राज्यातील ५ विधानपरिषदेच्या जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर झाली आहे. या 5 जागांसाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान होणार होईल. या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रथमच लढत होणार आहे. 1 डिसेंबरला होणारी निवडणूक औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदार संघासाठी होईल. यापूर्वी भाजप-शिवसेना युतीमध्ये एकत्र होते. पण, यंदा भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे तीन पक्ष पाहायला मिळतील. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक १ डिसेंबरला होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर तर पुणे व अमरावती शिक्षक या पाच मतदारसंघांतील निवडणूक करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या पाचही मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींची मुदत १९ जुलैला संपली होती. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पाचही मतदारसंघात निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. १२ नोव्हेंबपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, १७ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. १ डिसेंबरला मतदान तर ३ तारखेला मतमोजणी होईल. पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. गेल्या वेळी राष्ट्रवादी अंतर्गत बंडखोरीमुळे आ.चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळाला होता. या वेळी भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस आहे. राष्ट्रवादीने गतवेळची चूक टाळून सहमती घडविण्यावर भर दिला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी केले होते. त्यांनी पुन्हा लढण्याची तयारी केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित सामोरी जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.