Friday, 10 February 2017

pmc election 2017 महानगरपालिका निवडणूकीत भाजपकडून करोडपती उमेदवारांना प्राधान्य

पुणे महानगरपालिका निवडणूकीत  भाजपकडून करोडपती उमेदवारांना प्राधान्य



भारतीय जनता पार्टीने पुणे महापालिका निवडणुकीत सर्वाधिक संपत्ती असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. करोडपती असलेले 105 उमेदवार  आहेत. तर गुन्हे दाखल व प्रलंबित असलेल्या 30 जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तसेच सामाजिक आरक्षणाचे संतुलन राखताना सर्व जाती घटकांना सामावून घेण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस ब्युरो (प्राब) या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या 162 जागांसाठी भाजपच्या 152 अधिकृत उमेदवारांची माहिती उपलब्ध असून माहिती उपलब्ध नसलेल्या उमेदवारांची संख्या  7 आहे तर 3 अधिकृत उमेदवार नाहीत. उपलब्ध नसलेल्या 7 उमेदवारांमध्ये पुढील प्रभागांचा समावेश आहे –  13 ब, 15 ब, 25 ब, 35 अ, 35 क, 40 ब, 41 क. 
एकूण 152 उमेदवारांमध्ये पुरूष उमेदवारांची संख्या 74 आहे तर स्त्री उमेदवारांची संख्या 77 आहे. 
 संस्थेकडून या उमेदवारांची खालील प्रमाणे वयोगट,  शिक्षण, व्यवसाय, अपत्य, वार्षिक उत्पन्न, मालमत्ता, कर्ज, गुन्हेविषयक, सामाजिक आरक्षण, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये 152 जागांवर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांपैकी 105 उमेदवारांच्या मालमत्तेने कोटीचा आकडा ओलांडला आहे. उमेदवारी मिळालेल्यांपैकी 30 जणांवर गुन्हे दाखल आहेत. पक्षाने खुल्या 86 प्रभागांतून सर्वाधिक जागा मराठा समाजाला तर त्याखालोखाल ब्राह्मण व इतर समाजाच्या उमेदवारांना दिल्या आहेत. 
उमेदवारांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न कोटींच्या घरात असणारे चार उमेदवार आहेत. कोरेगाव पार्क- घोरपडी (21) प्रभागातील उमेदवार उमेश गायकवाड यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.67 कोटी रुपये आणि मुंढवा - मगरपट्टासिटी (22) प्रभागातील उमेदवार संदीप दळवी यांचे 1.64 कोटी रुपये आहे. औंध-बोपोडी (8) प्रभागातील उमेदवार विजय शेवाळे यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 4.52 कोटी रुपये आहे आणि सर्वाधिक म्हणजे 195 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे. वडगावशेरी-कल्याणीनगर (5) प्रभागातील उमेदवार योगेश मुळीक यांची 119 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.23 कोटी रुपये आहे. 
धायरी-वडगाव बुद्रुक (क्र. 33) प्रभागातील नीता दांगट यांची 55 कोटी, सनसिटी-हिंगणे खुर्द (34) प्रभागातील श्रीकांत जगताप यांची 54 कोटी, सॅलिसबरी पार्क- महर्षीनगर (28) प्रभागातील उमेदवार श्रीनाथ भिमाले यांची 45 कोटी, औंध बोपोडी प्रभागातील प्रकाश ढोरे यांची 43 कोटी तर मुंढवा-मगरपट्टासिटी प्रभागातील दिलीप तुपे व बावधन - कोथरूड डेपो (10) प्रभागातील दिलीप वेडे-पाटील यांची मालमत्ता 39 कोटी रुपयांहून अधिक आहे. रास्ता पेठ - रविवार पेठ (17) प्रभागातील सुलोचना कोंढरे यांची 29 कोटी, धनकवडी-आंबेगाव पठार (39) प्रभागातील प्रवीण भिंताडे यांची 31 कोटी तर आंबेगाव-कात्रज गावठाण (40) प्रभागातील अभिजित कदम यांची 34.80 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. सर्वांत कमी मालमत्ता असलेले पाच उमेदवार असून त्यांची मालमत्ता एक लाखांमध्ये आहे. यामध्ये शबनम शेख, उमेश चव्हाण, प्रसाद होले, अश्विनी सूर्यवंशी व वैभव पवार या उमेदवारांचा समावेश आहे. 
सहा उमेदवारांनी आश्‍चर्यकारकरित्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शून्य रुपये दाखविले असून प्रत्येकी पाच हजार व पंचवीस हजार वार्षिक उत्पन्न दाखवणारे दोनच उमेदवार आहेत. 
गुन्हे 
121 जण निष्कलंक 
भाजपने गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या एकूण 30 उमेदवारांना आणि एकही गुन्हा दाखल नसलेल्या 121 उमेदवारांना संधी दिली आहे, असे प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. पश्‍चिम पुण्यातील एका उमेदवारावर सर्वाधिक म्हणजे 11 गुन्हे प्रलंबित आहेत. प्रत्येकी एक गुन्हा दाखल असलेल्या चार महिलांसह एकूण 13 उमेदवार आहेत. प्रत्येकी दोन गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या नऊ आहे. प्रत्येकी तीन गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या सात आहे. 
१२१ उमेदवारांवर कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत. तर गुन्हे दाखल असून प्रलंबित गुन्हे असलेल्या उमेदवारांची संख्या ३० आहे.
त्यामध्ये प्रत्येकी १ गुन्हा दाखल असलेले १३ उमेदवार आहेत. त्यामध्ये ४ महिलांचा समावेश आहे. यामध्ये सुनिता वाडेकर, कल्पना बहिरट, मंगला मंत्री, मुक्ता टिळक यांच्यावर प्रलंबित गुन्हे दाखल असल्याची माहितीप्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.
२ गुन्हे प्रत्येकी दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या ९ आहे. त्यामध्ये २ महिलांचा समावेश आहे. यामध्ये रेश्मा भोसले व वर्षा तापकीर या महिलांवर प्रत्येकी २ दाखल गुन्हे प्रलंबित आहेत.
३ गुन्हे प्रत्येकी दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या ७ आहे. त्यामध्ये दिलीप उंबरकर, दिपक पोटे, श्रीकांत जगताप, राजेंद्र शिळीमकर, सुनिल कांबळे, प्रकाश ढोरे, राजेश येनपूरे यांचा समावेश आहे.
सर्वाधिक ११ दाखल गुन्हे प्रलंबित असलेला उमेदवार म्हणून धीरज घाटे यांचा समावेश आहे.  भाजपने एकुण ३० उमेदवारांना गुन्हे दाखल असणारा उमेदवारी दिली असल्याचे प्रतिज्ञापत्रातून दिसून येते.

