प्रसिद्धीचा राजकीय पोर 'खेळ'
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघात केलेल्या जनमत चाचणी सर्वेक्षणात रोहित पवार यांना मतदारांचा अल्प प्रतिसाद दिला आहे. सर्वाधिक पसंती विद्यमान आमदार व मंत्री प्रा. राम शिंदे यांनाच दिली आहे. प्रमुख इच्छुकांची वैयक्तीक पसंती देखील जाणून घेण्यात आली. रोहित पवार यांना 22 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे तर मंत्री प्रा. राम शिंदे यांना 37 टक्के पसंती दिलेली आहे. राजकीय पक्षांना मतदारांनी भाजप व शिवसेनेला प्राधान्यक्रम दिला असून त्यानंतर राष्ट्रवादी व कॉंग्रेसला दिला आहे. सद्यस्थितीत केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष मध्ये मंत्री प्रा. राम शिंदे यांनाच पुन्हा यश निवडणुकीत मिळेल असे असून रोहित पवार यांना यश मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. ठोस उपाययोजना करून नेतृत्वाचे आभासी वास्तव जाणून सोशल मीडियातील आभासी नेतृत्व ही प्रतिमा सुधारण्याची गरज आहे. सामाजिकदृष्ट्या या मतदारसंघात थेट धनगर समाजातील नेतृत्वाला आव्हान देण्याची भूमिका येथील मतदारांना रुचलेली नसल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू महाराष्ट्रातील इतर मतदारसंघ सोडून ओबीसींच्या विशेषतः धनगर समाजातील नेतृत्वाला आणि तेही अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरचे शिंदे घराण्याच्या वंशज मानले जाणारे मंत्री प्रा. राम शिंदे यांनाच आव्हान देण्याचा मनसुबा समाजघटकांवर परिणामकारक ठरत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन धनगर समाजात सरकारवर रोष असलातरी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी पक्षावर देखील रोष आहे. अशा परिस्थितीत धनगर समाजातील नेतृत्वाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्याचे रोहित पवार यांचे धोरण विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादीसाठी घातक व नुकसानकारक ठरू शकते अशास्वरुपाच्या मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत. धनगर समाजाचा रोषांचा परिणाम राज्यातील अन्य प्रभावित मतदारसंघावर होऊ शकेल. या मतदारसंघात अनुसूचित जाती समाजाचे 12.91 टक्के मतदार असून अनुसूचित जमातीचे 1.23 टक्के मतदार आहेत. खुला व इतर मागासप्रवर्ग 85.86 टक्के आहे. यामध्ये ओबीसी मतदारांचे या मतदारसंघात प्राबल्य आहे. ओबीसी मतदारांच्या भूमिकेवरच येथील राजकीय भवितव्य अवलंबून असते. तसेच या मतदारसंघातील सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या प्रमुख आडनावांमध्ये प्रामुख्याने शिंदे, काळे, पवार, शेख, जाधव या आडनावाचे सर्वाधिक मतदार दिसून येतात. 2009 मध्ये पुनर्रचना झाल्याने या समाविष्ट भागात बदल होऊन कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ रचना करण्यात आली. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीत कॉंग्रेसला जागावाटपात मतदारसंघ देण्यात आला होता. या निवडणुकीत मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता त्यानंतरच्या २०१४ च्या निवडणुकीत देखील पुन्हा प्रा. राम शिंदे यांनी यश मिळवले होते. 2014 च्या निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक लढवली मात्र कॉंग्रेस उमेदवाराला खूप कमी मतदान झाले होते. पहिल्या क्रमांकावर भाजप तर दुसर्या क्रमांकावर शिवसेनेने मते घेतली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अतिशय याभागात कमी मतदारांकडून प्रतिसाद मिळाला होता. विधानसभेसाठी तीव्र इच्छूक असलेले रोहित पवार यांनी सर्व शक्कल लढवूनही राष्ट्रवादीला मताधिक्य येथून मिळाले नव्हते ही वस्तूस्थिती नाकारता येऊ शकत नाही. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात धुळे येथील बेरोजगार युवकांकडून माहिती जमा केला आहे तर मुंबईतील इव्हेंट्स कंपनीला प्रसिद्धीचा ठेका दिलेला असल्याचे येथील नागरिक सांगतात. तर सोशल मिडीयाचे संचालन करणाऱ्या ठेकेदारच्या अतिउत्साही पोस्ट टाकण्याच्या निर्णयामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरणा ऐवजी नकारात्मकता रोहित पवार यांच्या विषयी मतदारसंघात वाढीस लागली आहे. दरम्यान शिरूर, हडपसर, खडकवासला आणि कर्जत-जामखेड या सर्व विधानसभा मतदारसंघात चाचपणी करून ऐनवेळी मतदारसंघ ठरवून निवडणूक लढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. शिरूर, हडपसर, खडकवासला आणि कर्जत-जामखेड या सर्व विधानसभा मतदारसंघातील सर्वेक्षणात त्यांच्या विषयी निगेटिव्ह रिपोर्ट आलेले दुर्लक्षित करून चालणार नाही. पक्षांतर्गत विरोध व कुरघोडी तसेच विरोधकांना गाफील ठेऊन यश मिळविण्यासाठी ऐनवेळी मतदारसंघ निवडणार असल्याचे समर्थकांचे मत आहे.
