Friday, 29 July 2022

आंबेगाव, खेड, मुळशीमध्ये महिलाराज तर भोर, वेल्हा तालुक्यात महिलांना स्थान नाही

पुणे जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत घोडचूक; पुन्हा सोडत काढणार


पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी (ता.२८) काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत चूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बारामती तालुक्यातील दोन गटांमध्ये याआधी अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठीचे आरक्षण आरक्षण असतानासुद्धा हे दोन गट खुले दाखविण्यात आले. परिणामी या दोन गटात पुन्हा अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. या चुकीमुळे गुरुवारी काढण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून पुणे जिल्ह्यातील गटांची आरक्षण सोडत पुन्हा काढावी लागणार आहे. यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख फेरसोडतीला परवानगी मागणारा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत. बारामती तालुक्यातील दोन्ही गटांचे चुकीचे आरक्षण बदलणार असून, सध्या या दोन गटात असलेले अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण अन्य दोन गटांत जाणार आहे. शिवाय हे दोन गट खुला संवर्ग किंवा नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) असणार आहेत. परिणामी सध्या ओबीसी आणि खुल्या गटासाठी जाहीर झालेल्या गटांतील एक किंवा दोन गटांचे आरक्षण बदलले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चक्राकार पद्धतीने आरक्षण जाहीर करणे बंधनकारक आहे. या पद्धतीनुसार याआधीच्या किमान चार निवडणुकीसाठीचे आरक्षण विचारात घेऊन, त्या ठिकाणी एकाच प्रवर्गाच्या आरक्षणाची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी घेतली जाते. बारामतीच्या तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या माहितीत चूक झाल्याने, जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत चुकली गेली आहे. बारामती तालुक्यातील सांगवी-वडगाव निंबाळकर हा गट २००२ मध्ये खुला, २००७ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि २०१२ मध्ये अनुसूचित जाती (महिला) अनुक्रमे या संवर्गासाठी आरक्षित झाला होता. प्रत्यक्षात या तीनही निवडणुकीत हा गट खुला असल्याचे दाखविण्यात आल्याने ही चूक झाली आहे. असाच प्रकार याच तालुक्यातील नीरावागज-डोर्लेवाडी गटाच्या बाबतीत घडला आहे. एकूण जागांपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) ८, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (एसटी) ६ आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २२ आणि खुल्या संवर्गासाठी ४६ जागा कायम राहणार आहेत. एकूण जागांपैकी प्रवर्गनिहाय निम्म्या जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या ८२ गटांची आरक्षण सोडत जाहीर

