Saturday, 17 January 2026

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026; महाराष्ट्राच्या सर्व 29 महापालिकांचे पक्षनिहाय निकाल

 23 महापालिकांमध्ये भाजपचा झंझावात




बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निकालात मोठा उलटफेर झाला. महायुतीने येथे 112 जागा मिळवल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपने 90 जागा मिळवल्या. तर शिंदेंची शिवसेना 22 जागांवर थांबली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 65 तर मनसेला 8 जागा मिळाल्या. काँग्रेसला 24 जागा तर AIMIM ला 8 जागा मिळाल्या.
पुणे महानगरपालिका (PMC) निकाल समोर आले आहे. पवारांच्या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला. एकूण 165 जागांपैकी भाजपला 120 जागा तर तर शिंदेसेनेला इथं खातं उघडता आलं नाही. तर दोन्ही राष्ट्रवादीला एकत्रित 29 जागा मिळाल्या. काँग्रेस 15 ठिकाणी विजयी झाली. 
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील (PCMC)एकूण 128 जागांपैकी भाजपने 84 जागांवर विजय मिळवला. शिंदे सेनेला 6 जागा, तर दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकूण 37 जागा मिळवता आल्या. एक जागा अपक्षाला मिळाली.
कल्याण-डोंबिवली - एकूण 122 जागा असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) निकालात भाजपला 50, शिंदेसेनेला 54, उद्धवसेनेला 10, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, मनसेला 5 तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या.
ठाणे महापालिका- एकूण 131 जागांच्या ठाणे महानगरपालिकेत (TMC) भाजप 28 जागा, तर एकनाथ शिंदे यांना 75 जागा मिळाल्या. उद्धवसेनेला दोन तर मनसेला अवघी एक जागा मिळाली. अपक्षाने एक जागा हिसकावली. 
नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) एकूण 111 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत गणेश नाईकांच्या वक्तव्याने रंगत आणली होती. इथं भाजपला 65 जागा तर शिंदे सेनेला 42 जागांवर विजय मिळाला. तर उद्धवसेना दोन जागांवर आणि मनसे एका ठिकाणी विजयी झाली. 
वसई-विरार महानगरपालिका (VVMC)-115 जागा असलेली वसई विरार महानगरपालिकेत हिंतेंद्र ठाकूर यांनी मोठी मुसंडी मारली. बहुजन विकास आघाड़ीने (BVA) 71 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर भाजपच्या पारड्यात 43 जागा पडल्या.
पनवेल महानगरपालिकेच्या (PMMC) निकालात भाजपचा दबदबा दिसून आला. एकूण 78 जागांपैकी 55 जागांवर भाजप विजयी झाली तर शिंदेसेना दोन ठिकाणी विजयी झाली. उद्धवसेनेला 5, काँग्रेसला 4 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेत (MBMC) भाजपने मोठा विजय मिळवला. एकूण 95 जागांमध्ये 78 जागा भाजपला मिळाल्या. काँग्रेसला 13 तर शिंदेसेनेला 3 जागांवर समाधान मानावं लागलं. अपक्षाला एक जागा मिळाली. 
उल्हासनगर महानगरपालिकेत (UMC)महायुतीचं पारडं जड भरलं. इथं भाजपला 37 तर एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेला 36 जागा मिळाल्या. एक जागा काँग्रेसला तर इतर पक्षांना तीन जागा मिळाल्या. 
भिवंडी-निजामपुर महानगरपालिका (BNMC) निकालात काँग्रेसने सर्वांना मोठा धक्का दिला. काँग्रेसला इथं 30 जागा मिळाल्या तर त्या खालोखाल भाजपला 22 तर शिंदे सेनेला 12 जागा मिळाल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 12 जागांवर विजय मिळवता आला.
नाशिक महानगरपालिका (NMC) -एकूण 122 जागांपैकी इथं 72 जागांवर भाजपनं मुसंडी मारली. तर शिंदेसेनेला 26 जागा आणि उद्धव सेनेला 15, मनसेला एका जागेवर समाधान मानावं लागले. काँग्रेसला तीन जागा, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या.
जळगाव महानगरपालिकेत (JMC) एकूण 75 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 46 जागा खिश्यात घातल्या. तर शिंदेसेनेला 22 जागा मिळाल्या. उद्धव सेना पाच तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळाली. 
मालेगाव महानगरपालिकेत इस्लामिक पक्षाने मोठी मुसंडी मारली. इतरांसह या पक्षाने 40 जागा घेतल्या. एमआयएमला 21 जागा मिळाल्या. तर शिंदेसेनेला 18 जागा, भाजपला दोन, काँग्रेसला तीन जागा मिळाल्या.
कोल्हापुर महानगरपालिकेत (KMC) काँग्रेसने हाबाडा दिला. पण सत्ता स्थापनेपासून हा पक्ष दूर दिसतो. एकूण 81 जागांपैकी काँग्रेसने 34 ठिकाणी विजय मिळवला. तर भाजपने 26, एकनाथ शिंदे सेनेला 15, उद्धव सेनेला एक, अजितदादांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या.
