Tuesday, 18 August 2026

राज्यातील एकूण 2 कोटी 07 लाख 03 हजार 268 फॉर्म संकलित न झालेले मतदार यादीतून वगळण्याची शक्यता; सर्वाधिक पुणे, ठाणे व मुंबईतील संभाव्य मतदारसंख्या

पुणे जिल्ह्यात मतदारांच्या जुन्या व सध्याच्या नोंदींमध्ये आढळलेल्या तफावतींच्या ७ लाख २५ हजार ४९ मतदारांना सुनावणीची संधी; सर्वाधिक 28 लाख 69 हजार 888 नावे वगळण्याची शक्यता



पुणे- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यातील एकूण 2 कोटी 07 लाख 03 हजार 268 मतदारांची ‘गणना प्रपत्र जमा न होणे’(फॉर्म अनकलेक्टेबल) या प्रवर्गात नोंद झाली आहे अशा मतदारांचे मतदार यादीतून वगळण्याची शक्यता असून यामध्ये सर्वाधिक पुणे, ठाणे व मुंबईतील संभाव्य मतदारसंख्या आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात राबवण्यात येत असलेल्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' (एसआयआर) मोहिमेतून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाब समोर आली आहे.  निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांची अचूकता तपासण्यासाठी आणि दुबार, स्थलांतरित किंवा मृत मतदारांची नावे वगळण्यासाठी एसआयआर मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत २८८ मतदारसंघात 1 लाख 253  बीएलओंमार्फत घरोघरी जाऊन गणना प्रपत्रे भरून घेण्याचे काम करण्यात आले. या घरभेटींनंतर प्रशासनाला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार 7 कोटी 71 लाख 50 हजार 584 मतदारांचेच गणना प्रपत्र भरून स्वाक्षरीसह प्राप्त होऊ शकले आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यात मतदारांच्या जुन्या व सध्याच्या नोंदींमध्ये आढळलेल्या तफावतींच्या ७ लाख २५ हजार ४९ मतदारांना सुनावणीची संधी दिली जाणार असून सर्वाधिक 28 लाख 69 हजार 888 नावे वगळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. 'विशेष सखोल पुनरीक्षण' (एसआयआर) मोहिमेचा राजकीय परिणाम देखील होणार आहे. कोणत्या मतदारसंघावर जास्त परिणाम होईल हे अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होईल.  तरी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्राथमिक यादीकडे आणि त्यानंतर दाखल होणाऱ्या हरकतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

अ.क्र.

जिल्ह्याचे नाव

एकूण बीएलओ (BLOs)

एकूण मतदार

डिजिटाइज केलेले ईएफ (EFs)

संकलित न झालेले ईएफ (EFs)