पुणे जिल्हा परिषदेच्या ८२ गटांची आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये आंबेगाव, खेड, मुळशीमध्ये बहुतांश जागा महीलांसाठी राखीव झाल्याने या तालुक्यांमध्ये महिला लोकप्रतिनिधींचे महिलाराज येणार असून तर भोर, वेल्हा तालुक्यात मात्र एकही जागा महिलांसाठी राखीव झाली नसल्याने या ठिकाणी महिला लोकप्रतिनिधीं आरक्षणात स्थान मिळाले नाही. आंबेगाव तालुक्यात 5 पैकी 4 गट महीलांसाठी राखीव झाले आहेत तर खेड तालुक्यात 9 पैकी 7 गट महीलांसाठी राखीव झाले आहेत. आणि मुळशी तालुक्यात 4 पैकी 3 गट महीलांसाठी राखीव झाले आहेत त्यामुळे येथील प्रस्थापित पुरुष राजकीय मंडळीना त्यांच्या परिवारातील महिलांच्या माध्यमातून राजकारण करावे लागणार आहे. भोर, वेल्हा तालुक्यात एकही गटात महिलांसाठी राखीव झाला नसल्याने येथील महीला लोकप्रतिनिधींना राजकीय पक्षाच्या उमेदवारीवर अवलंबून राहावे लागणार आहे राजकीय पक्षांनी डवले तर महीलांचे राजकीय अस्तित्व या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राहणार नाही. पुणे जिल्हा परिषदेच्या ८२ गटांमध्ये 50 टक्के जागा महीलांसाठी राखीव असून त्यामध्ये सर्वसाधारण संवर्गातून एकूण जागा ४६ पैकी २३ महिला तर अनुसूचित जाती संवर्गातून एकूण जागा आठ पैकी चार महिला, तसेच अनुसुचित जमाती संवर्गातून एकूण जागा सहा पैकी तीन महिला तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) संवर्गातून एकूण जागा २२ पैकी ११ गट महिलांसाठी राखीव आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांचा गट हा अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाला आहे, तर माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचा गट हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाल्याने त्यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे आहे. या सोडतीतून जिल्हा परिषद गटांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, शरद लेंडे, माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, प्रवीण माने, माजी कृषी सभापती सुजाता पवार, बाबुराव वायकर, मावळत्या सभागृहातील शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर आदींचे आरक्षण सोडतीमध्ये यांचे गट राखीव झाल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी सात जागा वाढल्याने नव्या सभागृहात ८२ सदस्य निवडून येणार आहेत. मावळत्या सभागृहात ही संख्या ७५ इतकी होती. एकूण ८२ सदस्यांपैकी विविध प्रवर्गातील मिळून एकूण ४१ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेतील महिला सदस्यांची संख्या तीनने वाढणार आहे. दरम्यान २ ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना सादर केल्या जातील. त्यानंतर जिल्हाअधिकारी डॉ. राजेश देशमुख त्याच्यावर सुनावणी घेऊन ५ ऑगस्ट रोजी आरक्षण अंतिम केले जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत गुरुवारी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद निवडणूक शाखेचे समन्वयक, उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारीवर्ग आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषदेच्या ८२ गटांची आरक्षण सोडत खालीलप्रमाणे

गट क्र.

पुणे जिल्हा परिषद गटाचे नाव

तालुका

आरक्षण तपशील

1

डिंगोरे-उदापूर

जुन्नर

सर्वसाधारण

2

खामगाव - तांबे

सर्वसाधारण

3

पाडळी-येणेरे

सर्वसाधारण (महिला)

4

धालेवाडी तर्फे हवेली - सावरगाव

सर्वसाधारण (महिला)

5

ओतूर - उंब्रज

नागरिकांचा मागास प्रवर्ग

7

राजुरी-बेल्हे

सर्वसाधारण (महिला)

8

बोरी बुद्रुक-खोडद

अनुसूचित जमाती (महिला)

9

नारायणगाव- वारुळवाडी

नागरिकांचा मागास प्रवर्ग

10

शिनोली-बोरघर

आंबेगाव

सर्वसाधारण (महिला)

11

आंबेगाव- पेठ

सर्वसाधारण (महिला)

12

कळंब-चांडोली बुद्रूक

अनुसूचित जमाती (महिला)

13

पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक - जारकरवाडी

सर्वसाधारण (महिला)

14

अवसरी बुद्रुक - पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे

अनुसूचित जमाती

15

टाकळी हाजी- कवठे येमाई

शिरूर

नागरिकांचा मागास प्रवर्ग

16

शिरूर ग्रामीण- निमोणे

अनुसूचित जमाती

17

कारेगाव- रांजणगाव गणपती

सर्वसाधारण

18

करंदी-कान्हूर मेसाई

सर्वसाधारण

19

सणसवाडी- कोरेगाव भीमा

सर्वसाधारण (महिला)

20

तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर

नागरिकांचा मागास प्रवर्ग

21

न्हावरा- निमगाव म्हाळुंगी

सर्वसाधारण

22

वडगाव रासाई- मांडवगण फराटा

अनुसूचित जमाती

23

नायफड- अवदर

खेड

नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला

24

वाडा- सातकरस्थळ

सर्वसाधारण

25

रेटवडी- कन्हेरसर

सर्वसाधारण (महिला)

26

पिंपळगाव तर्फे खेड -काळूस

सर्वसाधारण (महिला)

27

कडूस - शिरोली

सर्वसाधारण (महिला)

28

पाईट - पिंपरी बुद्रुक

सर्वसाधारण (महिला)

