Sunday, 27 January 2019

#Malkapur municipal council election 2019 मलकापूर नगरपरिषद निवडणूक निकाल-2019 ; नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निलम येडगे

मलकापूर नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची बाजी 



मलकापूर नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. नगरपरिषदेसाठी रविवारी 82.36 टक्के मतदान झाले होते. नगरपरिषदेत काँग्रेसने 14 जागांवर विजय मिळवला तर भाजपला केवळ 5 जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निलम येडगे विजयी झाल्या आहेत. येडगे यांना 7 हजार 747 मते तर भाजपच्या उमेदवार सारिका गावडे यांना 7 हजार 477 मते मिळाली. या निवडणुकीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस व भाजप मध्ये चुरस निर्माण झाली होती मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून बाजी मारली आहे.नऊ प्रभागातील प्रभाग क्रमांक एक, तीन, चार, सहा व नऊमध्ये काँग्रेसचे उमेदावर विजयी झाले. भाजपने प्रभाग क्रमांक दोन, व आठमध्ये विजय मिळवला. त्यात प्रभाग क्रमांक पाचमध्ये एक उमेदवार काँग्रेसचा तर एक भाजपचा विजयी झाला. त्यामुळे भाजपचे पाच तर काँग्रेसचे 14 उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक चारमध्ये काँग्रेसच्या भारती पाटील व भाजपच्या अवंतिका घाडगे यांना 662 अशी समान मते मिळाली. त्यांचा निकाल चिठ्ठीव्दारे जाहीर करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी त्या दोघींच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून त्या बॉक्समध्ये टाकल्या. चार वर्षांची लहान मुलगी आराध्या जाधवतर्फे एक चिठ्ठी उघडण्यात आली. ती चिठ्ठी भारती पाटील यांच्या नावाची होती. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.या निवडणुकीत शिवसेना कराड दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशिद यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. याशिवाय माजी नगराध्यक्ष काँग्रेस उमेदवार मोहन शिंगाडे, माजी नगरसेविका भाजपच्या उमेदवार उमा शिंदे, माजी उपसरपंच भाजप उमेदवार सुहास कदम यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तर सातारा जिल्हा परिषदेचे नियोजन समिती सदस्य सविनय कांबळे यांचाही पराभव झाला आहे. त्याचबरोबर मलकापूर नगरपंचायतीमध्ये विरोधी गटनेते म्हणून काम केलेले भाजपचे उमेदवार हणमंतराव जाधव यांनाही पराभवास सामोरे जावे लागले आहे. 

प्रभायनिहाय मतदानाची टक्केवारी अशी : मलकापूर नगरपालिकेत प्रभाग एकमध्ये 1848 मतदारांपैकी 1494, प्रभाग दोनमध्ये 1366 मतदारांपैकी 1154, प्रभाग तीनमध्ये 2461 मतदारांपैकी 2062, प्रभाग चारमध्ये 1692 मतदारांपैकी 1333, प्रभाग पाचमध्ये 1929 मतदारांपैकी 1563, प्रभाग सहामध्ये 1768 मतदारांपैकी 1499, प्रभाग सातमध्ये 1993 मतदारांपैकी 1653, प्रभाग आठमध्ये 2317 मतदारांपैकी 1845, प्रभाग नऊमध्ये 3256 मतदारांपैकी 2740 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये 9770 पुरूष मतदारांपैकी 8120 जणांनी मतदान केले. तर 8860 महिला मतदारांपैकी 7223 महिलांनी मतदान केले होते. एकूण 18630 मतदारांपैकी 15343 मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला होता. 


 साताऱ्यातील मलकापूर नगरपरिषद 

एकूण जागा 19 : काँग्रेस विजयी

काँग्रेस : 14

भाजप : 5

नगराध्याक्ष : नीलम येडगे (काँग्रेस)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   


====================================================================







No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.