सामाजिक आरक्षण
खुला प्रवर्ग  मधून ८६ उमेदवार आहेत. यामध्ये सर्वाधिक मराठा समाजाचे उमेदवार असून त्याखालोखाल ब्राम्हण व इतर समाजाच्या उमेदवारांनाही खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात आली आहे. यामध्ये एस.सी. व एस.टी. च्याउमेदवारांना प्रत्येकी १ जागा खुल्या प्रवर्गातून देण्यात आली असून माळी, मुस्लिम, मारवाडी या जातीच्या उमदेवारांना देखील खुल्या प्रवर्गातून ३ ते ६ जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे.
इतर मागासवर्ग ४५ उमेदवार आहेत. यामध्ये मराठा कुणबी जातीचे १७ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. तर उर्वरित २८ ओबीसी उमेदवारांमध्ये माळी-११, शिंपी-२, वंजारी-२, धनगर-२ आहेत. तर उर्वरित उमेदवारांमध्येप्रत्येकी १ उमेदवार बेलदार, भंडारी, धोबी, गोंधळी, गोसावी, गुरव, जोशी, कासार, कुंभार, सोनार व वैदु या जातींचा समावेश आहे.
अनुसूचित जाती (एस.सी.) १८ उमेदवार आहेत. यामध्ये महार समाजाचे ७ उमेदवार तर मातंग समाजाचे ८ उमेदवार असून बौद्ध, बुरूड, खाटीक या जातीचे प्रत्येकी १ उमेदवाराचा समावेश आहे.
अनुसूचित जमाती (एस.टी.) २ उमेदवार
यामध्ये महादेव कोळी व पारधी समाजाचे प्रत्येकी १ उमेदवाराचा समावेश आहे.