नावे कायम राहणार

वगळण्याची शक्यता

1

पुणे

8417

9080173

6210278

2869888

2

ठाणे

6894

7450515

4588838

2861676

3

मुंबई उपनगर

7574

7830011

5165214

2664797

4

नागपूर

4610

4638589

3194241

1444257

5

नाशिक

4919

5104458

4075278

1029180

6

मुंबई शहर

2537

2555499

1603611

951888

7

पालघर

2274

2376053

1706382

669671

8

सोलापूर

3723

3941095

3321041

620054

9

औरंगाबाद

3264

3216167

2607340

608827

10

रायगड

2790

2533739

1948921

584787

11

जळगाव

3677

3552199

3037342

514857

12

कोल्हापूर

3450

3355244

2906149

449095

13

अहमदनगर

3830

3810102

3383342

426760

14

नांदेड

3088

2777073

2388951

388122

15

सांगली

2482

2573339

2191123

382216

16

अमरावती

2682

2545677

2192614

353063

17

सातारा

3165

2651347

2309825

341522

18

धुळे

1752

1835125

1540297

294827

19

अकोला

1741

1595644

1318678

276966

20

चंद्रपूर

2076

1797655

1527380

270275

21

यवतमाळ

2578

2253236

1988307

264929

22

जालना

1755

1682723

1439552

243171

23

बीड

2416

2193827

1953364

240463

24

लातूर

2142

2004450

1790013

214371

25

बुलढाणा

2288

2089965

1899002

190963

26

नंदुरबार

1434

1348574

1159925

188649

27

उस्मानाबाद

1523

1413864

1232391

181473

28

परभणी

1623

1541007

1360811

180196

29

वर्धा

1342

1137242

959113

178129

30

गोंदिया

1285

1123805

963234

160571

31

वाशिम

1100

1019519

885299

134220

32

भंडारा

1167

1010788

877427

133361

33

रत्नागिरी

1747

1329042

1197453

131589

34

गडचिरोली

972

828904

738299

90605

35

हिंगोली

1015

969385

884088

85297

36

सिंधुदुर्ग

921

688014

605461

82553

एकूण

100253

97854049

77150584

20703268



बीएलओंच्या घरभेटींचा अहवाल आणि उपलब्ध डेटाच्या आधारे एसआयआर पूर्ण झालेल्या मतदारांची प्राथमिक यादी २४ ऑगस्ट रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीवर ज्या नागरिकांना काही आक्षेप, हरकती किंवा दावे दाखल करायचे असतील, त्यांच्यासाठी २३ सप्टेंबरपासून प्रक्रिया खुली केली जाईल. २३ सप्टेंबरपासून प्राप्त होणाऱ्या सर्व दावे व हरकतींची रीतसर छाननी करून आणि सुनावणी पूर्ण करून २७ ऑक्टोबर रोजी सर्व मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 28 लाख 69 हजार 888 नावे वगळण्याची शक्यता



पुणे जिल्ह्यात विशेष पुनरिक्षण प्रक्रियेअंतर्गत (SIR) मतदारांच्या एन्युमरेशन फॉर्मच्या वितरणापासून ते डिजिटलायझेशनपर्यंतची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्ह्यातील तब्बल ९० लाख ८० हजार १७३ मतदारांना एन्युमरेशन फॉर्मचे वाटप करण्याचे काम ९९.९९ टक्के पूर्ण झाले असून, ९९.९४ टक्के फॉर्मचे डिजिटलायझेशनही पूर्ण झाले आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या जुन्या व सध्याच्या नोंदींमध्ये आढळलेल्या तफावतींच्या ७ लाख २५ हजार ४९ अॅनोमलीज समोर आल्या असून, संबंधित मतदारांना सुनावणीची संधी देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील SIR अंतर्गत एन्युमरेशन फॉर्म वितरणाची मोहीम आता पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदार असून, त्यांना फॉर्म वाटपाची प्रक्रिया जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहे. फॉर्मचे डिजिटलायझेशनही अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ९९.९४ टक्के फॉर्म डिजिटल करण्यात आले आहेत.

वय, नाव अथवा मॅपिंगमधील तफावतींमुळे अॅनोमली डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेत ७ लाख २५ हजार ४९ अॅनोमलीज आढळून आल्या आहेत. २००२ मधील मतदाराच्या नोंदीतील वय आणि सध्याच्या नोंदीतील वय यामध्ये अपेक्षित ताळमेळ नसणे, नावामध्ये काही चूक असणे किंवा मॅपिंगच्या प्रक्रियेत त्रुटी राहणे, अशा विविध कारणांमुळे अॅनोमली निर्माण होऊ शकते. विशेषतः मॅपिंग करताना दोन भावंडांमधील वयाचा फरक नऊ महिन्यांपेक्षा कमी दाखविला गेल्यासही सॉफ्टवेअरमध्ये अॅनोमली निर्माण होऊ शकते. त्यामुळे अॅनोमली आढळली म्हणजे संबंधित मतदाराची नोंद चुकीचीच आहे, असे गृहीत धरले जाणार नाही. अशा सर्व प्रकरणांची सुनावणी घेऊन आवश्यक ती पडताळणी केली जाणार आहे. अॅनोमलीमध्ये आलेल्या सर्व मतदारांसाठी सुनावणीच्या कालावधीत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नोटिसा जनरेट करण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित मतदारांची सुनावणी घेऊन त्यांच्या नोंदींबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. अॅनोमलीप्रमाणेच ‘नो लिंकज’ असलेल्या मतदारांचीही सुनावणी घेण्यात येणार आहे. २००२ च्या मतदार यादीमध्ये ज्यांचे नाव नव्हते आणि त्यांच्याशी संबंधित आई, वडील, आजी, आजोबा किंवा अन्य नातेवाईकांची नोंद २००२ च्या यादीशी जोडता आली नाही, अशा मतदारांचा समावेश ‘नो लिंकज’मध्ये करण्यात आला आहे. 

या मतदारांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार असून, सुनावणीनंतर नियमानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल. दरम्यान, ASD (Absent, Shifted, Dead आणि Duplicate) मतदारांच्या सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या जिल्हाधिकारी, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या याद्यांमध्ये आपले नाव आहे किंवा नाही, याची तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. ASD यादीमध्ये एखाद्या मतदाराचे नाव आढळल्यास संबंधित मतदाराने फॉर्म क्रमांक ६ भरून नव्याने मतदार नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. एखादा मतदार पूर्वी गोवा, बिहार किंवा अन्य राज्यात मॅप झालेला असेल आणि त्याची नोंद महाराष्ट्रात करावयाची असेल, तर संबंधित जुन्या ठिकाणी फॉर्म क्रमांक ७ भरावा लागेल. त्यानंतर महाराष्ट्रात फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार नोंदणी करावी लागेल.

मतदाराचा केवळ पत्ता बदलायचा असल्यास नियमानुसार फॉर्म क्रमांक ८ भरून पत्ता बदलाची प्रक्रिया करता येणार आहे. येत्या तीन दिवसांत निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन अॅनोमली नोंदी दूर करण्याची प्रक्रिया राबविणार आहेत. सध्या ७ लाख २५ हजार ४९ अॅनोमली आणि ८ लाख १८ हजार ३९८ ‘नो लिंकज’ मतदार, असे एकूण १५ लाख ४३ हजार ४४७ मतदार सुनावणीसाठी अपेक्षित आहेत. मात्र, कागदपत्रांच्या पडताळणीतून अॅनोमली दूर झाल्यास संबंधित मतदारांची संख्या कमी होऊन त्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची गरज भासणार नाही. डिजिटलायझेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी तीन दिवसांचा कालावधी असून, या कालावधीत उर्वरित सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण ३१.७१ टक्के असून, एवढे मतदार मतदारयादीतून वगळण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. प्रामुख्याने शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला आणि हडपसर या मतदारसंघांतील सर्वाधिक मतदार मृत, स्थलांतरित किंवा ‘नॉट रेडी टू साइन’ या वर्गवारीत असल्याने त्यांनी अर्ज जमा केले नसल्याचे उघड झाले आहे. ‘एसआयआर’अंतर्गत वितरित करून जमा झालेल्या अर्जांपैकी ९९.९९ टक्के अर्जांच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

सर्वाधिक २ लाख ९८ हजार मतदार हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून तर कसबा विधानसभा मतदारसंघातून सर्वात कमी ९२ हजार मतदार अपात्र

मतदारसंघ

 मतदारसंख्या

पात्र मतदार

पात्रता प्रमाण

209-शिवाजीनगर

292851

162618

55.53

214-पुणे कॅन्टोन्मेंट (SC)

301152

179306

59.54

215-कसबा पेठ

284672

192087

67.48

212-पर्वती

371234

219214

59.05

206-पिंपरी (SC)

401975

236148

58.75

210-कोथरूड

448055

240776

53.74

199-दौंड

323099

269119

83.29

196-आंबेगाव

317947

276465

86.95

195-जुन्नर

329754

282773

85.75

204-मावळ

382788

290723

75.95

200-इंदापूर

347141

294925

84.96

202-पुरंदर

497770

309495

62.18

208-वडगाव शेरी

518754

314652

60.66

211-खडकवासला

597114

318662

53.37

197-खेड आळंदी

378713

322660

85.2

201-बारामती

380923

336057

88.22

213-हडपसर

651473

352927

54.17

203-भोर

450206

359280

79.8

198-शिरूर

481990

372007

77.18

205-चिंचवड

687448

417351

60.71

207-भोसरी

635114

463129

72.92

एकूण

9080173

6210374

68.39


मतदारसंघ

 मतदारसंख्या

अपात्र मतदार

अपात्रता प्रमाण

196-आंबेगाव

317947

41482

13.05

201-बारामती

380923

44866

11.78

195-जुन्नर

329754

46981

14.25

200-इंदापूर

347141

52216

15.04

199-दौंड

323099

53980

16.71

197-खेड आळंदी

378713

56053

14.8

203-भोर

450206

90926

20.2

204-मावळ

382788

92065

24.05

215-कसबा पेठ

284672

92585

32.52

198-शिरूर

481990

109982

22.82

214-पुणे कॅन्टोन्मेंट (SC)

