Saturday 9 July 2022

पुणे जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीसह राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर

ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका; 18 ऑगस्टला मतदान


पु
णे जिल्ह्यातील 9 नगरपरिषद (बारामती, चाकण, दौंड, राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर) व 2 नवनिर्वाचित (मंचर, माळेगाव बुद्रुक) नगरपंचायतीसह राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार असून राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर प्रथमच निवडणुकांना राजकीय पक्षांना सामोरे जावे लागत आहे. या निवडणुकांसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे. 
 इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी १८ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यावर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे. अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, गिरीश महाजन, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांच्या मतदारसंघांत निवडणुका होत असल्याने या नेत्यांना आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील.एकीकडे नागरिकांच्या इतर मागास प्रवर्ग(ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ नयेत अशी सर्वपक्षीय भूमिका असताना राज्यातील १७ जिल्ह्यांतील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीसाठी येत्या १८ ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी केली. राज्यात सत्तांतर होताच पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ नयेत अशी मागणी सर्वच पक्षांचे नेते करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयात येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार असतानाच राज्य निवडणूक आयोगाने ९६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. कमी पर्जन्यमान असलेल्या भागांमध्ये पावसाळय़ात निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार या निवडणुका होत आहेत.या मध्ये समाविष्ट नगरपालिका पुढील प्रमाणे- अ वर्ग नगरपालिका- भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड व उस्मानाबाद ब वर्ग नगरपालिका- मनमाड, सिन्नर, येवला, दोंडाईचा वरवाडे, शिरपूर वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव सुर्जी, क वर्ग नगरपालिका- चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर, वरणगाव, धरणागाव, एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल, जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी, राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर, म्हसवड, रहिमतपूर, वाई, आष्टा, तासगाव, पलूस, मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव, गंगापूर, खुलताबाद, अंबड, भोकरदन, परतूर, गेवराई, किल्लेधारुर, भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर, औसा, निलंगा, दर्यापूर, देउळगावराजा, नगरपंचायती- नेवासा, मंचर, माळेगाव बुद्रुक, अनगर यांचा समावेश आहे. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर केली जाणार असून 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम

जिल्हाधिकारी कार्यक्रम जाहीर करणार : २० जुलै
उमेदवारी अर्ज उपलब्ध : २२ ते २८ जुलै
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २२ ते २८ जुलै
अर्जाची छाननी : २९ जुलै
अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ ऑगस्ट दुपारी ३ पर्यंत
उमदेवारी अर्जावरील आक्षेप : ८ ऑगस्ट
मतदानाचा दिनांक : १८ ऑगस्ट
मतमोजणी आणि निकाल : १९ ऑगस्ट

जिल्हानिहाय नगरपालिकांची यादी

अ वर्ग नगरपालिका

पुणे : बारामती
सोलापूर : बार्शी
जालना : जालना
बीड : बीड
उस्मानाबाद : उस्मानाबाद
जळगाव : भुसावळ

ब वर्ग नगरपालिका

नाशिक : मनमाड, सिन्नर, येवला
धुळे :दोंडाईचा बरवाडे, शिरपूर वरवाडे
नंदूरबार : शहादा
जळगाव : अमळनेर, चाळीसगाव
अहमदनगर : संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर
पुणे : चाकण, दौंड
सातारा : कराड, फलटण
सागंली : इस्लामपूर, विटा
सोलापूर : अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज
कोल्हापूर : जयसिंगपूर
औरंगाबाद : कन्नड पैठण
बीड : अंबेजोगाई, माजलगाव, परळी-वैजनाथ
लातूर : अहमदपूर
अमरावती : अंजनगाव सूर्जी

क वर्ग नगरपालिका

नाशिक : चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर
जळगाव : वरणगांव, धरणगाव, एंरणडोल, फैजपूर, पारोळा, यावस
अहमदनगर : जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी,
पुणे : राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर
सातारा : म्हसवड, रहितमपूर, वाई
सांगली : आष्टा, तासगाव, पलूस,
सोलापूर : मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डूवाडी, मंदगी, मंगळवेढा, सांगोला
कोल्हापूर : गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव
औरंगाबाद : गंगापूर, खुल्ताबाद,
जालना: अंबड, भोकरदन, परतूर
बीड : गेवराई, किल्ले धारुर
उस्मानाबाद : भूम, कळंब, मुरुम, नळदूर्ग, उमरगा, परंडा, तुळजापूर
लातूर : औसा, निलंगा,
अमरावती : दर्यापूर
बुलडाणा : देऊळगाव राजा

नगरपंचायत निवडणूक

अहमदनगर : नेवासा
पुणे : मंचर, माळेगाव बुद्रुक
सोलापूर : अनगर

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.