Wednesday 23 January 2019

#Priyanka Gandhi #प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती

प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य



लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठी खेळी खेळली असून प्रियंका गांधी यांची पक्षात महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून पक्षातील कार्यकर्ते प्रियंका गांधी यांनी सक्रीय राजकारणात यावे, अशी मागणी करत होते. आता प्रियंका गांधी यांना औपचारिकरित्या पक्षात पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. प्रियंका गांधी या निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रचार करायच्या. मात्र, त्यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नव्हते. गेल्या काही वर्षांपासून प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची धूरा सोपवण्याची मागणी केली जात होती.  ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पक्षात पद दिले आहे. प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून फेब्रुवारीपासून त्या पदभार स्वीकारतील. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्रियंका गांधी वडेरा यांना दिलेली जबाबदारी महत्त्वाची आहे. याचा फायदा फक्त पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत मर्यादित राहणार नाही, याचा फायदा सर्वत्र होईल, असे व्होरा यांनी सांगितले. प्रियंका गांधींसह ज्योतिरादित्य सिंधिया यांची उत्तर प्रदेश पश्चिममधील महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच के सी वेणुगोपाल यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील विजयाची गणिते देशाची गणिते ठरविते, हे म्हणतात ते चुकीचे नाही. कारण, उत्तर प्रदेशातील 80 जागा या संसदेत कोण बसविणार हे ठरवत असते. 2014 मध्ये पण असेच झाले होते. भाजपने एक हाती जागा जिंकून देशभरात कमळ फुलविले होते. आता याच उत्तर प्रदेशने काँग्रेसने आपला हुकुमी एक्का उतरवत भाजपसह समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांना खुले आव्हान दिले आहे. सप आणि बसपने आघाडी करत काँग्रेसला दूर ठेवले होते. याला उत्तर म्हणून काँग्रेसने प्रियंका गांधींना सरचिटणीस पद देऊन पूर्व उत्तर प्रदेशचे प्रभारी केले आहे. पूर्व उत्तर प्रदेश म्हणजे काँग्रेसचे दोन बालेकिल्ले अमेठी आणि रायबरेली याच भागात येतात. याबरोबरच नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसीही याच भागात येतो. त्यामुळे काँग्रेस या भागात कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्याच दिसणाऱ्या प्रियांका गांधी यांच्याविषयी काँग्रेस पक्षात प्रचंड आकर्षण आहे. प्रियांका गांधी यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय व्हावं अशी काँग्रेसमधील एक गटाची तीव्र भावना आहे. तशा मागण्या आजवर अनेकदा झाल्या. मात्र, प्रियांकांनी स्वत:ला गांधी कुटुंबाच्या परंपरागत मतदारसंघापुरतं मर्यादित ठेवलं होतं. अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघातच आजवर त्या प्रचार करताना दिसायच्या. आता मात्र काँग्रेस पक्षानं त्यांना अधिकृत जबाबदारी दिली आहे.  दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुल फेल झाल्यामुळेच प्रियांकाला आणले-भाजप

प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर भाजपने तिरकस टीका केली आहे. 'राहुल गांधी हे नापास झाल्यानेच काँग्रेसला प्रियांका यांचा आधार घ्यावा लागला आहे. राहुल यांच्या नाकर्तेपणाची ही जाहीर कबुलीच आहे,' अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.