली आणि सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले, असे 'नाबार्ड'ने सन २०११ मध्ये केलेल्या ऑडिटमधून स्पष्ट झाले होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला एमएससी बँकेवर प्रशासक नेमण्याचा आदेश काढावा लागला होता. या प्रकरणी राज्य सरकारच्या सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम ८८ अन्वये बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळातील संचालकांवर सप्टेंबर - २०१५ मध्ये आरोपपत्र ठेवले होते. या संदर्भात फौजदारी कारवाई करण्यासाठी काहींनी पोलिसांत तक्रारही दिली होती. तरीही कोणतीच कारवाई होत नसल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत सन २०१५ मध्ये उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका केली होती. त्यावर न्यायालयाने गुरुवारी ८४ पानी निकाल दिला. 

गुन्हा कोणावर दाखल होणार -तत्कालीन संचालकांवर गैरव्यवहाराचा ठपका

१) माणिकराव पाटील, २) निलेश नाईक, ३) विजयसिंह मोहिते पाटील, ४) अजित पवार, ५) दिलीपराव देशमुख, ६) राजेंद्र शिंगणे, ७) मदन पाटील, ८) हसन मुश्रीफ, ९) मधुकरराव चव्हाण, १०) शिवराम जाधव, ११) गुलाबराव शेळके, १२) माधवराव पाटील, १३) सिद्दरामप्पा अल्लुरे, १४) विलासराव पाटील, १५) रवींद्र दुर्गाकर, १६) अरविंद पोरेडीवार, १७) सदाशिव मंडलिक, १८) यशवंतराव गडाख, १९) लीलावती जाधव, २० ) मधुकरराव जौंजळ, २१) प्रसाद तनपुरे, २२) आनंदराव चव्हाण, २३) सरकार जितेंद्रसिंग रावळ, २४) बाबासाहेब वसदे, २५) नरेशचंद्र ठाकरे, २६) नितीन पाटील, २७) किरण देशमुख, २८ ) तान्हाजीराव चोरगे, २९) दत्तात्रय पाटील, ३०) राजेंद्र जैन, ३१) तुकाराम ढिंगोळे, ३२) मीनाक्षी पाटील, ३३) रवींद्र शेट्ये, ३४) पृथ्वीराज देशमुख, ३५) आनंदराव अडसूळ, ३६) राजेंद्र पाटील, ३७) अंकुश पोळ, ३८) नंदकुमार धोटे, ३९) जगन्नाथ पाटील, ४०) सुरेश देशमुख, ४१) उषाताई चौधरी, ४२) संतोषकुमार कोरपे, ४३) जयंत पाटील, ४४) देविदास पिंगळे, ४५) एन. डी. कांबळे, ४६) राजवर्धन कदमबांडे, ४७) गंगाधरराव देशमुख, ४८) रामप्रसाद कदम, ४९) धनंजय दलाल, ५०) जयंतराव आवळे, ५१) वसंतराव शिंदे, ५२)डीएम माहोल, ५३) पांडुरंग फुंडकर, ५४) ईश्वरलाल जैन, ५५) वसंतराव पवार, ५६ ) रंजन तेली, ५७) दिलीपराव सोपल, ५८) चंद्रशेखर घुले- पाटील, ५९) विलासराव जगताप, ६०) अमरसिंग पंडित, ६१) योगेश पाटील, ६२) शेखर निकम, ६३) श्रीनिवास देशमुख, ६४) डी. एम. रवींद्र देशमुख, ६५) विलासराव शिंदे, ६६) यशवंत पाटील, ६७) बबनराव तायवंडे, ६८) अविनाश अरिंगळे, ६९) रजनी पाटील, ७०) लक्ष्मणराव पाटील, ७१)माणिकराव कोकाटे, ७२) राहुल मोटे, ७३) शिवाजीराव नलावडे, ७४) सुनील फुंदे, ७५) शैलजा मोरे.

