कर्जत नगर परिषदेवर युतीचा झेंडा
आमदार सुरेश लाड यांची कन्या अॅड. प्रतिक्षा लाड पराभूत
कर्जत नगर परिषदेवर शिवसेना, भाजप आणि आरपीआय युतीने विजय मिळवला आहे. नगर परिषदेच्या एकूण १८ पैकी १० जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. नगराध्यक्षपदासाठीही युतीच्या उमेदवार सुवर्णा जोशी विजयी झाल्या आहेत. कर्जत नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या सुवर्णा जोशी यांनी बाजी मारली असून, राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांची कन्या अॅड. प्रतिक्षा लाड यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. कर्जत नगरपरिषद निवडणुकीत 18 नगरसेवकपदांसाठी 43 उमेदवार, तर नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. एकूण 18 नगरसेवकांपैकी 10 शिवसेना-भाजप युतीचे, तर 8 राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून सुवर्णा जोशी, तर राष्ट्रवादीकडून आमदार सुरेश लाड यांची मुलगी अॅड. प्रतिक्षा लाड या उमेदवार होत्या. त्यात सुवर्णा जोशी यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवत, प्रतिक्षा लाड यांचा पराभव केला आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या सुवर्णा जोशी यांना 9972 मते, तर तर राष्ट्रवादी-मनसे आघाडीच्या उमेदवार अॅड. प्रतिक्षा लाड यांना 7363 मते मिळाली. शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांचा 2609 मतांच्या फरकाने विजय झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नगरपालिका-परिषदा निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप शिवसेना यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला होता.मात्र त्यांना यश आले नाही हे निकालावरून दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांच्या सर्व राजकीय गणितांना धक्का देत 25 वर्षांनी कर्जत नगरपालिकेत परिवर्तन शिवसेनेने हे परिवर्तन घडवून आणले आहे. शिवसेनेने येथे 6 जागांवर विजय मिळवला तर भाजपने 4 जागांवर यश मिळवले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा जिंकल्या आहेत. थेट नगराध्यक्षपदासाठी दोन आणि १८ सदस्य यांच्यासाठी मिळून ४५ उमेदवार रिंगणात होते. २२,८६३ मतदार त्यातून १९ लोकप्रतिनिधी निवडले आहेत. पालिका निवडणुकीसाठी बनविण्यात आलेल्या प्रभागात सर्वात लहान प्रभाग दोन असून तेथे सर्वाधिक कमी २०६६ मतदार आहेत. तर सर्वाधिक मतदार प्रभाग क्रमांक ७ मध्ये असून तेथे ३१५२ मतदार आहेत. एकूण मतदारांमध्ये ११,१४६ महिला मतदार असून ११,७१७ पुरु ष मतदार आहेत. महिला मतदार ९ पैकी केवळ एका प्रभागात म्हणजे प्रभाग तीनमध्ये सर्वाधिक १४६६ आहेत. अन्य सर्व प्रभागात पुरु ष मतदारांची संख्या अधिक आहे. सुमारे ८० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
कर्जतमधील ४ उमेदवार कोट्यधीश-
कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत ४ उमेदवार कोट्यधीश आहेत, तर आठ उमेदवार पाचवीपर्र्यंत शिक्षण घेतलेले आहेत. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांचे शिक्षण ग्रॅज्युएट आहे. त्यांच्याकडे ५० लाख २०५ रु पयांची जंगम मालमत्ता आहे तसेच ८ कोटी ९१ लाख ३९ हजार १२० रु पयांची स्थावर मालमत्ता आहे. प्रभाग- ९ ब मधून शिवसेनेकडून निवडणूक लढविणारे महेंद्र कानिटकर यांच्याकडे २४ कोटी २२ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. प्रभाग -२ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढणारे शरद लाड यांच्याकडे १ कोटी ७९ लाख ८१ हजार ६३ रु पयांची जंगम मालमत्ता आहे. १९ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामधील ८ उमेदवार पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतीक्षा लाड वकील असून त्यांच्याकडे जंगम मालमत्ता १७ लाख ६२ हजार रु पये एवढी आहे. नगरसेवक उमेदवारामध्ये प्रभाग-२ अ मधून निवडणूक लढणाऱ्या भाजपाच्या सरस्वती चौधरी यांच्याकडे ४४ कोटी ७३ लाख ५० हजारांची स्थावर मालमत्ता आहे.
एकूण जागा 17 : शिवसेना-भाजप युती विजयी
शिवसेना-भाजप-आरपीआय युती : 10 जागा
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : 8 जागा
नगराध्यक्ष : सुवर्णा जोशी (शिवसेना)
रायगडमधील कर्जत नगरपालिका
एकूण जागा 17 : शिवसेना-भाजप युती विजयीशिवसेना-भाजप-आरपीआय युती : 10 जागा
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : 8 जागा
नगराध्यक्ष : सुवर्णा जोशी (शिवसेना)

DHARADE RAJESH SHIVAJI
GAJMAL MAYURI RAVINDRA
HILE KISHORKUMAR SHANKARRAO
MENGAL JYOTI PANDURANG
PALKAR BHARATI BHANUDAS
VAIKAR ARUNA PRADEEP

BHASE SANKET JANARDAN
CHOWDHARI SARASWATI MILIND
KANHERIKAR KOYAL CHAITANYA
LAD SHARAD LAXMAN
NILADHE SUVARNA ANANT

DANDEKAR VIVEK BHASKAR
JINGARE VISHAKHA VIJAY
LAD KUNDA ARUN
PAWAR ATUL GOVIND

DERVANKAR PRACHI PRAKASH
MANE MALHARI SHANKAR
MORE SUSHAMA SUJIT
SAWANT NITIN NANDKUMAR
SHETTY RAKESH VYENKAPPA

GHUMARE BALWANT NARAHARI
HARPUDE SHWETA SUNIL
KADU ANJALI ATUL
PATIL SANCHITA SANTOSH

DAGADE PUSHPA HARISHCHANDRA
GOSAVI NILAM SURENDRA
HAJARE RAMCHANDRA RAGHO
THOMBARE SOMNATH MARUTI
VICHARE YAMUTAI BALAJI

BOBADE PUNAM PRALHAD
CHANDAN MADHURA MAHENDRA
DALIMBKAR RAHUL PRALAHAD
DOLAS RUPESH PANDURANG
GAIKWAD TRISHARAN RAJU

LAD RAJESH RAMESH
MANJARE SWAMINI DEVENDRA
OSWAL ASHOK DHARAMACHAND
PATANGE RUPALI SURENDRA

GAIKWAD UMESH SHRIRANG
JADHAV ANITA UTTAM
KANITKAR MAHENDRA MUKUNDRAO
MORE SARITA GANESH
MORE VAISHALI DEEPAK
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.