301152

121846

40.46

209-शिवाजीनगर

292851

130233

44.47

212-पर्वती

371234

152020

40.95

206-पिंपरी (SC)

401975

165827

41.25

207-भोसरी

635114

171985

27.08

202-पुरंदर

497770

188275

37.82

208-वडगाव शेरी

518754

204102

39.34

210-कोथरूड

448055

207279

46.26

205-चिंचवड

687448

270097

39.29

211-खडकवासला

597114

278449

46.63

213-हडपसर

651473

298546

45.83

एकूण

9080173

2869795

31.61


मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेपूर्वी शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात ३४ लाख ६५ हजार मतदार होते. आता या मोहिमेत अनुपस्थित, स्थलांतरित मृत आणि दुबार मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. त्यानुसार आता या आठही विधानसभा मतदारसंघांमधील १४ लाख ८५ हजार अर्थात ४२ टक्के मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. सर्वाधिक २ लाख ९८ हजार मतदार हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून वगळले जाणार असून सर्वात कमी ९२ हजार मतदार हे कसबा विधानसभा मतदारसंघातून वगळण्यात येणार आहेत. ही प्रारूप यादी आता ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शहरात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला, पर्वती, हडपसर , पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ अशा आठ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. शहरातील आठ मतदारसंघ मिळून एकूण ३४ लाख ६५ हजार ३०५ इतके मतदार होते. तर आता एसआयआर मोहिमेनंतर शहरात संभाव्य यादीनुसार १९ लाख ८० हजार २४२ इतके मतदार राहणार आहेत.एसआयआर मोहिमेत मतदार यादीतील प्रत्येक मतदाराला गणना अर्ज देण्यात आला. या अर्जावर मतदाराचे नाव, ओळखपत्र क्रमांक, पत्ता, मतदार यादीतील अनुक्रमांक, भाग क्रमांक, विधानसभा, लोकसभा मतदारसंघाचे नाव आणि मतदाराचे छायाचित्र आदी होती. हा अर्ज मतदाराला देऊन मतदाराचे २००२ यादीमधील आई, वडील यांची माहिती भरावयाची होती. तसेच आधार क्रमांक आणि फोटो घेण्यात आले. अशा प्रकारे हा अर्ज घेऊन त्याची माहिती अपलोड करण्यात आली.

संभाव्य प्रारूप मतदार यादीनुसार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात वगळण्यात आलेल्या संभाव्य मतदारांची संख्या ही २ लाख ४ हजार १०२ इतकी आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत वगळण्यात आलेल्या मतदारांची टक्केवारी ही ३९.३४ टक्के इतकी आहे. तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या १ लाख ३० हजार २३३ इतकी आहे. हे प्रमाण ४४.४७ टक्के इतके आहे. 

कोथरुड मतदारसंघात वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या २ लाख ७ हजार २७९ इतकी आहे. हे प्रमाण ४६.२६ टक्के इतके आहे. खडकवासला मतदारसंघातून २ लाख ७८ हजार ४४९ म्हणजेच ४६.६३ टक्के, पर्वती मतदारसंघातील १ लाख ५२ हजार २० म्हणजेच ४०.९५ टक्के, हडपसरमधील २ लाख ९८ हजार ५४६ म्हणजेच ४५.८३ टक्के, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील १ लाख २१ हजार ८४६ मतदार म्हणजेच ४०.४६ टक्के आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील ९२ हजार ५८५ म्हणजेच ३२.५२ टक्के मतदारांची नावे वगळली जाणार आहेत.

दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी ३१ ऑगस्टची मुदत दिली आहे. ही मुदत यापूर्वी २४ ऑगस्ट होती. सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीसंदर्भात ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येऊ शकतील. तसेच ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर या कालावधीत दावे व हरकतींबाबत नोटीस देणे तसेच सुनावणी करण्यात येईल. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातील तब्बल ९२ हजार ६५ मतदार अपात्र 

विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेत मावळ विधानसभा मतदारसंघातील तब्बल ९२ हजार ६५ मतदारांची नावे आढळून आलेली नाहीत. मतदारसंघातील ३ लाख ८२ हजार ७७८ मतदारांपैकी २ लाख ९० हजार ७२३ मतदारांची नोंद निश्चित झाली आहे. त्यामुळे २४.०५ टक्के मतदारांची नोंद पुनरिक्षणात निश्चित होऊ शकलेली नाही. या आकडेवारीमुळे संबंधित मतदारांच्या नावांबाबत पुढील कार्यवाही काय होणार, याकडे लक्ष लागले आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील ७५.९५ टक्के मतदारांची नोंद निश्चित झाली आहे. मात्र, उर्वरित २४.०५ टक्के मतदारांची ओळख, आवश्यक कागदपत्रे किंवा संबंधित नोंदी उपलब्ध न झाल्याने त्यांची नावे पुनरिक्षण प्रक्रियेत निश्चित झालेली नाहीत. 

पुणे जिल्ह्यात २८ लाख ६६ हजार ४८१ मतदार वगळले 

पुणे - मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी (दि. ३१) प्रसिद्ध करण्यात आली. पुनरीक्षणापूर्वीच्या यादीत एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदार होते. प्रारूप यादीत ही संख्या ६२ लाख १३ हजार ६९२ झाली आहे. त्यामुळे जुन्या यादीच्या तुलनेत २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांची, म्हणजेच सुमारे ३१.५७ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. त्यात पुरुषांची संख्या १५ लाख ३० हजार १५ ने घटली आहे. तर महिला मतदार १३ लाख ३५ हजार ९८३ व इतर ४८३ मतदार घटले आहेत. 

मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी असणे, मृत्यू, संबंधित पत्त्यावर मतदार न सापडणे, कायमस्वरूपी स्थलांतर तसेच अन्य कारणांमुळे ही नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. १८ जूनच्या मतदार यादीत जिल्ह्यात ४६ लाख ८१ हजार ३१२ पुरुष, ४३ लाख ९७ हजार ९९५ महिला आणि ८६६ तृतीयपंथी मतदार होते. प्रारूप यादीत पुरुष मतदारांची संख्या ३१ लाख ५१ हजार २९७, महिला मतदारांची संख्या ३० लाख ६२ हजार १२, तर इतर मतदारांची संख्या ३८३ झाली आहे.

हरकतीप्रारूप मतदार यादीवर नागरिकांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. दावे व हरकतींच्या निपटाऱ्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप मतदार यादीशी संबंधित एकूण १३ लाख ३२ हजार ४१८ प्रकरणांवर सुनावणी घेतली जाणार आहे. यामध्ये मतदारांच्या नाव, पत्ता आणि इतर तपशिलांतील त्रुटींशी संबंधित ५ लाख ७७ हजार ८२१ प्रकरणे, तर २००२च्या मतदार यादीशी नोंद जुळत नसलेल्या किंवा त्या यादीत समावेश नसलेल्या ७ लाख ५४ हजार ५९७ मतदारांची प्रकरणे आहेत. एकूण सुनावण्यांपैकी सुमारे ४३.३७ टक्के प्रकरणे तपशिलांतील त्रुटींशी, तर ५६.६३ टक्के प्रकरणे २००२ च्या यादीशी नोंद न जुळण्याशी संबंधित आहेत. 

पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक १ लाख २२ हजार २२५ सुनावण्या हडपसर मतदारसंघात होण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल खडकवासला मतदारसंघात १ लाख ३ हजार ७०६, तर चिंचवडमध्ये १ लाख ३ हजार १३ प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.या यादीमध्ये नाव नसल्यास अर्ज क्रमांक ६ भरून नव्याने मतदार नोंदणी करावी. तसेच यादीतील नावामध्ये आक्षेप असल्यास अर्ज क्रमांक ७ भरून आक्षेप नोंदविता येणार आहे. मतदार यादीमध्ये दुरुस्ती आणि मतदार कार्ड घेण्यासाठी अर्ज क्रमांक ८ भरता येईल आणि दुरुस्ती करून घेता येईल. प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट मतदारांच्या तपशिलात तफावत आढळल्यास तसेच २००२ च्या मतदार यादीशी ज्यांची जुळणी झालेली नाही, अशा मतदारांसाठी संबंधित यादी भागाच्या सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या स्तरावर सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करायचे किंवा नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 





