Tuesday, 15 January 2019

Karnataka govt. कर्नाटक सरकारवर संक्रांत! दोन आमदारांनी काढला पाठिंबा

काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये



2 Independent MLAs, H Nagesh and R Shankar, withdraw their support from Karnataka govt.

संक्रातीच्या मुहुर्तावर कर्नाटकातल्या आघाडी सरकारवर संक्रांत येण्याची शक्यता आहे. मंगळवारी अपक्ष आमदार एच नागेश आणि केपीजेपीचे आमदार आर शंकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी भाजपचे १०४, काँग्रेसचे ८० तर जेडीएसचे ३७ आमदार आहेत. बसपा, केपीजेपी आणि अपक्ष असे प्रत्येकी एक आमदार आहे. भाजपाने जेडीएस-काँग्रेसचं आघाडी सरकार पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे. काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतल्या रेनिसन्स हॉटेलमध्ये असल्याचे उघड झाले आहे. तसेच भाजपाच्या सर्व आमदारांना गुरूग्राममध्ये ठेवण्यात आले आहे. तर आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यातील २२४ जागांपैंकी भाजपकडे १०४, काँग्रेस ८०, जेडीएस ३७, बीएसपी - १, केपीजेपी १ आणि अपक्षकडे १ जागा आहे. काँग्रेसनं जेडीएससोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं होते. एच. नागेश आणि आर. शंकर अशी या दोन अपक्ष आमदारांची नावे आहेत. मंगळवारी त्यांनी राज्यपालांकडे लिखीत स्वरुपात आपला राजीनामा सोपवला आहे. “कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएस यांच्या युती सरकारमधून आम्ही ताबडतोब बाहेर पडत आहोत. त्यामुळे आपण आमच्या राजीनाम्यावर तत्काळ कार्यवाही करावी, असे या दोन्ही आमदारांनी राज्यपालांकडे पाठवलेल्या आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.दरम्यान, आमदार आर. शंकर यांनी म्हटले की, आज मकरसंक्रांती आहे. या दिनानिमित्त आम्हाला सरकार बदलायचे आहे. आम्हाला काम करणारे सरकार हवे आहे त्यामुळे आज आम्ही कर्नाटक सरकारमधून पाठींबा काढत आहोत.आमदार एच. नागेश म्हणाले, एका चांगल्या आणि स्थिर सरकारसाठी मी कर्नाटकतील युती सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, यामध्ये सरकार अपयशी ठरले आहे. काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे स्थिर सरकार स्थापण्यासाठी मी भाजपासोबत जाण्याचे ठरवले आहे.सरकारमधून दोन आमदार बाहेर पडल्याबद्दल माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, आमदार जरी सरकारमधून बाहेर पडले असले तरी त्यांचा आकडा किती आहे? मी पूर्णपणे निवांत आहे कारण मला माझी क्षमता माहिती आहे. गेल्या आठवड्यापासून माध्यमांमध्ये जे काही सुरु आहे ते मी एन्जॉय करीत आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://bit.ly/2Vo7a37

=============0===========0==========0==========

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.