वयोगटनिहाय उमेदवारांची संख्या 
21 ते 30 वर्षे - 23 
31 ते 40 वर्षे - 54 
41 ते 50 वर्षे - 51 
51 ते 67 वर्षे - 23 

शैक्षणिक पात्रता 
प्राथमिक - 22 
माध्यमिक - 18 
उच्चमाध्यमिक - 11 
पदवीधर - 86 
पदव्युत्तर - 14 
व्यवसायनिहाय संख्या 
व्यवसाय व व्यापार - 89 
नोकरी - 7 
गृहिणी - 44 
कृषी - 6 
उद्योग नाही – ५

अपत्य२००१ नंतर अपत्य नसलेले उमेदवार संख्या – १२एकूण १ अपत्य असलेल्या उमेदवारांची संख्या – २७एकूण २ अपत्य असलेल्या उमेदवारांची संख्या – ९२एकूण ३ अपत्य असलेल्या उमेदवारांची संख्या – १७विद्यमान भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांना एकूण ४ अपत्य असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे तर बबडाबार्इ पठारे यांना एकूण ५ अपत्य असल्याचे नमुद केले आहे. सर्वाधिक ६ अपत्यअसलेला भाजपमधील उमेदवार म्हणून सोपान गोंधळे आहेत.
वार्षिक उत्पन्नकुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ० असलेले ६ उमेदवार आहेत. तर प्रत्येकी ५ हजार व २५ हजार वार्षिक उत्पन्न असणारे २ उमेदवार आहेत.८० हजार ते ३ लाख वार्षिक उत्पन्न असणारे उमेदवार संख्या – २१३ लाख ते ५ लाख वार्षिक उत्पन्न असणारे उमेदवार संख्या – ३१५ लाख ते १० लाख वार्षिक उत्पन्न असणारे उमेदवार संख्या – ४४१० लाख ते २५ लाख वार्षिक उत्पन्न असणारे उमेदवार संख्या – २८२६ लाख ते ७५ लाख वार्षिक उत्पन्न असणारे उमेदवार संख्या – १५करोडपती उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न असणारे ४ उमेदवार आहेत. यामध्ये संदिप दळवी यांची १ कोटी ६१ लाख ४२ हजार ५८४ उत्पन्न आहे. तर योगेश मुळीक यांचे कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न २ कोटी २३ लाख ८५ हजार३०७ आहे. तसेच उमेश गायकवाड यांचे कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न २ कोटी ६७ लाख ३७ हजार आहे.  कौटुंबिक वार्षिक उत्पन्न सर्वाधिक असलेला उमेदवार म्हणून विजय शेवाळे यांचे ४ कोटी ५२ लाख ५६ हजार ९३० आहे. विविध संस्था व अस्थापना यांना द्यावयाची कर्ज, देणी /थकबाकी असणा-या उमेदवारांची संख्या १०९ आहे तर कोणतीही  थकबाकी अथवा देय/कर्ज नसलेले उमेदवार ४२ आहेत.१० लाखावरील कर्ज असलेले ६९ उमेदवारांमध्ये २० उमेदवारांचे देय कर्ज १ कोटींपेक्षा जास्त आहे.








Friday, 3 February 2017

उमेदवाराने आचारसंहिता भंग केल्यास थेट अॅपद्वारे तक्रार करा!

उमेदवाराने आचारसंहिता भंग केल्यास थेट अॅपद्वारे तक्रार करा!



राज्यातील महापालिका निवडणूका सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने टेक्नोसॅव्ही पाऊस उचललं आहे. उमेदवारांकडून आचारसंहिता भंग तर होत नाही ना याकडे लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सिटीझन ऑन पेट्रोलिंग’ (COP) हे अॅप तयार केलं आहे. कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराकडून आचारसंहिता भंग झाल्याचं लक्षात आल्यास या अॅपच्या मदतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार पोहचवता येणार
आहे. अँड्रॉईड फोनवर हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरुन प्रचाराला सुरवात झाल्यानंतर कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराकडुन आचारसंहितेचा भंग झाल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं, तर त्या संदर्भातली तक्रार नागरिक या अॅपच्या मदतीनं निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू शकणार आहेत. पुणे महापालिकेचे मुख्य निवडणुक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी याबद्दलची माहिती दिलीय.
अँड्रॉईड फोनवर गूगल प्ले स्टोअरवरुन हे अॅप नागरिक डाऊनलोड करु शकणार आहेत. त्याच बरोबर या अॅपमध्ये तक्रार करणाऱ्या नागरिकांची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिक निर्भयपणे हे अॅप वापरु शकणार आहेत. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडुन प्रचाराच्या भरात आचारसंहितेचं उल्लंघन होऊ शकतं. तसं काही आढळलंच तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करायची संधी नक्की घेऊ असं मत टेकसॅव्ही व्यक्त केलं आहे.