राज्य सहकारी बँक घोटाळा?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी वैधानिक समितीने बँकेचे तत्कालीन संचालक व सदस्यांवर दाखल केलेल्या दोषारोपपत्रातील मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
1. साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नाबार्डच्या क्रेडिट मॉनिटरिंग अ‍ॅरेंजमेंट (सीएमए) च्या निकषांशी विसंगत आहे. त्यामुळे बँकेला २९,७१४.१९ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी बँकेच्या ३७ संचालकांना दोषी ठरविण्यात आले आहे.
2. १४ साखर कारखान्यांना कर्ज देताना पुरेसे तारण घेतले नाही व राज्य सरकारकडून हमीही घेतली नाही. त्यामुळे बँकेचे ४७,४६५. २८ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी बँकेच्या ३८ संचालकांना दोषी ठरविण्यात आले.
3. चार साखर कारखान्यांकडून तारण न घेताच संचालकांनी कर्ज मंजूर केले. अपुरे तारण व हमी नसल्याने तसेच बँकेची संरक्षित संपत्ती विकूनही २०,३४८.९२ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी संचालक आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
4. लघुउद्योगांना कर्ज मंजूर करताना व त्याचे वाटप करताना निश्चित करण्यात आलेल्या धोरणाचे उल्लंघन करून चार सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देण्यात आले. त्यामुळे १७७.३१ लाखांचे नुकसान झाले. त्यात ५३ संचालक व अधिकारी दोषी आहेत.
5. सहा साखर कारखान्यांची संपत्ती विकताना बँकेने नियमांचे उल्लंघन केले. ठरलेल्या रकमेपेक्षा कमी किंमतीत बँकेची मालमत्ता विकली. त्यामुळे बँकेचे ८६५५.९६ लाखांचे नुकसान झाले. सहा साखर कारखाने आणि सूत गिरण्यांकडून कोणतीही हमी न घेता कर्ज वाटप करण्यात आले. त्यात ७५ संचालक आणि बँक अधिकारी दोषी आहेत.
6. तीन साखर कारखान्यांची संपत्ती घेताना अनियमितता झाली. संपत्तीच्या किंमतीबाबत खासगीरित्या केलेल्या वाटाघाटामुळे बँकेला १९१४.५१ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी ७२ संचालक जबाबदार आहेत.
7. संचालक मंडळाने किसान स्टार्च, सी. एस. देवपूर, धुळे याची सुरक्षित मालमत्ता कमी किंमतीत विकली. परिणामी बँकेला ३६५ लाखांचे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी ४५ संचालकांना जबाबदार धरण्यात आले.
8. बँकिंग रेग्युलेशन्स अ‍ॅक्टचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने पाच लाखांचा दंड बँकेला ठोठावला आणि त्यासाठी ७५ संचालकांना जबाबदार ठरविले.
9. महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला संचालकांच्या स्टडी टूरसाठी ७.३० लाख आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आली होती. मात्र, कोणीही स्टडी टूरला गेले नाही.

याचिकेतील प्रतिवादी क्रमांक व नावे खालीलप्रमाणे

11. Manikrao M. Patil
12. Nilesh Balasaheb V. Sarnaik
13. D. M. Mohol 
14. Arvind N. Poreddewar
15. Nitin Suresh Patil
16. Vasantrao Natha Shinde
17. Rajvardhan R. Kadambande
18. Yashwantrao K. Gadakh
19. Dr. Santoshkumar W. Korape
20. Shrinivas T. Deshmukh
21. Amarsingh Shivajirao Pandit
22. Sunil Baburaoji Phunde
23. Vijay N. Vaddettawar
24. Ishwarlal S. Jain
25. Manikrao S. Kokate
26. Rahul M. Mote
27. Diliprao D. Deshmukh
28. Shivajirao V. Nalawade
29. Jitendrasingh J .Rawal
30. Ramprasad W. Kadam-Bordikar
31. Ajit A. Pawar
32. Jayant P. Patil
33. Shekhar Govindrao Nikam
34. Vilasrao N. Jagtap
35. Laxmanrao Pandurang Jadhav
36. Vijaysingh S. Mohite-Patil 
37. Rajan Krishna Teli
38. Yogesh Baban Patil
39. Suresh B. Deshmukh
40. D. M. Ravindra Deshmukh
41. Rajendra H. Jain
42. Dr. Babanrao B. Taiwade
43. Pandurang P. Fundkar
44. Vishwasrao Jagdevrao Shinde
45. Yashwant Pandurang Patil
46. Chendrashekhar M. GhulePatil
47. Diliprao Gangadhar Sopal
48. Avinash Vithalrao Aringale
49. Kiran D. Deshmukh
50. Anandrao V. Adsul
51. Dhananjay M. Dalal
52. Smt. Meenakshitai P. Patil
53. Smt. Rajanitai A. Patil
54. Smt. Shailaja Jagannath rao
राज्याची शिखर बँक म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केली. राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतील संस्था आणि व्यक्तींना नियमबाह्यपणे कर्जे दिल्याने बँक अडचणीत सापडली आणि त्यावर प्रशासक नेमणे रिझर्व्ह बँकेला भाग पडले. या संदर्भात नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही एफआयआर नोंदवण्यात आला नाही, असा आरोप करत एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली होती. याविषयी हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारी महिन्यात अरोरा यांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र, त्यानंतर कोणतीच कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे हायकोर्टाने आर्थिक गुन्हे शाखेला जाब विचारला होता. तेव्हा अरोरा यांच्या तक्रारीत तथ्य आढळले नसल्याने एफआयआर नोंदवण्यात आला नाही, असे उत्तर आर्थिक गुन्हे शाखेने दिले होते. त्यानंतर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने ३१ जुलै रोजी याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला होता. आज तो जाहीर करताना खंडपीठाने याचिकादारांची विनंती मान्य करत पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.