लोकसभा निवडणूकीत कर्जत मतदारसंघात प्रमुख भागाप्रमाणे झालेले मतदान
|
सोशल मीडियातील आभासी नेतृत्व
सोशल मीडियाचा अतिरेकी वापर निवडणुकीच्या दृष्टीकोनातून केलेल्या कार्याचा उहापोह या कृत्यांमुळे सोशल मीडियातील आभासी नेतृत्व म्हणून बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांची ओळख निर्माण केली जात आहे. त्यांनी वेळीच नेतृत्वाचे आभासी वास्तव जाणले नाही तर त्यांना राजकीयदृष्ट्या मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साबणाच्या वडीची जाहिरात करावी त्या पद्धतीने आजकाल राजकीय नेत्यांची प्रसिद्धी केली जाते. त्यासाठी जनसंज्ञापनाची उपलब्धता यासाठी सर्व नवी-जुनी साधने वापरली जातात. नेत्यांच्या प्रत्यक्षाहून उत्तुंग अशा प्रतिमा बनविल्या जातात. अशा ब्रॅण्डेड नेत्यांनाच मग करिश्माई वगैरे म्हटले जाते. यात लोकांची फसगत होते, तशीच नेत्यांचीही फसगत होते आणि ते अधिक भयंकर आहे. जाहिरातबाजीचा हा सापळा सावजाइतकाच शिकाऱ्यासाठीही महाघातक आहे. प्रतिमा सुधारण्यासाठी हाती घेतलेले उपाय पाहता, ते अशाच प्रकारच्या सापळ्यात अडकत चालले आहेत की काय अशी शंका निर्माण होते. समाजमाध्यमांसह वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांत येणाऱ्या बातम्या, घटनावर नजर ठेवणे, पक्षीय मतांची माध्यमांतून पेरणी करणे, घटना-घडामोडींवर प्रतिक्रिया देणे अशी विविध कामे करणारी योग्य ठेकेदारी कंपनी नसेल तर नकारात्मक आभासी वास्तव तयार होते हे यांच्यासाठी अयोग्य ठरते. ज्या व्यक्ती प्रसार आणि समाजमाध्यमांवरच अवलंबून असतात अशा व्यक्तीचे लक्षण आभासी नेतृत्व म्हणून गणले जाते. विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार नशीब अजमावणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या बैठका, भेटी-गाठी सध्या या मतदारसंघात सुरु आहेत. एक वर्षभरापासून मतदारसंघातील त्यांचा वावर वाढलेला आहे. प्रसिद्धीसाठी त्यांनी जामखेडच्या एका छोट्या सलून दुकानात जाऊन दाढी करुन घेतली. आणि मिशा छाटण्याचे फोटो देखील व्हायरल केले. सलूनचालक संदीप राऊत यांचा मजेदार किस्सा सोशल मिडीयावर फिरत आहे. प्रसिद्धी मिळवून देणारे ठेकेदार सांगतात सुप्रसिद्धी आणि कुप्रसिद्धी आमच्या दृष्टीकोनातून ती प्रसिद्धीच असते.मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पोर'खेळ' देखील सुचवले जातात. प्रसिद्धीचा ठेका घेणार्यांना केवळ प्रसिद्धी दिसते त्यातून निवडणुकीत काय परिणाम होईल याचे भान नसते. असेच कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवार रोहित पवार यांच्या डोक्यात खेळण्यांमध्ये बसण्याचे खूळ घातले. कर्जतच्या श्री. सद्द्गुरु गोदड महाराज यांच्या यात्रेत या खेळांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या भावी मतदारांशी संवाद साधला म्हणे. यावेळी त्यांना 'दिल तो बच्चा है जी' असे कोणाचे तरी बोल आठवले. त्यामुळे मग मी ही या खेळण्यांमध्ये बसण्याचा मोह आवरू शकलो नाही असेही स्पष्टीकरण दिले. जत्रेत गेल्यानंतर तेथे काय-काय केले, यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. नातू...