Monday, 5 August 2019

विधानपरिषदेसाठी युतीकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी तर काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णी यांनी उमेदवारी

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल


EVENTS                                                                     DATES & DAYS

1 Issue of Notifications                                   25th July, 2019 (Thursday)
2 Last date of making nominations                   01st August, 2019 (Thursday)
3 Scrutiny of nominations                                 02nd August, 2019 (Friday)
5 Last date for withdrawal of candidatures        05th August, 2019 (Monday)
6 Date of poll                                                  19th August, 2019 (Monday)
7 Hours of poll                                                 8.00 a.m. to 4.00 p.m.
8 Counting of Votes                                         22nd August, 2019 (Thursday)
9 Date before which election completed            26th August, 2019 (Monday)
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विधानपरिषदेसाठी युतीकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी तर काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णी यांनी उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिवसेनेकडे १४१ तर भाजपकडे १८० सदस्य आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची सदस्य संख्या २५० आहे. आज उमेदवारी भरण्याचा अखेरचा दिवस होता. एकूण ७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 19 ऑगस्टला या जागेसाठी मतदान होणार आहे. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा वरचष्मा आहे. शिवसेनेकडे १४१ तर भाजपकडे १८० सदस्य आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची सदस्य संख्या २५० आहे. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात नगरसेवक आणि जि. प. सदस्य मतदान करतात. या दोन्ही जिल्ह्य़ांत ६५७ पात्र उमेदवार असल्याची यादी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आली. एका नगरसेवकास मतदार यादीत ठेवायचे की नाही यावरून संभ्रम होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जि. प. सदस्य भागवत उफाड यांचाही मतदार यादीत समावेश करण्यात आला. एमआयएमचे २८ नगरसेवक असून आमदार अब्दुल सत्तार यांचे ३६ समर्थक आहेत. काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतर जि. प.तील सत्तार यांचे समर्थक या निवडणुकीत कोणाला मदत करतात, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विकास आघाडीचेही काही सदस्य असल्यामुळे कोणाच्या पारडय़ात कोणाची मते पडतात, याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार, किशनचंद तनवाणी, सुभाष झांबड अशी मातबर मंडळी उमेदवार म्हणून उभी होती. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना बाबुराव कुलकर्णी यांच्या पाठीशी मतदान वळावे म्हणून प्रयत्न करावे लागणार आहेत.सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नंदकिशोर विठ्ठल सहारे यांनीही अर्ज दाखल केला आहे. ते सत्तार यांचे समर्थक आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी मतदारांची गोळाबेरीज युतीच्या बाजूने अधिक आहे. ती टिकवून ठेवणार आहोत, असा संदेश देण्यासाठी दानवे यांचा अर्ज दाखल करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, भाजपचे डॉ. भागवत कराड, किशनचंद तनवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर काँग्रेसची बहुतांश नेतेमंडळी बाबुराव कुलकर्णी यांच्यासमवेत अर्ज दाखल करण्यास आले होते.औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर पालिका आणि जिल्हा परिषद सदस्य विधान परिषदेवर आमदार निवडून देतात. या मतदार संघासाठी १९ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. संख्याबळावरून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी ही निवडणूक काहीशी सुकर मानली जाते. परंतु, विजयासाठीच्या आकडा गाठण्यासाठी युतीला देखील काही अपक्षांची गरज भासू शकते. औरंगाबाद-जालना मतदार संघात एकूण काँग्रेसकडे १६७, भाजपकडे १५९, शिवसेनेकडे १३९, राष्ट्रवादी ८३, एमआयएम २७ आणि अपक्ष ४१ मते आहेत. एकूण ६१६ पैकी ३०९ मते विजयासाठी हवे आहेत. या आकडेवारून शिवसेना उमेदवाराला विजयासाठी अपक्षांच्या मतांची गरज भासणार आहे. तर काँग्रेस उमेदवाराला एमआयएम आणि अपक्ष मतांची मोट बांधावी लागणार आहे.


Biennial election to Maharashtra Legislative Council from Aurangabad-cum-Jalna Local Authorities’ Constituency 2019 : Candidate Affidavits

Sr. No.Name of CandidateParty 
1Vishal Uddhav NandarkarShivswarajya Bahujan Paksha
2Bhavanidas Bhalchandrarao KulkarniIndian National Congress
3Nandkishor Vitthalrao SahareIndependent
4Ambadas Eknathrao DanaveShivsena
5Abdul Javed Abdul Vahed ShaikhIndependent
6Tatyasaheb Eknath ChimneIndependent
7Shahnawaj Abdul Raheman KhanIndependent

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
===============================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.