मावळ तालुक्यात जि.प. गटासाठी २७, पंचायत समिती गणासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल
वडगाव मावळ : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटासाठी २७, तर पंचायत समितीच्या १० गणांसाठी ५२ अर्ज दाखल झाले. माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी ही माहिती दिली. अर्ज दाखल करताना पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनदेखील केले. या सर्वच गटांत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये खडाजंगी रंगणार असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या टाकवे- नाणे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गटात ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. खरी लढत भाजप व राष्ट्रवादीमध्ये (अजित पवार) होणार आहे आहे. इंदुरी- वराळे सर्वसाधारण महिला आरक्षित असून या गटात ४ अर्ज दाखल झाले आहेत. येथे मुख्य लढत भाजप व राष्ट्रवादी पक्षात आहे. कार्ला खटकाळे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून गटात ४ उमेदवारांनी अर्ज केले दाखल असून लढत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जंगी सामना रंगू शकतो.
कुसगाव- काले सर्वसाधारण गटासाठी राखीव असून या गटात ७ अर्ज दाखल झाले आहेत, तर सोमाटणे-चांदखेड सर्वसाधारण महिला राखीव असून या गटात ६ अर्ज दाखल झाले आहेत. येथे अटीतटीची लढत ही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये असेल. वराळे व सोमाटणे गणात सर्वाधिक अर्ज दाखलपंचायत समितीच्या गणासाठी वराळे व सोमाटणे गणामध्ये सर्वाधिक ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नाणे व चांदखेड गणात प्रत्येकी ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. टाकवे बुद्रुक गणात ४, नाणे गणात ३, वराळे गणात ८, इंदुरी गणात ६, खटकाळे गणात ५, कार्ला गणात ५, कुसगाव बुद्रुक गणात ५, काले गणात ५, सोमाटणे गणात ८, चांदखेड गणात ३, असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे
टाकवे - बु. - नाणे गट - अनंता हनुमंत पावशे (खांडी)
वराळे - इंदुरी - पल्लवी संदीप दाभाडे (माळवाडी)
खंडकाळे - काले - दीपाली दीपक हुलावळे (काले)
कुसगाव बु. - काले - संतोष गबळू राऊत (कुसगाव बु.)
सोमाटणे चांदखेड - मनीषा नितीन मुहे (सोमाटणे)
राष्ट्रवादीचे मावळ पंचायत समिती गणनिहाय अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे
टाकवे बुद्रुक - प्राची देवा गायकवाड
नाणे - आशा ज्ञानेश्वर मोरमारे
वराळे - राजेंद्र कडलक
इंदुरी - दिलीप नामदेव ढोरे
खंडकाळे - समीर खंडू जाधव
कार्ला - रेश्मा राजू देवकर
कुसगाव बु. - योगेश मुरलीधर लोहोर
काले - शैला रामचंद्र कालेकर
सोमाटणे - साहेबराव नारायण कारके
चांदखेड - सुनीता मनोहर येवले
भाजपने (शिवसेना युती) पुणे जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे
टाकवे बु - नाणे गट : मधुकर लहू कोकाटे
वराळे - इंदोरी गट : मेघा प्रशांत भागवत
खडकाळा - कार्ला गट : आशा बाबुराव वायकर
कुसगाव - काले गट : दत्तात्रय शंकर गुंड
सोमाटणे - चांदखेड गट : शीतल अविनाश गराडे
भाजपने (शिवसेना युती) मावळ पंचायत समिती गणनिहाय अधिकृत उमेदवार
टाकवे बु. गण : अश्विनी सोमनाथ कोंडे
नाणे गण : संगीता ज्ञानेश्वर आढारी
इंदोरी गण : श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे
वराळे गण : रविंद्र निवृत्ती शेटे
कार्ला गण : रंजना सुरेश गायकवाड
खडकाळा गण : प्रकाश बाबूराव गायकवाड
कुसगाव गण : नवनाथ पांडुरंग हरपुडे
काले गण : शीला मुकुंद ठाकर
सोमाटणे गण : बाळासाहेब नथू पारखी
चांदखेड गण : सुवर्णा बाळासाहेब घोटकुले
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
================================================
"महाराष्ट्रातील राजकारण"
"महाराष्ट्रातील राजकारण"
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
==================================================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.