सोलापुर महानगरपालिका (SMC) निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. एकूण 102 जागांपैकी 87 जागा भाजपला मिळाल्या. तर शिंदेसेनेला चार जागा मिळाल्या. काँग्रेसला दोन, अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक तर एआयएमआयएमला आठ जागा मिळाल्या.
अमरावती महानगरपालिकेत (AMC) भाजपला त्याचा मित्र पक्ष युवा स्वाभिमानी चांगलाच नडला. एकूण 87 जागांपैकी भाजपला 25 तर युवा स्वाभिमानी आणि काँग्रेसला प्रत्येकी 15 जागा मिळाल्या. शिंदेसेनाला तीन तर उद्धव सेनेला दोन जागा मिळाल्या. अजितदादांच्या राष्ट्रवादीला 11 तर एमआयएमला 12 जागांवर विजय मिळाला.
जालना महानगरपालिका (JMC) निवडणुकीत भाजपने तुफान बॅटिंग केली. एकूण 65 जागांपैकी भाजपने 41 जागा खिश्यात घातल्या. शिंदेंच्या शिवसेनेला 12 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला 9 जागांवर विजय मिळाला. 
छत्रपति संभाजीनगर महानगरपालिकेत (CSMC) पहिल्यांदाच एका पक्षाच्या हाती जनतेने सत्ता दिली. भाजपने इथं 57 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर शिंदेसेनेला 13 जागा मिळाल्या. उद्धवसेना अवघ्या 6 जागांवर तर काँग्रेस आणि अजितदादाची राष्ट्रवादी एका एका जागेवरच थांबली. त्यानंतर एमआयएमने करिष्मा दाखवला. एमआयएमला 33 जागा मिळाल्या.
लातूर महापालिकेत काँग्रेसने गढी राखली. इथं काँग्रेसने भाजपला चांगलीच धोबीपछाड दिली. काँग्रेसला सर्वाधिक 43 जागांवर विजय मिळाला. तर भाजपला 22 जागांवर समाधान मानावं लागलं. वंचितला 4 जागा तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. तर परभणीत उद्धवसेनेने 25 जागांवर मुसंडी मारली. काँग्रेसला 12 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 11 जागा मिळाल्या.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका (SMKMC) निकालात भाजपचा झंझावात दिसला. एकूण 78 जागांच्या महापालिकेत भाजपने 39 जागांसह दणदणीत विजय मिळवला. तर काँग्रेसला 18 जागा, अजित पवार NCP 16, शरद पवार NCP 3 तर शिंदेसेनेला अवघ्या 2 जागा मिळाल्या. तर इचलकरंजीमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. येथील 65 जागांपैकी भाजपने 43 जागा मिळवल्या. इतर पक्ष 17 शिंदेसेना ३, उद्धव सेनेला एक जागा मिळाली.
अहिल्यानगर महानगरपालिका (AMC)-एकूण 68 जागांपैकी अजित पवार यांची राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरली. इथं अजित पवार NCP ला 27 जागा मिळाल्या. तर त्यानंतर भाजपला 25 जागा तर एकनाथ शिंदे शिवसेनेला 10 जागा मिळाल्या. उद्धव सेना एक तर काँग्रेसला दोन जागांवर यश मिळाले. 
नागपुर महानगरपालिकेच्या (NMC) एकूण 151 जागांपैकी भाजपने 102 अशी मोठी मुसंडी मारली. तर उद्धवसेनेला दोन आणि शिंदेसेनेला एक जागा मिळाली. काँग्रेसला इथं 34 जागा मिळाल्या. अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. इतर पक्षांना 11 जागा मिळाल्या.
चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण 66 जागांपैकी 23 जागा भाजपला तर सर्वाधिक 27 जागा काँग्रेसला मिळाल्या. उद्धवसेनेच्या खात्यात सहा जागा, तर शिंदेसेनेला एक जागा मिळाली. एमआयएमला एक जागा तर इतरांना 6 जागा मिळाल्या.
अकोला महापालिकेत भाजप मोठा भाऊ ठरला.  भाजपने 38 जागा मिळवल्या. तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या. उद्धवसेना सहा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागेल.
नांदेड-वाघाळा महापालिकेत 81 पैकी 45 जागांवर भाजपनं दणदणीत विजय मिळवला. तर त्यापाठोपाठ एमआयएम 14, काँग्रेस 10, अजितदादांची राष्ट्रवादी दोन आणि इतरांना पाच जागा मिळाल्या.

======
PMC, PCMC ELECTION FIRST EXIT POLL| PRAB SURVEY:
पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा पहिला EXIT POLL
TOP NEWS MARATHI

===================

Pimpri-Chinchwad:‘प्राब’च्या एक्झिट पोलनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष
===================

PMC Election 2026 : पुणे महापालिकेत भाजप बहुमताच्या जवळ; राष्ट्रवादी, काँग्रेसला मोठा धक्का; ‘प्राब’च्या एक्झिट पोलचा अंदाज ; वाचा सविस्तर निकाल!

https://www.youtube.com/live/N7ofmupmXkU
===================

===================
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

======

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.