सिंधुदुर्गातील कोकीसरे मतदारसंघातून साधना सुधीर नकाशे यांची बिनविरोध निवड
नगरपरिषदा, महापालिका निवडणुकीतील बिनविरोधचा फंडा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडीमध्ये भाजपने आपले खातं उघडलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ही पहिलीच बिनविरोध निवड ठरली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने कोकीसरे मतदारसंघातून साधना सुधीर नकाशे या बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भाजपने वैभववाडी पंचायत समितीत आपले खाते उघडले. भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या या पत्नी आहेत. हा विजय केलेल्या विकास कामांचा विजय असल्याची भावना यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कोकिसरे मतदारसंघातून भाजपतर्फे साधना सुधीर नकाशे यांनी दोन अर्ज भरले होते, तर अक्षता सूर्यकांत डाफळे यांनी भाजपचा डमी अर्ज सादर केला होता. मात्र या मतदारसंघातून ठाकरे सेना, मनसे किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नाही. इतर कोणत्याही पक्षाचा किंवा अपक्षाचा अर्ज न आल्याने नकाशे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या विजयानंतर वैभववाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधून जिल्हा परिषदेसाठी २७३, तर पंचायत समितीसाठी ४४० असे एकूण ७१३ उमेदवारी अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधून जिल्हा परिषदेसाठी २७३, तर पंचायत समितीसाठी ४४० असे एकूण ७१३ नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण ५० जिल्हा परिषद गट आणि १०० पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक ६० आणि पंचायत समितीसाठी १०१ अर्ज आले असून येथे मोठी राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. तर वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यात जागांच्या संख्येनुसार अर्जांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी, सर्वच जागांसाठी उमेदवारांनी उत्साह दाखवला आहे.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
================================================
"महाराष्ट्रातील राजकारण"
"महाराष्ट्रातील राजकारण"
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
==================================================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.