Sunday, 27 January 2019

#Malkapur municipal council election 2019 मलकापूर नगरपरिषद निवडणूक निकाल-2019 ; नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निलम येडगे

मलकापूर नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची बाजी 



मलकापूर नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. नगरपरिषदेसाठी रविवारी 82.36 टक्के मतदान झाले होते. नगरपरिषदेत काँग्रेसने 14 जागांवर विजय मिळवला तर भाजपला केवळ 5 जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निलम येडगे विजयी झाल्या आहेत. येडगे यांना 7 हजार 747 मते तर भाजपच्या उमेदवार सारिका गावडे यांना 7 हजार 477 मते मिळाली. या निवडणुकीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस व भाजप मध्ये चुरस निर्माण झाली होती मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून बाजी मारली आहे.नऊ प्रभागातील प्रभाग क्रमांक एक, तीन, चार, सहा व नऊमध्ये काँग्रेसचे उमेदावर विजयी झाले. भाजपने प्रभाग क्रमांक दोन, व आठमध्ये विजय मिळवला. त्यात प्रभाग क्रमांक पाचमध्ये एक उमेदवार काँग्रेसचा तर एक भाजपचा विजयी झाला. त्यामुळे भाजपचे पाच तर काँग्रेसचे 14 उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक चारमध्ये काँग्रेसच्या भारती पाटील व भाजपच्या अवंतिका घाडगे यांना 662 अशी समान मते मिळाली. त्यांचा निकाल चिठ्ठीव्दारे जाहीर करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी त्या दोघींच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून त्या बॉक्समध्ये टाकल्या. चार वर्षांची लहान मुलगी आराध्या जाधवतर्फे एक चिठ्ठी उघडण्यात आली. ती चिठ्ठी भारती पाटील यांच्या नावाची होती. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.या निवडणुकीत शिवसेना कराड दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशिद यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. याशिवाय माजी नगराध्यक्ष काँग्रेस उमेदवार मोहन शिंगाडे, माजी नगरसेविका भाजपच्या उमेदवार उमा शिंदे, माजी उपसरपंच भाजप उमेदवार सुहास कदम यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तर सातारा जिल्हा परिषदेचे नियोजन समिती सदस्य सविनय कांबळे यांचाही पराभव झाला आहे. त्याचबरोबर मलकापूर नगरपंचायतीमध्ये विरोधी गटनेते म्हणून काम केलेले भाजपचे उमेदवार हणमंतराव जाधव यांनाही पराभवास सामोरे जावे लागले आहे. 

प्रभायनिहाय मतदानाची टक्केवारी अशी : मलकापूर नगरपालिकेत प्रभाग एकमध्ये 1848 मतदारांपैकी 1494, प्रभाग दोनमध्ये 1366 मतदारांपैकी 1154, प्रभाग तीनमध्ये 2461 मतदारांपैकी 2062, प्रभाग चारमध्ये 1692 मतदारांपैकी 1333, प्रभाग पाचमध्ये 1929 मतदारांपैकी 1563, प्रभाग सहामध्ये 1768 मतदारांपैकी 1499, प्रभाग सातमध्ये 1993 मतदारांपैकी 1653, प्रभाग आठमध्ये 2317 मतदारांपैकी 1845, प्रभाग नऊमध्ये 3256 मतदारांपैकी 2740 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये 9770 पुरूष मतदारांपैकी 8120 जणांनी मतदान केले. तर 8860 महिला मतदारांपैकी 7223 महिलांनी मतदान केले होते. एकूण 18630 मतदारांपैकी 15343 मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला होता. 