29

म्हाळुंगे- आंबेठाण

नागरिकांचा मागास प्रवर्ग

30

नाणेकरवाडी- मेदनकरवाडी

नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला

31

कुरुळी-मरकळ

नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला

32

टाकवे बुद्रुक- नाणे

मावळ

सर्वसाधारण

33

खडकाळे-वराळे

अनुसूचित जाती

34

कुरवंडे - कार्ला

सर्वसाधारण (महिला)

35

कुसगाव बुद्रुक-सोमाटणे

सर्वसाधारण (महिला)

36

चांदखेड-काले

सर्वसाधारण (महिला)

37

इंदुरी-तळेगाव दाभाडे ग्रामीण

नागरिकांचा मागास प्रवर्ग

38

कोळवण-माले

मुळशी

नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला

39

हिंजवडी - कासारसाई

सर्वसाधारण (महिला)

40

माण-कासार अंबोली

सर्वसाधारण

41

पिरंगुट-भुगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला

42

पेरणे- लोणीकंद

हवेली

नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला

43

वाडेबोल्हाई-कोरेगाव मूळ

सर्वसाधारण

44

ऊरळीकांचन- सोरतापवाडी

सर्वसाधारण (महिला)

45

कदमवाकवस्ती - थेऊर

सर्वसाधारण (महिला)

46

लोणीकाळभोर -कुंजीरवाडी

नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला

47

खेड शिवापूर- खानापूर

सर्वसाधारण

48

राहू-खामगाव

दौंड

सर्वसाधारण

49

पारगाव-पिंपळगाव

अनुसूचित जाती (महिला)

50

गोपाळवाडी-कानगाव

सर्वसाधारण

51

लिंगाळी-देऊळगावराजे

सर्वसाधारण

52

खडकी-राजेगाव

अनुसूचित जाती (महिला)

53

पाटस-कुरकुंभ

सर्वसाधारण

54

वरवंड-बोरीपार्धी

सर्वसाधारण

55

यवत-बोरीभडक

नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला

56

गराडे - दिवे

पुरंदर

सर्वसाधारण (महिला)

57

पिसर्वे- माळशिरस

सर्वसाधारण

58

कोळविहीरे - बेलसर

सर्वसाधारण (महिला)

59

मांडकी-परिंचे

सर्वसाधारण

60

नीरा शिवतक्रार - वाल्हे

सर्वसाधारण (महिला)

61

विंझर-पानशेत

वेल्हे

नागरिकांचा मागास प्रवर्ग

62

वेल्हे बुद्रुक- वांगणी

सर्वसाधारण

63

वेळू-नसरापूर

भोर

नागरिकांचा मागास प्रवर्ग

64

भोंगवली- संगमनेर

सर्वसाधारण

65

भोलावडे- शिंद

सर्वसाधारण

66

कारी-ऊत्रोली

सर्वसाधारण

67

सुपा-काऱ्हाटी

बारामती

नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला

68

काटेवाडी- शिर्सूफळ

नागरिकांचा मागास प्रवर्ग

69

गुणवडी-पणदरे

अनुसूचित जाती (महिला)

70

मोरगाव- मुढाळे

सर्वसाधारण (महिला)

71

निंबूत-वाघळवाडी

नागरिकांचा मागास प्रवर्ग

72

वडगाव निंबाळकर - सांगवी बुद्रुक

अनुसूचित जाती

73

नीरावागज-डोर्लेवाडी

अनुसूचित जाती (महिला)

74

भिगवण- शेटफळगढे

इंदापूर

सर्वसाधारण (महिला)

75

अंथुर्णे-बोरी

नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला

76

पळसदेव- बिजवडी

नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला

77

वडापुरी-माळवाडी

अनुसूचित जाती

78

निमगाव केतकी- शेळगाव

सर्वसाधारण

79

सणसर- बेलवडी

सर्वसाधारण (महिला)

80

लासुर्णे-वालचंदनगर

नागरिकांचा मागास प्रवर्ग

81

काटी- वरकुटे खुर्द

अनुसूचित जाती

82

बावडा-लुमेवाडी

सर्वसाधारण


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.