Monday, 11 March 2024

पत्रकार पंकज खेळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; प्राब संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

पत्रकार पंकज खेळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुण्यातील पत्रकार पंकज खेळकर यांचे 11 मार्च रोजी रात्री हृदयविकाराने निधन झाले. आज तक आणि ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीमध्ये ते पुण्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. ते 52 वर्षांचे होते. औंध येथील सिंध सोसायटीत त्यांचे वास्तव्य होते. हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पंकज खेळकर हे मूळचे अकोला येथील होते. गेली 20-22 वर्ष ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. गेली 18 वर्ष ते आज तकमध्ये पुणे प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. इंडिया टूडे ग्रुपमध्ये असोसिएट एडिटर ही जबाबदारी सांभाळली आहे. ते पुणे ब्युरो म्हणून देखील जबाबदारी सांभाळत होते.


लोकसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर 19 जानेवारीला घेतलेली अखेरची मुलाखत ठरली. मित्र पत्रकार पंकज खेळकर याला पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

🙏🙏

 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

============================


कर्तृत्ववान महिलांचा इतिहास समाजासाठी सदैव प्रेरणादायी- ह.भ.प. सौ. राजश्री माझिरे

अॅड. संध्या भुजबळ यांना राजमाता जिजाऊ रणरागिणी गौरव पुरस्कार प्रदान



पुणे- कर्तृत्ववान महिलांचा इतिहास समाजासाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महिला कीर्तनकार ह.भ.प. सौ. राजश्री माझिरे यांनी केले. आम्ही महाराष्ट्रीयन फाऊन्डेशनच्या वतीने जागतिक महीला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महिलांचा राजमाता जिजाऊ रणरागिणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.

महीलांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन ट्रस्टच्या अध्यक्षा अॅड. संध्या भुजबळ यांच्यासह मान्यवरांना राजमाता जिजाऊ रणरागिणी गौरव पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास समाजसेविका सौ कल्याणी कदम, सौ. स्मिता पवार, सौ. जयश्री अशोक जाधव, सौ. प्राजक्ता मेढेकर, सौ. प्रभा फाटक, सौ. विद्या चौधरी, सौ. अलका कोकाटे, सौ. वैशाली संजय सातव, पत्रकार विठ्ठल जाधव, चंद्रकांत भुजबळ, फाऊन्डेशनचे प्रदेश अध्यक्ष शामराव दौंडकर, अंबिका कला केंद्राचे प्रमुख अशोक जाधव, समिर फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.   

पुढे राजश्री माझिरे म्हणाल्या की, महीला कायमच समाजात अग्रस्थानी राहिल्या असून त्यांना संतांनी देखील प्रथम स्थान दिले आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, !!कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरएक वाटे देवा, धन्य माता पिता तयाचिया!! प्रथम कन्या आणि माता संबोधले असून महीलांना प्रथम स्थान साडेतीनशे वर्षापूर्वीच संतांनी अधोरेखित केले असून आता आपण लेडीज फस्ट असे म्हणतो. आपला इतिहास सांगतो की महिलांनी खूप कर्तृत्ववान कार्य केलेले आहेत ते आजही समाजाची प्रेरणादायी आहे. महीला त्यांच्या माहेर व सासरच्या अशा दोन्ही ठिकाणच्या 42 कुळांचा उद्धार करीत असतात म्हणूनच महिलांना समाजात अग्रस्थानी मानले असल्याचे सांगून उपस्थित कर्तृत्ववान महीलांचे त्यांनी यावेळी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ साविताताई दगडे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, प्रत्येकाने न्यायाच्या बाजूने उभे राहिल्यास समाजात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी त्या पुढे म्हणाल्या की, महिलांनी कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना आपले कुटुंब पहा मग अन्य कार्यात अग्रेसर रहा यश हमखास मिळते असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, मी प्रथम शिक्षिका होते त्यानंतर सर्वांच्या आग्रहामुळे राजकारणात प्रवेश करून यशस्वी झाले. त्याचे कारण म्हणजे कुटुंब आणि राजकीय सामाजिक कार्यात कधीही गल्लत केली नाही. आपण नेहमीच जमिनीवर पाय ठेवून मार्गक्रम केले पाहिजे असे सांगून समाजाने महिलांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला ठेवला पाहिजे तरच महिलांवरील अत्याचार कमी होतील. मुलांना चांगले संस्कार देणे हे पालकांच्या हातात आहे ते मुलांना योग्य मार्ग दाखवला तर आदर्श समाज उभा राहायला वेळ लागणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