पक्षाने उमेदवारी नाकारली तरी अपक्ष म्हणून अर्ज कायम

पक्षाने उमेदवारी नाकारली तरी अपक्ष म्हणून अर्ज कायम








अनुसूचित नामनिर्देशनपत्राचा नमुना ( जिल्हा परिषद निवडणूक)

अनुसूचित
नामनिर्देशनपत्राचा नमुना
( जिल्हा परिषद निवडणूक) 

( सूचकाने भरावयाचे )
भाग एक

नामनिर्देशनपत्राचा अनुक्रमांक :- ***********
मी याद्वारे :-
यांस,जिल्हा परिषद zp pune
निवडणूक विभाग/निर्वाचित गण क्रमांक :-*****, नाव :-***********
मधून निवडणुकीकरता: *********** यांना उमेदवार म्हणून नामनिर्देशित करत आहे

१) उमेदवाराचे नाव :- ***********

२) उमेदवाराच्या वडिलांचे /पतीचे नाव :- ***********

३) लिंग: ***********

४) जन्म तारीख व वय : ***********

५) व्यवसाय / धंदा :- ***********

६) संपूर्ण पत्ता (पोस्टाचा पत्ता) :- *********** पिन :- ***********

७) उमेदवाराचं मतदार यादीतील तपशील
अ) नाव :-***********
ब) निवडणूक विभाग / निर्वाचक गण क्रमांक व नाव:- ***********
क) यादी भाग क्रमांक:***********
ड) अनुक्रमांक:***********
८) उमेदवाराचा प्रवर्ग (राखीव जागेची निवडणूक असल्यास ):-
मुख्य प्रवर्ग : *********** , प्रवर्ग :***********

(अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या बाबतीत धर्म नमूद करावा)धर्म :-***********

९) महिलांकरिता राखीव असलेल्या जागेकरिता निवडणूक आहे काय:- ***********

१०) मतदार यादीतील सूचकाचा तपशील
अ) नाव :-***********
ब) निवडणूक विभाग / निर्वाचक गण क्रमांक व नाव***********
क) यादी भाग क्रमांक:***********
ड) अनुक्रमांक:***********

दिनांक : __/__/____ सूचकाची सही किंवा अंगठयाचा ठसा

उमेदवाराचे प्रतिज्ञापन

मी याद्वारे सूचित करतो /करते कि , निवडून आल्यास जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्यास मी तयार आहे.

दिनांक : __/__/____ उमेदवाराची सही किंवा अंगठयाचा ठसा
उमेदवाराने करावयाचे घोषणापत्र

मी, याद्वारे असे घोषित करतो की, माझी या नामनिर्देशनास संमती असून, मी असेही घोषित करतो की,
(अ) माझ्या वयाची *********** वर्षे , *********** महिने वर्षे पूर्ण झालेली आहेत.
(ब) महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम, १९६१ च्या कलम १६ मधील तरतुदीनुसार मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नाही.
(क) मी जिल्हा परिषद ठेकेदार नाही.
(ड) मी जिल्हा परिषद नियमानुसार देय असलेली कोणत्याही रक्कमेची थकबाकी शिल्लक ठेवलेली नाही.
दिनांक : __/__/____ (उमेदवार सही किंवा अंगठयाचा ठसा)
नाव :- ***********
जिल्हा परिषद निवडणूक विभाग निर्वाचक गणाचा क्र.:-*********** नाव:***********


भाग दोन
निवडणूक चिन्हांच्या निवडीबाबतचे घोषणापत्र
(उमेदवाराने भरावयाचे )

मी, याद्वारे आणखी असे घोषित करतो/करते की,***********
(1) मी, या निवडणुकीमध्ये ***********पक्ष (राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांच्याकडे नोंदणी झालेल्या पक्षाचे नाव) यांच्यातर्फे उभा आहे. (ब) मी निवडलेली निवडणूक चिन्ह ही पंसतीक्रमानुसार पुढीलप्रमाणे आहेत :
(१)***********
(२)***********
(३)***********
दिनांक : __/__/____ उमेदवार सही किंवा अंगठयाचा ठसा
टीपा :-
(1) उमेदवारास कोणत्याही पक्षाने किंवा आघाडीने पुरस्कृत केले नसल्यास व तो अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असल्यास बाब (अ) खोडून टाकावी.
(2) प्रत्येक उमेदवाराने, मग त्याला कोणत्याही पक्षाने किंवा आघाडीने पुरस्कृत केलेले असो वा नसो, बाब (ब) मधील तीन चिन्हे निर्दिष्ट करावयाची आहेत.


