८५ ऍप्स मोबाईलमध्ये असतील तर लगेचच डिलीट करा, गूगलनं यादी केली जाहीर
गूगलनं नुकतीच धोकादायक मोबाईल ऍप्लिकेशन्सची एक यादीच जाहीर केली आहे. या ८५ ऍप्सपैंकी एखादे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर ते धोकादायक ठरू शकते. हे ऍप्स तुमच्या फोनमध्ये असणाऱ्या माहितीवर नजर ठेवून आहेत. उल्लेखनीय म्हणजे, हे ऍप गूगल प्ले स्टोअरवरूनही हटवण्यात आलेत. परंतु, त्याआधीच तुम्ही ते डाऊनलोड केले असतील तर आता तुम्हालाच तुमच्या मोबाईलमधील खालील सर्व ऍप डिलीट करावे लागणार आहेत. हटवण्यात आलेल्या ८५ ऍप्समध्ये व्हायरचा धोका होता. हे ऍप तुमच्या फोनमध्ये पूर्ण स्क्रीनभर जाहिरात दाखवून मोबाईलच्या बॅकग्राऊंडमध्ये चालू राहतात तसेच तुमच्या फोनच्या अनलॉकिंग फंक्शन्सवरही ते नजर ठेवतात. एकप्रकारे युझर्सची गुप्तहेरगिरीचे काम हे ऍप करतात. जपानची सायबर सिक्युरिटी आणि डिफेन्स कंपनी Trend Micro नं दिलेल्या माहितीनुसार, हे ऍप्स आत्तापर्यंत ९० लाख मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यात आलेत. धोकादायक ८५ ऍप्सच्या लिस्टमधील 'Easy Universal Remote’ हे एक ऍप जवळपास ५० लाख मोबाईलमध्ये डाऊनलोड झाली आहेत.
हे आहेत धोकादायक ऍप्स
फेसबुक युझरच्या माहितीची देखील होत आहे चोरी!
भारतात सोशल मिडीयाच्या वापराबाबत जनजागृती नसल्याने वापरकर्ते यांच्या अज्ञानामुळे फेसबुकसह अनेक सोशल मिडीयाच्या युझरची वैयक्तीक माहितीची देखील होत आहे चोरी होतच आहे. या माहितीचा वापर निवडणुकांसह व्यवसायिकांसाठी केला जातो. फेसबुक युझरची माहिती मिळविणारे facebook asstractor चे अनेक प्रकारचे Apps/software यांचा वापर होत आहे.लोकसभा निवडणुकांची फेसबुक कंपनीची व्यावसायिक तयारी
आगामी लोकसभा निवडणुका या फेसबुक आणि मार्क झुकरबर्गसाठी टॉप प्रायोरिटी असल्याचा दावा फेसबुकच्या ग्लोबल पॉलिटिक्स आणि गव्हरमेंट आऊटरिच विभागाने केला आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकीकडे फेसबुक, भारत सरकार आणि भारतीय मतदार-जनता यांच्यासोबतचे संबंध अधिक व्यापक करण्याची एक संधी म्हणून पाहात आहे. या माध्यमातून व्यवसाय वृद्धिंगत करण्याचाही फेसबुकचा प्रयत्न करीत आहे. सार्वत्रिक निवडणुकांना जेमतेम चार महिन्यांचा अवधी शिल्लक असताना, फेसबुकमधील महत्त्वाच्या नियुक्त्या, जाहिरातीचे पारदर्शक धोरण यावर फेसबुकने काम सुरु केले आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुका तसेच बांगलादेश, ब्राझिल आणि अमेरिकेतील निवडणुकांच्या अनुभवातून भारतात काय काय धोरणे राबवायची याचा अभ्यास केला जात आहे. फेसबुकच्या ग्लोबल पॉलिटिक्स संचालक केटी हरबथ यांच्या मते भारतातील सार्वत्रिक निवडणूक ही फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि सीओओ शेरील सँडबर्ग यांच्यासाठीही टॉप प्रायोरिटी आहेत. फेसबुकवर प्रत्येक यूजरला त्याच्या प्रोफाईलवर किंवा पेजवर माहिती पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य असते. फेसबुकप्रमाणेच फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामच्या बाबतीतही हीच पावले उचलण्यात येणार आहे. खोट्या आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी फेसबुक समूह यथाशक्ती प्रयत्न करणार आहे. भारतात फेसबुक आणि इन्स्टाग्राम निवडणूक आयोगासोबत काम करणार आहे. फेसबुक भारतीय निवडणुकांवर ऑक्टोबर 2017 पासूनच काम करत आहे. तेव्हापासून झालेल्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकातून फेसबुक नव्याने काही ना काही बोध घेत आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष तसंच उद्योगांकडून येणाऱ्या जाहिरातींबाबतही फेसबुकने व्यापक धोरण ठरवले आहे. भारतासारख्या बहुभाषिक देशात काम करण्यासाठी फेसबुकने वेगवेगळ्या भाषांचे जाणकार असलेल्या गटांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमधील मजकुराचा नेमका अर्थ आणि त्याचा प्रभाव याचा माग काढणे सहज शक्य होणार आहे. राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षांच्या विचारधारेशी साम्य असलेल्या काही त्रयस्थ संस्था त्यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. काही वृत्तसंस्था तसंच प्रसारमाध्यमेही असा छुपा प्रयत्न करतात. त्याचा माग घेणे भारतात तुलनेने अवघड आहे.केबल टीव्हीसाठी TRAI चे नवे नियम: कसे निवडाल स्वस्त आणि मस्त चॅनल्स पॅक्स?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अलिकडेच केबल टीव्ही प्रेक्षकांसाठी नवे नियम सुरु केले आहेत. ट्रायच्या नव्या नियमानुसार, तुम्ही जे चॅनल्स पाहता त्याच चॅनल्सचे चार्जेस तुम्हाला भरावे लागतील. यानुसार प्रत्येक चॅनल्ससाठी फेअर प्रायसिंग मॉड्ल्स लागू करण्यात आले आहे. ट्रायचे हे नवे नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. त्यापूर्वी जाणून घेऊया स्वस्त आणि मस्त चॅनल्स पॅकची निवड कशी करायची?बेस पॅक
चॅनलची निवड करण्यापूर्वी बेस पॅक कोणते असते, हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण बेस पॅक घेणे, हे ग्राहकांसाठी अनिवार्य आहे. या बेस पॅकमध्ये 100 नॉन-एचडी फ्री टू एअर चॅनल्स फ्री मिळतील. बेस पॅकची किंमत 130 रुपये आहे. याशिवाय टॅक्स वेगळे द्यावे लागतील. डिटीएच सेवा देणारी कंपनी एअरटेलच्या बेस पॅकची किंमत 99 रुपये आहे.
बुकेट पेड चॅनल्स
बेस पॅक शिवाय तुम्ही अधिक चॅनल्सची निवड करु शकता. या सर्व पेड चॅनल्सचे मासिक किंमत ठरलेली आहे. हे सर्व चॅनल्स कॉम्बो मध्ये घेतल्यास यावर डिस्काऊंट मिळेल. हे चॅनल्स तुम्ही भाषा आणि ठिकाणानुसार निवडू शकता. हे चॅनल्स तुम्ही बेस पॅकसह जोडू शकता. एकत्र 9 बुकेट चॅनल्स सब्सक्राईब करणे हे अधिक स्वस्त पडते.
चॅनल्सची निवड
बेस पॅक आणि बुकेट पॅकमध्ये आपल्या आवडीचे चॅनल्स निवडणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या मासिक बजेटनुसार एसडी किंवा एचडी चॅनल्सची निवड करु शकता. काही ब्रॉडकास्टर्सच्या यादीत 535 फ्री-टू-एअर चॅनल्स आणि 330 पेड चॅनल्स रजिस्टर आहेत. त्यामुळे या चॅनल्सची निवड करण्यापूर्वी तुम्हाला कोणते चॅनल्स पाहायला आवडेल, तुमचे मासिक बजेट काय आहे, हे ठरवा. त्यामुळे चॅनल्सची निवड करणे सोपे होईल.
31 जानेवारी अंतिम तारीख
प्रेक्षकांना आपल्या आवडीचे चॅनल्स निवडण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने 31 जानेवारी ही अंतिम तारीख दिली आहे. 31 जानेवारी 2019 तुम्ही या चॅनल्सची निवड करु शकता. जर तुम्ही तुमच्या आवडीचे चॅनल्सची निवड न केल्यास तुम्हाला फक्त बेस पॅक मिळेल. पॅकची निवड करण्यासाठी तुम्हाला केबल ऑपरेटर्स किंवा डिटीएच सर्व्हिस प्रॉव्हायडर्सशी संपर्क करावा लागेल.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
Click here Pay Now- https://bit.ly/2Vo7a37
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
=============0===========0==========0==========
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.