 साताऱ्यातील मलकापूर नगरपरिषद 

एकूण जागा 19 : काँग्रेस विजयी

काँग्रेस : 14

भाजप : 5

नगराध्याक्ष : नीलम येडगे (काँग्रेस)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   


====================================================================







#karjat election 2019 कर्जत नगर परिषद निवडणूक निकाल-2019 नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्णा जोशी

कर्जत नगर परिषदेवर युतीचा झेंडा




आमदार सुरेश लाड यांची कन्या अॅड. प्रतिक्षा लाड पराभूत

कर्जत नगर परिषदेवर शिवसेना, भाजप आणि आरपीआय युतीने विजय मिळवला आहे. नगर परिषदेच्या एकूण १८ पैकी १० जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. नगराध्यक्षपदासाठीही युतीच्या उमेदवार सुवर्णा जोशी विजयी झाल्या आहेत. कर्जत नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या सुवर्णा जोशी यांनी बाजी मारली असून, राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांची कन्या अॅड. प्रतिक्षा लाड यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. कर्जत नगरपरिषद निवडणुकीत 18 नगरसेवकपदांसाठी 43 उमेदवार, तर नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. एकूण 18 नगरसेवकांपैकी 10 शिवसेना-भाजप युतीचे, तर 8 राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून सुवर्णा जोशी, तर राष्ट्रवादीकडून आमदार सुरेश लाड यांची मुलगी अॅड. प्रतिक्षा लाड या उमेदवार होत्या. त्यात सुवर्णा जोशी यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवत, प्रतिक्षा लाड यांचा पराभव केला आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या  सुवर्णा जोशी यांना 9972 मते, तर तर राष्ट्रवादी-मनसे आघाडीच्या उमेदवार अॅड. प्रतिक्षा लाड यांना 7363 मते मिळाली. शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांचा 2609 मतांच्या फरकाने विजय झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नगरपालिका-परिषदा निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप शिवसेना यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला होता.मात्र त्यांना यश आले नाही हे निकालावरून दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांच्या सर्व राजकीय गणितांना धक्का देत 25 वर्षांनी कर्जत नगरपालिकेत परिवर्तन शिवसेनेने हे परिवर्तन घडवून आणले आहे. शिवसेनेने येथे 6 जागांवर विजय मिळवला तर भाजपने 4 जागांवर यश मिळवले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा जिंकल्या आहेत. थेट नगराध्यक्षपदासाठी दोन आणि १८ सदस्य यांच्यासाठी मिळून ४५ उमेदवार रिंगणात होते. २२,८६३ मतदार त्यातून १९ लोकप्रतिनिधी निवडले आहेत. पालिका निवडणुकीसाठी बनविण्यात आलेल्या प्रभागात सर्वात लहान प्रभाग दोन असून तेथे सर्वाधिक कमी २०६६ मतदार आहेत. तर सर्वाधिक मतदार प्रभाग क्रमांक ७ मध्ये असून तेथे ३१५२ मतदार आहेत. एकूण मतदारांमध्ये ११,१४६ महिला मतदार असून ११,७१७ पुरु ष मतदार आहेत. महिला मतदार ९ पैकी केवळ एका प्रभागात म्हणजे प्रभाग तीनमध्ये सर्वाधिक १४६६ आहेत. अन्य सर्व प्रभागात पुरु ष मतदारांची संख्या अधिक आहे. सुमारे ८० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

कर्जतमधील ४ उमेदवार कोट्यधीश-
कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत ४ उमेदवार कोट्यधीश आहेत, तर आठ उमेदवार पाचवीपर्र्यंत शिक्षण घेतलेले आहेत. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांचे शिक्षण ग्रॅज्युएट आहे. त्यांच्याकडे ५० लाख २०५ रु पयांची जंगम मालमत्ता आहे तसेच ८ कोटी ९१ लाख ३९ हजार १२० रु पयांची स्थावर मालमत्ता आहे. प्रभाग- ९ ब मधून शिवसेनेकडून निवडणूक लढविणारे महेंद्र कानिटकर यांच्याकडे २४ कोटी २२ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. प्रभाग -२ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढणारे शरद लाड यांच्याकडे १ कोटी ७९ लाख ८१ हजार ६३ रु पयांची जंगम मालमत्ता आहे. १९ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामधील ८ उमेदवार पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतीक्षा लाड वकील असून त्यांच्याकडे जंगम मालमत्ता १७ लाख ६२ हजार रु पये एवढी आहे. नगरसेवक उमेदवारामध्ये प्रभाग-२ अ मधून निवडणूक लढणाऱ्या भाजपाच्या सरस्वती चौधरी यांच्याकडे ४४ कोटी ७३ लाख ५० हजारांची स्थावर मालमत्ता आहे.