Monday, 18 May 2026

Vidhan Parishad Election 2026; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जूनला निवडणूक तर 22 जून रोजी मतमोजणी


राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत संशयकल्लोळामुळे मित्र पक्षांना राजकीय लाभ 




महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक आज जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. काही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अद्यापही प्रलंबित असूनही या निवडणुका जाहीर केलेल्या असल्याने भावी सदस्यांच्या मतदानाअभावी या निवडणुका पार पडणार आहेत. मतदारांची संख्या अत्यल्प असणार असून केवल त्या क्षेत्रातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद सदस्यांच्या संख्येवर मतदान होणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. एकूण 17 जागांवर निवडणूक होणार, ज्यातील एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सर्व १६ जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील असून या जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ मे ते १ जून असणार आहे, तर अर्जांची छानणी २ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने या मतदारांतून होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकाही लांबल्या होत्या. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्याने विधानपरिषदेच्या या १६ जागांसाठीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणकोणत्या मतदारसंघांसाठी होणार निवडणूक?
सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना. 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच विधानसभा सदस्यांच्या मतदानावर होणाऱ्या विधानपरिषदेच्या ९ जागांवरील निवडणूक पार पडली. विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक अशा दहा सदस्यांचा शपथविधी गुरुवारी सकाळी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला. परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या सदस्यांना शपथ दिली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होते. बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांमध्ये भाजपचे प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, शिवसेना उबाठा पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकींचा समावेश आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेतली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सातव यांनाच ती जागा देण्यात आली.

आदर्श आचारसंहिता लागू- निवडणूक आयोगाच्या या घोषणेसोबतच संबंधित मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात ‘आदर्श निवडणूक आचारसंहिता’ (Model Code of Conduct) तातडीने लागू करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्या संख्याबळावर या जागांचे भवितव्य ठरणार असल्याने, आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी आणि राजकीय गणितांना सुरुवात झाली आहे.

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक 
अधिकृत अधिसूचना जारी करणे  : २५ मे २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत: ०१ जून २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्जांची छाननी  : ०२ जून २०२६ (मंगळवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस: ०४ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाचा दिनांक  : १८ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाचा वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत
मतमोजणी आणि निकाल : २२ जून २०२६ (सोमवार)

सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्यांची नावे
सोलापूर: प्रशांत प्रभाकर परिचारक
अहमदनगर: अरुणकाका बालभीमराव जगताप
ठाणे: फाटक रवींद्र सदानंद
जळगाव: चंदूभाई व्ही. पटेल
सांगली-सातारा: कदम मोहनराव श्रीपती
नांदेड: अमरनाथ अनंतराव राजूरकर
यवतमाळ: दुष्यंत सतीश चतुर्वेदी
पुणे: अनिल शिवाजीराव भोसले
भंडारा-गोंदिया: डॉ. परिणय रमेश फुके
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: अनिकेत सुनील तटकरे
नाशिक: नरेंद्र भिकाजी दराडे
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली: रामदास भगवानजी आबिटकर
अमरावती: प्रवीण रामचंद्र पोते
उस्मानाबाद-लातूर-बीड: सुरेश धस
परभणी-हिंगोली: विप्लव गोपीकिसन बजोरिया
औरंगाबाद-जालना: अंबादास दानवे

राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत संशयकल्लोळामुळे मित्र पक्षांना राजकीय लाभ 


राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांतर्गत संशयकल्लोळ वातावरण निर्माण करण्यात विरोधकांना यश आल्याचे दिसून येत असून आमदार रोहित पवार यांची भूमिका देखील कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झडत आहे. पक्षाचे सर्वेसर्वा अजित दादांच्या निधनामुळे पोरके झालेला पक्ष अजूनही धक्क्यातून सावरताना दिसून येत नाही. नेतृत्वावरुन पक्षांतर्गत संघर्ष धुपसत असून जेष्ठ व नवख्या पदाधिकाऱ्यांमध्ये विचारांची दरी निर्माण करण्यास काही प्रमाणात यश मिळताना दिसून येत आहे. दादांच्या अपघात दुर्घटना चौकशीची मागणी करुन त्रुटी दर्शवून घातपाताचा संशय निर्माण करणाऱ्या आमदार रोहित पवार यांची भूमिका देखील कारणीभूत असल्याची चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असे देखील राजकीय वातावरण निर्माण केले जात आहे. विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या परिस्थितीचा लाभ विरोधकांना नव्हे तर मित्र पक्षांना लाभ मिळणार आहे.  