वाघोलीच्या माजी सरपंच सौ. जयश्रीताई सातव या प्रसंगी म्हणाल्या की, महिलांचा कर्तृत्ववान इतिहास पाहिल्यास आजच्या युवा महिलांनी प्रथम आपले कुटुंब सुखी व समाधानी ठेवले तरच आपल्या कलागुणांना योग्य न्याय देणे शक्य होते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. आजकालच्या युवा महीला केवळ आपण पाश्चिमात्य कपडे परिधान केले म्हणजे आपण पुढारलेलो आहोत असे समजतात हे अयोग्य असून खरे कर्तुत्व अंगीकारले पाहिजे असेही त्यांनी सांगून ज्या महिलांनी समाजापुढे आदर्शवत कार्य केले आहे त्यांचा आदर्श आपण घ्यावा असे आवाहन सौ. जयश्रीताई सातव यांनी यावेळी केले.

तसेच महीला कोणत्याही क्षेत्रात आज मागे नाहीत. पायलट पासून पंतप्रधान पदापर्यंतच्या व्यासपीठावर गेल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये सर्वाधिक सहनशक्ती असते एकाचवेळी अनेक कामांवर त्यांचे लक्ष असते. संकटावर मात करण्याचे कौशल्य त्यांच्यात उपजत आहे, कोणत्याही प्रसंगाला न डगमगता सामोरे जाते हे महिलांचे वैशिष्ट आहे असे मत सौ. पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ जयश्रीताई पोकळे यांनी यावेळी व्यक्त केले.

आम्ही महाराष्ट्रीयन फाऊन्डेशनचे प्रदेश अध्यक्ष शामराव दौंडकर यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन पुरस्काराने सन्मानित केलेल्या महीलांचे कर्तुत्व प्रास्ताविक भाषणात विषद केले. आम्ही महाराष्ट्रीयन फाऊन्डेशनच्या वतीने जागतिक महीला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महिलांचा राजमाता जिजाऊ रणरागिणी गौरव पुरस्काराने सन्मान केला यामध्ये लावणी कलाकार ते पोलीस उपनिरीक्षक पदी मजल मारणाऱ्या सुरेखा कोरडे, कारगिल युद्धात शहीद भागवत बागडे यांच्या वीरपत्नी श्रीमती अजिता बागडे, रस्त्यावर फिरस्ती मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या स्वाती डिंबळे, समाजसेविका सौ. निलम खंडागळे, सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य ते क्लास वन अधिकारी झालेल्या कोमल शिंदे, विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अॅड. संध्या भुजबळ, माजी सरपंच वैशाली संजय सातव, अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणाऱ्या हेमलता मराठे, शिक्षण घेता-घेता गायांचा गोठा सांभाळणाऱ्या रिद्धी लेंडे, समाजसेविका स्वाती काळे व विद्या काळे यांचा समावेश आहे.