  रायगडमधील कर्जत नगरपालिका 

एकूण जागा 17 : शिवसेना-भाजप युती विजयी
शिवसेना-भाजप-आरपीआय युती : 10 जागा
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : 8 जागा

नगराध्यक्ष : सुवर्णा जोशी (शिवसेना)

 prabhag 1
DHARADE RAJESH SHIVAJI
GAJMAL MAYURI RAVINDRA
HILE KISHORKUMAR SHANKARRAO
MENGAL JYOTI PANDURANG
PALKAR BHARATI BHANUDAS
VAIKAR ARUNA PRADEEP

 prabhag 2
BHASE SANKET JANARDAN
CHOWDHARI SARASWATI MILIND
KANHERIKAR KOYAL CHAITANYA
LAD SHARAD LAXMAN
NILADHE SUVARNA ANANT

 prabhag 3
DANDEKAR VIVEK BHASKAR
JINGARE VISHAKHA VIJAY
LAD KUNDA ARUN
PAWAR ATUL GOVIND

 prabhag 4
DERVANKAR PRACHI PRAKASH
MANE MALHARI SHANKAR
MORE SUSHAMA SUJIT
SAWANT NITIN NANDKUMAR
SHETTY RAKESH VYENKAPPA

 prabhag 5
GHUMARE BALWANT NARAHARI
HARPUDE SHWETA SUNIL
KADU ANJALI ATUL
PATIL SANCHITA SANTOSH

 prabhag 6
DAGADE PUSHPA HARISHCHANDRA
GOSAVI NILAM SURENDRA
HAJARE RAMCHANDRA RAGHO
THOMBARE SOMNATH MARUTI
VICHARE YAMUTAI BALAJI

 prabhag 7
BOBADE PUNAM PRALHAD
CHANDAN MADHURA MAHENDRA
DALIMBKAR RAHUL PRALAHAD
DOLAS RUPESH PANDURANG
GAIKWAD TRISHARAN RAJU

 prabhag 8
LAD RAJESH RAMESH
MANJARE SWAMINI DEVENDRA
OSWAL ASHOK DHARAMACHAND
PATANGE RUPALI SURENDRA

 prabhag 9
GAIKWAD UMESH SHRIRANG
JADHAV ANITA UTTAM
KANITKAR MAHENDRA MUKUNDRAO
MORE SARITA GANESH
MORE VAISHALI DEEPAK


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   


====================================================================





श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक निकाल-2019 नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी पोटे विजयी

श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी पोटे 



भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी झाल्या आहेत. भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा 2100 मतांनी पराभव केला. भाजपाने 11 जागांवर विजय मिळविला तर आघाडीने 08जागांवर विजय मिळविला. आघाडीच्या संगिता मखरे, राजू लोखंडे, गणेश भोस, सुनीता खेतमाळीस यांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपाच्या दिपाली औटी, संग्राम घोडके विजयी झाल्या आहेत. प्रभाग सातमधून आघाडीचे निसार बेपारी व सोनल घोडके यांनी विजय मिळविला आहे. प्रभाग सहामधून भाजपाच्या अशोक खेंडके, मनिषा लांडे यांनी विजय खेचून आणला आहे. नगरपालिकेसाठी काल ८४ टक्के मतदान झाले होते. २३ हजार ६०४ मतदारांपैकी १९ हजार ८५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. श्रीगोंदा नगरपालिकेसाठी १९ जागांसाठी ७१ उमेदवार मैदानात होते. नगराध्यक्षपदासाठी शुभांगी पोटे, सुनीता शिंदे आणि सिराबजी कुरेशी या उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या.


