नमो अॅप सर्वेक्षणाची भाजप खासदारांना धास्ती
सर्वेक्षणात विचारलेले प्रश्न -
क्या आपको लगता है कि सरकार की कार्यप्रणाली सुधर रही है? (हां या नहीं)
देशातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्या खासदारांबद्दल, भाजप सरकारच्या कामाबद्दल आणि विविध योजनांबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी भाजप नमो अॅपच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये खासदारांबद्दल अनेक प्रश्न असून त्यातून बऱ्याच गोष्टी चव्हाट्यावर येणार आहेत. भाजप खासदारांची लोकसभा निवडणुकांची ही पूर्वपरीक्षा असल्याने खासदार धास्तावले आहेत. देशातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्या खासदारांबद्दल, भाजप सरकारच्या कामाबद्दल आणि विविध योजनांबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी भाजप नमो अॅपच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये खासदारांबद्दल अनेक प्रश्न आहेत. मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती, केंद सरकारने साध्य केलेल्या प्रगतीबाबत तसेच उज्ज्वला, सौभाग्य, स्वच्छ भारत मिशन सारख्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किती प्रयत्न केले?, असे अनेक प्रश्न या सर्व्हेच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत. तुमच्या जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय तीन भाजपा नेत्यांची नावे सांगा, असाही एक प्रश्न यामध्ये आहे. यातून एखाद्या मतदारसंघांमध्ये कोणाला निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबतचा अंदाज पक्षनेतृत्वाला घेता येणार आहे. भाजपचे सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधून निवडले गेले होते. या सर्वच राज्यांमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनेक खासदारांनी मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजनांचे प्रसार, प्रचार व सवांद कार्य केलेले नाही अशा खासदरांचे धाबे दणाणले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने या सर्व्हेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या सर्वेक्षणातून काय कल येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान यापूर्वी भाजपने 'नमो अॅप'च्या माध्यमातून पक्षासाठी देणगी जमा केली होती. या अॅपद्वारे पक्षनिधीत ५ रुपये ते १ हजार रुपये इतकी देणगी जमा करावी, असे आवाहन कार्यकर्ते व हितचिंतकांना करण्यात आले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज 'नमो अॅप'च्या माध्यमातून १ हजार रुपयांची देणगी जमा केली होती. या देणगीची पावती ट्विटरवर पोस्ट करत शहा यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. सार्वजनिक जीवनात पारदर्शकता आणण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हा. तुमचे छोटंसे दान 'महान भारत' घडवण्यासाठी मोठे पाऊल ठरेल, असे शहा यांनी ट्विटमध्ये नमूद केले होते. त्यांच्या या आवाहनाला भरघोस पाठींबा कार्यकर्ते व नागरीकांनी दिला होता.
'नमो अॅप' वरून कोट्यावधींची कमाई!
'नमो अॅप' वरून सर्वाधिक खरेदी ही भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधून आणि देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. गेल्या महिन्यापासून पेटीएम आणि अॅमेझॉनसारख्या माध्यमातूनही ‘नमो’ ब्रॅण्डच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नमो टी-शर्ट नमो अॅपवर 499 रुपयांना उपलब्ध आहेत. एकूण विक्री झालेल्या वस्तूंपैकी 50 टक्के टी-शर्टस आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त नमो ब्रॅण्डच्या वस्तूंवर विशेष सेल अंतर्गत सवलत देण्यात आली होती. या काळामध्ये विकल्या गेलेल्या टी-शर्टमधून एकूण 2 कोटी 64 लाखांची कमाई झाली. टी-शर्टसबरोबरच 56 लाखांच्या टोप्या, 43 लाखांचे किचैन्स, 37 लाखांचे कॉफी मग व 32 लाखांच्या वह्या विकल्या गेल्या आहेत. शिवाय, नमो ब्रॅण्डच्या पेन विक्रीमधून 38 लाखांची कमाई झाली आहे.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now-
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========
=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
https://bit.ly/2Vo7a37
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्येClick here Pay Now-
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.