Adv Sandhya Bhujbal | अ‍ॅड. संध्या भुजबळ यांना राजमाता जिजाऊ रणरागिणी गौरव पुरस्कार प्रदान



Adv Sandhya Bhujbal | अॅड. संध्या भुजबळ यांना राजमाता जिजाऊ रणरागिनी गौरव पुरस्कार जाहीर 

अॅड. संध्या भुजबळ यांना राजमाता जिजाऊ रणरागिनी गौरव पुरस्कार जाहीर



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

Wednesday, 6 March 2024

Co-Op Credit Society Election 2024 दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत नवपरिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय

विद्यमान संचालकांच्या परिवर्तन पॅनेलचा दारूण पराभव



दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या (The Poona District Police Co-Op Credit Society Election 2024) संचालक मंडळ सन 2024 ते 2029 या कालावधीकरिता 5 मार्च 2024 रोजी मतदान झाले या निवडणूकीत नवपरिवर्तन पॅनेलच्या 13 जागांपैकी 12 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर काही विद्यमान संचालकांचा सहभाग असलेल्या परिवर्तन पॅनेलला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. परिवर्तन पॅनेलच्या एकाच उमेदवाराला विजय मिळवता आला. परिवर्तन पॅनेलला घवघवीत यश मिळाल्याने मतमोजणीनंतर विजयी जल्लोष करण्यात आला यामध्ये बहुतांश उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शवला. नवनिर्वाचित संचालकांवर शहर व जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत पाच मतदारसंघात विभागून 13 जागांसाठी मतदान झाले. यामध्ये (१) सर्वसाधारण गट यामध्ये 8 जागांसाठी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर (२) महिला राखीव यामध्ये 2 जागांसाठी 6 उमेदवार आणि (३) अनुसूचित जाती व जमाती या गटामधील एका जागेसाठी 4 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. (४) इतर मागास वर्ग या गटामधील एका जागेसाठी 3 उमेदवार तर (५) भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग या गटामधील एका जागेसाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 13 जागांसाठी 42 उमेदवारांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत विद्यमान संचालकांचे परिवर्तन पॅनेल आणि विरोधात नवपरिवर्तन पॅनेल आणि काही जागांवर एक अन्य पॅनेल अशी प्रमुख लढत झाली. परिवर्तन विरुद्ध नवपरिवर्तन पॅनेल मध्ये झालेल्या लढतीत अनेक आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली. शहर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील कर्मचारी वर्ग उत्साहाने प्रचारात सक्रीय झाल्याचे पहावयास मिळाले.  

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत एकूण पात्र मतदार संख्या 11 हजार 206 इतकी होती. पुणे शहर व जिल्ह्यातील 44 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. यामध्ये एकूण 6 हजार 236 मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. 160 मते बाद ठरली असून वैध मतांची संख्या 6 हजार 076 इतकी होती. मा. निलम पिंगळे निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-2 यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान श्री. संपतराव जाधव, अध्यक्ष शिखर संस्था, दत्तात्रय अण्णा गिरमकर  व नामदेव आप्पा रेणुसे मा.संचालक पोलीस सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेल प्रमुख श्री.महेश गंबरे तसेच प्रचार प्रमुख श्री. महेश गायकवाड (पुणे ग्रामीण) व धनेश म्हेत्रे (पुणे शहर) यांचा नवपरिवर्तन पॅनल निवडून आणण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे.

दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीचा नावलौकिकता वाढविण्यासाठी व सभासदांच्या हक्कांसाठी नवपरिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून विकासात्मक जाहीरनामा घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहचलो. आम्हाला विद्यमान संचालकांवर केवळ आरोप करण्यासाठी नव्हे तर प्रामाणिक, गतिमान प्रशासन देण्यासाठी नवपरिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली त्याला मतदारांनी कौल दिलेला आहे असे मत नवपरिवर्तन पॅनलच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे. 

