Friday 22 July 2022

पुणे महापालिका निवडणूक-2022; ओबीसींच्या नव्याने आरक्षण सोडतीमुळे राजकीय गणिते बदलणार

46 जागांवर ओबीसींचे आरक्षण; अनु.जाती-जमातीच्या 24 प्रभागात 13 जागांसाठी सोडत!


पुणे- पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक-2022 करिता आरक्षण सोडतीसह अंतिम प्रभाग रचना होऊन अंतिम मतदारयादी देखील निश्चित करण्यात आलेली असताना ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुनर्स्थापित करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. यापूर्वी सोडत काढलेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या सोडत निश्चितीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र सर्वच 58 प्रभागांत ओबीसींचे आरक्षण सोडत काढण्यात येणार असून त्यामध्ये अनु.जाती-जमातीच्या 24 प्रभागात 12 जागांसाठी तर उर्वरित 34 प्रभागांमध्ये 34 जागांसाठी ओबीसींकरीता आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. ओबीसींच्या नव्याने आरक्षण सोडतीमुळे राजकीय गणिते बदलणार असून लोकप्रतिनिधींमध्ये धाकधूक वाढली आहे. आरक्षण सोडतीवर उमेदवारी व पुढील राजकीय रणनीती अवलंबून असल्याने संभाव्य सोडतीवरील चर्चांना उधाण आले आहे. पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील एकूण 173 सदस्यांमध्ये 46 जागांसाठी ओबीसींचे आरक्षण असणार आहे. यामध्ये 50 टक्के महीलांसाठी जागा राखीव असणार आहे.पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग आहे. 58 प्रभागांपैकी 57 प्रभागात तीन सदस्य आहेत. तर एका प्रभागात दोन सदस्य आहेत. 173 जागांपैकी 87 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीच्या 23 जागांपैकी 12 जागा महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत. तर अनुसूचित जमातीच्या 2 जागांपैकी 1 जागा महिलेसाठी आरक्षीत आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या 24 प्रभागांमध्ये आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे आता उर्वरित 34 प्रभागातून ओबीसीचे आरक्षण काढले जाणार आहे. 46 जागांसाठी 34 प्रभागातील प्रत्येकी एक जागा ओबीसी आरक्षणासाठी राखीव केली जाईल. उर्वरित 14 जागांसाठी अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण पडलेल्या प्रभागातून ओबीसीची सोडत काढली जाईल. महापालिकेच्या 173 जागांपैकी 46 जागा या ओबीसी साठी आरक्षित असतील. यापूर्वी महापालिकेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या 25 जागांवरील आरक्षण निश्चित झालेले आहे. आता उर्वरित 148 जागांमधून ओबीसींचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे खुल्या गटातील उमेदवारांच्याही जागांची अदलाबदल होणार आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीची अंतिम मतदार यादी काल जाहीर होणार होती, मात्र अद्यापही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली नाही. निवडणूक शाखेकडून कोणत्या प्रभागातील किती मतदार बदलले याची यादी रात्री जाहीर केली त्यानुसार महापालिकेसाठी अंतिम मतदारांची संख्या ३४ लाख ५४ हजार ६३९ इतकी आहे. प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोळ असल्याचे निदर्शनास आले. अनेक नागरिकांचे प्रभाग बदलले गेले, अर्धवट नाव, अर्धवट पत्ता, फोटो नसणे अशी अनेक बोगस नावे सुद्धा या मतदार यादीत आढळून आली. सर्वच प्रभागात हा घोळ झाल्याने ५ हजार ५४६ हजार हरकती व सूचना निवडणूक आयोगाकडे नोंदविण्यात आल्या होत्या त्याची पालिकेने दाखल घेऊन अंतिम मतदार यादी तयार करण्यात आलेली असून सर्वाधिक कमी मतदार असलेला प्रभाग क्र. 24 मगरपट्टा-साधना विद्यालय असून त्यामध्ये प्रारूप मतदार यादीनुसार मतदारसंख्या 34080 इतकी होती मात्र अंतिम मतदारसंख्या कमी होऊन आता 33825 मतदार इतकी आहे. तर सर्वाधिक मतदारसंख्या असलेला प्रभाग क्र.12 औंध-बालेवाडी असून त्यामध्ये प्रारूप मतदार यादीनुसार मतदारसंख्या 81603 इतकी होती मात्र अंतिम मतदारसंख्या कमी होऊन आता 82504 मतदार इतकी आहे.

महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी २९ जुलै रोजी आरक्षण सोडत

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, राज्यातील १३ महापालिकांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आणि सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी २९ जुलै रोजी सोडत काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या आदेशामुळे आरक्षण सोडत झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून सप्टेंबर अखेर निवडणुका होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत प्रशासकराजची सहा महिन्यांची मुदत १४ सप्टेंबर रोजी संपत आहे. अशावेळी २२ जुलै रोजीच निवडणूक आयोगाने राज्यातील १३ महापालिकांना २९ जुलै रोजी ओबीसी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठीच्या जागांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत. या सोडतीनंतर ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचना मागवून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण तक्ता ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्याचे नमूद केले आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्याने २३ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी समाजातील महिला व खुल्या जागा तसेच सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली होती. पुणे महापालिकेत २३ जागा एस.सी. साठी रिझर्व्ह असून त्यापैकी १२ जागा या एससी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर दोन जागा एसटी समाजासाठी राखीव आहेत. एससी व एसटी समाजासाठीचे आरक्षण २०११ च्या जनगणनेनुसार ठेवण्यात आल्याने मतदार यादीमध्ये बदल झाले तरी, यापूर्वी काढण्यात आलेल्या सोडतीनुसारच त्या जागा आरक्षित राहणार आहेत. परंतु आता २७ टक्के ओबीसी आरक्षणामुळे पुणे महापालिकेमध्ये 46 जागा या ओबीसी प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. यामुळे ओबीसी प्रवर्गासोबतच महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढावी लागणार आहे.

एकूण जागा -173
महिलांसाठी राखीव - 87
एससी प्रवर्गासाठी राखीव -23 (12 महिला)
एसटी प्रवर्गासाठी राखीव - 2 (1 महिला)
ओबीसी प्रवर्ग - 46 (24 महिला)
सर्वसाधारण महिला - 50
सर्वसाधारण गट - 51

पुणे महापालिका प्रभाग क्र. व नाव

प्रारूप संख्या

अंतिम मतदार

1) धानोरी-विश्रांतवाडी

51569

50597

2) टिंगरे नगर-संजय पार्क

50776

45836

3) लोहगाव-विमान नगर

71674

73837

4) पूर्व खराडी-वाघोली

64665

67052

5) पश्चिम खराडी-वडगावशेरी

70575

76336

6) वडगाव शेरी-रामवाडी

57767

49337

7) कल्याणीनगर-नागपूर चाळ

62109

61466

8) कळस-फुलेनगर

45768

47816

9) येरवडा

66666

68164

10) शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी

61633

59302

11) बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

59981

60708

12) औंध-बालेवाडी

81603

82504

13) बाणेर-सूस- म्हाळुंगे

66167

65490

14) पाषाण-बावधन बु.

66656

64781

15) गोखलेनगर-वडारवाडी

63184

64941

16) फर्ग्युसन कॉलेज-एरंडवणे

65354

65488

17) शनिवार पेठ-नवी पेठ

64649

64547

18) शनिवारवाडा-कसबा पेठ

66076

68289

20) पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता

57901

54557

21) कोरेगाव पार्क-मुंढवा

66731

61367

22) मांजरी बु.-शेवाळवाडी

64573

63781

23) साडेसतरा नळी-आकाशवाणी

51185

52848

24) मगरपट्टा-साधना विद्यालय

34080

33825

26) वानवडी गावठाण-वैदुवाडी

53081

58918

27) कासेवाडी-लोहियानगर

62508

59297

28) महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ

62212

58516

29) घोरपडे पेठ उद्यान-महात्मा फुले मंडई

58304

61423

30) जय भवानीनगर-केळेवाडी

58768

70123

31) कोथरूड गावठाण-शिवतीर्थनगर

66343

57447

32) भुसारी कॉलनी-बावधन खु.

46677

48148

33) आयडियल कॉलनी-महात्मा सोसायटी

54483

57285

34) वारजे-कोंढवे धावडे

64258

64510

35) रामनगर-उत्तमनगर, शिवणे

74916

73603

36) कर्वेनगर

65898

61296

37) जनता वसाहत-दत्तवाडी

67448

66527

38) शिवदर्शन-पद्मावती

65373

68029

39) मार्केटयार्ड-महर्षीनगर

60678

57534

40) बिबवेवाडी-गंगाधाम

46301

49542

42) रामटेकडी-सय्यदनगर

36601

49228

45) फुरसुंगी

35912

38880

46) मोहम्मदवाड -उरुळी देवाची

83412

76976

48) अप्पर सुपर-इंदिरानगर

48604

45424

49) बालाजीनगर-शंकर महाराज मठ

57333

55529

50) सहकारनगर-तळजाई

57935

58137

51) वडगाव बु.-माणिकबाग

65288

60829

52) नांदेड सिटी-सन सिटी

55420

59479

53) खडकवासला-नऱ्हे

46795

57942

54) धायरी-आंबेगाव

103959

73784

55) धनकवडी-आंबेगाव पठार

50708

59633

56) चैतन्यनगर-भारती विद्यापीठ

49144

46396

57) सुखसागर नगर-राजीव गांधी

41071

46336

58) कात्रज-गोकुळनगर

57196

63831


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.