नातू अशा शब्दाचा सातत्याने प्रत्येक पोस्टमध्ये मारा केला जात आहे. कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील नागरीकांमध्ये या शब्द प्रयोगामुळे नकारात्मकता वाढीस लागली आहे. नातू...नातू असे शब्द त्यांच्या कानावर पडल्याने ते आता तू..ना..तू..ना असे मतदार बोलू लागले आहेत. सोशल मीडियातून प्रसिद्धीसाठी सातत्याने वेगवेगळ्या विषयांना अनुसरून पोस्ट केल्या जातात त्यामध्ये जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू अशा शब्दाच्या अतिरेकामुळे येथील नागरिकांमध्ये काही प्रमाणात त्यांच्या विषयी नकारात्मकता निर्माण होत आहे.व्यवसायातील सहभागाने कर्जबाजारीपणाच-
रोहित पवार यांच्या व्यवसायातील सहभागाने कर्जबाजारीपणाच वाढलेला कंपनीच्या रिपोर्ट वरून दिसून येत आहे. यशस्वी व्यवसाय केल्याचा त्यांचा दावा फोल ठरतो आहे. बारामती अॅग्रो लि. या कंपनीची त्यांनी 01/04/2009 मध्ये जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी कंपनीवर अल्प कर्ज/बोजा होता. रोहित पवार यांच्या व्यवसायातील सहभागाने कर्जबाजारीपणाच वाढलेला असून २०१९ मध्ये 116 कोटी 93 लाख बारामती अॅग्रो लि. या कंपनीवर कर्ज/बोजा नोंद केल्याचे दिसून येते तर एकूण या कंपनीवर तब्बल 1145 कोटी 82 लाख 1 हजार रुपयांचा कर्ज/बोजा नोंद कंपनी रजिस्टार यांच्या दप्तरी आहे.रोहीत पवार यांच्यावर मर्जी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि बारामती जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्यावर इतरांपेक्षा आजोबांची मर्जी असल्याचे दिसून येते. देश व विदेश दौरयामध्ये रोहित पवार यांना अनेकदा सहभागी करून घेतले आहे. तसेच काही संस्थामध्ये निवडीस त्यांना प्राधान्य दिलेले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशन अर्थात इस्मा या देशातील खासगी साखर उद्योगाच्या संघटनेच्या अध्यक्षपदी बारामती अॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले रोहित पवार यांनी इस्मा या संघटनेचे मागील वर्षी उपाध्यक्षपद स्विकारले होते. सध्या ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचेही संचालक देखील आहेत. दरम्यान सात कंपन्यांमध्ये संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. या सात कंपन्यांमध्ये BARAMATI AGRO LIMITED, RAJAS AGRO PRIVATE LIMITED, SUHIT TRADING PRIVATE LIMITED, INDIAN SUGAR EXIM CORPORATION LTD., RAVISH GREENFIELDS PRIVATE LIMITED., ANSHUMAN GREENFIELDS PRIVATE LIMITED., DINKAR GREENFIELDS PRIVATE LIMITED यांचा समावेश आहे.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook===============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.