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते (कंसात)

सर्वसाधारण गट नवनिर्वाचित संचालक
1. कदम सुमित लहू (3303)
2. काळभोर उदयकुमार सुदाम (3079) 
3. नरुटे शशिकांत हरीदास (2988) 
4. घोरपडे विठ्ठल अनिल (2972)
5. राजेंद्र बाळकृष्ण मारणे (2866) 
6. तांबोळी जमीर बाबालाल (2836)
7. गडांकुश दिनेश प्रल्हाद (2973)
8. गावडे अनिल बाळासाहेब (2846) परिवर्तन पॅनल
महिलांसाठी राखीव गट नवनिर्वाचित संचालक
9. गोडगे-बनकर वैशाली अशोक (3382)
10. राठोड आशा चुनीलाल (2978)
अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग गट नवनिर्वाचित संचालक
11. फ़ासगे आकाश नारायण (3186)
इतर मागासवर्ग गट नवनिर्वाचित संचालक 
12. भोंग अनिल मनोहर (3430)
भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागासवर्ग गट नवनिर्वाचित संचालक
13. गोरे गणपत धोंडीबा (2739)


दरम्यान दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को - ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत  सर्वसाधारण या मतदारसंघासाठी 8 जागांसाठी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात होते यामध्ये पराभवाला सामोरे गेलेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे मते प्राप्त झालेली आहेत यामध्ये खोमणे रक्मिणी गुलाब यांना 465 मते तर गवळी गणेश शिवाजी यांना 546 मते तर गायकवाड अमोल अरुण यांना 2159 मते आणि जगताप गणेश अशोक यांना 498 मते तर जठार रमेश पांडुरंग यांना 510 मते तसेच जाधव विनायक एकनाथ यांना 2209 मते तर डोळस सुधीर हरिश्चंद्र यांना 2168 मते तर दावणे महावीर म-याप्पा यांना 2704 मते आणि पालांडे राजेंद्र आत्माराम यांना 2651 मते तर भाटे विलास एकनाथ यांना 524 मते तर भोकरे मनोज सोमेश्वर यांना 555 मते तसेच भोसले सुशांत राजेंद्र यांना 546 मते तर मोमिन इम्तियाज दस्तगीर यांना 2289 मते तर वर्ष दिपक विठठल यांना 2491 मते आणि शिदे प्रशांत लक्ष्मण यांना 2755 मते प्राप्त झलेली आहेत.

या निवडणुकीत अन्य पराभूत उमेदवारांमध्ये इतर मागासवर्ग या मतदारसंघातील ताठे अनिल तुकाराम यांना 2256 मते तर जगताप गणेश अशोक यांना अवघी 441 मते मिळाली आहेत तर भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागासवर्ग या मतदारसंघातील उमेदवार माने राहूल रामचंद्र यांना 1909 मते मिळाली तसेच सामसे महावीर लक्ष्मण यांना 453 मते तर खुणवे राकेश शिवाजी यांना 382 मते प्राप्त झाली तर पांढरे गोविंद हेबंत यांना 366 ममते आणि शिंदे गणेश दत्ता यांना केवळ 176 मतांवर समाधान मानावे लागले. अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग या मतदारसंघातील उमेदवारांना अनुक्रमे बगाड संतोष काशिनाथ यांना 1927 मते प्राप्त झाली तसेच तिटकारे दिनेश मंगल यांना 514 मते मिळाली तर शिवशरण अविनाश श्रीमंत यांना अवघी 503 मते मिळाली. महिलांसाठी राखीव या मतदारसंघातील अन्य पराभूत उमेदवारांमध्ये काळे अनुपमा दिपक यांना 2249 मते मिळाली असून थोरात उषा राहूल यांना 2083 मते मिळाली तसेच शिदे सीमा शंकरराव यांना 517 तर तायडे अर्चना राहुल यांना 410 मते प्राप्त झाली आहेत.



Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

Friday, 1 March 2024

Loksabha Election-2024- महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदारांवर मतदारांची नाराजी; उमेदवारीत बदल केल्यास भाजपला 34 मतदारसंघात अनुकुलता

लोकसभा निवडणुकीत महायुतीलाच सर्वाधिक जागा

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा महायुतीलाच मिळण्याचा सर्वेक्षणातील अंदाज असून 16 लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदारांवर मतदारांची नाराजी असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पहिल्या टप्यातील सर्वेक्षणात व्यक्त केला तो दुसऱ्या व अंतिम टप्प्यातही कायम राहिला आहे. 16 लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारीत बदल केल्यास भाजपला एकूण 34 मतदारसंघात अनुकुलता मतदारांनी दर्शविली असल्याचा निष्कर्ष 'पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो' (प्राब) संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये दिसून आला आहे.


सशुल्क माहितीसाठी संपर्क करा- 




Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 








Loksabha Election 2024- मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी मराठा संघटनांची रणनीती

प्रत्येक मतदारसंघात बहुसंख्याने उमेदवारी दाखल करण्याची व्यूहरचना


लोकसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघात हजारो उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करून प्रशासनाला मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी मजबूर करण्याची रणनीती मराठा संघटनांकडून जाहीर केली जात आहे. प्रत्येक मतदारसंघात बहुसंख्याने उमेदवारी दाखल करण्याची व्यूहरचना असून प्रत्येक गावातून उमेदवार निवडणूक रिंगणात असावा असे आवाहन देखील मराठा संघटनांकडून केले जात आहे. राज्याच्या राजकारणात पक्षांतर्गत फाटाफूट आणि गट निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दुषित झाले आहे त्याप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणावरून अभिनव प्रखर आंदोलनांतील एकेरी टीका टिप्पणी, राजकीय व जातीय आरोप-प्रत्यारोपामुळे सामाजिकदृष्ट्या वातावरण देखील दुषित झाले आहे या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांना राजकीय पक्षांना सामोरे जाताना चक्रव्यूहात अडकल्या सारखे निश्चित भूमिका काय घ्यावी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामध्येच काही मराठा संघटनांकडून आरक्षणाबाबत अन्य मागण्यासाठी आडमुठी भूमिका घेऊन प्रशासनाला अडचणीत आणण्याचा घाट बांधला आहे.
 
सकल मराठा समाजाने लोकसभा निवडणूकीत एक हजार उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने निवडणूक विभाग आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार आहे. एका कंट्रोल युनिटवर २४ बॅलेट युनिट लावता येतात. १ बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांच्या चिन्हांची बटणे असतात. एकूण २४ युनिटवर ३८४ उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांचा समावेश असतो. 'ईव्हीएम' ची क्षमता ३८४ उमेदवार असते. जर ३८४ पेक्षा जास्त उमेदवार झाले तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याशिवाय निवडणूक आयोगासमोर पर्याय नसतो. सर्व ४८ मतदारसंघात अशीच प्रशासनाची अडचण करण्याची रणनीती मराठा संघटनांची आहे.  

मराठा आरक्षणावरून शासनाने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलकांकडून होत आहे. मनोज जरांगे पाटील यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे आता रस्त्यावरच्या लढाईबरोबर गनिमी कावा करण्याची तयारी मराठा समाजाने चालविली आहे. याच अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्हात एक हजार उमेदवार उतरवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. या बाबत मराठा समाजाकडून बैठका देखील घेतल्या जात आहे, अशी माहिती पंडित कदम, प्रमोद इंगोले, रामकृष्ण कदम यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

मराठा आरक्षण आणि सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. त्यांच्या या लढ्याला काही मराठा बांधवाची साथ मिळत आहे. याच मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे रास्ता टोको आंदोलन देखील करण्यात आले. शासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. उलट जरांगे यांच्या आंदोलनाच्या चौकशीसाठी एसआयटी लावण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शासना विरोधात रस्त्यावरील आंदोलना सोबतच गमिनीकावा करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. प्रत्येक गावातून दहा उमेदवार असे ऐकून नांदेड जिल्ह्यात एक हजार उमेदवार निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत अर्धापूर तालुक्यात मराठा समाजाची बैठक देखील पार पडली. मराठा समाजाच्या या निर्णयामुळे येणारी निवडणूक सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक असणार आहे. प्रत्येक मतदारसंघात बहुसंख्याने उमेदवारी दाखल करण्याची व्यूहरचना आखणी केली जात आहे मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी वास्तविकपणे कितपत होते याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी रणनीती राबविण्याचा खरा फंडा कोणाचा आहे यावरूनही मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

