Wednesday, 21 January 2026

Maharashtra Municipal Corporation Reservation 2026; महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर ; पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण

वर्षाताई तापकीर होणार पुण्याच्या महापौर!

राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज


राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. 50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला , तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिक, धुळे, मालेगाव या महापालिकांवर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघाली. या पालिकांवर ओपन प्रवर्गातील महापाैर असणार आहे. 

वर्षाताई तापकीर होणार पुण्याच्या महापौर!
सलग दुसऱ्यांदा पुणे महापालिकेत भाजपला घवघवीत यश मिळाले असून महापौर पद कोणाला मिळणार याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात होत होती मात्र सर्व आरक्षणावर अवलंबून होते. आरक्षण जाहीर होताच संभाव्य महापौर पदासाठी  भाजपकडून ६ महिला नगरसेवकांची नावे आघाडीवर आहेत त्यामध्ये सर्वाधिक वर्षाताई तापकीर यांचे नाव आघाडीवर असून त्यांना प्रथम मान मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रभारी भाजपा महिला मोर्चा पुणे शहर व सरचिटणीस म्हणून देखील कार्य केलेले आहे. प्रभाग_क्र_३७_धनकवडी_आंबेगाव_पठार प्रभागातून त्यांनी सलग विजय मिळविलेला आहे. 

पुणे महानगर पालिकेसाठी महापौरपदासाठी भाजपकडून ६ महिला नगरसेवकांची नावे आघाडीवर आहेत. त्यामध्ये वर्षाताई तापकीर, रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे यांच्या नावाचा समावेश आहे. मा मंजुषा नागपुरे यांनी यंदाच्या महापालिकेत बिनविरोध विजय मिळवला होता. रंजना टिळेकर या आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत त्यांची ही सहावी टर्म आहे. त्यामुळे त्यांचेही नाव महापौरपदासाठी जोरदार चर्चेत आहे. पुणे महापालिकेत यापूर्वी २०१२ आणि २०१७ या निवडणुकांमध्ये महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण होते. मात्र, यंदा सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. यामुळे महापालिकेच्या नेतृत्वात महिला सत्तेची संधी निर्माण झाली आहे.

दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. दोन्ही महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झालं होतं. तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली होती. राज्यातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी 8, आणि सर्वसाधारण 17 प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आहे.  कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे, याबाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे. 

महाराष्ट्रातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण-
अनुसूचित जमाती - 1 
अनुसूचित जाती - 3 
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - 8 
सर्वसाधारण - 17

कोणत्या महापालिकेसाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण? (Municipal Corporation Reservation 2026)

विभाग

महानगरपालिका

आरक्षणाचा प्रवर्ग

आरक्षण (महिला/खुला)

कोकण

मुंबई (BMC)

सर्वसाधारण (Open)

महिला

 

ठाणे

अनुसूचित जाती (SC)

खुला

 

नवी मुंबई

सर्वसाधारण (Open)

महिला

 

कल्याण-डोंबिवली

अनुसूचित जमाती (ST)

खुला

 

उल्हासनगर

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

खुला

 

मिरा-भाईंदर

सर्वसाधारण (Open)

महिला

 

भिवंडी-निजामपूर

सर्वसाधारण (Open)

खुला

 

वसई-विरार

सर्वसाधारण (Open)

खुला

 

पनवेल

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

खुला

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सर्वसाधारण (Open)

महिला

 

पिंपरी-चिंचवड

सर्वसाधारण (Open)

खुला

 

सोलापूर

सर्वसाधारण (Open)

खुला

 

कोल्हापूर

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

खुला

 

सांगली-मिरज-कुपवाड

सर्वसाधारण (Open)

खुला

 

इचलकरंजी

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

खुला

उत्तर महाराष्ट्र

नाशिक

सर्वसाधारण (Open)

महिला

 

अहिल्यानगर

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

महिला

 

धुळे

सर्वसाधारण (Open)

महिला

 

जळगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

महिला

 

मालेगाव

सर्वसाधारण (Open)

महिला

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर

सर्वसाधारण (Open)

खुला

 

नांदेड-वाघाळा

सर्वसाधारण (Open)

खुला

 

लातूर

अनुसूचित जाती (SC)

महिला

 

परभणी

सर्वसाधारण (Open)

खुला

 

जालना (नवनियुक्त)

अनुसूचित जाती (SC)

महिला

विदर्भ

नागपूर

सर्वसाधारण (Open)

महिला

 

अमरावती

सर्वसाधारण (Open)

खुला

 

अकोला

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

महिला

 

चंद्रपूर

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)

महिला

 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.