भाग तीन

नामनिर्देशनपत्राचा अनुक्रमांक :- ***********
हे नामनिर्देशनपत्र,_____________ *उमेदवाराने / उमेदवाराच्या सूचकाने दिनांक ________ रोजी____________(वेळ) माझ्याकडे ,
माझ्या____________________________________________________________________________येथील कार्यालयात माझ्या सुपूर्द केले.

दिनांक : __/__/____ निवडणूक निर्णय अधिकारी यांची सही
नामनिर्देशनपत्र स्वीकारल्याबद्दल किंवा ते नाकारल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय

मी, या नामनिर्देशन पत्राची महाराष्ट्र जिल्हा परिषद/पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणूक विभाग ) नियम, 1962 मधील नियम 19 अनुसार तपासणी केली आहे
आणि पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे :-_________________________________________________________________________.

दिनांक : __/__/____ निवडणूक निर्णय अधिकारी यांची सही
टीपा :- (* जे लागू नसेल ते खोडावे)

भाग चार

(नामनिर्देशनपत्र आणि छाननीची नोटीस यांची पोहोच)
(नामनिर्देशनपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीकडे द्यावयाची)
नामनिर्देशनपत्राचा अनुक्रमांक :- ***********
zp pune जिल्हा परिषदेच्या क्रमांक :-*********** ,
निवडणूक विभागातील निवडणुकीसाठी असलेले उमेदवार *********** यांचे नामनिर्देशनपत्र____________(दिनांक) रोजी____________ (वेळ) वाजता * उमेदवाराकडून / उमेदवाराच्या सूचकाकडून माझ्याकडे माझ्या कार्यालयात सुपूर्द केले आहे.
सर्व नामनिर्देशनपत्रांची _____________(ठिकाण) येथे ___________________ (दिनांक) रोजी____________(वेळ) वाजता छाननी करण्यात येईल.

दिनांक : __/__/____ निवडणूक निर्णय अधिकारी यांची सही
टीपा :- (* जे लागू नसेल ते खोडावे)

Political Research and Analysis Bureau (PRAB)
9422323533

pune election 2017 पुणे महापालिका निवडणूक २०१७ 27 महापालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर

pune election 2017  पुणे महापालिका निवडणूक २०१७   

27 महापालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर 







27 महापालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर ..... पुणे : खुला प्रवर्ग महिला

27 महापालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर 


महापालिका महापौरपदाची सोडत जाहीर झाली आहे. 27 पैकी 14 महापालिकांचं महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. मुंबईचं महापौरपद खुल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे. तर नाशिकचं महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालं आहे.

सरकारच्या नियमानुसार
अनुसूचित जमाती – 1 जागा आरक्षित
अनुसूचित जाती – 3 जागा आरक्षित, त्यात 1 सर्वसाधारण 2 महिला
इतर मागासवर्गीय – 7 जागा आरक्षित, त्यात 4 महिला 3 सर्वसाधारण
खुला गट – 16 जागा, त्यापैकी 8 महिला 8 सर्वसाधारण

अनुसूचित जमातीसाठी 1 तर जातीसाठी 3 महापालिका आरक्षित
नाशिक महापौर : अनुसूचित जमाती
पनवेल : अनुसूचित जाती (महिला)
नांदेड वाघाळा : अनुसूचित जाती (महिला)
अमरावती : अनुसूचित जाती

इतर मागास प्रवर्गासाठी 7 महापालिका आरक्षित (4 महिला 3 साधारण)
मीरा भाईंदर : ओबीसी महिला
नवी मुंबई : सर्वसाधारण
पिंपरी चिंचवड : सर्वसाधारण
सांगली मिरज कुपवड : ओबीसी महिला
जळगाव : ओबीसी महिला
औरंगाबाद : सर्वसाधारण
चंद्रपूर : ओबीसी महिला

खुल्या प्रवर्गासाठी 16 महापालिका आरक्षित (महिला 8, साधारण 8)
खुला गट- पुरुष
मुंबई : खुला साधारण
वसई विरार : खुला साधारण
भिवंडी : खुला साधारण
लातूर : खुला साधारण
मालेगाव : खुला साधारण
धुळे : खुला साधारण
अकोला : खुला साधारण
अहमदनगर : खुला साधारण
खुला गट- महिला
ठाणे : खुला प्रवर्ग महिला
कल्याण डोंबिवली : खुला प्रवर्ग महिला
पुणे : खुला प्रवर्ग महिला
उल्हासनगर : खुला प्रवर्ग महिला
परभणी : खुला प्रवर्ग महिला
सोलापूर : खुला प्रवर्ग महिला
कोल्हापूर : खुला प्रवर्ग महिला