लोकसभा निवडणूक - २०१९ मध्ये रुपेरी पडद्यावरही प्रचाराची धूम!
'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर', 'ठाकरे', 'एनटीआर', 'द आयरन लेडी' आणि 'ताशकंद' सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
राजकारणामध्ये पूर्वजांची सहानभुती मिळवून निवडणूक जिंकणे सोयीचे जावे, मतदारांमध्ये अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी राजकीय व्यक्ती व पक्षांकडून चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून निवडणूक प्रचार करण्यात येणार आहे. तसेच विरोधकांच्या प्रतिमा मलीन करून प्रतिकूल वातावरण निर्माण करण्यासाठी राजकीय व्यक्ती व पक्षांकडून चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून निवडणूक प्रचार करण्याचा फंडा अलीकडील काळात वापरला जात आहे. आगामी निवडणुकांसाठी ५ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामधील एका चित्रपटाबाबत न्यायालयाने निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अजून काही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत यामध्येही आक्षेपार्ह टीका टिप्पणी असल्यास विरोध न्यायालयीन लढाया सुरूच राहतील अशी शक्यता आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून कल्पकतेने निवडणूक प्रचार केला जातो. आता चित्रपटाच्या माध्यमाचा निवडणुकीतील प्रचारासाठीचा वापर कितपत यश मिळवून देईल हे आगामी निवडणुकांच्या निकालावरून दिसून येईलच. संसदेनंतर आता सिनेसृष्टीत देखील राजकारणाचे वातावरण पाहायला मिळत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' यांच्यापाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच या सिनेमाचा पोस्टर रिलिज झाला असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारणार आहे. 2019 या वर्षी लोकसभा निवडणुका देखील आहेत. यासोबतच भारतीय सिनेमांमधून अनेक मोठ्या नेत्यांचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
चित्रपट पाहून कोणी मत देत नाही
शिवसेनेचे नेते संजय राऊत हे १४ तारखेला 'ठाकरे' सिनेमाबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत, असे पवार म्हणाले. सध्या 'ठाकरे', 'द अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर' आणि 'पीएम नरेंद्र मोदी' हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यातील तुम्ही कोणता चित्रपट बघणार असा प्रश्न पत्रकारांनी पवार यांना केला होता. 'मी गेल्या ४० वर्षात कुठलाही चित्रपट बघितला. समाजातील बहुतेक क्षेत्रामध्ये फिरत असल्याने चित्रपट बघण्याची गरज पडली नाही. पण चित्रपट बघून कुणी मत देत नाही, अशी 'टिप्पणी शरद पवार यांनी यावेळी केली. पंतप्रधान मोदींची जुमलेबाजी सुरू आहे. देशात त्यांच्याविरोधात असंतोष आणि संतप्त वातावरण आहे. त्यामुळे अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला. जनतेमध्ये सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे, असे पवार म्हटले आहे. लोकसभेसाठी राज्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत ३ नव्हे ८ जागांवर तिढा आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाच्या वंचित आघाडीबाबतही पवार यांनी मत व्यक्त केले. ओवेसी वगळून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्यावर पक्षात चर्चा सुरू आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
2019 यावर्षी राजकारणाशी संबंधित प्रदर्शित होणारे चित्रपट खालीलप्रमाणे-
द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर
'ठाकरे'
पाकिस्तानी उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांच्या 'मंटो'या बायोपिकनंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या 'ठाकरे' या सिनेमामुळे खूप चर्चेत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सिनेमावर हा सिनेमा आधारलेला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे करत आहे. हा सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
'एनटीआर'
खूप दिवसांपासून सिनेमा सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एन.टी.रामा राव यांच्या जीवनावरील बायोपिक खूप चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर खूप चर्चेत आलं आहे. त्यांच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन आणि रकुल प्रीत सारख्या अभिनेत्री आहेत. एन.टी.रामा राव आंध्रप्रदेशचे दहावे मुख्यमंत्री आहेत.
'द आयरन लेडी'
दक्षिण भारताची दिग्गज अभिनेत्री आणि राजकीय व्यक्तिमत्व जयललिता यांच्यावर बायोपिक तयार होत आहे. जयललिता या साऊथ सिनेमांमधील हिरोईन आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री देखील राहिल्या आहेत. जयललिता यांच 5 डिसेंबर 2016 रोजी निधन झालं असून 1991 ते 2016 पर्यंत राजकारणात सक्रीय होत्या. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री नित्या मेनन जयललिता यांची भूमिका साकारत आहे.
'ताशकंद'
------------------------------------------------------------------
The Accidental Prime Minister : अनुपम खेर यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि अन्य १३ जणांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील स्थानिक न्यायालयाने दिले आहेत. द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या आगामी चित्रपटाविरोधात ऍडव्होकेट सुधीर ओझा यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी स्थानिक न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने अनुपम खेर आणि अन्य १३ जणांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीवर आधारित द ऍक्सिडेंटर प्राईम मिनिस्टर चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) कार्यकाळात डॉ. मनमोहन सिंग सलग १० वर्षे देशाचे पंतप्रधान राहिले होते. त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या निर्णयांवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका सोमवारी फेटाळण्यात आली होती. पण मुझफ्फरनगरमधील न्यायालयाने या प्रकरणी अनुपम खेर आणि अन्य १३ जणांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. युपीए २ मधील डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. या काळात सरकारवर विविध भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. त्याचबरोबर गांधी कुटुंबियांचे सरकारवर असलेले नियंत्रणही वादग्रस्त ठरले होते. त्यातच आता लोकसभेची निवडणूक तीन महिन्यांवर आली असताना हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येत असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट आधी आम्हाला दाखविण्यात यावा आणि मगच प्रदर्शित केला जावा, अशीही मागणी काही नेत्यांनी केली होती. डॉ. मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. सुधीर ओझा यांनी आपल्या याचिकेत केलेल्या तक्रारीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांची भूमिका निभावत अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. यामुळे मला आणि अनेकांना वाईट वाटलं असल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. तक्रारीत त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वड्रा यांच्याही प्रतिमेला धक्का लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यां विरोधातही तक्रार करण्यात आली आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
https://bit.ly/2Vo7a37
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्येClick here Pay Now-
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.