महाराष्ट्रातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून त्या भागात झालेल्या पालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये सत्तेतील भाजप प्रमुख पक्ष असून त्यांच्या सर्वाधिक सदस्य आहेत त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये मित्र पक्षांच्या मतदार संख्या प्रभावी आहे मात्र राजकीय नेतृत्वहीन कुशलते अभावी विधानपरिषद निवडणुकांच्या जागांना  मुकावे लागणार आहे याचा राजकीय लाभ मित्र पक्षांना होणार आहे हे मात्र निश्चित आहे. 

राष्ट्रीय अध्यक्षांच्या सहीचे दोनदा वेगवेगळे बदल करून निवडणूक आयोगाला देण्यात आलेले पत्र ग्राह्य धरायचे की राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रक्रिया ग्राह्य धरायची याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पत्रांचा घोळ पदांचा गोंधळ सुरू आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दोन महिन्यात बदललेल्या भूमिकेवरून देखील पक्षात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सध्याचा निवडणूक आयोगासोबत सुरू असलेला पत्र प्रपंच पार्थ पवार करत आहे. म्हणजेच सुनेत्रा वहिनींची सही पार्थ पवारांची शाई हे करताना सुनेत्रा पवार त्यांना रोखू शकत नसल्यामुळे आणि प्रफुल पटेल सुनील तटकरे पक्षासोबत नसतील तर आगामी काळातील पक्षाचे एकंदरीत भविष्यच अडचणीचे असल्याचे आमदारामधे चर्चा आहे. सध्या भाजपने त्यांच्या पक्षात कोणत्याही प्रकारे राष्ट्रवादीतून इनकमिंग केले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पक्षातील बिघडणारी घडी सावरायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच पुढाकार घ्यावा अशी काहींची धारणा आहे. 

पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक; राष्ट्रवादीकडे सर्वाधिक ३३८ मते 

महायुतीत राष्ट्रवादीला जागा दिल्यास बंडखोरी अटळ; भाजप सेनेकडे ३६७ मते

पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन घटक पक्षांमध्येच सध्या तरी मोठी चुरस पहावयास मिळत आहे. मात्र पुण्याची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार की भाजपला, यावर या निवडणुकीच्या विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत. हा मतदारसंघ पुर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने पुण्याची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे दोन नेते घेणार आहेत. या निवडणुकीत विजयासाठी ४०० मते आवश्यक असून एकहाती मते ही दोन्ही पक्षांकडे नसल्याचे दिसून येत आहे. परंतू, भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिक मते आहेत तर भाजप शिंदे सेनेकडे ३६७ मते वरचड आहेत. राष्ट्रवादीमध्ये एकगठ्ठा पक्षीय मतदान होण्याची शक्यता धूसर असून बदलत्या राजकीय समिकरणामुळे राष्ट्रवादीत दोन गट विभागले गेले असून त्याचा फटका बसेल अशी देखील शक्यता वर्तविली जात आहे. महायुतीत राष्ट्रवादीला जागा दिल्यास बंडखोरी अटळ असल्याचे देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

तब्बल चार वर्षांच्या कालखंडानंतर यंदा पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांचे सर्व नगरसेवक (स्विकृत वगळून), पुणे जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती, नगरपालिका व नगरपंचायतींचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे या निवडणुकीचे मतदार आहेत.  दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक ३३८ मते असून त्यापाठोपाठ भाजपकडे २९७ मते आहेत. याशिवाय शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ७०, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १२, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १० आणि अपक्ष व अन्य २७ मते आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि अपक्ष यांची मते निर्णायक ठरणार आहेत.  या निवडणुकीसाठी एकूण ७९९ मते आहेत. या निवडणुकीत १०० टक्के मतदान झाल्यास, निवडून येण्यासाठी किमान ४०० मते लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाल्यास, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि अपक्षांची मते निर्णायक ठरणार आहेत.