---------------------------------

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==============================


     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================

Tuesday, 27 February 2024

SANMITRA SAHAKARI BANK CO OP ELECTION 2024- सन्मित्र सहकारी बँक निवडणुकीत एकहाती पुन्हा सत्ता; सभासदांच्या विश्वासाचा विजय - मा.बाळासाहेब शिवरकर

सन्मित्र प्रगती पॅनलचे निर्विवाद वर्चस्व; सर्वच उमेदवार विजयी


सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूकीत पुन्हा सत्ताधारी संचालकांचे सन्मित्र प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून सर्वच उमेदवार भरघोस मताने विजयी झाले आहेत. यामध्ये विद्यमान चेअरमन सुनिल गायकवाड यांचा देखील समावेश आहे. दरम्यान सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील सन्मित्र प्रगती पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केली.

सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत 11 मतदान केंद्रावर मतदान झाले होते. 13 हजार 640 मतदारांपैकी झालेल्या मतदानात सर्वाधिक मते सन्मित्र प्रगती पॅनलच्या उमेदवारांना प्राप्त झाली. सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 17 जागांवर सन्मित्र प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. बँकेच्या चेअरमन पदावर पुन्हा प्रबळ दावेदारी विद्यमान चेअरमन सुनिल गायकवाड यांची असल्याने अन्य संचालकांना चेअरमन पदाची संधी देतील का याबाबत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 
 
सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील सन्मित्र प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. या पॅनलचे सर्व १७ उमेदवार विजयी झाले आहेत. सोमवारी महर्षी नगर कटारे हायस्कूल येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी कामकाज पाहिले.

सन्मित्र प्रगतीचे विजयी झालेले उमेदवार व कंसात मिळालेली मते सर्वसाधारण मतदारसंघातून विजय रामचंद्र कोद्रे -(३३१९), हेमंत दामोदर गाढवे -(३२४१), सुनील रामचंद्र गायकवाड -(३२७४), योगेश जयसिंग गोंधळे-(३३०९), दिलीप रामदास टकले -(३२२०), प्रशांत वसंतराव तुपे-(३१७५), अमोल भरतलाल धर्मावत-(३२२७), विजय कृष्णाजी राऊत -(३२८४), अभिजीत चंद्रकांत शिवरकर -(३२८५), संजय जयवंतराव शेवाळे-(३२२९), चंद्रकांत अर्जुन ससाणे -(३२७५), यशवंत शिवराम साळुंखे-(३२१८),तसेच महिला राखीव गटातून सविता दिनेश गिरमे-(३१६९), रेश्मा दत्तात्रेय हिंगणे-(३०५७), अनुसूचित जाती-जमाती विभागातून रमेश बाबुराव काकडे-(३४३३), इतर मागासवर्गीय विभागातून गणेश सुदाम फुलारे -(३४१७), भटक्या विमुक्त राखीव विभागातून विशाल संभाजी हाके-(३४१६) असे सन्मित्र प्रगती पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

प्रगती पॅनल च्या विरोधात एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. प्रतिस्पर्धी उमेदवारांना अवघ्या ३६५ मतांवर समाधान मानावे लागले. सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीत अॅड. प्रभाकर शेवाळे, शिवाजी केदारी, बाळासाहेब कोद्रे, दामोदर राऊत, सुनिल बनकर, योगेश ससाणे, सोपान गोंधळे, मुनीर सय्यद, उत्तमराव रायकर यांचा सिहांचा वाटा असल्याचे बँकेचे मार्गदर्शक बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले. सभासद मतदारांनी सन्मित्र प्रगती पॅनलच्या उमेदवारांना सुमारे साडेतीन हजार मतांचे मताधिक्य देवून जो विश्वास दाखवला आहे. तो यापुढेही अधिक सक्षमपणे काम करण्याची प्रेरणा देणारा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