 निकाल :  विजयी उमेदवार

[?]  प्रभाग क्रमांक १ -संगीता मखरे, राजूू लोखंडे (आघाडी)
[?]  प्रभाग क्रमांक २- सुनीता खेतमाळीस (भाजप), गणेश भोस (आघाडी)
[?]  प्रभाग क्रमांक ३-  दीपाली औटी, संग्राम घोडके (भाजप)
[?]  प्रभाग क्रमांक ४- मनोहर पोटे (आघाडी), वनिता क्षीरसागर (भाजप)
[?]  प्रभाग क्रमांक ५- मनीषा वाळके, शहाजी खेतमाळीस (भाजप)
[?]  प्रभाग क्रमांक ६- अशोक खेंडके, मनीषा लांडे (भाजप)
[?]  प्रभाग क्रमांक ७ - सोनल घोडके, निसार बेपारी (आघाडी)
[?]  प्रभाग क्रमांक ८- ज्योती खेडकर, रमेश लाढाणे (भाजप)
[?]  प्रभाग क्रमांक ९- छाया गोरे (भाजप), सीमा गोरे, संतोष कोथिंबिरे (आघाडी).

श्रीगोंदा नगरपरिषद निकाल (एकूण जागा – 19) :

प्रभागनिहाय विजयी उमेदवार :

  प्रभाग क्रमांक - 1
सतीश मखरे, आघाडी
राजभाऊ लोखंडे,आघाडी
  प्रभाग क्रमांक - 2
गणेश भोस ,आघाडी
सुनीता खेतमाळीस,भाजप
  प्रभाग क्रमांक - 3
दीपाली औटी ,भाजप
घोडेक संग्राम ,भाजप
  प्रभाग क्रमांक - 4
मनोहर पोटे : आघाडी
वनिता क्षीरसागर,भाजप
  प्रभाग क्रमांक - 5
शहाजी खेतमाळीस ,भाजप
मनिषा वाळ्के : भाजप
  प्रभाग क्रमांक - 6
मनिषा लांडे : भाजप
अशोक खेंड़के : भाजप
  प्रभाग क्रमांक - 7
निसार बेपारी : आघाडी
सोनाली घोडके : आघाडी
  प्रभाग क्रमांक - 8
ज्योती खेडकर : भाजप
रमेश लढणे :     भाजप
  प्रभाग क्रमांक - 9
संतोष कोथिंबीरे : आघाडी
सीमा गोरे   : आघाडी


छाया गोरे   : भाजप

प्रभायनिहाय मतदानाची टक्केवारी अशी : प्रभाग 1: 2 हजार 322 पैकी 2 हजार 050, प्रभाग 2 :  2 हजार 314  पैकी 2 हजार 024, प्रभाग 3 : 2 हजार 122 पैकी 1हजार 837, प्रभाग 4 : 2 हजार 319 पैकी 1 हजार 815, प्रभाग 5 : 2 हजार 628  पैकी 2 हजार 324, प्रभाग 6 : 2 हजार 870 पैकी 2हजार 292,  प्रभाग  7 :  2 हजार 689 पैकी 2 हजार 223, प्रभाग 8 : 2 हजार 484 पैकी 2हजार 157, प्रभाग 9 : 3 हजार 766 पैकी 3 हजार 100 मतदान झाले.


  अहमदनगरमधील श्रीगोंदा नगर परिषद

एकूण जागा 19 : भाजप विजयी
भाजप : 11
काँगेस-राष्ट्रवादी आघाडी : 8
नगराध्यक्ष : शुभांगी पोटे (काँगेस-राष्ट्रवादी आघाडी)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   


====================================================================

#election 2019 निवडणूक जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांची खैरात रोखा! जनहित याचिका दाखल

 सत्ताधारी पक्षाचा लेखाजोगा मतदारांपुढे मांडावा अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल 