कोण आहेत मतदार? 
- पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्व नगरसेवक. 
- पुणे जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य ( पदसिद्ध सदस्यांसह) 
- जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगर पंचायतींचे नगराध्यक्ष व नगरसेवक.

स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय एकूण मतदार 
- पुणे जिल्हा परिषद --- ७३. 
- जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती (पद्सिद्ध झेडपी सदस्य) --- १३. 
- पुणे महापालिका नगरसेवक --- १६५. 
- पिंपरी चिंचवड महापालिका नगरसेवक --- १२८. 
- नगरपालिका व नगर पंचायतींचे नगराध्यक्ष --- १८. 
- नगरपालिका व नगर पंचायतींचे नगरसेवक --- ४०२. 
- एकूण --- ७९९.

पक्षीय बलाबल 
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) --- ३३८
- भाजप --- २९७
- शिवसेना (एकनाथ शिंदे गट) --- ७०
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष --- १२
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष --- १०
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस --- १९
- नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी --- १६ 
- कृष्णा -भीमा आघाडी --- ०६
- जनमत विकास आघाडी --- ०२
- राष्ट्रीय समाज पक्ष --- ०१
- बहूजन समाज पार्टी --- ०१
- अपक्ष व अन्य --- २७. 
- एकूण --- ७९९.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 




Tuesday, 5 May 2026

Assembly Election Results 2026: पाच राज्यांच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर; भाजपला घवघवीत यश, ममता बॅनर्जींच्या तृणमूलच बंगालमध्ये पानिपत

ममता बॅनर्जींच्या तृणमूलच बंगालमध्ये पानिपत; तामिळनाडूत द्रमुकला सर्वात मोठा धक्का, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन पराभूत



पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. तर आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक धक्कादायक निकाल लागला आहे. द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा पराभव झाला आहे. अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाच्या त्सुनामीमध्ये द्रमुकचा मोठा पराभव झाला आहे.  तामिळनाडूच्या विधानसभेची सदस्यसंख्या 234 इतकी आहे. या नुसार बहुमताची आकडेवारी 118 इतकी होते. जो पक्ष 118 जागा जिंकेल तामिळनाडूत सत्ता स्थापन करता येऊ शकते. अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी ते बहुमताच्या मॅजिक फिगरपासून दूर आहेत. मात्र, सर्वात मोठा पक्ष म्हणून टीव्हीके पक्षाला तामिळनाडूत सत्ता स्थापन करता येऊ शकते. दरम्यान, अभिनेता विजय याचा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं समोर येताच मोठ्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. अभिनेता विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर यांनी काँग्रेसनं टीव्हीकेसोबत आघाडी करावी, यासाठी ऑफर दिली आहे. मात्र, राष्ट्रीय राजकारणातील द्रमुक सोबतची आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप-207
तृणमूल काँग्रेस- 80
काँग्रेस -02
डावे पक्ष- 02
इतर-02
एकूण जागा-293
Tamilnadu Election Result 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल
द्रमुक- 74
अण्णाद्रमुक-53
टीव्हीके-107
इतर-00
एकूण जागा-234
Kerla Election Result 2026: केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल
काँग्रेस यूडीएफ आघाडी-102
डावी आघाडी -35
इतर-03
एकूण जागा-140
Assam Election Result 2026: आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप-102
काँग्रेस- 19
इतर-05
एकूण जागा-126
Puducherry Election Result 2026: पुद्दुचेरी  विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप- 18
काँग्रेस-06
इतर-06
एकूण जागा-30

Rahuri Bypoll Election 2026: राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय

112587 मतांनी अक्षय कर्डीले विजयी. येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीच्या संतोष चोळकेंना 5690 मतं पडली आहेत. याशिवाय, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 7299 मतं मिळाली असून लाखांच्या फरकाने अक्षय कर्डिले आमदार बनले आहेत.

Baramati byelection Result 2026: सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य, पोटनिवडणुकीत इतिहास रचला

बारामती पोटनिवडणुकीच्या २४ व्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय झाला आहे. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने आज झाला आहे. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-