Tuesday, 20 February 2024

SANMITRA SAHAKARI BANK CO OP ELECTION 2024- सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 25 फेब्रुवारीला मतदान; विजयाची फक्त औपचारिकता बाकी

प्रखर विरोधकांची निवडणुकीकडे पाठ; विद्यमान संचालकांचे एकमेव प्रगती पॅनेल




पुणे- सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 25 फेब्रुवारीला मतदान होत असून पारंपारिक विरोधकांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याने तसेच प्रमुख विरोधक उमेदवारांनी माघार घेतल्याने सत्ताधारी संचालकांच्या पॅनेलच्या विरोधात केवळ 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे विजयाची फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. विद्यमान संचालकांनी एकमेव पॅनेल तयार करून त्यामध्ये युवकांना प्राधान्य देण्यात येऊन सभासदांना पुन्हा कार्य करण्याची संधी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यांच्या आवाहनाला सभासद मतदारांचा भरघोष पाठींबा मिळत आहे. प्रबळ विरोधक निवडणूक रिंगणात नसल्याने सत्ताधारी संचालकांचे प्रगती पॅनेलला सभासदांचा प्रतिसाद मिळत असल्याने केवळ विजयाची औपचारिकता बाकी राहिलेली आहे. 

पुणे शहरातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून नावलौकिकता प्राप्त केलेल्या सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली असून रविवारी 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत 11 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत 13 हजार 640 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 17 जागांसाठी 22 अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक होत असून विद्यमान संचालकांनी प्रगती पॅनेल तयार केले असून त्यामाध्यमातून निवडणुकांना सामोरे जात आहेत.

सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 22 जानेवारीला जाहीर करण्यात आला. संचालक मंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 12 जागा आहेत. अनुसुचित जाती-जमातीसाठी एक जागा, भटक्या विमुक्त जाती-जमातीसाठी एक जागा, इतर मागासवर्गीय साठी एक जागा, तसेच महिलांसाठी राखीव 2 जागा याप्रमाणे मतदारसंघ आहेत. सत्ताधारी संचालकांच्या माध्यमातून प्रगती पॅनेल तयार केले असून यामध्ये काही संचालकांच्या कुटुंबातील युवकांना यामध्ये सामावून घेतले आहे त्यामुळे युवकांना प्राधान्य देण्याचे धोरण सन्मित्र सहकारी बँकेचे मार्गदर्शक व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी अवलंबविले आहे. त्यांच्या या भूमिकेचे देखील सभासद मतदारांकडून स्वागत केले जात आहे.       

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत 22 ते 29 जानेवारी पर्यंत होती. तर नामनिर्देशनपत्राची छाननी 30 जानेवारीला झाली असून 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत माघार घेण्याची मुदत होती. 14 फेब्रुवारी पर्यंत 17 जागांसाठी केवळ 22 अर्ज राहिल्याने निवडणूक नियमाप्रमाणे घेण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्री दिगंबर हौसारे उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (4) पुणे यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे.

सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूकीसाठी प्रगती पॅनेलमध्ये सर्वसाधारण गटातून कोद्रे विजय रामचंद्र, डॉ. गाढवे हेमंत दामोदर, गायकवाड सुनिल रामचंद्र, गोंधळे योगेश जयसिंग, टकले दिलीप रामदास, तुपे प्रशांत उर्फ मामा वसंतराव, धर्मावत अमोल भरत, अॅड. राऊत विजय कृष्णाजी, शिवरकर अभिजीत चंद्रकांत, शेवाळे संजय जयवंतराव, ससाणे चंद्रकांत अर्जुनराव, साळुंखे यशवंतराव शिवराम यांचा समावेश असून महिला राखीव २ जागांसाठी सौ. गिरमे सविता दिनेश व सौ. हिंगणे रेश्मा यांचा समावेश आहे. अनुसुचित जाती-जमाती १ जागेसाठी काकडे रमेश बाबुराव तर इतर मागासवर्गीय १ जागेसाठी फुलारे गणेश सुदाम आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती एका जागेसाठी हाके विशाल संभाजी यांचा प्रगती पॅनेलमध्ये समावेश आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर व माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली जात आहे.

सन्मित्र सहकारी बँकेच्या सताधारी संचालकांच्या विरोधात पारंपारिक विरोधकांचा सूर प्रगतीमुळे मावळला असून ज्यांच्यावर विरोधी नेतृत्वाची आस होती ते महाशय ऐन निवडणुकीच्या वेळी अयोध्या येथे श्री रामाच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. ही संधी साधून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याची विरोधकांची ओरड होती तरीही बहुतांश जणांनी अखेरच्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. श्री रामाचे दर्शन घेऊन येईपर्यंत केवळ एकच दिवस नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उरला असल्याने विरोधकांना तुल्यबळ पॅनेल उभारण्यासाठी वेळेची संघीच मिळाली नाही याची खमंग चर्चा सभासद करीत असून त्यांच्या फजितीचा आस्वाद देखील घेत आहेत. सत्ताधारी संचालकांच्या प्रगती पॅनेल विरुद्ध 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रगती पॅनेलच्या सर्व उमेदवारांचे निवडणूक चिन्ह विमान असून विमानाने विरोधांना मतदानापूर्वीच अस्मान दाखवल्याने विरोधकांना नेहमीप्रमाणे हरेराम करण्याची वेळ आली असून निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी राहिलेली आहे.  

सन्मित्र सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. सुनिल गायकवाड यांनी गेल्या पंचवार्षिक कालावधीत बँकेच्या प्रगतीत आमुलाग्र बदल घडवून यशस्वी भरभराटीची वाटचाल केल्याने विद्यमान संचालक व सभासदांचा त्यांना व त्यांच्या धोरणांना पाठींबा मिळत आहे. त्यांच्या कारकीर्दीत सन्मित्र सहकारी बँकेला उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले. सन 2018 मध्ये पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. पुणे यांच्या तर्फे सर्वाधिक सेवकांना प्रशिक्षण देणारी बँक म्हणून आपल्या सन्मित्र सहकारी बँकेला केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी साहेब  यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. तर केरळ राज्यातील आपतग्रस्तांच्या मदतीकरीता, सन्मित्र सहकारी बँकेच्यावतीने रु.५१,०००/- ची देणगी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ ला देण्यात आली होती. सन 2019 मध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मित्र सहकारी बँकेला ‘बँको’ पुरस्कार देवून गौरवण्यात आले होते. 

सर्वात महत्वाचे व उल्लेखनीय कार्य म्हणजे बँकेला स्थेर्य मिळवून देण्यासाठी मुख्यालयासाठी स्व-मालकीची भव्य वास्तू उभारण्यात आली. तसेच  सन्मित्र सहकारी बँकेच्या सासवड शाखेचे स्व-मालकीच्या जागेत स्थलांतर त्यांच्या कारकीर्दीत झाल्याने विश्वसनीय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सन्मित्र सहकारी बँकेचे मार्गदर्शक व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी तसेच विद्यमान संचालक श्री. चंद्रकांत ससाणे सर यांच्यासह सर्व संचालकांनी विद्यमान चेअरमन श्री.सुनिल गायकवाड यांना एकहाती काम करण्याची संधी देऊन विश्वास ठाकला तो त्यांनी सार्थ करून दाखवला असल्याचे समाधान श्री. सुनिल गायकवाड यांनी व्यक्त केले.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================