Friday 25 January 2019

#pune gram panchayat election 2019 पुणे जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर;२४ फेब्रुवारीला मतदान

राज्यातील २६४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर;२४ फेब्रुवारीला मतदान


पुणे जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींसह राज्यातील २६४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम  जाहीर करण्यात आलेला असून २४ फेब्रुवारीला मतदान घेण्यात येणार आहे. जाहीर झालेल्या पुणे विभागातील ग्रामपंचायतींची संख्या ७२ असून त्यामध्ये सर्वाधिक सातारा जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींचा निवडणूक जाहीर झालेल्यांमध्ये समावेश आहे. माहे मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्‍या सुमारे 264 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे.

पुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक असलेल्या २२ ग्रामपंचायत तालुका निहाय गावे पुढीलप्रमाणे-
[?] इंदापूर तालुका ग्रामपंचायत(5)- लुमेवाडी,शिरसाटवाडी, अवसरी, भाटनिमगाव व निरनिमगाव
[?] खेड तालुका ग्रामपंचायत(7)- गुळाणी, रौंधळवाडी, आसखेड बु., आंबेठाण, वाशेरे, सायगाव व काडाचीवाडी
[?] मुळशी तालुका ग्रामपंचायत(6)- रावडे, पोमगाव, भुगाव, मारणेवाडी, कुंभेरी व दारवली
[?] वेल्हा तालुका ग्रामपंचायत(3)- सुरवड व वडगाव झांजे.
[?] शिरूर तालुका ग्रामपंचायत(1)- कासारी
[?] दौंड तालुका ग्रामपंचायत(1)- एकरेवादी

निवडणूक कार्यक्रम

         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे             : 4 ते 9 फेब्रुवारी 2019
         नामनिर्देशनपत्रांची छाननी                 : 11 फेब्रुवारी 2019
         उमेदवारी मागे घेणे                           : 13 फेब्रुवारी 2019 पर्यंत
        निवडणूक‍ चिन्ह वाटप                      : 13 फेब्रुवारी 2019
         मतदान                                           : 24 फेब्रुवारी 2019
         मतमोजणी                                      : 25 फेब्रुवारी 2019
         निकालाची राजपत्रात प्रसिद्धी             : 27 फेब्रुवारी 2019 पर्यंत

पाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी रविवारी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान

कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या रविवारी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार आहे. याबरोबरच पोटनिवडणूक होत असलेली नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय जागा अशी: राजापूर (जि.रत्नागिरी)- 6अ, आळंदी (पुणे)- 9अ, फलटण (सातारा)- 12अ, दुधनी (सोालापूर)- 2ब, पन्हाळा (कोल्हापूर)- 8क, दिंडोरी (नाशिक)- 15, यावल (जळगाव)- 1अ, बीड- 11अ, बुलढाणा- 12ब, अर्जुनी (गोंदिया)- 14, गोरेगाव (गोंदिया)- 14.या जागांसाठी येत्या रविवारी मतदान घेण्यात येणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   

====================================================================



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.