निवडणूक जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांची खैरात रोखावी तसेच सत्ताधारी पक्षाचा लेखाजोगा मतदारांपुढे मांडावा अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सत्तेवर येण्यासाठी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने सत्ताधारी पक्षाने पूर्ण केली, याचा अहवाल निवडणूक आयोगाला द्यावा आणि आयोगाने तो जाहीर करून त्या पक्षाचा जमाखर्च मतदारांपुढे मांडावा; ज्यायोगे पुढील काळात त्या पक्षाला मतदान करण्याबाबत मतदारांना निर्णय घेता येईल, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याचे महत्त्व जाणून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला याबाबत मागदर्शक तत्वे आखण्याचे निर्देश दिले. त्यानुसार निवडणूक आयोगाने काही मागदर्शक तत्त्वे आखली. मात्र, या जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या वचनांची पूर्तता करण्यात आली की नाही, याबाबत माहिती मिळवण्यापासून निवडणूक आयोगाने मतदारांना वंचित ठेवले आहे. सत्ताधारी पक्षाने निवडून आल्यानंतर केलेल्या कामांचा लेखाजोगा निवडणूक आयोगापुढे मांडावा आणि आयोगाने ही माहिती सामान्यांसाठी खुली करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते अक्षय बजाद यांनी उच्च न्यायालायत याचिका दाखल केली आहे. मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. एन.एम. जामदार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. न्यायालयाने पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. राजकीय पक्षाने व त्यांच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची किती पूर्तता केली, याचा अहवाल निवडणूक आयोगापुढे पुढील निवडणूक लढविताना भरणे, बंधनकारक करावे व ही माहिती नागरिकांना देण्यात यावी. त्यासाठी ‘कंडक्ट आॅफ इलेक्शन रुल्स, १९६२ मधील नियम ४ (अ) आणि फॉर्म २६ मध्ये सुधारना करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.तसेच केलेल्या कामांचा अहवाल सादर करण्याबाबत मागदर्शक तत्त्वे आखण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंतीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे निवदेन दिले. मात्र, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम आम्ही करू शकत नाही, असे उत्तर याचिकाकर्त्यांना दिले. ‘निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या कामकाजावर लक्ष ठेवू नये. मात्र, लोकशाहीला बळकटी देण्यासाठी राजकीय पक्षांनी केलेल्या कामाची यादी जाहीर करावी. राजकर्त्यांचे काम सामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी निवडणूक आयोग हे एक माध्यम ठरेल असे याचिकेत म्हटले आहे. निवडणूक जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांची खैरात केली जाते मतदार अशा आश्वासनांना भुलून मते देतात आणि नंतर संबधित राजकीय पक्ष आश्वासनांची पूर्तता करीत नाहीत मतदारांची फसवणूक होते असे गैरप्रकार रोखावे अशी मागणी केली आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   

====================================================================


News Update-20 feb 2019 times pub.

PIL seeks update of earlier poll promises -


In yet another PIL over the forthcoming general elections, an activist has moved Bombay HC over the right of voters to know the status of election manifestos from previous campaigns. The HC has sought a reply to the PIL which says parties/candidates must be asked to put up status updates of earlier election manifestos while filling nomination forms.The petitioner, Akshay Bajad, in the PIL filed last month through Talekar and Associates says election manifestos have become guides for voters to know the political party and the policies they seek to implement when elected. There is no law governing such election manifestos in India other than guidelines issued by the  says the petition, which counsel S B Talekar had mentioned before a bench of chief justice Naresh Patil and justice Nitin Jamdar. The bench asked lawyer for the central government, Carina Xavier, to let the court know its stand. The matter will now be heard in March.The PIL seeks directions to the Centre to frame guidelines that require candidates to give a declaration at the time of filing nomination of status of promises made in election manifestos. The petitioner says last May, the ECI had, in response to his representations, said monitoring promises made in earlier manifestos was not part of its function. The HC also asked that the petition be served on the ECI. The HC also asked that the petition be served on the ECI. The matter will now be heard on 26/03/2019.